सावधान ! विनामास्क वाहन चालविल्यास परवाना होणार रद्द औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक वाहन चालवणाऱ्या चालकांना वाहन चालवताना मास्क घालणे बंधनकारक आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्या परवानाधारकांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता.१३) आयोजित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी) संजय मेत्रेवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी विना मास्क सार्वजनिक वाहतूक करीत असलेल्या वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या विनामास्क वाहन चालवणाऱ्या परवाना धारकाविरुद्ध पहिल्या गुन्ह्यासाठी ३० दिवस तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी ९० दिवस परवाना निलंबन करण्याचा तर तिसऱ्या गुन्ह्याकरिता वाहनाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ  केंद्रशासनाने वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र, सर्व प्रकारचे परवाने, शिकाऊ परवाना, पक्का परवाना, नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण, तात्पुरत्या नोंदणी प्रमाणपत्रांची मुदत १ फेब्रुवारी २०२० नंतर लॉकडॉऊन कालावधीमध्ये संपली असेल तर अशा वाहनविषयक दस्तऐवजांची वैधता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवलेली आहे. देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. त्यानुसार प्रादेशिक परिवहन प्राधीकरण औरंगाबाद यांनी परवानाधारकांच्या परवाना नूतनीकरणाची, बदली वाहन आदेशाची, इरादा पत्राची मुदत अशा वाहनविषयक दस्तऐवजांच्या वैधतेस ३१ डिसेंबर २०२० या दिनांकापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.  (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, October 13, 2020

सावधान ! विनामास्क वाहन चालविल्यास परवाना होणार रद्द औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक वाहन चालवणाऱ्या चालकांना वाहन चालवताना मास्क घालणे बंधनकारक आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्या परवानाधारकांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता.१३) आयोजित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी) संजय मेत्रेवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी विना मास्क सार्वजनिक वाहतूक करीत असलेल्या वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या विनामास्क वाहन चालवणाऱ्या परवाना धारकाविरुद्ध पहिल्या गुन्ह्यासाठी ३० दिवस तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी ९० दिवस परवाना निलंबन करण्याचा तर तिसऱ्या गुन्ह्याकरिता वाहनाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ  केंद्रशासनाने वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र, सर्व प्रकारचे परवाने, शिकाऊ परवाना, पक्का परवाना, नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण, तात्पुरत्या नोंदणी प्रमाणपत्रांची मुदत १ फेब्रुवारी २०२० नंतर लॉकडॉऊन कालावधीमध्ये संपली असेल तर अशा वाहनविषयक दस्तऐवजांची वैधता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवलेली आहे. देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. त्यानुसार प्रादेशिक परिवहन प्राधीकरण औरंगाबाद यांनी परवानाधारकांच्या परवाना नूतनीकरणाची, बदली वाहन आदेशाची, इरादा पत्राची मुदत अशा वाहनविषयक दस्तऐवजांच्या वैधतेस ३१ डिसेंबर २०२० या दिनांकापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.  (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/33TALre

No comments:

Post a Comment