पालघरमधील पाणीपुरवठा योजना रखडल्या; पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना खडे बोल  पालघर  ः पालघर जिल्ह्यातील 90 टक्के पाणी पुरवठा योजना रखडल्या आहेत. जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आढवा घेतल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली. पाटील यांनी योजनांचे काम पुन्हा करण्याच्या सुचना केल्या आहेत. ठेकेदारांना घाबरुन काम करु नका आम्ही तुमच्यापाठीशी आहोत. प्रत्येक गावा गावात घरा घरात पाणी पोहचले पाहिजे. फेब्रुवारी महिन्यात आपण पुन्हा बैठक घेणार असून त्यावेळी मला या कामात सुधारणा झालेली दिसली पाहिजे. असे म्हणत पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना पाटील यांनी धारेवर धरले. पाटील आज पालघर दौऱ्यावर आले होते. त्यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली होती.  कोविड केअर सेंटर्स बंदचा निर्णय दिवाळी नंतर; रुग्णामध्ये वाढ होण्याच्या शक्यतेने BMC सज्ज दरम्यान मोखाडा जव्हार विक्रमगड, वाडा बरोबर डहाणु भागातील अनेक पाणीपुरवठा योजना रखडलेल्या आहेत. या योजना एकाच ठेकेदारांकडे गेलेल्या असल्याने कामे रखडल्याचा आरोप आमदार सुनिल भुसारा यांनी बैठकीत केला. तसेच ठेकेदारच पाणीपुरवठा विभाग आणि जिल्हा परीषद चालवतात काय असा सवाल करत व्यासपीठावर उभे राहून ठेकेदारांवर कारवाई करा, त्यांना पाठीशी घालणाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी केली.  गुलाबराव पाटील म्हणाले, पालघर जिल्हातील पाणी योजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही नाराज असून मुंबईला पाणीपुरवठा करणारा जिल्हा पाणीप्रश्नाबाबत 25 व्या नंबरवर असल्याने मुख्यमंत्री महोदयानी मला पाठवले.पाणी पाजणे अतिशय पुण्याईचे काम असून ते प्रामाणिकपणे करा.  या बैठकीला खासदार राजेंद्र गावीत, आमदार श्रीनिवास वणगा, आमदार राजेश पाटील जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी ज्योती ठाकरे बांधकाम सभापती काशीनाथ चौधरी आदि जिल्हा परिषद सदस्य सभापती अधिकारी उपस्थित होते.  Gulabrao Patil dissatisfied with Palghar water scheme ( संपादन ः रोशन मोरे) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 9, 2020

पालघरमधील पाणीपुरवठा योजना रखडल्या; पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना खडे बोल  पालघर  ः पालघर जिल्ह्यातील 90 टक्के पाणी पुरवठा योजना रखडल्या आहेत. जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आढवा घेतल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली. पाटील यांनी योजनांचे काम पुन्हा करण्याच्या सुचना केल्या आहेत. ठेकेदारांना घाबरुन काम करु नका आम्ही तुमच्यापाठीशी आहोत. प्रत्येक गावा गावात घरा घरात पाणी पोहचले पाहिजे. फेब्रुवारी महिन्यात आपण पुन्हा बैठक घेणार असून त्यावेळी मला या कामात सुधारणा झालेली दिसली पाहिजे. असे म्हणत पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना पाटील यांनी धारेवर धरले. पाटील आज पालघर दौऱ्यावर आले होते. त्यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली होती.  कोविड केअर सेंटर्स बंदचा निर्णय दिवाळी नंतर; रुग्णामध्ये वाढ होण्याच्या शक्यतेने BMC सज्ज दरम्यान मोखाडा जव्हार विक्रमगड, वाडा बरोबर डहाणु भागातील अनेक पाणीपुरवठा योजना रखडलेल्या आहेत. या योजना एकाच ठेकेदारांकडे गेलेल्या असल्याने कामे रखडल्याचा आरोप आमदार सुनिल भुसारा यांनी बैठकीत केला. तसेच ठेकेदारच पाणीपुरवठा विभाग आणि जिल्हा परीषद चालवतात काय असा सवाल करत व्यासपीठावर उभे राहून ठेकेदारांवर कारवाई करा, त्यांना पाठीशी घालणाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी केली.  गुलाबराव पाटील म्हणाले, पालघर जिल्हातील पाणी योजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही नाराज असून मुंबईला पाणीपुरवठा करणारा जिल्हा पाणीप्रश्नाबाबत 25 व्या नंबरवर असल्याने मुख्यमंत्री महोदयानी मला पाठवले.पाणी पाजणे अतिशय पुण्याईचे काम असून ते प्रामाणिकपणे करा.  या बैठकीला खासदार राजेंद्र गावीत, आमदार श्रीनिवास वणगा, आमदार राजेश पाटील जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी ज्योती ठाकरे बांधकाम सभापती काशीनाथ चौधरी आदि जिल्हा परिषद सदस्य सभापती अधिकारी उपस्थित होते.  Gulabrao Patil dissatisfied with Palghar water scheme ( संपादन ः रोशन मोरे) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3pazyEG

No comments:

Post a Comment