मालवण रॉक गार्डनमध्ये आता प्रवेश कर  मालवण (सिंधुदुर्ग) - येथे येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या रॉक गार्डनमध्ये म्युझिक फाउंटन बसविण्यात आल्याने गार्डनमध्ये पर्यटकांची गर्दी वाढत आहे. गार्डनच्या देखरेखीवर खर्चही वाढत असल्याने आता गार्डनमध्ये प्रवेश कर आकारण्यात येणार आहे. पालिकेच्या ऑनलाईन सभेत हा निर्णय घेण्यात आला असून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यात प्रत्येकी पाच रुपये कर घेण्याचे निश्‍चित करण्यात आले असून यामुळे पालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार असल्याचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सांगितले.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन केंद्र असणाऱ्या शहरात पालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या रॉक गार्डनला अलीकडच्या काही वर्षात पर्यटक मोठी पसंती देत आहेत. समुद्र किनारी खडकाळ भागात हिरवळ आणि विविध फुल झाडांनी बहरलेल्या या गार्डनमध्ये पालिकेने रंगीबेरंगी एलईडी लाईट, हायमास्ट टॉवर, छोटेखानी तलाव, मुलांसाठी खेळणी उभारून गार्डनच्या सौंदर्यात भर घातली. यात आणखी भर म्हणून नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा वार्षिक योजना पर्यटन निधींतून एक कोटी खर्चाचा म्युझिकल फाउंटन प्रकल्प उभारण्यात आला आहे. कलरफुल लाईट आणि म्युझिकच्या तालावर उडणारे पाण्याचे कारंजे सर्वांचे आकर्षण ठरत आहेत. सायंकाळी सूर्यास्ताचा नजारा आणि फाउंटनचा आनंद लुटण्यासाठी सध्या गार्डनमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. रॉक गार्डन देखभाल व दुरुस्तीसाठी दोन वर्षासाठी 95 हजार रुपये खर्च होणार आहे. पालिका ही क वर्ग पालिका असल्याने उत्पन्नाचे मोठे साधन नाही.  ...म्हणून निर्णय  रॉक गार्डनच्या देखभाल दुरुस्तीसाठी शासनाकडून अनुदान प्राप्त होत नाही. हा आर्थिक बोजा पालिकेवर पडतो. म्हणून नाममात्र प्रवेश फी आकारण्यात आल्यास हा बोजा पडणार नसल्याने रॉक गार्डन प्रवेशासाठी प्रत्येकी पाच रुपये कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. रॉक गार्डन मध्ये प्रवेश कर आकारावा, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती, आता ही मागणी पूर्ण होऊन प्रत्यक्षात कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, December 28, 2020

मालवण रॉक गार्डनमध्ये आता प्रवेश कर  मालवण (सिंधुदुर्ग) - येथे येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या रॉक गार्डनमध्ये म्युझिक फाउंटन बसविण्यात आल्याने गार्डनमध्ये पर्यटकांची गर्दी वाढत आहे. गार्डनच्या देखरेखीवर खर्चही वाढत असल्याने आता गार्डनमध्ये प्रवेश कर आकारण्यात येणार आहे. पालिकेच्या ऑनलाईन सभेत हा निर्णय घेण्यात आला असून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यात प्रत्येकी पाच रुपये कर घेण्याचे निश्‍चित करण्यात आले असून यामुळे पालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार असल्याचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सांगितले.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन केंद्र असणाऱ्या शहरात पालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या रॉक गार्डनला अलीकडच्या काही वर्षात पर्यटक मोठी पसंती देत आहेत. समुद्र किनारी खडकाळ भागात हिरवळ आणि विविध फुल झाडांनी बहरलेल्या या गार्डनमध्ये पालिकेने रंगीबेरंगी एलईडी लाईट, हायमास्ट टॉवर, छोटेखानी तलाव, मुलांसाठी खेळणी उभारून गार्डनच्या सौंदर्यात भर घातली. यात आणखी भर म्हणून नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा वार्षिक योजना पर्यटन निधींतून एक कोटी खर्चाचा म्युझिकल फाउंटन प्रकल्प उभारण्यात आला आहे. कलरफुल लाईट आणि म्युझिकच्या तालावर उडणारे पाण्याचे कारंजे सर्वांचे आकर्षण ठरत आहेत. सायंकाळी सूर्यास्ताचा नजारा आणि फाउंटनचा आनंद लुटण्यासाठी सध्या गार्डनमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. रॉक गार्डन देखभाल व दुरुस्तीसाठी दोन वर्षासाठी 95 हजार रुपये खर्च होणार आहे. पालिका ही क वर्ग पालिका असल्याने उत्पन्नाचे मोठे साधन नाही.  ...म्हणून निर्णय  रॉक गार्डनच्या देखभाल दुरुस्तीसाठी शासनाकडून अनुदान प्राप्त होत नाही. हा आर्थिक बोजा पालिकेवर पडतो. म्हणून नाममात्र प्रवेश फी आकारण्यात आल्यास हा बोजा पडणार नसल्याने रॉक गार्डन प्रवेशासाठी प्रत्येकी पाच रुपये कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. रॉक गार्डन मध्ये प्रवेश कर आकारावा, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती, आता ही मागणी पूर्ण होऊन प्रत्यक्षात कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/34RPYt8

No comments:

Post a Comment