कोव्हिड केंद्र चालवणाऱ्या संस्थेला BMCची नोटीस; आरसीएमआरच्या सूचनांचे पालन होत नसल्याचा ठपका मुंबई : मुलुंड येथील कोव्हिड केंद्राची जबाबदारी असणाऱ्या संस्थेला महापालिकेने नोटीस पाठवली आहे. रिचर्ड ऍण्ड क्रुडास कंपनीच्या आवारात तयार करण्यात आलेल्या या कोव्हिड केंद्राची जबाबदारी आशा कॅन्सर ट्रस्ट ऍण्ड रिसर्च सेंटरवर असून भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नसल्याचा ठपका पालिकेने ठेवला आहे.  BREAKING : कंगना रानौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; वांद्रे न्यायालयाने दिले होते आदेश महापालिकेच्या टी प्रभाग कार्यालयामार्फत संस्थेला नोटीस बजावण्यात आली आहे. या कोव्हिड केंद्रात 2 हजार 644 रुग्णांवर उपचार झाले आहेत. त्यातील 187 रुग्णांना रुग्णालयात हलविण्यात आले. 11 जणांचा मृत्यू झाला. 146 रुग्णांना वैद्यकीय सल्ला देऊन डिस्चार्ज देण्यात आला. उर्वरित 2,299 पैकी 1,550 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यापैकी 406 रुग्णांना 11 दिवसांत आणि उर्वरित 1,144 रुग्णांना 11 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. आयसीआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार 85 टक्के रुग्णांना 11 दिवसांच्या आत डिस्चार्ज देणे गरजेचे आहे. 1 ऑक्‍टोबरपर्यंत 183 रुग्णांना डिस्चार्ज देणे गरजेचे होते; मात्र तसे झालेले नाही, असा ठपका नोटिशीत ठेवण्यात आला आहे. "ही नोटीस नसून संबंधित संस्थेला आरसीएमआरची मार्गदर्शन तत्त्वे पाळण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत,' असे टी प्रभागाचे सहायक आयुक्त किशोर गांधी यांनी सांगितले. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रुग्णात सलग तीन दिवस कोणतीही लक्षणे नसल्यास घरी पाठवावे. तसेच त्याने सात दिवस गृह विलगीकरणात राहावे, असा नियम आहे.    आम्ही आयसीएमआरच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करत आहोत. सर्व रुग्णांना नियमाप्रमाणे डिस्चार्ज केले जात आहे.  - डॉ. सतीश कामत, प्रमुख, आशा कॅन्सर ट्रस्ट ऍण्ड रिसर्च सेंटर  आयसीयूतील प्रत्येक रुग्ण दगावला  शहरात कोव्हिड सेंटर उभारण्यावर पालिकेने अमाप खर्च केला आहे; मात्र रुग्णांना काय सुविधा मिळतात? किती डॉक्‍टर उपस्थित असतात? याचा लेखाजोखा ठेवला जात नाही. संबंधित कोव्हिड सेंटरमध्ये 25 सप्टेंबर रोजी आयसीयू सुरू झाला; पण त्यात गेलेले सर्व रुग्ण दगावले आहेत. त्याबाबत प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहिती दिली आहे, असे भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले. कोव्हिड सेंटरमध्ये किती डॉक्‍टर उपस्थित असतात, रुग्णांवर कोणते उपाय होतात, याकडे पालिका प्रशासन बघतही नाही. प्रत्येक रुग्णामागे ठराविक रक्कम पालिका संस्थेला देत आहे. प्रत्येक दिवसाला प्रत्येक रुग्णामागे एक हजार रुपये पालिका खर्च करते. मात्र, ही संस्थेची धन होत आहे, असा आरोपही शिंदे यांनी केला. याबाबत प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.  ------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 17, 2020

कोव्हिड केंद्र चालवणाऱ्या संस्थेला BMCची नोटीस; आरसीएमआरच्या सूचनांचे पालन होत नसल्याचा ठपका मुंबई : मुलुंड येथील कोव्हिड केंद्राची जबाबदारी असणाऱ्या संस्थेला महापालिकेने नोटीस पाठवली आहे. रिचर्ड ऍण्ड क्रुडास कंपनीच्या आवारात तयार करण्यात आलेल्या या कोव्हिड केंद्राची जबाबदारी आशा कॅन्सर ट्रस्ट ऍण्ड रिसर्च सेंटरवर असून भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नसल्याचा ठपका पालिकेने ठेवला आहे.  BREAKING : कंगना रानौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; वांद्रे न्यायालयाने दिले होते आदेश महापालिकेच्या टी प्रभाग कार्यालयामार्फत संस्थेला नोटीस बजावण्यात आली आहे. या कोव्हिड केंद्रात 2 हजार 644 रुग्णांवर उपचार झाले आहेत. त्यातील 187 रुग्णांना रुग्णालयात हलविण्यात आले. 11 जणांचा मृत्यू झाला. 146 रुग्णांना वैद्यकीय सल्ला देऊन डिस्चार्ज देण्यात आला. उर्वरित 2,299 पैकी 1,550 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यापैकी 406 रुग्णांना 11 दिवसांत आणि उर्वरित 1,144 रुग्णांना 11 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. आयसीआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार 85 टक्के रुग्णांना 11 दिवसांच्या आत डिस्चार्ज देणे गरजेचे आहे. 1 ऑक्‍टोबरपर्यंत 183 रुग्णांना डिस्चार्ज देणे गरजेचे होते; मात्र तसे झालेले नाही, असा ठपका नोटिशीत ठेवण्यात आला आहे. "ही नोटीस नसून संबंधित संस्थेला आरसीएमआरची मार्गदर्शन तत्त्वे पाळण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत,' असे टी प्रभागाचे सहायक आयुक्त किशोर गांधी यांनी सांगितले. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रुग्णात सलग तीन दिवस कोणतीही लक्षणे नसल्यास घरी पाठवावे. तसेच त्याने सात दिवस गृह विलगीकरणात राहावे, असा नियम आहे.    आम्ही आयसीएमआरच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करत आहोत. सर्व रुग्णांना नियमाप्रमाणे डिस्चार्ज केले जात आहे.  - डॉ. सतीश कामत, प्रमुख, आशा कॅन्सर ट्रस्ट ऍण्ड रिसर्च सेंटर  आयसीयूतील प्रत्येक रुग्ण दगावला  शहरात कोव्हिड सेंटर उभारण्यावर पालिकेने अमाप खर्च केला आहे; मात्र रुग्णांना काय सुविधा मिळतात? किती डॉक्‍टर उपस्थित असतात? याचा लेखाजोखा ठेवला जात नाही. संबंधित कोव्हिड सेंटरमध्ये 25 सप्टेंबर रोजी आयसीयू सुरू झाला; पण त्यात गेलेले सर्व रुग्ण दगावले आहेत. त्याबाबत प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहिती दिली आहे, असे भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले. कोव्हिड सेंटरमध्ये किती डॉक्‍टर उपस्थित असतात, रुग्णांवर कोणते उपाय होतात, याकडे पालिका प्रशासन बघतही नाही. प्रत्येक रुग्णामागे ठराविक रक्कम पालिका संस्थेला देत आहे. प्रत्येक दिवसाला प्रत्येक रुग्णामागे एक हजार रुपये पालिका खर्च करते. मात्र, ही संस्थेची धन होत आहे, असा आरोपही शिंदे यांनी केला. याबाबत प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.  ------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2T4P9XK

No comments:

Post a Comment