'एमसीक्यू' विद्यार्थ्यांच्या पथ्यावर; तांत्रिक अडचणीनंतरही निकाल वाढला पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चॉइस क्वेश्चन-एमसीक्यू) पद्धतीने घेतल्याने ही पद्धत विद्यार्थ्यांच्या पथ्यावर पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला, पण जवळपास सर्वच अभ्यासक्रमाचा निकाल पूर्वीच्या तुलनेत २० ते २५ टक्के वाढल्याचे समोर आले आहे. एकंदरीत विद्यापीठ आणि विद्यार्थी या दोघांनाही दिलासा मिळाला आहे.  'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा पारंपरिक पध्दतीने घेता येणे शक्य नव्हते. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून 'एमसीक्यू'  पद्धतीने परीक्षा घेण्यात आली.  - 'उशीरा का होईना शिक्षणमंत्र्यांना शहाणपण आलं'; 'आप'चा टोला पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात सव्वाशेपेक्षा अभ्यासक्रमांच्या आणि २ हजार ९०० विषयांच्या परीक्षा घेतल्या. यात जवळपास २ लाख जणांनी ऑनलाईन, तर ५० हजारजणांनी ऑफलाइन परीक्षा दिली. 'एमसीक्यू' पध्दतीने परीक्षा घेण्याची पहिलीच वेळ असल्याने विद्यापीठासह विद्यार्थ्यांना परीक्षा देताना तांत्रिक अडचणींना सामोरे  जावे लागले. काहींना एकाच विषयाचा पेपर दोन ते तीन वेळा सोडवावा लागला, काहींचे सोडवलेले प्रश्न सबमिट झाले नाहीत. यासह इतर अडचणींमुळे निकालावर परिणाम होणार असल्याची भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली  जात होती. याचा फटका काही विद्यार्थ्यांना बसला बसून, त्यांचा मोबाईल अॅपमधील डेटा परीक्षेच्या सर्व्हरशी सिंक्रनाॅईज न झाल्याने परीक्षेला अनुपस्थिती पडली आहे. तर अनेकांनी पूर्ण प्रश्न सोडवून शून्य गुण मिळाले आहेत.  - केवढा हा राग; गाडी बाजूला घेतली नाही म्हणून दोघांवर तलवारीने वार!​ एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे विद्यापीठाने जवळपास सर्व अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर केले. यामध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा चांगले गुण पडले आहेत, विद्यार्थी नापास होण्याचे प्रमाण होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले अाहे. साधारणपणे विद्यापीठाचा निकाल साठ टक्क्यांच्या जवळपास लागत असतो, पण यंदाच्या निकालात २० ते २५ टक्के वाढ होऊन ८० ते ८५ टक्के निकाल निकाल लागला आहे. तर अनेक अभ्यासक्रमांचे शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  " पुणे विद्यापीठाने जवळपास सर्व अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहेत  विद्यापीठाच्या अंतिम वर्षाचा निकाल ८० ते ८५ टक्के लागला असून, २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जे विद्यार्थी नापास झाले आहेत, त्यांची परीक्षा नियमित सत्र परीक्षेच्या वेळेस घेण्यात येतील."  - डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited By : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 15, 2020

'एमसीक्यू' विद्यार्थ्यांच्या पथ्यावर; तांत्रिक अडचणीनंतरही निकाल वाढला पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल चॉइस क्वेश्चन-एमसीक्यू) पद्धतीने घेतल्याने ही पद्धत विद्यार्थ्यांच्या पथ्यावर पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला, पण जवळपास सर्वच अभ्यासक्रमाचा निकाल पूर्वीच्या तुलनेत २० ते २५ टक्के वाढल्याचे समोर आले आहे. एकंदरीत विद्यापीठ आणि विद्यार्थी या दोघांनाही दिलासा मिळाला आहे.  'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा पारंपरिक पध्दतीने घेता येणे शक्य नव्हते. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून 'एमसीक्यू'  पद्धतीने परीक्षा घेण्यात आली.  - 'उशीरा का होईना शिक्षणमंत्र्यांना शहाणपण आलं'; 'आप'चा टोला पुणे विद्यापीठाने ऑक्टोबर महिन्यात सव्वाशेपेक्षा अभ्यासक्रमांच्या आणि २ हजार ९०० विषयांच्या परीक्षा घेतल्या. यात जवळपास २ लाख जणांनी ऑनलाईन, तर ५० हजारजणांनी ऑफलाइन परीक्षा दिली. 'एमसीक्यू' पध्दतीने परीक्षा घेण्याची पहिलीच वेळ असल्याने विद्यापीठासह विद्यार्थ्यांना परीक्षा देताना तांत्रिक अडचणींना सामोरे  जावे लागले. काहींना एकाच विषयाचा पेपर दोन ते तीन वेळा सोडवावा लागला, काहींचे सोडवलेले प्रश्न सबमिट झाले नाहीत. यासह इतर अडचणींमुळे निकालावर परिणाम होणार असल्याची भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली  जात होती. याचा फटका काही विद्यार्थ्यांना बसला बसून, त्यांचा मोबाईल अॅपमधील डेटा परीक्षेच्या सर्व्हरशी सिंक्रनाॅईज न झाल्याने परीक्षेला अनुपस्थिती पडली आहे. तर अनेकांनी पूर्ण प्रश्न सोडवून शून्य गुण मिळाले आहेत.  - केवढा हा राग; गाडी बाजूला घेतली नाही म्हणून दोघांवर तलवारीने वार!​ एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे विद्यापीठाने जवळपास सर्व अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर केले. यामध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा चांगले गुण पडले आहेत, विद्यार्थी नापास होण्याचे प्रमाण होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले अाहे. साधारणपणे विद्यापीठाचा निकाल साठ टक्क्यांच्या जवळपास लागत असतो, पण यंदाच्या निकालात २० ते २५ टक्के वाढ होऊन ८० ते ८५ टक्के निकाल निकाल लागला आहे. तर अनेक अभ्यासक्रमांचे शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  " पुणे विद्यापीठाने जवळपास सर्व अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहेत  विद्यापीठाच्या अंतिम वर्षाचा निकाल ८० ते ८५ टक्के लागला असून, २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जे विद्यार्थी नापास झाले आहेत, त्यांची परीक्षा नियमित सत्र परीक्षेच्या वेळेस घेण्यात येतील."  - डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मुल्यमापन मंडळ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited By : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3lBJswL

No comments:

Post a Comment