आंबोली प्रकरण; पुरावे शोधण्यात पाऊस अडसर सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गीतांजली मळगावकर मृत्यू प्रकरणात मोटारीचा वापर झाला होता. मोटार मालकाला येथील पोलिस ठाण्यात बोलाविले होते. यात आणखी काही धागेदोरे सापडतात का? याची माहिती घेण्यासाठी त्याची कसून चौकशी झाली. दरम्यान, आज घाटात पाऊस झाल्याने पुरावे शोधण्याची मोहीम स्थगित करण्यात आली. हे पुरावे या गुन्ह्यात महत्त्वाचे असल्याने ते शोधण्याची मोहीम पुन्हा राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.  आंबोली घाटामध्ये मळगाव येथील गीतांजली मळगावकर या महिलेचा घातपात करून मृतदेह टाकल्यानंतर कॉल रेकॉर्डवरून या प्रकरणाचा छडा लावत चौघांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील मुख्य संशयित योगेश आडणेकर हा तपासात योग्य सहकार्य करत नसल्याची माहिती आज सहाय्यक पोलिस निरिक्षक तौफिक सय्यद यांनी दिली. ते म्हणाले, ""संशयितांनी रात्रीच्यावेळी घाटात महिलेची पर्स, चप्पल, मोबाईल या गोष्टी ज्या ठिकाणी फेकल्या होत्या. त्या ठिकाणी शोध घेण्यात आला; मात्र तेथे काही सापडले नाही. आज पुन्हा शोध घेण्यात येणार होता; मात्र पाऊस असल्याने ही मोहीम तूर्त थांबविण्यात आली. फेकलेल्या वस्तू पुरावे म्हणून महत्त्वाच्या असल्याने पुन्हा त्यांचा शोध घेण्यात येणार आहे. संबंधित महिलेवर ज्या मोटारीत अत्याचार झाला ती मोटर ताब्यात घेतली आहे. तरी ही मोटार अन्य कुठल्या अवैध धंद्यासाठी वापरली आहे का? हेही तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.''  त्यामुळे या प्रकरणात वापरलेल्या मोटार मालकाची आता चौकशी सुरू झाली आहे. ही मोटार एका राजकीय युवा पदाधिकाऱ्याची असल्याचे तपासात समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच या मोटारीबाबत दोन राजकीय युवा पदाधिकाऱ्यांत खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याचे समजते.  मोटार भाड्याने  ही मोटार संशयित आडणेकर याने भाड्याने नेली होती. त्यानंतरच हा सर्व प्रकार घडला. या प्रकरणातील पुरावे शोधण्याचे काम हाती घेतले असले तरी संशयित हा पोलिसांना पुढील तपासात सहकार्य करत नसल्याचे सय्यद यांनी सांगितले. संबंधित महिलेच्या मुलाचे डीएनए तपासासाठी रत्नागिरी येथील प्रयोगशाळेत आज पाठविल्याचेही त्यांनी सांगितले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, October 2, 2020

आंबोली प्रकरण; पुरावे शोधण्यात पाऊस अडसर सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गीतांजली मळगावकर मृत्यू प्रकरणात मोटारीचा वापर झाला होता. मोटार मालकाला येथील पोलिस ठाण्यात बोलाविले होते. यात आणखी काही धागेदोरे सापडतात का? याची माहिती घेण्यासाठी त्याची कसून चौकशी झाली. दरम्यान, आज घाटात पाऊस झाल्याने पुरावे शोधण्याची मोहीम स्थगित करण्यात आली. हे पुरावे या गुन्ह्यात महत्त्वाचे असल्याने ते शोधण्याची मोहीम पुन्हा राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.  आंबोली घाटामध्ये मळगाव येथील गीतांजली मळगावकर या महिलेचा घातपात करून मृतदेह टाकल्यानंतर कॉल रेकॉर्डवरून या प्रकरणाचा छडा लावत चौघांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील मुख्य संशयित योगेश आडणेकर हा तपासात योग्य सहकार्य करत नसल्याची माहिती आज सहाय्यक पोलिस निरिक्षक तौफिक सय्यद यांनी दिली. ते म्हणाले, ""संशयितांनी रात्रीच्यावेळी घाटात महिलेची पर्स, चप्पल, मोबाईल या गोष्टी ज्या ठिकाणी फेकल्या होत्या. त्या ठिकाणी शोध घेण्यात आला; मात्र तेथे काही सापडले नाही. आज पुन्हा शोध घेण्यात येणार होता; मात्र पाऊस असल्याने ही मोहीम तूर्त थांबविण्यात आली. फेकलेल्या वस्तू पुरावे म्हणून महत्त्वाच्या असल्याने पुन्हा त्यांचा शोध घेण्यात येणार आहे. संबंधित महिलेवर ज्या मोटारीत अत्याचार झाला ती मोटर ताब्यात घेतली आहे. तरी ही मोटार अन्य कुठल्या अवैध धंद्यासाठी वापरली आहे का? हेही तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.''  त्यामुळे या प्रकरणात वापरलेल्या मोटार मालकाची आता चौकशी सुरू झाली आहे. ही मोटार एका राजकीय युवा पदाधिकाऱ्याची असल्याचे तपासात समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच या मोटारीबाबत दोन राजकीय युवा पदाधिकाऱ्यांत खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याचे समजते.  मोटार भाड्याने  ही मोटार संशयित आडणेकर याने भाड्याने नेली होती. त्यानंतरच हा सर्व प्रकार घडला. या प्रकरणातील पुरावे शोधण्याचे काम हाती घेतले असले तरी संशयित हा पोलिसांना पुढील तपासात सहकार्य करत नसल्याचे सय्यद यांनी सांगितले. संबंधित महिलेच्या मुलाचे डीएनए तपासासाठी रत्नागिरी येथील प्रयोगशाळेत आज पाठविल्याचेही त्यांनी सांगितले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3ngplFA

No comments:

Post a Comment