कोरोना लढाईतील पुढचं पाऊल, कोविशील्डची चाचणी आता ज्येष्ठ नागरिकांवर मुंबई : कोरोनावरील कोविशील्ड लसची चाचणी मुंबई महापालिकेच्या नायर तसेच केईएम रूग्णालयात सुरू आहे. पहिल्या टप्प्यात या चाचण्या 18 ते 60 वर्षा दरम्यानच्या स्वयंसेवकांवर करण्यात आल्या. आता 60 वर्षावरील स्वयंसेवकांचा यात समावेश करण्याचे निर्देश ( ICMR ) आयसीएमआरकडून देण्यात आले असल्याने चाचणीसाठी ज्येष्ठ नागरिकांचा सोध सुरू झाला आहे.  नायर रुग्णालयात आजपर्यंत 148 जणांना कोविशील्ड लस देण्यात आली. चाचणीचा पहिला टप्पा पुर्ण झाला असून आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. चाचणीसाठी सुरुवातीला  18 ते 60 वर्षा दरम्यानच्या नागरिकांना ही लस देण्याचे आयसीएमआरचे निकष होते. मात्र आता ज्येष्ठ म्हणजेच 60 वर्ष वयोगटातील नागरिकांचा यात समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महत्त्वाची बातमी : कलाकारांना ड्रग्स पुरवणाऱ्या सुल्तान मिर्झाला NCB कडून अटक, मुंबईत धडक कारवाई केईएम रुग्णालयात कोविशील्डचा तिसऱ्या टप्प्यातील प्रयोग सुरू झाला आहे. नायर रुग्णालयात आजतागायत 148 स्वयंसेवकांना लस देण्यात आली. हे स्वयंसेवक सुदृढ असून त्यांच्या तब्येतीवर कोणताही विपरित परिणाम झाला नसल्याचे नायर रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. शिवाय आता आयसीएमआरच्या निर्देशानुसार ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करणार असल्याचे ही भारमल यांनी पुढे सांगितले. कोविशील्ड या ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीवर केईएम आणि नायर रुग्णालयात चाचणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात केईएम आणि नायर रूग्णालयातील 100 स्वयंसेवकांना लस देण्यात आली. मात्र, नायर रुग्णालयातील स्वयंसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने 100 ऐवजी 125 जणांना लस देण्यात येणार आहे.  त्यासाठी उर्वरीत ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात येणार आहे. नायरमध्ये आतापर्यंत 148 जणांना लस देण्यात आल्याचे डॉ.रमेश भारमल यांनी सांगितले. अधिक वाचाः  मुख्यमंत्र्यांकडून संयम कसा बाळगावा हे शिकलो: आदित्य ठाकरे ज्येष्ठ नागरिकांना समावेश चाचणीसाठी करण्यात येतोय. या लसीमुळे या आजाराला प्रतिबंध होतो का , श्वशनासंबंधी आजार कमी होतात का याचा अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी उच्च रक्तदाब, मधूमेह, क्षयरोग, कर्करोग आदी आजार नसलेल्या स्वयंसेवकांची गरज असते. व्याधीमुक्त ज्येष्ठ नागरिक शोधणे सुरू असून त्यासाठी प्रशासनाची दमछाक सुरू असल्याचे कळते.   covishield vaccine testing in third phase senior citizens will be given dose in KEM and nair News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 5, 2020

कोरोना लढाईतील पुढचं पाऊल, कोविशील्डची चाचणी आता ज्येष्ठ नागरिकांवर मुंबई : कोरोनावरील कोविशील्ड लसची चाचणी मुंबई महापालिकेच्या नायर तसेच केईएम रूग्णालयात सुरू आहे. पहिल्या टप्प्यात या चाचण्या 18 ते 60 वर्षा दरम्यानच्या स्वयंसेवकांवर करण्यात आल्या. आता 60 वर्षावरील स्वयंसेवकांचा यात समावेश करण्याचे निर्देश ( ICMR ) आयसीएमआरकडून देण्यात आले असल्याने चाचणीसाठी ज्येष्ठ नागरिकांचा सोध सुरू झाला आहे.  नायर रुग्णालयात आजपर्यंत 148 जणांना कोविशील्ड लस देण्यात आली. चाचणीचा पहिला टप्पा पुर्ण झाला असून आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. चाचणीसाठी सुरुवातीला  18 ते 60 वर्षा दरम्यानच्या नागरिकांना ही लस देण्याचे आयसीएमआरचे निकष होते. मात्र आता ज्येष्ठ म्हणजेच 60 वर्ष वयोगटातील नागरिकांचा यात समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महत्त्वाची बातमी : कलाकारांना ड्रग्स पुरवणाऱ्या सुल्तान मिर्झाला NCB कडून अटक, मुंबईत धडक कारवाई केईएम रुग्णालयात कोविशील्डचा तिसऱ्या टप्प्यातील प्रयोग सुरू झाला आहे. नायर रुग्णालयात आजतागायत 148 स्वयंसेवकांना लस देण्यात आली. हे स्वयंसेवक सुदृढ असून त्यांच्या तब्येतीवर कोणताही विपरित परिणाम झाला नसल्याचे नायर रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. शिवाय आता आयसीएमआरच्या निर्देशानुसार ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करणार असल्याचे ही भारमल यांनी पुढे सांगितले. कोविशील्ड या ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या लसीवर केईएम आणि नायर रुग्णालयात चाचणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात केईएम आणि नायर रूग्णालयातील 100 स्वयंसेवकांना लस देण्यात आली. मात्र, नायर रुग्णालयातील स्वयंसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने 100 ऐवजी 125 जणांना लस देण्यात येणार आहे.  त्यासाठी उर्वरीत ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात येणार आहे. नायरमध्ये आतापर्यंत 148 जणांना लस देण्यात आल्याचे डॉ.रमेश भारमल यांनी सांगितले. अधिक वाचाः  मुख्यमंत्र्यांकडून संयम कसा बाळगावा हे शिकलो: आदित्य ठाकरे ज्येष्ठ नागरिकांना समावेश चाचणीसाठी करण्यात येतोय. या लसीमुळे या आजाराला प्रतिबंध होतो का , श्वशनासंबंधी आजार कमी होतात का याचा अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी उच्च रक्तदाब, मधूमेह, क्षयरोग, कर्करोग आदी आजार नसलेल्या स्वयंसेवकांची गरज असते. व्याधीमुक्त ज्येष्ठ नागरिक शोधणे सुरू असून त्यासाठी प्रशासनाची दमछाक सुरू असल्याचे कळते.   covishield vaccine testing in third phase senior citizens will be given dose in KEM and nair News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2I90KmC

No comments:

Post a Comment