भारत बंद : धान्य-भाजीपाला बाजार बंद, तर रिक्षांचा दोन तास चक्का जाम! पुणे : केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात गुरुवारी (ता. 26) देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी हमाल पंचायत, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार संघटना, तोलणार संघटना यांनी धान्य आणि भाजीपाला बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, सकाळी 11 ते 1 या दोन तासांच्या कालावधीत रिक्षातळांवरच रिक्षांचा चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.  भारत बंद नागरिक समितीच्या वतीने डॉ. बाबा आढाव आणि नितीन पवार यांनी विविध संघटनांच्या बैठकीचे आयोजन केले होते. पथारी व्यावसायिक पंचायतीने पथारी, हातगाडी आणि रस्ता विक्रेते बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अंगणवाडी कर्मचारी सभेनेही पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामधील अंगणवाड्या बंद राहतील, असे प्रशासनाला कळवले आहे. रिक्षांचा चक्का जाम आंदोलनाला पुणे जिल्हा वाहतूक सेवा संघाचे संजय कवडे आणि अजिंक्‍य रिक्षा संघटनेचे नितिन भुजबळ यांनी पाठिंबा दिला आहे.  - '...म्हणून आत्महत्या नाही करू शकलो'; गौतम पाषाणकरांनी सांगितली 'मन की बात'!​ 'भारत भाग्य विधाते रॅली'चे आयोजन  साहित्यिक अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी गौरवार्थ चित्रमय "भारत भाग्य विधाते रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा कष्टकऱ्यांकडून संविधान दिन, सामाजिक सुरक्षा हक्क दिवस म्हणून पाळतील. यानिमित्त ससून रुग्णालयाजवळ सकाळी 11 वाजता कष्टकरी, कारागीर आणि लोककलावंत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमतील. त्यानंतर मानवी चित्र रथांसह जिल्हाधिकारी कार्यालय येथे जातील.  - Corona Updates: ३५ दिवसांनंतर पुणे जिल्ह्यात पुन्हा रुग्णांचा आकडा हजारापार!​ महसूल, सार्वजनिक बांधकामसह पाटबंधारे कर्मचारी संपात सहभागी होणार  सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. रिक्त पदे तातडीने भरावीत यासह विविध मागण्यांसाठी राज्य महसूल कर्मचारी संघटना तसेच सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटनेने देशव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना निवेदन देण्यात आले. - दिग्गज फूटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन​ संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष श्रीनिवास कंडेपल्ली, सचिन तांबोळी, सचिन तारू या वेळी उपस्थित होते. तसेच, कोरोनामुळे नियमांचे पालन करीत पदाधिकाऱ्यांनी निवेदन द्यावे, असे आवाहन राज्य समन्वय समितीचे चेअरमन रमेशभाई आगावणे, जिल्हाध्यक्ष मंदार देशमुख, कार्याध्यक्ष राकेश शिंदे यांनी केले आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, November 25, 2020

भारत बंद : धान्य-भाजीपाला बाजार बंद, तर रिक्षांचा दोन तास चक्का जाम! पुणे : केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात गुरुवारी (ता. 26) देशव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी हमाल पंचायत, छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार संघटना, तोलणार संघटना यांनी धान्य आणि भाजीपाला बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, सकाळी 11 ते 1 या दोन तासांच्या कालावधीत रिक्षातळांवरच रिक्षांचा चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.  भारत बंद नागरिक समितीच्या वतीने डॉ. बाबा आढाव आणि नितीन पवार यांनी विविध संघटनांच्या बैठकीचे आयोजन केले होते. पथारी व्यावसायिक पंचायतीने पथारी, हातगाडी आणि रस्ता विक्रेते बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अंगणवाडी कर्मचारी सभेनेही पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामधील अंगणवाड्या बंद राहतील, असे प्रशासनाला कळवले आहे. रिक्षांचा चक्का जाम आंदोलनाला पुणे जिल्हा वाहतूक सेवा संघाचे संजय कवडे आणि अजिंक्‍य रिक्षा संघटनेचे नितिन भुजबळ यांनी पाठिंबा दिला आहे.  - '...म्हणून आत्महत्या नाही करू शकलो'; गौतम पाषाणकरांनी सांगितली 'मन की बात'!​ 'भारत भाग्य विधाते रॅली'चे आयोजन  साहित्यिक अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी गौरवार्थ चित्रमय "भारत भाग्य विधाते रॅली'चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा कष्टकऱ्यांकडून संविधान दिन, सामाजिक सुरक्षा हक्क दिवस म्हणून पाळतील. यानिमित्त ससून रुग्णालयाजवळ सकाळी 11 वाजता कष्टकरी, कारागीर आणि लोककलावंत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमतील. त्यानंतर मानवी चित्र रथांसह जिल्हाधिकारी कार्यालय येथे जातील.  - Corona Updates: ३५ दिवसांनंतर पुणे जिल्ह्यात पुन्हा रुग्णांचा आकडा हजारापार!​ महसूल, सार्वजनिक बांधकामसह पाटबंधारे कर्मचारी संपात सहभागी होणार  सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. रिक्त पदे तातडीने भरावीत यासह विविध मागण्यांसाठी राज्य महसूल कर्मचारी संघटना तसेच सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटनेने देशव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना निवेदन देण्यात आले. - दिग्गज फूटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन​ संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष श्रीनिवास कंडेपल्ली, सचिन तांबोळी, सचिन तारू या वेळी उपस्थित होते. तसेच, कोरोनामुळे नियमांचे पालन करीत पदाधिकाऱ्यांनी निवेदन द्यावे, असे आवाहन राज्य समन्वय समितीचे चेअरमन रमेशभाई आगावणे, जिल्हाध्यक्ष मंदार देशमुख, कार्याध्यक्ष राकेश शिंदे यांनी केले आहे. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/33g5w98

No comments:

Post a Comment