नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला भामट्यांचा गंडा ! औरंगाबाद : वित्तीय संस्थेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत परप्रांतीय भामट्यांनी तरुणाला सहा लाख ९२ हजार ४४० रुपयांना गंडविले.  हा प्रकार १२ मार्च २०१९ ते २० सप्टेंबर २०१९ यादरम्यान घडला. विशेष म्हणजे लोकांना कर्ज दिले जाईल असे आमिष दाखवल्याने फसवणूक झालेल्या तरुणाने शेकडो लोकांकडून प्रत्येकी चार हजार ६२० रुपये जमा करून भामट्यांच्या बँक खात्यात जमा केले.  मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अविनाश मनोहर सौंदाणे (वय ३५, रा. सिद्धी निवास, बालाजीनगर) हे पूर्वी इंडिया बुल्स फायनान्स कंपनीत होते. दुसऱ्या नोकरीच्या शोधात असताना त्यांना १२ मार्च २०१९ ला एका भामट्याने मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी त्याने धनी बिझनेस सोल्युशन या कंपनीतून एचआर मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर अविनाश यांची कर्ज विभागात प्रतिनिधी पदासाठी मुलाखत घेतली. मुलाखतीनंतर त्यांना लोकांना कर्ज देण्यासाठी पैसे गोळा करावे लागतील असे सांगण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. त्यामुळे अविनाश यांनी सुमारे ११२ जणांकडून प्रत्येकी चार हजार ६२० रुपये फाईल चार्जेस म्हणून जमा केले. यातून जमा झालेले पाच लाख १७ हजार ४४० रुपये अविनाश यांनी भामट्यांच्या बँक खात्यात जमा केले. नंतर या भामट्यांनी जीएसटी आणि प्रोसेसिंग शुल्कच्या नावाखाली ११२ जणांना पुन्हा पैसे भरावे लागतील असे सांगितले. त्यापैकी ३० जणांनी जीएसटी आणि प्रोसेसिंग शुल्कापोटी एक लाख ७५ हजार रुपये अविनाशला दिले. त्याने ही रक्कम देखील भामट्यांच्या खात्यात भरली. मात्र भामट्यांनी आणखी ८२ जणांकडून जीएसटी आणि प्रोसेसिंग फिस जमा करून भरावी असे सांगितले. त्यानंतर मात्र अविनाश यांना भामट्यांवर संशय आला. त्यानंतर भामट्यांनी कोणतेही रिफंड व कर्ज दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अविनाश यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील करीत आहेत.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, October 4, 2020

नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला भामट्यांचा गंडा ! औरंगाबाद : वित्तीय संस्थेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत परप्रांतीय भामट्यांनी तरुणाला सहा लाख ९२ हजार ४४० रुपयांना गंडविले.  हा प्रकार १२ मार्च २०१९ ते २० सप्टेंबर २०१९ यादरम्यान घडला. विशेष म्हणजे लोकांना कर्ज दिले जाईल असे आमिष दाखवल्याने फसवणूक झालेल्या तरुणाने शेकडो लोकांकडून प्रत्येकी चार हजार ६२० रुपये जमा करून भामट्यांच्या बँक खात्यात जमा केले.  मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अविनाश मनोहर सौंदाणे (वय ३५, रा. सिद्धी निवास, बालाजीनगर) हे पूर्वी इंडिया बुल्स फायनान्स कंपनीत होते. दुसऱ्या नोकरीच्या शोधात असताना त्यांना १२ मार्च २०१९ ला एका भामट्याने मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी त्याने धनी बिझनेस सोल्युशन या कंपनीतून एचआर मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर अविनाश यांची कर्ज विभागात प्रतिनिधी पदासाठी मुलाखत घेतली. मुलाखतीनंतर त्यांना लोकांना कर्ज देण्यासाठी पैसे गोळा करावे लागतील असे सांगण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. त्यामुळे अविनाश यांनी सुमारे ११२ जणांकडून प्रत्येकी चार हजार ६२० रुपये फाईल चार्जेस म्हणून जमा केले. यातून जमा झालेले पाच लाख १७ हजार ४४० रुपये अविनाश यांनी भामट्यांच्या बँक खात्यात जमा केले. नंतर या भामट्यांनी जीएसटी आणि प्रोसेसिंग शुल्कच्या नावाखाली ११२ जणांना पुन्हा पैसे भरावे लागतील असे सांगितले. त्यापैकी ३० जणांनी जीएसटी आणि प्रोसेसिंग शुल्कापोटी एक लाख ७५ हजार रुपये अविनाशला दिले. त्याने ही रक्कम देखील भामट्यांच्या खात्यात भरली. मात्र भामट्यांनी आणखी ८२ जणांकडून जीएसटी आणि प्रोसेसिंग फिस जमा करून भरावी असे सांगितले. त्यानंतर मात्र अविनाश यांना भामट्यांवर संशय आला. त्यानंतर भामट्यांनी कोणतेही रिफंड व कर्ज दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अविनाश यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील करीत आहेत.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/34opApF

No comments:

Post a Comment