सिंधुदुर्गात औषध निर्माण विभाग मेटाकुटीला  सावंतवाडी (सिंधुदुर्ग)  वैद्यकीय अधिकारी आणि रुग्ण यांच्या मधील महत्त्वाचा दुवा औषध निर्माण अधिकारी समजला जातो; मात्र गेल्या काही वर्षांत औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या बाबतीत मात्र शासनाने अन्याय केलेला दिसून येत आहे. वेतन श्रेणीमध्ये तफावत व कामाचा ताण त्यामुळे हा विभाग मेटाकुटीस आला आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडविणे गरजेचे आहे.  सिंधुदुर्ग आरोग्य विभागातील औषध निर्माण अधिकारी हे पद सर्वच बाबतीत वंचित राहिले आहे. औषध निर्माण अधिकारी या पदाला कायदेशीर संरक्षण देणे झाले आहे; परंतु शासनाकडून या पदाची दयनीय अवस्था केली असून मागील 30 वर्षांपासून या विभागाकडून शासनाकडे अनेक मागण्या करण्यात येत आहेत; परंतु कोणतीही भूमिका घेण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभाग लक्ष देणार का? असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. या विभागाकडून मागण्या मान्य करण्यासाठी अनेक धरणे आंदोलने करण्यात आली, निवेदने देण्यात आली. पदोन्नती सेवाप्रवेश विभागात सुधारणा, कर्तव्य आणि जबाबदारी सुधारणा, वेतनश्रेणी याबाबत एकही मागणी पूर्ण झाली नाही. ओरोस येथील मुख्य औषध भांडार एकच पद मंजूर आहे. सर्व जिल्ह्याला औषध पुरवठा होत असलेल्या कार्यालयात औषध निर्माण अधिकारी ही दोन पदे आणि परिचरची दोन पदे भरणे आवश्‍यक आहे. तसे केल्यास मुख्य भांडारात कामाचा पडणारा ताण कमी होईल. सध्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषधसाठा व लस साठा वितरित केला जातो. महिन्यातून एकदाच हा औषध साठा वितरित केला जातो. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना यामुळे तारेवरची कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपलब्ध औषध साठ यानुसारच उपचार करावे लागतात सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगर दऱ्यांचा जिल्हा आहे. त्यामुळे भौगोलिक दृष्टीने विचार केला असता तालुक्‍याच्या ठिकाणी औषध भांडार निर्माण करणे गरजेचे आहे. याठिकाणी औषध भांडार झाल्यास तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषध पुरवठा करण्यास सोयीचे होऊ शकते औषध वितरण कार्यालयात असणाऱ्या अतिरिक्त कामकाजामुळे काम पूर्ण होण्यात अडचणी येतात त्यामध्ये वेळही वाया जातो त्यामुळे या विभागात असलेले रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत अशी मागणी आहे. औषध निर्माण अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन निश्‍चिती करताना चौथा वेतन आयोगाच्या शिफारशी पासून अन्याय करण्यात आलेला आहे. यामध्ये संवर्ग 12 + 2 अशी शैक्षणिक पात्रता असतानाही जबाबदारीच्या कामानुसार तेवढे वेतन मात्र लागू करण्यात आलेले नाही. त्यामुळे औषध निर्माण अधिकारी यांना केंद्राप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी नुसार वेतन देण्यात यावे अशी मागणीही जोर धरत आहे. सध्या कार्यरत असलेले औषध निर्माण अधिकारी हे 24 तास काम सांभाळत आहेत. त्यांना औषधे देण्याव्यतिरिक्त केसपेपर काढणे रुग्ण दवाखान्यात असेपर्यंत सेवा द्यावयाची असते त्यातच नवीन औषध ऑनलाईन प्रणाली निक्षय औषधी एफ. पी एल एम एस या ऑनलाईन प्रणालीमुळे कामाचा ताण वाढत आहे. या सर्वांचा विचार करता इतिहास पेपर कार व इतर नोंदणी करणे यासाठी ज्यादा सहाय्यक म्हणून पद भरती करावी, अशी मागणी होत आहे. ग्रामीण भागातील यंत्रणा सक्षम होण्यासाठी या सर्व गोष्टी होणे तेवढेच गरजेचे आहे. औषध पुरवठा तालुकास्तरावरुन केल्यास त्याचा फायदा ग्रामीण जनतेला नक्कीच होऊ शकतो, अशी अपेक्षा औषध निर्माण अधिकारी संघटनेकडून करण्यात येत आहे.  वेतन आयोग*दिले*द्यायला हवे  4 था*330*450  5 वा*1350*1400  6 वा*5200*9300  ग्रेड पे वेतन  पूर्ण झालेली वर्षे*देण्यात आले*द्यायला हवे  12*2800*4200  24*3700*4600  सध्याची स्थिती  मंजूर पदे - 41  भरलेली - 31  रिक्त - 10  नव्याने मागणी- प्रत्येक तालुक्‍याला जादा 8 पदे    अनेक वर्षांपासून औषध निर्माण अधिकाऱ्यांना अपुऱ्या मनुष्य बळामुळे ताण सहन करावा लागत आहे. वेळोवेळी शासन दरबारी विविध मागण्या मांडल्या; मात्र दुर्लक्ष झाले. वेतनश्रेणी आणि पदभरती या मागण्या अग्रक्रमाने पूर्ण होणे गरजेचे आहे. तरच शहरी व ग्रामीण भागातील आरोग्याची स्थिती सुधारेल.  - मधुकर पाटील अध्यक्ष, जिल्हा औषध निर्माण अधिकारी संघटना  - संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, November 25, 2020

सिंधुदुर्गात औषध निर्माण विभाग मेटाकुटीला  सावंतवाडी (सिंधुदुर्ग)  वैद्यकीय अधिकारी आणि रुग्ण यांच्या मधील महत्त्वाचा दुवा औषध निर्माण अधिकारी समजला जातो; मात्र गेल्या काही वर्षांत औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या बाबतीत मात्र शासनाने अन्याय केलेला दिसून येत आहे. वेतन श्रेणीमध्ये तफावत व कामाचा ताण त्यामुळे हा विभाग मेटाकुटीस आला आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडविणे गरजेचे आहे.  सिंधुदुर्ग आरोग्य विभागातील औषध निर्माण अधिकारी हे पद सर्वच बाबतीत वंचित राहिले आहे. औषध निर्माण अधिकारी या पदाला कायदेशीर संरक्षण देणे झाले आहे; परंतु शासनाकडून या पदाची दयनीय अवस्था केली असून मागील 30 वर्षांपासून या विभागाकडून शासनाकडे अनेक मागण्या करण्यात येत आहेत; परंतु कोणतीही भूमिका घेण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभाग लक्ष देणार का? असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. या विभागाकडून मागण्या मान्य करण्यासाठी अनेक धरणे आंदोलने करण्यात आली, निवेदने देण्यात आली. पदोन्नती सेवाप्रवेश विभागात सुधारणा, कर्तव्य आणि जबाबदारी सुधारणा, वेतनश्रेणी याबाबत एकही मागणी पूर्ण झाली नाही. ओरोस येथील मुख्य औषध भांडार एकच पद मंजूर आहे. सर्व जिल्ह्याला औषध पुरवठा होत असलेल्या कार्यालयात औषध निर्माण अधिकारी ही दोन पदे आणि परिचरची दोन पदे भरणे आवश्‍यक आहे. तसे केल्यास मुख्य भांडारात कामाचा पडणारा ताण कमी होईल. सध्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषधसाठा व लस साठा वितरित केला जातो. महिन्यातून एकदाच हा औषध साठा वितरित केला जातो. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना यामुळे तारेवरची कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपलब्ध औषध साठ यानुसारच उपचार करावे लागतात सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगर दऱ्यांचा जिल्हा आहे. त्यामुळे भौगोलिक दृष्टीने विचार केला असता तालुक्‍याच्या ठिकाणी औषध भांडार निर्माण करणे गरजेचे आहे. याठिकाणी औषध भांडार झाल्यास तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषध पुरवठा करण्यास सोयीचे होऊ शकते औषध वितरण कार्यालयात असणाऱ्या अतिरिक्त कामकाजामुळे काम पूर्ण होण्यात अडचणी येतात त्यामध्ये वेळही वाया जातो त्यामुळे या विभागात असलेले रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत अशी मागणी आहे. औषध निर्माण अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन निश्‍चिती करताना चौथा वेतन आयोगाच्या शिफारशी पासून अन्याय करण्यात आलेला आहे. यामध्ये संवर्ग 12 + 2 अशी शैक्षणिक पात्रता असतानाही जबाबदारीच्या कामानुसार तेवढे वेतन मात्र लागू करण्यात आलेले नाही. त्यामुळे औषध निर्माण अधिकारी यांना केंद्राप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी नुसार वेतन देण्यात यावे अशी मागणीही जोर धरत आहे. सध्या कार्यरत असलेले औषध निर्माण अधिकारी हे 24 तास काम सांभाळत आहेत. त्यांना औषधे देण्याव्यतिरिक्त केसपेपर काढणे रुग्ण दवाखान्यात असेपर्यंत सेवा द्यावयाची असते त्यातच नवीन औषध ऑनलाईन प्रणाली निक्षय औषधी एफ. पी एल एम एस या ऑनलाईन प्रणालीमुळे कामाचा ताण वाढत आहे. या सर्वांचा विचार करता इतिहास पेपर कार व इतर नोंदणी करणे यासाठी ज्यादा सहाय्यक म्हणून पद भरती करावी, अशी मागणी होत आहे. ग्रामीण भागातील यंत्रणा सक्षम होण्यासाठी या सर्व गोष्टी होणे तेवढेच गरजेचे आहे. औषध पुरवठा तालुकास्तरावरुन केल्यास त्याचा फायदा ग्रामीण जनतेला नक्कीच होऊ शकतो, अशी अपेक्षा औषध निर्माण अधिकारी संघटनेकडून करण्यात येत आहे.  वेतन आयोग*दिले*द्यायला हवे  4 था*330*450  5 वा*1350*1400  6 वा*5200*9300  ग्रेड पे वेतन  पूर्ण झालेली वर्षे*देण्यात आले*द्यायला हवे  12*2800*4200  24*3700*4600  सध्याची स्थिती  मंजूर पदे - 41  भरलेली - 31  रिक्त - 10  नव्याने मागणी- प्रत्येक तालुक्‍याला जादा 8 पदे    अनेक वर्षांपासून औषध निर्माण अधिकाऱ्यांना अपुऱ्या मनुष्य बळामुळे ताण सहन करावा लागत आहे. वेळोवेळी शासन दरबारी विविध मागण्या मांडल्या; मात्र दुर्लक्ष झाले. वेतनश्रेणी आणि पदभरती या मागण्या अग्रक्रमाने पूर्ण होणे गरजेचे आहे. तरच शहरी व ग्रामीण भागातील आरोग्याची स्थिती सुधारेल.  - मधुकर पाटील अध्यक्ष, जिल्हा औषध निर्माण अधिकारी संघटना  - संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3m7GTCR

No comments:

Post a Comment