शिक्षकांसाठी कोरोना चाचणीची सुविधा शाळेजवळ करा! शिक्षक संघटनेची मागणी मुंबई : ऑनलाईन व ऑफलाईन कामासाठी शिक्षकांची शाळेमध्ये 50 टक्के उपस्थिती आणि 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार शिक्षकांना कोरोना चाचणी करून शाळेत येणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी शिक्षकांना शाळेजवळ चाचणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. याशिवाय रात्र शाळेतील शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची कोरोना चाचणीची व्यवस्था शाळेतच करण्यात यावी, अशी मागणीही रात्र शाळेतील शिक्षकांकडून करण्यात येत आहे.  हेही वाचा - कुणाल कामराकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान? खटला दाखल 23 नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागामार्फत देण्यात आले आहे. मुंबईतील रात्रशाळेत शिकवणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तुटपुंजे वेतन दिले जाते. त्यामुळे कोरोना तपासणी व त्यासाठीचा खर्च रात्रशाळेतील कर्मचाऱ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसू शकतो. ही बाब लक्षात घेऊन मुंबई विभागातील 120 रात्रशाळेतील कर्मचाऱ्यांची व विद्यार्थ्यांची मोफत कोरोना चाचणी सरकारमार्फत किंवा महापालिकांच्या वतीने मोफत करण्यात यावी. त्याचप्रमाणे रात्रशाळेतील कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना रात्रशाळेतच आवारात आरोग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक परिषदेचे संयोजक निरंजन गिरी केली आहे.    शाळेतील शिक्षकांना कोरोना चाचणी करण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. शाळेत ेयेण्यापूर्वी चाचणी कुठे करायची, असा प्रश्‍न शिक्षकांना पडला आहे. त्यामुळे शाळेजवळ शिक्षकांना चाचणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. या केंद्रांची माहिती शिक्षण विभागाने शाळांना दिल्यास शिक्षकांचा त्रास कमी होईल.  - शिवनाथ दराडे, कार्यवाह, शिक्षक परिषद.  Facilitate corona testing for teachers near school Demand of teachers union ----------------------------------------------------  ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 13, 2020

शिक्षकांसाठी कोरोना चाचणीची सुविधा शाळेजवळ करा! शिक्षक संघटनेची मागणी मुंबई : ऑनलाईन व ऑफलाईन कामासाठी शिक्षकांची शाळेमध्ये 50 टक्के उपस्थिती आणि 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार शिक्षकांना कोरोना चाचणी करून शाळेत येणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी शिक्षकांना शाळेजवळ चाचणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. याशिवाय रात्र शाळेतील शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची कोरोना चाचणीची व्यवस्था शाळेतच करण्यात यावी, अशी मागणीही रात्र शाळेतील शिक्षकांकडून करण्यात येत आहे.  हेही वाचा - कुणाल कामराकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान? खटला दाखल 23 नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागामार्फत देण्यात आले आहे. मुंबईतील रात्रशाळेत शिकवणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तुटपुंजे वेतन दिले जाते. त्यामुळे कोरोना तपासणी व त्यासाठीचा खर्च रात्रशाळेतील कर्मचाऱ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसू शकतो. ही बाब लक्षात घेऊन मुंबई विभागातील 120 रात्रशाळेतील कर्मचाऱ्यांची व विद्यार्थ्यांची मोफत कोरोना चाचणी सरकारमार्फत किंवा महापालिकांच्या वतीने मोफत करण्यात यावी. त्याचप्रमाणे रात्रशाळेतील कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना रात्रशाळेतच आवारात आरोग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक परिषदेचे संयोजक निरंजन गिरी केली आहे.    शाळेतील शिक्षकांना कोरोना चाचणी करण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. शाळेत ेयेण्यापूर्वी चाचणी कुठे करायची, असा प्रश्‍न शिक्षकांना पडला आहे. त्यामुळे शाळेजवळ शिक्षकांना चाचणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. या केंद्रांची माहिती शिक्षण विभागाने शाळांना दिल्यास शिक्षकांचा त्रास कमी होईल.  - शिवनाथ दराडे, कार्यवाह, शिक्षक परिषद.  Facilitate corona testing for teachers near school Demand of teachers union ----------------------------------------------------  ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3pw8OPk

No comments:

Post a Comment