वीजेअभावी गॅस निर्मिती प्रकल्प 'स्टॉप'  औरंगाबाद : कचराकोंडीनंतर महापालिकेने कांचनवाडी येथे तीस टन ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मिती करण्याच्या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असले तरी एका वीज कनेक्शनमुळे गेल्या दहा महिन्यांपासून प्रकल्प कार्यान्वित होऊ शकला नाही. वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर आता वीज कंपनीने निविदा अंतिम करीत काम सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! शहरात दोन वर्षांपूर्वी कचराकोंडी निर्माण झाली. त्यानंतर राज्य शासनाने दिलेल्या निधीतून महापालिकेने चिकलठाणा, हर्सूल व पडेगाव येथे प्रत्येकी दीडशे टनाचे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. यातील फक्त चिकलठाणा येथील प्रकल्प सुरू झाला. तसेच शहरातील हॉटेल्स, भाजीमंडईमधून निघणाऱ्या सुमारे ४० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून गॅस निर्मिती करण्यासाठी कांचनवाडी येथे प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. मात्र, वीज कनेक्शनअभावी हा प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पाची पाहणी केली होती. त्यावेळी प्रशासनाने काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले होते; पण दहा महिन्यांपासून केवळ वीज कनेक्‍शन मिळाले नाही म्हणून प्रकल्प सुरू झाला नसल्याचे समोर आले आहे. सुरवातीला कंत्राटदाराने वीज कनेक्शन घ्यावे, यासाठी महापालिकेने तगादा लावला; पण वीज मिळवून देणे महापालिकेची जबाबदारी असल्याचे सांगत कंत्राटदाराने हात आखडता घेतला. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेने प्रकल्पासाठी वीजपुरवठा आणण्याच्या कामाची निविदा काढली, असून हे काम लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर प्रकल्प कार्यान्वित होईल, असे सूत्रांनी सांगितले.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. चिकलठाण्यातही उफाळला होता वाद  चिकलठाणा येथील प्रकल्पाला वीज देताना महापालिका व वीज वितरण कंपनीत वाद निर्माण झाला होता. महापालिकेने त्यांच्या स्तरावर प्रकल्पापर्यंत वीज घेण्याचे काम करून घ्यावे, अशी भूमिका घेतली. दरम्यान, वरिष्ठस्तरावर बैठका झाल्यानंतर महापालिकेने कामाचे पैसे द्यावेत व महावितरण पोलसह रोहित्र बसविण्याचे काम करून देईल, असे कंपनीने स्पष्ट केले. काही काळ हा प्रकल्प महापालिकेला जनरेटरवर चालवावा लागला होता.  (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, October 2, 2020

वीजेअभावी गॅस निर्मिती प्रकल्प 'स्टॉप'  औरंगाबाद : कचराकोंडीनंतर महापालिकेने कांचनवाडी येथे तीस टन ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मिती करण्याच्या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असले तरी एका वीज कनेक्शनमुळे गेल्या दहा महिन्यांपासून प्रकल्प कार्यान्वित होऊ शकला नाही. वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर आता वीज कंपनीने निविदा अंतिम करीत काम सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! शहरात दोन वर्षांपूर्वी कचराकोंडी निर्माण झाली. त्यानंतर राज्य शासनाने दिलेल्या निधीतून महापालिकेने चिकलठाणा, हर्सूल व पडेगाव येथे प्रत्येकी दीडशे टनाचे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. यातील फक्त चिकलठाणा येथील प्रकल्प सुरू झाला. तसेच शहरातील हॉटेल्स, भाजीमंडईमधून निघणाऱ्या सुमारे ४० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून गॅस निर्मिती करण्यासाठी कांचनवाडी येथे प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले. मात्र, वीज कनेक्शनअभावी हा प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काही महिन्यांपूर्वी या प्रकल्पाची पाहणी केली होती. त्यावेळी प्रशासनाने काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले होते; पण दहा महिन्यांपासून केवळ वीज कनेक्‍शन मिळाले नाही म्हणून प्रकल्प सुरू झाला नसल्याचे समोर आले आहे. सुरवातीला कंत्राटदाराने वीज कनेक्शन घ्यावे, यासाठी महापालिकेने तगादा लावला; पण वीज मिळवून देणे महापालिकेची जबाबदारी असल्याचे सांगत कंत्राटदाराने हात आखडता घेतला. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेने प्रकल्पासाठी वीजपुरवठा आणण्याच्या कामाची निविदा काढली, असून हे काम लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर प्रकल्प कार्यान्वित होईल, असे सूत्रांनी सांगितले.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. चिकलठाण्यातही उफाळला होता वाद  चिकलठाणा येथील प्रकल्पाला वीज देताना महापालिका व वीज वितरण कंपनीत वाद निर्माण झाला होता. महापालिकेने त्यांच्या स्तरावर प्रकल्पापर्यंत वीज घेण्याचे काम करून घ्यावे, अशी भूमिका घेतली. दरम्यान, वरिष्ठस्तरावर बैठका झाल्यानंतर महापालिकेने कामाचे पैसे द्यावेत व महावितरण पोलसह रोहित्र बसविण्याचे काम करून देईल, असे कंपनीने स्पष्ट केले. काही काळ हा प्रकल्प महापालिकेला जनरेटरवर चालवावा लागला होता.  (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3jCVEwc

No comments:

Post a Comment