स्वच्छ सर्वेक्षणासाठी वीस कलमी कार्यक्रम !  औरंगाबाद : शासनाने शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्यानंतर गेल्यावेळी महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षणात समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी यंदा जोरदार तयारी सुरू केली असून, वीस कलमी कार्यक्रम तयार केल्याचे त्यांनी सांगितले.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! प्रक्रियायुक्त पाण्याच्या वापरावर भर दिला जाणार आहे. त्यासोबतच ई-कचऱ्यावर प्रक्रिया, नाल्यात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्‍याला पायबंद घालण्यासाठी फेंसिंग, बांधकाम साहित्यावर प्रक्रिया अशा उपक्रमांवर महापालिकेचा भर राहणार आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. स्वच्छ सर्वेक्षणासाठी महापालिकेने केलेल्या तयारीची माहिती देताना श्री. पांडेय म्हणाले, की यावेळी स्वच्छ सर्व्हेक्षणात जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी प्रशासनाने वीस कलमी कार्यक्रम तयार केला आहे. सर्वाधिक भर महापालिकेच्या एसटीपी (मल जल प्रक्रिया प्रकल्प) प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा वापर कसा होईल, त्यातून महापालिकेचे उत्पन्न कसे वाढले? यासाठी सध्या काम सुरू आहे. पाण्याच्या फेरवापर धोरणानुसार झाल्टा ग्रामपंचायतीमध्ये पहिला उपक्रम सुरू होत आहे. सुरत शहराच्या मॉडेलचा अभ्यास केला जात आहे. अनेक नागरिक नाल्यात कचरा टाकतात. हा प्रकार थांबविण्यासाठी जाळी लावली जाणार आहे. तसेच ई-कचरा जमा करण्यासाठी विविध ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जाईल. ज्या भागात जास्त कचरा निघतो किंवा कचरा रस्त्यावर आणून टाकला जातो, तिथे फिक्स पॉइंट तयार केले जाणार आहेत. प्लॅस्टिक कचरा संकलन करण्यासाठी फिक्स पॉइंट दिले जातील. मोठ्या प्रकल्पांबरोबरच सुक्या कचऱ्यावर लगेचच प्रक्रिया होऊ शकेल असे छोटे प्रकल्प कांचनवाडी, रामनगर, मध्यवर्ती जकात नाका या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी स्वच्छता सायकल मॅरेथॉनचे आयोजन केले जाणार आहे. ‘आय लव्ह औरंगाबाद’ हे अभियान देखील हाती घेतले जाणार आहे, असे पांडेय यांनी सांगितले.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. जुन्या बांधकामाचे साहित्य जमा करण्यासाठी पथके  शहरातील अनेक भागात जुने बांधकाम साहित्य रस्त्यावर फेकून दिले जाते. त्यामुळे अशा साहित्याची विल्हेवाट लावणारी यंत्रणा उभारली जाणार आहे. शहरातील एक रस्ता तयार करण्याचे नियोजन देखील केले जात आहे. असे साहित्य गोळा करण्यासाठी फिरती पथके तयार केली जाणार, असल्याचे पांडेय यांनी सांगितले.  (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, October 2, 2020

स्वच्छ सर्वेक्षणासाठी वीस कलमी कार्यक्रम !  औरंगाबाद : शासनाने शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिल्यानंतर गेल्यावेळी महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षणात समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी यंदा जोरदार तयारी सुरू केली असून, वीस कलमी कार्यक्रम तयार केल्याचे त्यांनी सांगितले.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! प्रक्रियायुक्त पाण्याच्या वापरावर भर दिला जाणार आहे. त्यासोबतच ई-कचऱ्यावर प्रक्रिया, नाल्यात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्‍याला पायबंद घालण्यासाठी फेंसिंग, बांधकाम साहित्यावर प्रक्रिया अशा उपक्रमांवर महापालिकेचा भर राहणार आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. स्वच्छ सर्वेक्षणासाठी महापालिकेने केलेल्या तयारीची माहिती देताना श्री. पांडेय म्हणाले, की यावेळी स्वच्छ सर्व्हेक्षणात जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी प्रशासनाने वीस कलमी कार्यक्रम तयार केला आहे. सर्वाधिक भर महापालिकेच्या एसटीपी (मल जल प्रक्रिया प्रकल्प) प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा वापर कसा होईल, त्यातून महापालिकेचे उत्पन्न कसे वाढले? यासाठी सध्या काम सुरू आहे. पाण्याच्या फेरवापर धोरणानुसार झाल्टा ग्रामपंचायतीमध्ये पहिला उपक्रम सुरू होत आहे. सुरत शहराच्या मॉडेलचा अभ्यास केला जात आहे. अनेक नागरिक नाल्यात कचरा टाकतात. हा प्रकार थांबविण्यासाठी जाळी लावली जाणार आहे. तसेच ई-कचरा जमा करण्यासाठी विविध ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जाईल. ज्या भागात जास्त कचरा निघतो किंवा कचरा रस्त्यावर आणून टाकला जातो, तिथे फिक्स पॉइंट तयार केले जाणार आहेत. प्लॅस्टिक कचरा संकलन करण्यासाठी फिक्स पॉइंट दिले जातील. मोठ्या प्रकल्पांबरोबरच सुक्या कचऱ्यावर लगेचच प्रक्रिया होऊ शकेल असे छोटे प्रकल्प कांचनवाडी, रामनगर, मध्यवर्ती जकात नाका या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी स्वच्छता सायकल मॅरेथॉनचे आयोजन केले जाणार आहे. ‘आय लव्ह औरंगाबाद’ हे अभियान देखील हाती घेतले जाणार आहे, असे पांडेय यांनी सांगितले.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. जुन्या बांधकामाचे साहित्य जमा करण्यासाठी पथके  शहरातील अनेक भागात जुने बांधकाम साहित्य रस्त्यावर फेकून दिले जाते. त्यामुळे अशा साहित्याची विल्हेवाट लावणारी यंत्रणा उभारली जाणार आहे. शहरातील एक रस्ता तयार करण्याचे नियोजन देखील केले जात आहे. असे साहित्य गोळा करण्यासाठी फिरती पथके तयार केली जाणार, असल्याचे पांडेय यांनी सांगितले.  (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3neamw4

No comments:

Post a Comment