कोरोनामुळे तेजीत चाललेल्या मेडिकलवर ते टाकणार होते दरोडा, पण... पुणे : कोरोनाच्या संसर्गामुळे मेडिकलचा व्यावसाय चांगला होत असून त्यांच्याकडे दररोज भरपूर रोख रक्कम येत असल्यामुळे थेट मेडिकलवरच दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने अटक केली.  - राष्ट्रवादीबरोबर आघाडीबाबत शिवसेनेची उद्या बैठक; पदवीधरचे चित्र स्पष्ट होणार​ अजय बाबु ओव्हाळ (वय 30), शुभम सुनील शिंदे (वय 24), विनायक महादेव कांबळे (वय 28, तिघेही रा. कात्रज) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर त्यांचे दोन साथीदार पंकज लवटे आणि रामा लवटे हे दोघे पळून गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या मेडिकल व्यवसाय तेजीत सुरू आहे. त्यामुळे मेडीकलमध्ये दररोज रोख रक्कम मोठ्या प्रमाणात जमा होते. त्यामुळे पाच ते सहा जण तळजाई टेकडी येथे मेडिकलवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असून त्यांच्याकडे धारदार शस्त्रे असल्याची खबर पोलिस कर्मचारी अजय थोरात आणि अशोक माने यांना मिळाली. - IPL 2020 MIvsDC Final : आडनाड जेतपदाची परंपरा मोडीत काढत मुंबई पलटन पाचव्यांदा चॅम्पियन त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, हनुमंत शिंदे, सुनील कुलकर्णी यांच्यासह सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर, पोलिस उपनिरीक्षक बापू खेंगरे यांच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचून आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन धारदार तीन फूट लांबीच्या पालघन, मिरची पावडर, मोबाईल, दुचाकी असा 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली, त्यावेळी संबंधीत आरोपींनी सहकारनगर येथील एका मेडिकलवर दरोडा टाकण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार ते एकत्र जमले होते. तत्पूर्वी पोलिसांनी त्यांना अटक केली. आरोपी अजय ओव्हाळ याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच सरकारी नोकरावर हल्ला करुन जखमी केल्याचा एक असे चार गुन्हे दाखल आहेत. तर विनायक कांबळेविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, November 10, 2020

कोरोनामुळे तेजीत चाललेल्या मेडिकलवर ते टाकणार होते दरोडा, पण... पुणे : कोरोनाच्या संसर्गामुळे मेडिकलचा व्यावसाय चांगला होत असून त्यांच्याकडे दररोज भरपूर रोख रक्कम येत असल्यामुळे थेट मेडिकलवरच दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनीट एकच्या पथकाने अटक केली.  - राष्ट्रवादीबरोबर आघाडीबाबत शिवसेनेची उद्या बैठक; पदवीधरचे चित्र स्पष्ट होणार​ अजय बाबु ओव्हाळ (वय 30), शुभम सुनील शिंदे (वय 24), विनायक महादेव कांबळे (वय 28, तिघेही रा. कात्रज) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर त्यांचे दोन साथीदार पंकज लवटे आणि रामा लवटे हे दोघे पळून गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या मेडिकल व्यवसाय तेजीत सुरू आहे. त्यामुळे मेडीकलमध्ये दररोज रोख रक्कम मोठ्या प्रमाणात जमा होते. त्यामुळे पाच ते सहा जण तळजाई टेकडी येथे मेडिकलवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असून त्यांच्याकडे धारदार शस्त्रे असल्याची खबर पोलिस कर्मचारी अजय थोरात आणि अशोक माने यांना मिळाली. - IPL 2020 MIvsDC Final : आडनाड जेतपदाची परंपरा मोडीत काढत मुंबई पलटन पाचव्यांदा चॅम्पियन त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, हनुमंत शिंदे, सुनील कुलकर्णी यांच्यासह सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर, पोलिस उपनिरीक्षक बापू खेंगरे यांच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचून आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन धारदार तीन फूट लांबीच्या पालघन, मिरची पावडर, मोबाईल, दुचाकी असा 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली, त्यावेळी संबंधीत आरोपींनी सहकारनगर येथील एका मेडिकलवर दरोडा टाकण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार ते एकत्र जमले होते. तत्पूर्वी पोलिसांनी त्यांना अटक केली. आरोपी अजय ओव्हाळ याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच सरकारी नोकरावर हल्ला करुन जखमी केल्याचा एक असे चार गुन्हे दाखल आहेत. तर विनायक कांबळेविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3llj1vp

No comments:

Post a Comment