सांगली, कुपवाड शहरात नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ सांगली : दिवाळीपुर्व देखभाल दुरुस्तीसाठी आज दिवसभर वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने सांगली, कुपवाड शहरांमध्ये सकाळी आणि दुपारीही पाणी पुरवठा अपुरा झाला. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडाली.  सायंकाळी वीज पुरवठा पुर्ववत झाला असला तरी पाण्याच्या टाक्‍या भरुन ते शुध्दीकरण प्रक्रियेनंतर पुरवठा करण्यास विलंब होण्याची शक्‍यता असल्याने उद्या (बुधवारी) सकाळीही पाणी पुरवठा अपुरा होऊ शकतो असे पाणी पुरवठा विभागातून सांगण्यात आले.  वीज वितरण कंपनीने आज दिवाळी पुर्व देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी दहा वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित केला होता. त्यानंतर कंपनीची कामे पुर्ण होऊन पुन्हा वीज पुरवठा सुरु करण्यासाठी सायंकाळचे सहा वाजले. नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा वीज पुरवठा सुरु झाला. तोवर शहरवासियांची पाण्यासाठी धावपळ उडाली. शहरातील विविध भागात वीजेच्या तारांना अडथळे बनलेले झाडांच्या फांद्या कापण्यात आल्या. काही ठिकाणी दुरुस्तीची कामे होती ती करण्यात आली. त्यामुळे वीज पुरवठा चार ऐवजी साडेपाच नंतर सुरु करण्यात आला.  दरम्यान, पाणी पुरवठा विभागाने वीज पुरवठा खंडित झाल्याने जॅकवेलजवळ असलेली गळतीचे काम करुन घेतले. सायंकाळी वीज पुरवठा सुरु झाला. त्यानंतर पाणी उपसा करुन सांगली आणि कुपवाडला पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्‍या भरुन घेण्याचे काम सुरु झाले. मात्र या टाक्‍या भरुन तेथून पाणी शुध्दीकरण करुन ते शहरात विविध भागात पुरवठा करण्यास विलंब होणार असल्याने उद्या (ता. 4) सकाळच्या सत्रात पाणी पुरवठा अपुरा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.   संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, November 3, 2020

सांगली, कुपवाड शहरात नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ सांगली : दिवाळीपुर्व देखभाल दुरुस्तीसाठी आज दिवसभर वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने सांगली, कुपवाड शहरांमध्ये सकाळी आणि दुपारीही पाणी पुरवठा अपुरा झाला. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडाली.  सायंकाळी वीज पुरवठा पुर्ववत झाला असला तरी पाण्याच्या टाक्‍या भरुन ते शुध्दीकरण प्रक्रियेनंतर पुरवठा करण्यास विलंब होण्याची शक्‍यता असल्याने उद्या (बुधवारी) सकाळीही पाणी पुरवठा अपुरा होऊ शकतो असे पाणी पुरवठा विभागातून सांगण्यात आले.  वीज वितरण कंपनीने आज दिवाळी पुर्व देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी दहा वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित केला होता. त्यानंतर कंपनीची कामे पुर्ण होऊन पुन्हा वीज पुरवठा सुरु करण्यासाठी सायंकाळचे सहा वाजले. नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा वीज पुरवठा सुरु झाला. तोवर शहरवासियांची पाण्यासाठी धावपळ उडाली. शहरातील विविध भागात वीजेच्या तारांना अडथळे बनलेले झाडांच्या फांद्या कापण्यात आल्या. काही ठिकाणी दुरुस्तीची कामे होती ती करण्यात आली. त्यामुळे वीज पुरवठा चार ऐवजी साडेपाच नंतर सुरु करण्यात आला.  दरम्यान, पाणी पुरवठा विभागाने वीज पुरवठा खंडित झाल्याने जॅकवेलजवळ असलेली गळतीचे काम करुन घेतले. सायंकाळी वीज पुरवठा सुरु झाला. त्यानंतर पाणी उपसा करुन सांगली आणि कुपवाडला पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्‍या भरुन घेण्याचे काम सुरु झाले. मात्र या टाक्‍या भरुन तेथून पाणी शुध्दीकरण करुन ते शहरात विविध भागात पुरवठा करण्यास विलंब होणार असल्याने उद्या (ता. 4) सकाळच्या सत्रात पाणी पुरवठा अपुरा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.   संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/35Wopyw

No comments:

Post a Comment