आठवड्यात दोन दिवस प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे बंधनकारक - डॉ. राजेश देशमुख पुणे - जिल्ह्यात यंदा "स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण आणि "माझी वसुंधरा अभियान' प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या क्षेत्रांमध्ये उपाययोजना करण्यासाठी सर्व मुख्याधिकाऱ्यांना दर आठवड्यात दोन दिवस प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.  या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत. "स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण-2021 साठी मार्च महिन्यात केंद्रीय समितीमार्फत पाहणी होणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील नगरपालिकांनी उत्कृष्ट कामगिरी करणे आवश्‍यक आहे. त्या अनुषंगाने सर्व मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रात अभियानांतर्गत दिलेल्या घटकांची प्रभावी अंगलबजावणी करणे आवश्‍यक आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून सहभाग नोंदवणे आवश्‍यक आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा "माझी वसुंधरा अभियाना'ची प्रभावी अंमलबजावणी करीता पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाच्या कार्यपद्धती निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार जल, अग्नी, वायू, पृथ्वी आणि आकाश या पंचतत्वाशी संबंधित बाबींना महत्त्व देण्यात येणार आहे. वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण इत्यादी बाबींवर कार्य करणे. हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदुषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे. नदी संवर्धन, सागरी जैवविविधता, जलस्त्रोतांचे व संरक्षण आणि ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडीक जमिनी, शेतीच्या बांधावर राबविण्यात येणार आहेत. तसेच, मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे जनमानसात बिंबविणे या प्रमुख बाबींचा समावेश आहे. या अभियाना अंतर्गत निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर केलेल्या कामाचे मुल्यमापन करणेसाठी दीड हजार गुण ठेवण्यात आले आहेत.  सत्यजित तांबेचे संधीसाधू राजकारण संपूर्ण राज्याला माहित आहे - अंकिता पाटील स्वच्छ सर्वेक्षणात या घटकांना प्राधान्य :  नगरपालिका क्षेत्रातील घनकचरा संकलन, शंभर टक्‍के ओला आणि सुका कचरा वर्गीकरण, कचरा वाहनांना जीपीएस यंत्रणा, ओला कचऱ्यावर प्रक्रिया, घनकचरा जागेवर प्रक्रिया, नाला व गटर सफाई, योजनेत नागरिकांचा सहभाग, सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरूस्ती आणि सफाई, नागरिकांच्या स्वच्छता ऍपवरील तक्रारींवर मुदतीत उपाययोजना या घटकांना प्राधानय देण्यात येणार आहे.  पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल स्वच्छता अभियानाच्या अंमलबजावणीच्या कालावधीत सर्व बाबींवर प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष देणे आवश्‍यक आहे. सर्व मुख्याधिकाऱ्यांना प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत कामाचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे अनिवार्य राहील.  - डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 30, 2020

आठवड्यात दोन दिवस प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे बंधनकारक - डॉ. राजेश देशमुख पुणे - जिल्ह्यात यंदा "स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण आणि "माझी वसुंधरा अभियान' प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या क्षेत्रांमध्ये उपाययोजना करण्यासाठी सर्व मुख्याधिकाऱ्यांना दर आठवड्यात दोन दिवस प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.  या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत. "स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण-2021 साठी मार्च महिन्यात केंद्रीय समितीमार्फत पाहणी होणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील नगरपालिकांनी उत्कृष्ट कामगिरी करणे आवश्‍यक आहे. त्या अनुषंगाने सर्व मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रात अभियानांतर्गत दिलेल्या घटकांची प्रभावी अंगलबजावणी करणे आवश्‍यक आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून सहभाग नोंदवणे आवश्‍यक आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा "माझी वसुंधरा अभियाना'ची प्रभावी अंमलबजावणी करीता पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाच्या कार्यपद्धती निश्‍चित करण्यात आली आहे. त्यानुसार जल, अग्नी, वायू, पृथ्वी आणि आकाश या पंचतत्वाशी संबंधित बाबींना महत्त्व देण्यात येणार आहे. वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण इत्यादी बाबींवर कार्य करणे. हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदुषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे. नदी संवर्धन, सागरी जैवविविधता, जलस्त्रोतांचे व संरक्षण आणि ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडीक जमिनी, शेतीच्या बांधावर राबविण्यात येणार आहेत. तसेच, मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे जनमानसात बिंबविणे या प्रमुख बाबींचा समावेश आहे. या अभियाना अंतर्गत निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर केलेल्या कामाचे मुल्यमापन करणेसाठी दीड हजार गुण ठेवण्यात आले आहेत.  सत्यजित तांबेचे संधीसाधू राजकारण संपूर्ण राज्याला माहित आहे - अंकिता पाटील स्वच्छ सर्वेक्षणात या घटकांना प्राधान्य :  नगरपालिका क्षेत्रातील घनकचरा संकलन, शंभर टक्‍के ओला आणि सुका कचरा वर्गीकरण, कचरा वाहनांना जीपीएस यंत्रणा, ओला कचऱ्यावर प्रक्रिया, घनकचरा जागेवर प्रक्रिया, नाला व गटर सफाई, योजनेत नागरिकांचा सहभाग, सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरूस्ती आणि सफाई, नागरिकांच्या स्वच्छता ऍपवरील तक्रारींवर मुदतीत उपाययोजना या घटकांना प्राधानय देण्यात येणार आहे.  पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल स्वच्छता अभियानाच्या अंमलबजावणीच्या कालावधीत सर्व बाबींवर प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष देणे आवश्‍यक आहे. सर्व मुख्याधिकाऱ्यांना प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत कामाचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे अनिवार्य राहील.  - डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/34SdgPB

No comments:

Post a Comment