भाषांचा उपयोग वर्चस्ववादासाठी नको : डॉ. सदानंद मोरे पुणे : भाषांमध्ये सौहार्द असले पाहिजे; पण त्यांचा उपयोग वर्चस्ववादासाठी करणे गैर आहे, असे प्रतिपादन डॉ. सदानंद मोरे यांनी केले.  संजय सोनवणी लिखित “प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास” या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथ्था, 'सकाळ'चे संचालक संपादक श्रीराम पवार, हरी नरके, इंद्रकुमार छाजेड, निलेश नवलाखा, शैलेश पगारिया, नितीन मेमाणे, अरविंद शिंदे, मधुबाला चोरडिया, श्रीमंत कोकाटे आदी यावेळी उपस्थित होते. - विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; अंतिम वर्ष परीक्षेचं वेळापत्रक झालं जाहीर!​ डॉ. मोरे म्हणाले, "प्राकृत आणि पाली भाषांची स्वतंत्र पुरातन परंपरा आहे. सोनवणी यांनी प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास लिहून भाषिक इतिहासाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिली आहे. प्राकृत भाषा अकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमात आणण्यासाठी आपण पाठ्यपुस्तके लिहून घेतली. विद्यालयांनी त्यासाठी आता पुढाकार घेतला पाहिजे. प्राकृत भाषांचा इतिहास सर्वांनाच त्या भाषांकडे पाहण्याची नवी दृष्टी देईल." पवार म्हणाले, "भाषिक न्यूनगंड निर्माण करण्याचे प्रयत्न फार जुने आहेत. आर्यवंश सिद्धांत आणि संस्कृत सर्व भाषांची जननी या सिद्ध न झालेल्या सिद्धांतातून, प्रसंगी दिशाभूल करून भाषिक आणि सांस्कृतिक वर्चस्व माजवण्याचा आजही प्रयत्न होतो. पण भाषिक न्यूनगंडामुळे ग्रामीण भागातून आलेल्या तरुणांवर विपरीत मानसिक परिणाम होतो. भाषांचा इतिहास एकतर्फी होता. आता खरे भाषिक वास्तव काय आहे, याचा वेध सोनवणी यांनी या पुस्तकातून घेतला आहे. यामुळे भाषिक न्यूनगंड दूर  होण्यास मदत होईल." - खासदार डॉ. कोल्हेंनी दिला कानमंत्र; 'कोरोनामुक्त असल्याच्या भ्रमात राहू नका!'​ मुथ्था म्हणाले, "अर्धमागधी आणि शौरसेनी प्राकृतच नव्हे; तर आजच्या मराठीचे मूळ असलेल्या महाराष्ट्रीय प्राकृतात प्राचीन कालापासून जैनांनी मोलाची भर घातली, इतकी की तिला जैन महाराष्ट्रीय म्हटले जायचे. या आपल्या पूर्वज प्राचीन भाषेला पुन्हा शिकवणे आणि त्यातील ज्ञान, विज्ञान आजच्या पिढ्यांसमोर आणणे आवश्यक आहे." नरके म्हणाले, की हे पुस्तक मराठी व अन्य प्राकृत भाषांना अभिजात सिद्ध करण्यासाठी मदत करील. सरहदचे अध्यक्ष संजय नहार यांनी पुढील वर्षी भरवल्या जाणार असलेल्या प्राकृत-पाली विश्व परिषदेची माहिती दिली. संजय सोनवणी मनोगत व्यक्त केले. युवराज शहा यांनी आभार मानले. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 3, 2020

भाषांचा उपयोग वर्चस्ववादासाठी नको : डॉ. सदानंद मोरे पुणे : भाषांमध्ये सौहार्द असले पाहिजे; पण त्यांचा उपयोग वर्चस्ववादासाठी करणे गैर आहे, असे प्रतिपादन डॉ. सदानंद मोरे यांनी केले.  संजय सोनवणी लिखित “प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास” या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथ्था, 'सकाळ'चे संचालक संपादक श्रीराम पवार, हरी नरके, इंद्रकुमार छाजेड, निलेश नवलाखा, शैलेश पगारिया, नितीन मेमाणे, अरविंद शिंदे, मधुबाला चोरडिया, श्रीमंत कोकाटे आदी यावेळी उपस्थित होते. - विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; अंतिम वर्ष परीक्षेचं वेळापत्रक झालं जाहीर!​ डॉ. मोरे म्हणाले, "प्राकृत आणि पाली भाषांची स्वतंत्र पुरातन परंपरा आहे. सोनवणी यांनी प्राकृत आणि पाली भाषांचा इतिहास लिहून भाषिक इतिहासाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिली आहे. प्राकृत भाषा अकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमात आणण्यासाठी आपण पाठ्यपुस्तके लिहून घेतली. विद्यालयांनी त्यासाठी आता पुढाकार घेतला पाहिजे. प्राकृत भाषांचा इतिहास सर्वांनाच त्या भाषांकडे पाहण्याची नवी दृष्टी देईल." पवार म्हणाले, "भाषिक न्यूनगंड निर्माण करण्याचे प्रयत्न फार जुने आहेत. आर्यवंश सिद्धांत आणि संस्कृत सर्व भाषांची जननी या सिद्ध न झालेल्या सिद्धांतातून, प्रसंगी दिशाभूल करून भाषिक आणि सांस्कृतिक वर्चस्व माजवण्याचा आजही प्रयत्न होतो. पण भाषिक न्यूनगंडामुळे ग्रामीण भागातून आलेल्या तरुणांवर विपरीत मानसिक परिणाम होतो. भाषांचा इतिहास एकतर्फी होता. आता खरे भाषिक वास्तव काय आहे, याचा वेध सोनवणी यांनी या पुस्तकातून घेतला आहे. यामुळे भाषिक न्यूनगंड दूर  होण्यास मदत होईल." - खासदार डॉ. कोल्हेंनी दिला कानमंत्र; 'कोरोनामुक्त असल्याच्या भ्रमात राहू नका!'​ मुथ्था म्हणाले, "अर्धमागधी आणि शौरसेनी प्राकृतच नव्हे; तर आजच्या मराठीचे मूळ असलेल्या महाराष्ट्रीय प्राकृतात प्राचीन कालापासून जैनांनी मोलाची भर घातली, इतकी की तिला जैन महाराष्ट्रीय म्हटले जायचे. या आपल्या पूर्वज प्राचीन भाषेला पुन्हा शिकवणे आणि त्यातील ज्ञान, विज्ञान आजच्या पिढ्यांसमोर आणणे आवश्यक आहे." नरके म्हणाले, की हे पुस्तक मराठी व अन्य प्राकृत भाषांना अभिजात सिद्ध करण्यासाठी मदत करील. सरहदचे अध्यक्ष संजय नहार यांनी पुढील वर्षी भरवल्या जाणार असलेल्या प्राकृत-पाली विश्व परिषदेची माहिती दिली. संजय सोनवणी मनोगत व्यक्त केले. युवराज शहा यांनी आभार मानले. - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3juzXyA

No comments:

Post a Comment