प्लॅस्टिकपासून बनवलेलं घर तुम्ही पाहिलं का? खर्च आला फक्त साडेचार लाख रुपये मंगळूर : प्लॅस्टिक फॉर चेंज इंडिया फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने (एनजीओ) पाचनाडी येथील लँडफिल साइटजवळ टाकलेल्या प्लॅस्टिकचा वापर करून कमला या सेवानिवृत्त महिलेसाठी ३५० चौरस फूट क्षेत्रावर विनामूल्य घर बांधले आहे. एनजीओचे संचालक चंदन एम.सी. यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कमला यांच्या घराच्या बांधकामासाठी आम्ही बटाटा चिप्स आणि ज्याचं रिसायकल करता येणार नाही, अशा प्लॅस्टिक रॅपर्सचा वापर केला आहे. गेल्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने कमला यांच्या घराचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे एनजीओने त्यांना घर बांधून देण्यासाठी मदत करण्याचं ठरवलं.  - Positive Story - महिलेनं दागिने विकून जीम उघडली; फिटनेसनं मिळवून दिली जगात ओळख​ चंदन पुढे म्हणाले, कमलाचे घर बांधण्यासाठी एनजीओने हैदराबादस्थित बांबू हाऊसशी हातमिळवणी केली. त्यानंतर कचरा गोळा करणाऱ्यांकडून रॅग पिकर्स प्लॅस्टिकचे रॅपर्स गोळा केले आणि गुजरातमधील एका फर्मकडे पाठविले. त्या फर्मने रॅपर्सवर प्रक्रिया करून ८ मिमी ते २० मिमी जाडी असलेले पॅनेल तयार केले. आणि ते काँक्रिट फाउंडेशनवर फिट बसविण्यासाठी लोखंडी पट्ट्यांचा वापर केला. अशा प्रकारे आम्ही बांधलेले हे पहिले घर असून या घराचे आयुष्य ३० वर्षे आहे. घराच्या बांधकामासाठी एकूण १५०० किलो नॉन-रिसायकल प्लॅस्टिकचा वापर केला होता. अशा पद्धतीच्या घरांसाठी सौरऊर्जा कनेक्शन देण्यासाठीही एनजीओने तयारी दर्शविली आहे.  - National Press Day : 'मोदी सरकार नेहमीच प्रेसच्या स्वातंत्र्यासाठी कटीबद्ध'​ घर बांधून २ महिने होऊन गेले असून या नव्या, हवेशीर घरात राहून मला खूप आनंद झाला आहे, असं कमला हसत हसत सांगत होती. गेल्या १५ वर्षांपासून कमला या भागात वास्तव्यास आहे. गेल्यावर्षी झालेल्या मुसळधार पावसात तिचे घर खराब झाले होते. आणि हे पाहून एनजीओने तिला तिच्यासाठी घर उभारण्याचे आश्वासन दिले होते.  एनजीओ गेल्या वर्षभरापासून पाचनाडीमधील शंभरहून अधिक रॅग पिकर्स आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. आरोग्य आणि इतर गरजा भागविण्यासाठी एनजीओ या भागात कार्यरत आहे. फेब्रुवारीपासून एनजीओ या भागातील २० मुलांचे ऑनलाइन क्लास घेत आहे, असे चंदन यांनी सांगितले. This house costed around Rs 4.5 lakhs. This is a pilot project and a proof of concept for us. We hope to create more applications of this concept. In 2021, we hope to create 20 homes for waste pickers: Shifrah Jacobs, Chief Impact Officer at Plastic for change India Foundation https://t.co/bdzF3OGc8I — ANI (@ANI) November 14, 2020 - जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा (Edited By : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 16, 2020

प्लॅस्टिकपासून बनवलेलं घर तुम्ही पाहिलं का? खर्च आला फक्त साडेचार लाख रुपये मंगळूर : प्लॅस्टिक फॉर चेंज इंडिया फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने (एनजीओ) पाचनाडी येथील लँडफिल साइटजवळ टाकलेल्या प्लॅस्टिकचा वापर करून कमला या सेवानिवृत्त महिलेसाठी ३५० चौरस फूट क्षेत्रावर विनामूल्य घर बांधले आहे. एनजीओचे संचालक चंदन एम.सी. यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कमला यांच्या घराच्या बांधकामासाठी आम्ही बटाटा चिप्स आणि ज्याचं रिसायकल करता येणार नाही, अशा प्लॅस्टिक रॅपर्सचा वापर केला आहे. गेल्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने कमला यांच्या घराचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे एनजीओने त्यांना घर बांधून देण्यासाठी मदत करण्याचं ठरवलं.  - Positive Story - महिलेनं दागिने विकून जीम उघडली; फिटनेसनं मिळवून दिली जगात ओळख​ चंदन पुढे म्हणाले, कमलाचे घर बांधण्यासाठी एनजीओने हैदराबादस्थित बांबू हाऊसशी हातमिळवणी केली. त्यानंतर कचरा गोळा करणाऱ्यांकडून रॅग पिकर्स प्लॅस्टिकचे रॅपर्स गोळा केले आणि गुजरातमधील एका फर्मकडे पाठविले. त्या फर्मने रॅपर्सवर प्रक्रिया करून ८ मिमी ते २० मिमी जाडी असलेले पॅनेल तयार केले. आणि ते काँक्रिट फाउंडेशनवर फिट बसविण्यासाठी लोखंडी पट्ट्यांचा वापर केला. अशा प्रकारे आम्ही बांधलेले हे पहिले घर असून या घराचे आयुष्य ३० वर्षे आहे. घराच्या बांधकामासाठी एकूण १५०० किलो नॉन-रिसायकल प्लॅस्टिकचा वापर केला होता. अशा पद्धतीच्या घरांसाठी सौरऊर्जा कनेक्शन देण्यासाठीही एनजीओने तयारी दर्शविली आहे.  - National Press Day : 'मोदी सरकार नेहमीच प्रेसच्या स्वातंत्र्यासाठी कटीबद्ध'​ घर बांधून २ महिने होऊन गेले असून या नव्या, हवेशीर घरात राहून मला खूप आनंद झाला आहे, असं कमला हसत हसत सांगत होती. गेल्या १५ वर्षांपासून कमला या भागात वास्तव्यास आहे. गेल्यावर्षी झालेल्या मुसळधार पावसात तिचे घर खराब झाले होते. आणि हे पाहून एनजीओने तिला तिच्यासाठी घर उभारण्याचे आश्वासन दिले होते.  एनजीओ गेल्या वर्षभरापासून पाचनाडीमधील शंभरहून अधिक रॅग पिकर्स आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. आरोग्य आणि इतर गरजा भागविण्यासाठी एनजीओ या भागात कार्यरत आहे. फेब्रुवारीपासून एनजीओ या भागातील २० मुलांचे ऑनलाइन क्लास घेत आहे, असे चंदन यांनी सांगितले. This house costed around Rs 4.5 lakhs. This is a pilot project and a proof of concept for us. We hope to create more applications of this concept. In 2021, we hope to create 20 homes for waste pickers: Shifrah Jacobs, Chief Impact Officer at Plastic for change India Foundation https://t.co/bdzF3OGc8I — ANI (@ANI) November 14, 2020 - जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा (Edited By : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/36O1Bl8

No comments:

Post a Comment