स्मशानभुमीला आले मंदिराचे स्वरूप; खडकाळ जमिनीवर सुमारे आठ हजार वृक्षांची लागवड टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : ढवळपुरी (ता. पारनेर) येथे वृक्षलागवड मोहिम हाती घेवून 12 हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. काळू धरण परिसरातील खडकाळ जमिनीवर सुमारे आठ हजार वृक्ष लागवड करुन परिसराचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. त्यामुळे निसर्ग संपन्न ढवळपुरी अशी ओळख आता या गावाची होऊ पाहत आहे. गावातील स्मशानभुमी सुशोभीकरणाने या परिसराला मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यातील काळु धरण परिसरातील वृक्ष दिड वर्षाचे व स्मशानभूमी परिसरातील तीन वर्षाचे वृक्ष झाली आहेत. जंगली वृक्षाबरोबरच आंबे, सिताफळ, जांभूळ, आवळा, चिंच फळाच्या वृक्षाबरोबरच रंगबेरंगी बोगनवेली, करवंदाची लागवड करण्यात आली आहे. अकोले तालुक्यात असणारी नांदुरकी वृक्षाची लागवड करुन काळू व अंकुर बंधारा परिसरात काजव्यांना आकर्षित करुन भविष्यातील काजव्यांचा प्रकाशोत्सव पहायला मिळाला नवल वाटावयास नको. सामाजिक वनीकरणामार्फत ढवळपुरी फाटा ते ढवळपुरी, ढवळपुरी ते सुतारवाडी, लमाणतांडा, गावडेवाडी रस्त्यालगत दुतर्फा वृक्षलागवड करुन संगोपन करण्यात आहे. ढवळपुरी स्मशान भूमीत आकर्षक असे फायकस, शंकासूर, पाम, नारळ, गुलमोहर, आंबा, चिंच, आवळा, रातराणी, कन्हेर, शिसम, मोगरा, जाई, जुई, बकुळ, सोनचाफा यासारख्या वृक्षांची स्वखर्चाने वृक्षलागवड करुन सरपंच डॉ. राजेश भनगडे यांनी निसर्गाशी एकरुप होत निसर्गमित्र असल्याचे दाखवून दिले आहे. पुढील काळात दुर्गादेवी मंदिरासमोरील बंधाऱ्यामध्ये आकर्षक कारंजा लोकसहभागातून उभारुन गावाच्या सुशोभिकरणात भर घालण्यात येणार आहे. सरपंच डॉ. राजेश भनगडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गावामध्ये विविध लोकउपयोगी कामांना सुरवात केली आहे. समुह शेती, अंकुर बंधारा, वृक्षारोपण, स्मशानभूमी सुशोभीकरण यासंह अन्य कामे पुर्ण झाली आहेत. जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर विविध नैसर्गिक आपत्तींना सतत सामोरे जावे लागत आहे. पृथ्वीवरील वातावरण शुद्ध करण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास वृक्ष मदत करतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात येत आहे, असे सरपंच डॉ. राजेश भनगडे यांनी सांगितले. संपादन : अशोक मुरुमकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 2, 2020

स्मशानभुमीला आले मंदिराचे स्वरूप; खडकाळ जमिनीवर सुमारे आठ हजार वृक्षांची लागवड टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : ढवळपुरी (ता. पारनेर) येथे वृक्षलागवड मोहिम हाती घेवून 12 हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. काळू धरण परिसरातील खडकाळ जमिनीवर सुमारे आठ हजार वृक्ष लागवड करुन परिसराचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. त्यामुळे निसर्ग संपन्न ढवळपुरी अशी ओळख आता या गावाची होऊ पाहत आहे. गावातील स्मशानभुमी सुशोभीकरणाने या परिसराला मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यातील काळु धरण परिसरातील वृक्ष दिड वर्षाचे व स्मशानभूमी परिसरातील तीन वर्षाचे वृक्ष झाली आहेत. जंगली वृक्षाबरोबरच आंबे, सिताफळ, जांभूळ, आवळा, चिंच फळाच्या वृक्षाबरोबरच रंगबेरंगी बोगनवेली, करवंदाची लागवड करण्यात आली आहे. अकोले तालुक्यात असणारी नांदुरकी वृक्षाची लागवड करुन काळू व अंकुर बंधारा परिसरात काजव्यांना आकर्षित करुन भविष्यातील काजव्यांचा प्रकाशोत्सव पहायला मिळाला नवल वाटावयास नको. सामाजिक वनीकरणामार्फत ढवळपुरी फाटा ते ढवळपुरी, ढवळपुरी ते सुतारवाडी, लमाणतांडा, गावडेवाडी रस्त्यालगत दुतर्फा वृक्षलागवड करुन संगोपन करण्यात आहे. ढवळपुरी स्मशान भूमीत आकर्षक असे फायकस, शंकासूर, पाम, नारळ, गुलमोहर, आंबा, चिंच, आवळा, रातराणी, कन्हेर, शिसम, मोगरा, जाई, जुई, बकुळ, सोनचाफा यासारख्या वृक्षांची स्वखर्चाने वृक्षलागवड करुन सरपंच डॉ. राजेश भनगडे यांनी निसर्गाशी एकरुप होत निसर्गमित्र असल्याचे दाखवून दिले आहे. पुढील काळात दुर्गादेवी मंदिरासमोरील बंधाऱ्यामध्ये आकर्षक कारंजा लोकसहभागातून उभारुन गावाच्या सुशोभिकरणात भर घालण्यात येणार आहे. सरपंच डॉ. राजेश भनगडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गावामध्ये विविध लोकउपयोगी कामांना सुरवात केली आहे. समुह शेती, अंकुर बंधारा, वृक्षारोपण, स्मशानभूमी सुशोभीकरण यासंह अन्य कामे पुर्ण झाली आहेत. जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर विविध नैसर्गिक आपत्तींना सतत सामोरे जावे लागत आहे. पृथ्वीवरील वातावरण शुद्ध करण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास वृक्ष मदत करतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात येत आहे, असे सरपंच डॉ. राजेश भनगडे यांनी सांगितले. संपादन : अशोक मुरुमकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3kTA6My

No comments:

Post a Comment