सावंतवाडीत स्टॉल वाद पेटला; सेना, राष्ट्रवादी आक्रमक सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील स्टॉलवरून निर्माण झालेला वाद आता पेटला आहे. काही झाले तरी स्टॉलधारकाला न्याय मिळवून देणारच, जनतेला न्याय देणे हे रक्तातच आहे. त्यामुळे गुन्हे दाखल झाले तरी त्याची फिकीर नाही, असा इशारा आज शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी शिवसेना व राष्ट्रवादीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिला. नगराध्यक्षांनीही स्टॉल हटवण्याच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा वाद पेटला आहे.  शहरामध्ये उभारलेला रवी जाधव या युवकाचा स्टॉल पालिका प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्तामध्ये हटविल्यानंतर स्टॉलवरून शिवसेना, राष्ट्रवादी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाला टार्गेट केले. काल (ता.24) सकाळी पालिकेच्या दारात ढोल बजाओ आंदोलन करत मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचा निषेध केला होता. शिवाय आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यास बोलावले असता ते न आल्याने संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाने हटविलेला स्टॉल पुन्हा उभारला होता. आज भेटण्याची वेळ मागितली होती; मात्र मुख्याधिकारी रजेवर गेल्याने आंदोलनकर्त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला.  यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, नगरसेविका भारती मोरे, शिवसेना महिला तालुकाध्यक्षा अपर्णा कोठावळे, ऍड. नीता सावंत, शब्बीर मणियार, प्रशांत कोठावळे, अशोक पवार, राष्ट्रवादीच्या महिला व्यापार-उद्योग जिल्हाध्यक्ष चित्रा बाबर, अजित सांगेलकर आदी उपस्थित होते.  यावेळी श्री. राऊळ म्हणाले, ""बेरोजगार युवकांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम पालिकेने केले आहे. त्यामुळे रवी जाधव या युवकाला न्याय मिळवून देण्याचा उद्देश आहे; मात्र सत्ताधारी ज्याप्रमाणे जाधव या युवकाशी वागत आहेत ते पाहता भाजप पक्षासाठी आणि सावंतवाडीकर जनतेसाठी घातक आहे. आदेश नसतानाही केलेली कारवाई चुकीची आहे. आपण यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली असता कारवाई संदर्भात कुठलेही आदेश कर्मचाऱ्यांना दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे एकीकडे मुख्याधिकाऱ्यांना आदेश दिले असे सांगणाऱ्या नगराध्यक्षांच्या आदेशाला मुख्याधिकारी केराची टोपली दाखवत असल्याचे दिसून आले. मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यामध्ये समन्वय नसल्याचेही समोर आले आहे. मुख्याधिकारी आज रजेवर गेलेले असले तरी ते ज्यावेळी हजर होतील त्यावेळी ज्या कर्मचाऱ्यांनी स्टॉल हटविला त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याबरोबरच जप्त केलेले साहित्य परत मिळण्यासाठी चर्चा करणार; मात्र कुठल्याही परिस्थितीत रवी जाधव याला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.'' ते पुढे म्हणाले, ""गुन्हा दाखल करण्याची धमकी नगराध्यक्षांनी देऊ नये. जनतेला न्याय देण्याची वृत्ती रक्तात आहे. त्यामुळे गुन्हे दाखल झाले तरी चालतील ते अंगावर घेण्याची हिंमत आहे. नगराध्यक्ष म्हणून परब यांनी चांगले काम करावे. शांत शहराला अशांत न करता जाधवसारख्या युवकाला मुदत वाढवून देऊन रोजगार द्यावा.''  "मला मदत वाढवून द्या'  सत्ताधारी नगरसेवकाकडून उद्या तुला स्टॉल दिसणार नाही, अशी धमकी देण्यात आली. आज स्टॉलचे वीज बिल एक लाखापेक्षा जास्त आहे. कोरोनामुळे धंदा नाही. गेल्यावर्षी परिस्थिती वेगळी होती आणि माझ्याकडे वेगळा पर्याय होता; मात्र आज दुसरा पर्याय नाही. मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी असल्याचे स्टॉलधारक रवी जाधव यांनी यावेळी सांगितले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, November 25, 2020

सावंतवाडीत स्टॉल वाद पेटला; सेना, राष्ट्रवादी आक्रमक सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील स्टॉलवरून निर्माण झालेला वाद आता पेटला आहे. काही झाले तरी स्टॉलधारकाला न्याय मिळवून देणारच, जनतेला न्याय देणे हे रक्तातच आहे. त्यामुळे गुन्हे दाखल झाले तरी त्याची फिकीर नाही, असा इशारा आज शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी शिवसेना व राष्ट्रवादीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिला. नगराध्यक्षांनीही स्टॉल हटवण्याच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा वाद पेटला आहे.  शहरामध्ये उभारलेला रवी जाधव या युवकाचा स्टॉल पालिका प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्तामध्ये हटविल्यानंतर स्टॉलवरून शिवसेना, राष्ट्रवादी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाला टार्गेट केले. काल (ता.24) सकाळी पालिकेच्या दारात ढोल बजाओ आंदोलन करत मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचा निषेध केला होता. शिवाय आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यास बोलावले असता ते न आल्याने संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाने हटविलेला स्टॉल पुन्हा उभारला होता. आज भेटण्याची वेळ मागितली होती; मात्र मुख्याधिकारी रजेवर गेल्याने आंदोलनकर्त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला.  यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, नगरसेविका भारती मोरे, शिवसेना महिला तालुकाध्यक्षा अपर्णा कोठावळे, ऍड. नीता सावंत, शब्बीर मणियार, प्रशांत कोठावळे, अशोक पवार, राष्ट्रवादीच्या महिला व्यापार-उद्योग जिल्हाध्यक्ष चित्रा बाबर, अजित सांगेलकर आदी उपस्थित होते.  यावेळी श्री. राऊळ म्हणाले, ""बेरोजगार युवकांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम पालिकेने केले आहे. त्यामुळे रवी जाधव या युवकाला न्याय मिळवून देण्याचा उद्देश आहे; मात्र सत्ताधारी ज्याप्रमाणे जाधव या युवकाशी वागत आहेत ते पाहता भाजप पक्षासाठी आणि सावंतवाडीकर जनतेसाठी घातक आहे. आदेश नसतानाही केलेली कारवाई चुकीची आहे. आपण यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली असता कारवाई संदर्भात कुठलेही आदेश कर्मचाऱ्यांना दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे एकीकडे मुख्याधिकाऱ्यांना आदेश दिले असे सांगणाऱ्या नगराध्यक्षांच्या आदेशाला मुख्याधिकारी केराची टोपली दाखवत असल्याचे दिसून आले. मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यामध्ये समन्वय नसल्याचेही समोर आले आहे. मुख्याधिकारी आज रजेवर गेलेले असले तरी ते ज्यावेळी हजर होतील त्यावेळी ज्या कर्मचाऱ्यांनी स्टॉल हटविला त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याबरोबरच जप्त केलेले साहित्य परत मिळण्यासाठी चर्चा करणार; मात्र कुठल्याही परिस्थितीत रवी जाधव याला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.'' ते पुढे म्हणाले, ""गुन्हा दाखल करण्याची धमकी नगराध्यक्षांनी देऊ नये. जनतेला न्याय देण्याची वृत्ती रक्तात आहे. त्यामुळे गुन्हे दाखल झाले तरी चालतील ते अंगावर घेण्याची हिंमत आहे. नगराध्यक्ष म्हणून परब यांनी चांगले काम करावे. शांत शहराला अशांत न करता जाधवसारख्या युवकाला मुदत वाढवून देऊन रोजगार द्यावा.''  "मला मदत वाढवून द्या'  सत्ताधारी नगरसेवकाकडून उद्या तुला स्टॉल दिसणार नाही, अशी धमकी देण्यात आली. आज स्टॉलचे वीज बिल एक लाखापेक्षा जास्त आहे. कोरोनामुळे धंदा नाही. गेल्यावर्षी परिस्थिती वेगळी होती आणि माझ्याकडे वेगळा पर्याय होता; मात्र आज दुसरा पर्याय नाही. मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी असल्याचे स्टॉलधारक रवी जाधव यांनी यावेळी सांगितले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3m7r4MH

No comments:

Post a Comment