शहीद साळसकर यांच्या एडगावातील स्मारकाची डागडुजी  वैभववाडी (सिंधुदुर्ग) - शहीद विजय साळसकर यांच्या एडगाव येथील स्मारक परिसराची शिवसेना आणि स्थानिकांनी स्वच्छता आणि किरकोळ डागडुजी केली. या स्मारकाची काही छायाचित्रे साळसकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना पाठवून लक्ष वेधले होते. त्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेऊन जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना खासदार विनायक राऊतांमार्फत सूचना केली होती.  26/11ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ज्येष्ठ पोलिस अधिकारी विजय साळसकर हे शहीद झाले होते. श्री. साळसकर यांचे गाव वैभववाडी तालुक्‍यातील एडगाव आहे. त्यामुळे एडगाव येथे शहीद साळसकर यांचे स्मारक उभारले आहे. या स्मारकाभोवती वाढलेले गवत आणि किरकोळ पडझडीचे छायाचित्रे शहीद साळसकरांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना पाठविली होती. याची तत्काळ दखल मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी घेत खासदार राऊत यांना स्मारक परिसराची स्वच्छता आणि डागडुजी करण्याची सूचना केली होती. खासदार श्री. राऊतांनी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांना सूचना केल्यानंतर आज सावंत, जिल्हा बॅंकेचे संचालक दिगंबर पाटील, तालुका प्रमुख मंगेश लोके, उपजिल्हा प्रमुख नंदु शिंदे, मनोज सावंत, अशोक चव्हाण, राजु सावंत, अशोक रावराणे, सुनील रावराणे, प्रवीण गायकवाड, दीपक पवार आदींनी स्वच्छता केली. स्मारकाभोवती वाढलेले गवत श्रमदानातुन काढण्यात आले. सर्व स्मारक परिसराची स्वच्छता केल्यानंतर कार्यकर्त्यांनी किरकोळ डागडुजी केली. याशिवाय रंगरगोटीही केली जात आहे.    शहीद विजय साळसकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे या स्मारकाच्या दुरवस्थेची काही छायाचित्रे पाठविल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने खासदार विनायक राऊतांमार्फत सूचना केली. त्यानुसार आज स्मारकासह भोवतीचा परिसर स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना आणि स्थानिक ग्रामस्थ श्रमदानातुन हे काम करीत आहेत.  - सतीश सावंत, शिवसेना नेते   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, November 25, 2020

शहीद साळसकर यांच्या एडगावातील स्मारकाची डागडुजी  वैभववाडी (सिंधुदुर्ग) - शहीद विजय साळसकर यांच्या एडगाव येथील स्मारक परिसराची शिवसेना आणि स्थानिकांनी स्वच्छता आणि किरकोळ डागडुजी केली. या स्मारकाची काही छायाचित्रे साळसकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना पाठवून लक्ष वेधले होते. त्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेऊन जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना खासदार विनायक राऊतांमार्फत सूचना केली होती.  26/11ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ज्येष्ठ पोलिस अधिकारी विजय साळसकर हे शहीद झाले होते. श्री. साळसकर यांचे गाव वैभववाडी तालुक्‍यातील एडगाव आहे. त्यामुळे एडगाव येथे शहीद साळसकर यांचे स्मारक उभारले आहे. या स्मारकाभोवती वाढलेले गवत आणि किरकोळ पडझडीचे छायाचित्रे शहीद साळसकरांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना पाठविली होती. याची तत्काळ दखल मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी घेत खासदार राऊत यांना स्मारक परिसराची स्वच्छता आणि डागडुजी करण्याची सूचना केली होती. खासदार श्री. राऊतांनी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांना सूचना केल्यानंतर आज सावंत, जिल्हा बॅंकेचे संचालक दिगंबर पाटील, तालुका प्रमुख मंगेश लोके, उपजिल्हा प्रमुख नंदु शिंदे, मनोज सावंत, अशोक चव्हाण, राजु सावंत, अशोक रावराणे, सुनील रावराणे, प्रवीण गायकवाड, दीपक पवार आदींनी स्वच्छता केली. स्मारकाभोवती वाढलेले गवत श्रमदानातुन काढण्यात आले. सर्व स्मारक परिसराची स्वच्छता केल्यानंतर कार्यकर्त्यांनी किरकोळ डागडुजी केली. याशिवाय रंगरगोटीही केली जात आहे.    शहीद विजय साळसकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे या स्मारकाच्या दुरवस्थेची काही छायाचित्रे पाठविल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने खासदार विनायक राऊतांमार्फत सूचना केली. त्यानुसार आज स्मारकासह भोवतीचा परिसर स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. शिवसेना आणि स्थानिक ग्रामस्थ श्रमदानातुन हे काम करीत आहेत.  - सतीश सावंत, शिवसेना नेते   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/37cwyj1

No comments:

Post a Comment