सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 174 शाळा सुरू  सिंधुदुर्गनगरी -  जिल्ह्यातील 247 माध्यमिक शाळांपैकी आतापर्यंत 174 शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण 42 हजार विद्यार्थ्यांपैकी 11 हजार 148 विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली.  राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर कोरोना महामारी बाबतच्या शासन आदेशाचे पालन करत जिल्ह्यातील एकूण 247 माध्यमिक शाळांपैकी आज अखेर 174 शाळा सुरू झाल्या आहेत. नववी ते बारावीपर्यंतच्या एकूण 42 हजार विद्यार्थ्यांपैकी 11 हजार 148 विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे. विद्यार्थ्यांची एकूण संख्या पाहता 26.28 टक्के विद्यार्थी शाळेत उपस्थित राहून शिक्षण घेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनुदानित व विनाअनुदानित अशा 247 माध्यमिक शाळांच्या 2 हजार 393 शिक्षकांपैकी 22 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. 1002 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी 11 कर्मचारी पॉझिटिव्ह आहेत, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली.  माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी असलेल्या माध्यमिक विद्यालयांमध्ये येण्यासाठी एसटी अथवा अन्य कोणत्याही वाहनांची व्यवस्था नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी अद्यापही शाळांपासून दूर आहेत. पर्याय म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले असले तरी ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने बहुसंख्य ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे .तरी शासनाने ग्रामीण भागातील एसटी वाहतूक पूर्ववत सुरू करण्याची गरज आहे तरच शाळांच्या उपस्थितीमध्ये वाढ दिसून येईल, असे यावेळी शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी स्पष्ट केले.  30 हजार 852 विद्यार्थी शाळेपासून दूर  जिल्ह्यातील 247 शाळांमध्ये 42 हजार एवढे विद्यार्थी नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत आहेत; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर एप्रिलपासून शाळा बंद झाल्यानंतर पुन्हा 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानंतर शाळा सुरू झाल्या असल्या तरी अद्यापही जिल्ह्यातील 73 शाळा बंदच आहेत. सुरू झालेल्या शाळांमध्येही अद्याप 100 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती नसल्याचे दिसून येत आहे. संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, December 4, 2020

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 174 शाळा सुरू  सिंधुदुर्गनगरी -  जिल्ह्यातील 247 माध्यमिक शाळांपैकी आतापर्यंत 174 शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण 42 हजार विद्यार्थ्यांपैकी 11 हजार 148 विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली.  राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर कोरोना महामारी बाबतच्या शासन आदेशाचे पालन करत जिल्ह्यातील एकूण 247 माध्यमिक शाळांपैकी आज अखेर 174 शाळा सुरू झाल्या आहेत. नववी ते बारावीपर्यंतच्या एकूण 42 हजार विद्यार्थ्यांपैकी 11 हजार 148 विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे. विद्यार्थ्यांची एकूण संख्या पाहता 26.28 टक्के विद्यार्थी शाळेत उपस्थित राहून शिक्षण घेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनुदानित व विनाअनुदानित अशा 247 माध्यमिक शाळांच्या 2 हजार 393 शिक्षकांपैकी 22 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. 1002 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी 11 कर्मचारी पॉझिटिव्ह आहेत, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली.  माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी असलेल्या माध्यमिक विद्यालयांमध्ये येण्यासाठी एसटी अथवा अन्य कोणत्याही वाहनांची व्यवस्था नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी अद्यापही शाळांपासून दूर आहेत. पर्याय म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले असले तरी ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने बहुसंख्य ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे .तरी शासनाने ग्रामीण भागातील एसटी वाहतूक पूर्ववत सुरू करण्याची गरज आहे तरच शाळांच्या उपस्थितीमध्ये वाढ दिसून येईल, असे यावेळी शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी स्पष्ट केले.  30 हजार 852 विद्यार्थी शाळेपासून दूर  जिल्ह्यातील 247 शाळांमध्ये 42 हजार एवढे विद्यार्थी नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत आहेत; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर एप्रिलपासून शाळा बंद झाल्यानंतर पुन्हा 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानंतर शाळा सुरू झाल्या असल्या तरी अद्यापही जिल्ह्यातील 73 शाळा बंदच आहेत. सुरू झालेल्या शाळांमध्येही अद्याप 100 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती नसल्याचे दिसून येत आहे. संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3lNtUoV

No comments:

Post a Comment