पुणे : मुलांच्या शिक्षणासाठी पालकांचे 'भीक मागो आंदोलन' पुणे : "शाळेचे शुल्क भरणे शक्य न झाल्याने शाळेने ऑनलाइन शिक्षण बंद केले. वर्गातील इतर क्लासमेट नियमितपणे शिकत आहे आणि आमचे शिक्षण बंद आहे. आता आम्ही करायचे काय? आमचा अभ्यास मागे पडणार आणि आतापर्यंत झालेला अभ्यास भरून कसा निघणार?" असे सांगत विद्यार्थ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. - भेट होतेय, पण मनमोकळेपणे बोलणं नाही!​ कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अनेक पालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. परिणामी, पालक शाळेचे शुल्क भरू शकलेले नाहीत. ही परिस्थिती लक्षात घेऊन शिक्षण विभागाने पालकांचा संवेदनशीलतेने विचार करण्यात यावा, अशी भूमिका मांडली. परंतु, त्याला न जुमानता शहरातील काही खासगी शाळांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू असताना संबंधित विद्यार्थ्यांना ऑनलाइनची लिंक न पाठविणे, ऑनलाइन वर्गाचा पासवर्ड न देणे, ऑनलाइन वर्गातून ब्लॉक करणे, अशी कठोर पावले उचलली. परिणामी, हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, हक्काचे शिक्षण मिळावे, यासाठी पालकांनी सोमवारी महापालिकेच्या शिक्षण मंडळ कार्यालयात 'भीक मागो आंदोलन' केले. या आंदोलनात शाळेच्या कठोर भूमिकेमुळे शिक्षणापासून दुरावलेले विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. - Positive story: तुरुंगात शिक्षा भोगताना केला विश्वविक्रम; 8 वर्षात 31 पदव्या आणि सरकारी नोकरी​ शाळेचे शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येणार असे महापालिका प्रशासनाने ठरविले, त्यासाठी चौकशी समिती देखील नेमण्यात आली. मात्र त्यानंतरही संबंधित शाळांनी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवले आहे. या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पालक विद्यार्थी शिक्षण मंडळ कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसले होते. दरम्यान शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि शिक्षणाचा हक्क डावलणाऱ्या शाळांची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी लावून धरली. - Success Story : २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात 'यूपीएससी'त केलं टॉप!​ शाळांविरोधात एफआयआर दाखल करण्याची पालकांची मागणी "विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याच्या शाळांच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच विद्यार्थ्यांना दुजाभावची वागणूक मिळत आहे. याबाबत पालकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, कागदोपत्री नोटिसा पाठविण्याशिवाय शाळांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षणाचा हक्क डावललेल्या शाळांविरोधात महापालिकेच्या शिक्षण मंडळाने पोलिसांत तक्रार दाखल करण्याची आमची मागणी आहे." - नंदकुमार गोसावी, पालक प्रतिनिधी - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 9, 2020

पुणे : मुलांच्या शिक्षणासाठी पालकांचे 'भीक मागो आंदोलन' पुणे : "शाळेचे शुल्क भरणे शक्य न झाल्याने शाळेने ऑनलाइन शिक्षण बंद केले. वर्गातील इतर क्लासमेट नियमितपणे शिकत आहे आणि आमचे शिक्षण बंद आहे. आता आम्ही करायचे काय? आमचा अभ्यास मागे पडणार आणि आतापर्यंत झालेला अभ्यास भरून कसा निघणार?" असे सांगत विद्यार्थ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. - भेट होतेय, पण मनमोकळेपणे बोलणं नाही!​ कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अनेक पालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. परिणामी, पालक शाळेचे शुल्क भरू शकलेले नाहीत. ही परिस्थिती लक्षात घेऊन शिक्षण विभागाने पालकांचा संवेदनशीलतेने विचार करण्यात यावा, अशी भूमिका मांडली. परंतु, त्याला न जुमानता शहरातील काही खासगी शाळांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू असताना संबंधित विद्यार्थ्यांना ऑनलाइनची लिंक न पाठविणे, ऑनलाइन वर्गाचा पासवर्ड न देणे, ऑनलाइन वर्गातून ब्लॉक करणे, अशी कठोर पावले उचलली. परिणामी, हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, हक्काचे शिक्षण मिळावे, यासाठी पालकांनी सोमवारी महापालिकेच्या शिक्षण मंडळ कार्यालयात 'भीक मागो आंदोलन' केले. या आंदोलनात शाळेच्या कठोर भूमिकेमुळे शिक्षणापासून दुरावलेले विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. - Positive story: तुरुंगात शिक्षा भोगताना केला विश्वविक्रम; 8 वर्षात 31 पदव्या आणि सरकारी नोकरी​ शाळेचे शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येणार असे महापालिका प्रशासनाने ठरविले, त्यासाठी चौकशी समिती देखील नेमण्यात आली. मात्र त्यानंतरही संबंधित शाळांनी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवले आहे. या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पालक विद्यार्थी शिक्षण मंडळ कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसले होते. दरम्यान शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि शिक्षणाचा हक्क डावलणाऱ्या शाळांची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी लावून धरली. - Success Story : २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात 'यूपीएससी'त केलं टॉप!​ शाळांविरोधात एफआयआर दाखल करण्याची पालकांची मागणी "विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याच्या शाळांच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच विद्यार्थ्यांना दुजाभावची वागणूक मिळत आहे. याबाबत पालकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, कागदोपत्री नोटिसा पाठविण्याशिवाय शाळांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षणाचा हक्क डावललेल्या शाळांविरोधात महापालिकेच्या शिक्षण मंडळाने पोलिसांत तक्रार दाखल करण्याची आमची मागणी आहे." - नंदकुमार गोसावी, पालक प्रतिनिधी - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/35eweQO

No comments:

Post a Comment