Video : पुण्यातील ते बाह्यवळण जीवघेणेच! पुणे - बाह्यवळण मार्ग म्हणून बांधलेला कात्रज-देहूरोड रस्ता अवघ्या पंधरा वर्षांत पुणे-पिंपरी चिंचवड महानगरांमधील नागरी वाहतुकीसाठी मध्यवर्ती मार्ग बनला आहे. या मार्गाच्या भोवती अफाट वेगाने झालेल्या नागरीकरणामुळे तेथील मालवाहतूक नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. मंगळवारी सकाळी पुण्यात नवले पुलाजवळ झालेल्या ट्रक अपघातामुळे उडालेला हाहाकार भविष्यात या रस्त्यावरील मालवाहतूक किती जोखमीची बनणार आहे, याचे ताजे उदाहरण ठरला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बाह्यवळण रस्त्याच्या दुतर्फा राहणारी लोकसंख्या पाच लाखांच्या पुढे पोचली असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची हद्दही विस्तारली आहे. बाह्यवळण मार्ग तयार करताना सेवा रस्ते (सर्व्हिस लेन) झाले; पण ते सलग नसल्यामुळे दुचाकी वाहने महामार्गावरच येतात आणि त्यातून अपघातांना वारंवार निमंत्रण मिळत आहे. दोन्ही बाजूंना प्रत्येकी १२ मीटर रुंदीचे विकास आराखड्यातील रस्ते (डीपी रोड) अजूनही कागदोपत्रीच आहेत, हेही बाह्यवळण मार्गाचे गंभीर दुखणे आहे. सुमारे ४० किलोमीटर लांबीचा हा बाह्यवळण रस्ता राष्ट्रीय महामार्गाचा भाग असला तरी, त्याची अवस्था सध्या शहरी रस्त्यांसारखीच आहे. २००० मध्ये सुरू झालेला हा बाह्यवळण मार्ग २००५ मध्ये पूर्ण झाला. कात्रजकडून देहूरोडच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला पूर्वी तुरळक वस्ती होती. आता तेथे दत्तनगर, नऱ्हे, आंबेगाव, वडगाव, वारजे, सूस, बावधन, सुतारवाडी, बाणेर, म्हाळुंगे, वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत अशी उपनगरे तयार झाली. तेथे गेल्या पंधरा वर्षांत सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त लोक राहायला आले. त्यांच्यासाठी पुरेसे सेवा रस्ते विकसित न झाल्यामुळे त्यांच्या नागरी वाहतुकीचा भार महामार्गावर येत आहे. जड वाहनांच्या वाहतुकीचा वेग जास्त असल्यामुळे अपघातांची संख्या वाढतीच असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. बार, हॉटेलचालकांनो, आता नियम मोडू नका नाहीतर... महामार्गांवरील वाहतुकीचे अभ्यासक तन्मय पेंडसे यांच्या निरीक्षणानुसार बाह्यवळण मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता आणि सेवा रस्ते यांच्यामधील शोल्डर लेनमध्ये अवघे अर्ध्या फुटाचे अंतर आहे. ‘बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्यांची एकूणच अवस्था दयनीय आहे. ते सलग नाहीत. खरे तर हे सेवा रस्ते सलग हवेत. रस्त्याच्या कडा, उंची याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. काही ठिकाणी रस्ता आणि शोल्डर लेनमध्ये अर्ध्या फुटाचे अंतर आहे. त्यामुळेही अपघात होत आहेत.’ कोंढव्यात दारु पिण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणातून तरुणाचा खून  सेवा रस्ते खंडितच बाह्यवळण रस्त्याची रुंदी ६० मीटर आहे. त्यात सेवा रस्त्यांचाही समावेश आहे. परंतु, सेवा रस्ते सलग नसल्यामुळे कात्रजपासून देहूरोडपर्यंत सलग त्यांचा वापर होत नाही. महामार्ग, दोन मीटर रुंदीची शोल्डर लेन (मातीचा रस्ता), सेवा रस्ते यामध्ये अनेक ठिकाणी फरकच दिसत नाही, असेही प्रत्यक्ष पाहणी केल्यावर दिसून येते. आजचा नवले पुलाजवळील डेक्कन पॅव्हेलियन हॉटेलसमोर झालेला अपघात हा त्याचीच परिणीती आहे. डीपी रोड कागदावरच सेवा रस्त्याच्या शेजारी दोन्ही बाजूला प्रत्येकी १२ मीटर रुंदीचे रस्ते महापालिकेने विकास आराखड्यात प्रस्तावित केले. परंतु, वारज्याचा काही भाग वगळता अन्यत्र कोठेही हे रस्ते नाहीत. नव्याने विकसित झालेल्या उपनगरांतील नागरिक हे रस्ते वापरतील, त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल, असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे न झाल्यामुळे दुचाकी व मोटारीही महामार्गावरूनच वाहतूक करतात. हे रस्ते विकसित करण्यासाठी भूसंपादनात अनेक अडचणी येत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. मात्र त्याचे परिणाम अपघातांच्या माध्यमांतून नागरिकांना भोगावे लागत आहेत. राजगुरूनगर नगरपरिषदेला उच्च न्यायालयाचा दणका वाहनचालकांची बेशिस्त उलट दिशेने भरधाव येणारी वाहने, हे देखील या रस्त्यावरील प्रमुख समस्या आहे. त्यातच महामार्ग कोठूनही ओलांडला जातो. महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार दुभाजक उभारता येत नाही. त्यामुळे मिळेल तेथून पादचारी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात. पुणे शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या म्हणण्यानुसार महामार्गाच्या दुतर्फा दुकाने, नागरी वस्ती असेल तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षिततेची साधने लावणे गरजेचे आहे. ‘अंतर्गत रस्त्यांचे पुरेसे जाळे निर्माण झाले तर, महामार्गावर अनावश्‍यक वाहनांची गर्दी होणार नाही. किमान महामार्गांच्या नियमांची जरी या रस्त्यावर अंमलबजावणी झाली तरी, अपघातांचे प्रमाण कमी होईल,’ असे त्यांचे मत आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी हवे - बाह्यवळण रस्त्याच्या दुतर्फा सलग सेवा रस्ते - महापालिकेच्या विकास आराखड्यातील रस्त्यांची बांधणी - रम्बलर्स, ब्रायफेन रोप, दुभाजक यांचा योग्य ठिकाणी वापर - सुरक्षित वाहतुकीसाठीच्या नियमांची अंमलबजावणी कात्रजजवळ भीषण अपघात; ट्रकने १३ वाहनांना उडवले; एकाचा मृत्यू, तर आठजण जखमी धायरी/पुणे - भरधाव मालवाहू ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने सात दुचाकी व सहा चारचाकी वाहनांना त्याने जोरदार धडक देत त्यांचा चक्काकूर केला. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली आल्याने दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य सात जण जखमी झाले असून, त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी साडे दहाला मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नऱ्हे-आंबेगाव येथील पेट्रोल पंपासमोर घडला.   शुभम प्रकाश सुपेकर (वय २४, रा. ग्रीनव्हीला सोसायटी, आंबेगाव) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रकाश अशोक आराख (वय ३३, रा. उत्तमनगर), रवींद्र शहाणे (वय ५५, रा. कोंढवे-धावडे), नागनाथ भारत वदणे (वय ३१, रा. कोंढवा), विलास सदाशिव जगताप (वय ४०, रा. आंबेगाव बुद्रूक), दिलीप लक्ष्मण मादगुडे (वय ५८, रा. आंबेगाव पठार), सिद्धार्थ अनिरुद्ध वेदपाठक (वय २८, रा. कोंढवा), मुकेशकुमार मालाजी पुरोहित (वय ३०, रा. कात्रज-कोंढवा), सायली गुरुदत्त भोसले (वय २६, रा. दत्तनगर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर अन्य काही नागरिक किरकोळ जखमी असून, त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.  मंगळवारी सकाळी साडे दहाला कात्रजहून देहूरोडच्या दिशेने निघालेल्या ट्रकचे (एमएच १२ एचसी ७२९९) ब्रम्हा हॉटेलसमोर ब्रेक निकामी झाले. उतार असल्यामुळे त्याला आणखीनच वेग मिळाला. ट्रकने पहिल्यांदा डाव्या बाजूच्या एका पिकअप टेम्पोला उडविले. त्यामुळे हा टेम्पो सेवा रस्त्यासाठी खोदलेल्या २५ फूट खड्ड्यात कोसळला. त्यानंतर ट्रकने समोरील सात दुचाकींना लागोपाठ उडविले. त्यानंतर पुढच्या तीन मोटारींना त्याने धडक दिली.   शुभमचा टेम्पो खड्ड्यात शुभम सुपेकर हा बाटलीबंद पिण्याच्या पाण्याच्या विक्रीचा व्यवसाय करीत होता. त्यासाठी त्याच्याकडे बोलेरो कंपनीचा पिकअप टेम्पो होता. त्यावर विलास जगताप हे चालक होते. शुभम हा जगताप यांच्यासह पिकअपमध्ये डिझेल भरण्यासाठी आला होता. डिझेल भरल्यानंतर तो टेम्पोसमवेत त्याच्या दुचाकीवरून जात होता. त्याचवेळी ट्रकने शुभमला उडविले. तो ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला तर शुभमच्या दुचाकी मागे असणाऱ्या पिकअप टेम्पोला ट्रकने धडक दिल्याने टेम्पो २५ फूट खड्ड्यात कोसळला. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, October 6, 2020

Video : पुण्यातील ते बाह्यवळण जीवघेणेच! पुणे - बाह्यवळण मार्ग म्हणून बांधलेला कात्रज-देहूरोड रस्ता अवघ्या पंधरा वर्षांत पुणे-पिंपरी चिंचवड महानगरांमधील नागरी वाहतुकीसाठी मध्यवर्ती मार्ग बनला आहे. या मार्गाच्या भोवती अफाट वेगाने झालेल्या नागरीकरणामुळे तेथील मालवाहतूक नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. मंगळवारी सकाळी पुण्यात नवले पुलाजवळ झालेल्या ट्रक अपघातामुळे उडालेला हाहाकार भविष्यात या रस्त्यावरील मालवाहतूक किती जोखमीची बनणार आहे, याचे ताजे उदाहरण ठरला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा बाह्यवळण रस्त्याच्या दुतर्फा राहणारी लोकसंख्या पाच लाखांच्या पुढे पोचली असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची हद्दही विस्तारली आहे. बाह्यवळण मार्ग तयार करताना सेवा रस्ते (सर्व्हिस लेन) झाले; पण ते सलग नसल्यामुळे दुचाकी वाहने महामार्गावरच येतात आणि त्यातून अपघातांना वारंवार निमंत्रण मिळत आहे. दोन्ही बाजूंना प्रत्येकी १२ मीटर रुंदीचे विकास आराखड्यातील रस्ते (डीपी रोड) अजूनही कागदोपत्रीच आहेत, हेही बाह्यवळण मार्गाचे गंभीर दुखणे आहे. सुमारे ४० किलोमीटर लांबीचा हा बाह्यवळण रस्ता राष्ट्रीय महामार्गाचा भाग असला तरी, त्याची अवस्था सध्या शहरी रस्त्यांसारखीच आहे. २००० मध्ये सुरू झालेला हा बाह्यवळण मार्ग २००५ मध्ये पूर्ण झाला. कात्रजकडून देहूरोडच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला पूर्वी तुरळक वस्ती होती. आता तेथे दत्तनगर, नऱ्हे, आंबेगाव, वडगाव, वारजे, सूस, बावधन, सुतारवाडी, बाणेर, म्हाळुंगे, वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत अशी उपनगरे तयार झाली. तेथे गेल्या पंधरा वर्षांत सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त लोक राहायला आले. त्यांच्यासाठी पुरेसे सेवा रस्ते विकसित न झाल्यामुळे त्यांच्या नागरी वाहतुकीचा भार महामार्गावर येत आहे. जड वाहनांच्या वाहतुकीचा वेग जास्त असल्यामुळे अपघातांची संख्या वाढतीच असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. बार, हॉटेलचालकांनो, आता नियम मोडू नका नाहीतर... महामार्गांवरील वाहतुकीचे अभ्यासक तन्मय पेंडसे यांच्या निरीक्षणानुसार बाह्यवळण मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता आणि सेवा रस्ते यांच्यामधील शोल्डर लेनमध्ये अवघे अर्ध्या फुटाचे अंतर आहे. ‘बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्यांची एकूणच अवस्था दयनीय आहे. ते सलग नाहीत. खरे तर हे सेवा रस्ते सलग हवेत. रस्त्याच्या कडा, उंची याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. काही ठिकाणी रस्ता आणि शोल्डर लेनमध्ये अर्ध्या फुटाचे अंतर आहे. त्यामुळेही अपघात होत आहेत.’ कोंढव्यात दारु पिण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणातून तरुणाचा खून  सेवा रस्ते खंडितच बाह्यवळण रस्त्याची रुंदी ६० मीटर आहे. त्यात सेवा रस्त्यांचाही समावेश आहे. परंतु, सेवा रस्ते सलग नसल्यामुळे कात्रजपासून देहूरोडपर्यंत सलग त्यांचा वापर होत नाही. महामार्ग, दोन मीटर रुंदीची शोल्डर लेन (मातीचा रस्ता), सेवा रस्ते यामध्ये अनेक ठिकाणी फरकच दिसत नाही, असेही प्रत्यक्ष पाहणी केल्यावर दिसून येते. आजचा नवले पुलाजवळील डेक्कन पॅव्हेलियन हॉटेलसमोर झालेला अपघात हा त्याचीच परिणीती आहे. डीपी रोड कागदावरच सेवा रस्त्याच्या शेजारी दोन्ही बाजूला प्रत्येकी १२ मीटर रुंदीचे रस्ते महापालिकेने विकास आराखड्यात प्रस्तावित केले. परंतु, वारज्याचा काही भाग वगळता अन्यत्र कोठेही हे रस्ते नाहीत. नव्याने विकसित झालेल्या उपनगरांतील नागरिक हे रस्ते वापरतील, त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल, असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तसे न झाल्यामुळे दुचाकी व मोटारीही महामार्गावरूनच वाहतूक करतात. हे रस्ते विकसित करण्यासाठी भूसंपादनात अनेक अडचणी येत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. मात्र त्याचे परिणाम अपघातांच्या माध्यमांतून नागरिकांना भोगावे लागत आहेत. राजगुरूनगर नगरपरिषदेला उच्च न्यायालयाचा दणका वाहनचालकांची बेशिस्त उलट दिशेने भरधाव येणारी वाहने, हे देखील या रस्त्यावरील प्रमुख समस्या आहे. त्यातच महामार्ग कोठूनही ओलांडला जातो. महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार दुभाजक उभारता येत नाही. त्यामुळे मिळेल तेथून पादचारी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात. पुणे शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या म्हणण्यानुसार महामार्गाच्या दुतर्फा दुकाने, नागरी वस्ती असेल तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षिततेची साधने लावणे गरजेचे आहे. ‘अंतर्गत रस्त्यांचे पुरेसे जाळे निर्माण झाले तर, महामार्गावर अनावश्‍यक वाहनांची गर्दी होणार नाही. किमान महामार्गांच्या नियमांची जरी या रस्त्यावर अंमलबजावणी झाली तरी, अपघातांचे प्रमाण कमी होईल,’ असे त्यांचे मत आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी हवे - बाह्यवळण रस्त्याच्या दुतर्फा सलग सेवा रस्ते - महापालिकेच्या विकास आराखड्यातील रस्त्यांची बांधणी - रम्बलर्स, ब्रायफेन रोप, दुभाजक यांचा योग्य ठिकाणी वापर - सुरक्षित वाहतुकीसाठीच्या नियमांची अंमलबजावणी कात्रजजवळ भीषण अपघात; ट्रकने १३ वाहनांना उडवले; एकाचा मृत्यू, तर आठजण जखमी धायरी/पुणे - भरधाव मालवाहू ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने सात दुचाकी व सहा चारचाकी वाहनांना त्याने जोरदार धडक देत त्यांचा चक्काकूर केला. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली आल्याने दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य सात जण जखमी झाले असून, त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी साडे दहाला मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नऱ्हे-आंबेगाव येथील पेट्रोल पंपासमोर घडला.   शुभम प्रकाश सुपेकर (वय २४, रा. ग्रीनव्हीला सोसायटी, आंबेगाव) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रकाश अशोक आराख (वय ३३, रा. उत्तमनगर), रवींद्र शहाणे (वय ५५, रा. कोंढवे-धावडे), नागनाथ भारत वदणे (वय ३१, रा. कोंढवा), विलास सदाशिव जगताप (वय ४०, रा. आंबेगाव बुद्रूक), दिलीप लक्ष्मण मादगुडे (वय ५८, रा. आंबेगाव पठार), सिद्धार्थ अनिरुद्ध वेदपाठक (वय २८, रा. कोंढवा), मुकेशकुमार मालाजी पुरोहित (वय ३०, रा. कात्रज-कोंढवा), सायली गुरुदत्त भोसले (वय २६, रा. दत्तनगर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर अन्य काही नागरिक किरकोळ जखमी असून, त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.  मंगळवारी सकाळी साडे दहाला कात्रजहून देहूरोडच्या दिशेने निघालेल्या ट्रकचे (एमएच १२ एचसी ७२९९) ब्रम्हा हॉटेलसमोर ब्रेक निकामी झाले. उतार असल्यामुळे त्याला आणखीनच वेग मिळाला. ट्रकने पहिल्यांदा डाव्या बाजूच्या एका पिकअप टेम्पोला उडविले. त्यामुळे हा टेम्पो सेवा रस्त्यासाठी खोदलेल्या २५ फूट खड्ड्यात कोसळला. त्यानंतर ट्रकने समोरील सात दुचाकींना लागोपाठ उडविले. त्यानंतर पुढच्या तीन मोटारींना त्याने धडक दिली.   शुभमचा टेम्पो खड्ड्यात शुभम सुपेकर हा बाटलीबंद पिण्याच्या पाण्याच्या विक्रीचा व्यवसाय करीत होता. त्यासाठी त्याच्याकडे बोलेरो कंपनीचा पिकअप टेम्पो होता. त्यावर विलास जगताप हे चालक होते. शुभम हा जगताप यांच्यासह पिकअपमध्ये डिझेल भरण्यासाठी आला होता. डिझेल भरल्यानंतर तो टेम्पोसमवेत त्याच्या दुचाकीवरून जात होता. त्याचवेळी ट्रकने शुभमला उडविले. तो ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला तर शुभमच्या दुचाकी मागे असणाऱ्या पिकअप टेम्पोला ट्रकने धडक दिल्याने टेम्पो २५ फूट खड्ड्यात कोसळला. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3nlR3Rw

No comments:

Post a Comment