शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी  पुणे - राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल दिवाळीपूर्वी लागण्याची शक्‍यता आहे. तर जिल्हानिहाय गुणवत्ता यादी नोव्हेंबरमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या अंतिम निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना तसेच शाळांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा राज्यात 16 फेब्रुवारीला ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. यात पाच लाख 51 हजार 556 विद्यार्थ्यांनी पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा दिली. त्यातील एक लाख 36 हजार 820 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर तीन लाख 81 हजार 783 विद्यार्थ्यांनी आठवीसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा दिली. त्यातील 57 हजार 557 पात्र ठरले आहेत. या परीक्षेचा अंतरिम निकाल 9 ऑक्‍टोबरला जाहीर करण्यात आला. त्यानंतर गुणपडताळणीसाठी मंगळवारपर्यंत मुदत दिली होती. मंगळवारी दुपारपर्यंत पाचवीच्या 887 आणि आठवीच्या 555 असे एकूण एक हजार 442 विद्यार्थ्यांचे अर्ज गुणपडताळणीसाठी आले आहेत. राज्य परीक्षा परिषदेने पडताळणीचे कामही सुरु केले आहे. आतापर्यंत जवळपास दिडशे अर्ज निकाली काढले असून पडताळणी दरम्यान त्यात कोणत्याही बदल झालेला नाही. सर्व अर्ज आणि आक्षेप तपासणी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अंतिम निकालानंतर गुणवत्ता यादीही प्रसिद्ध होईल, असे राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी सांगितले.  महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा यंदा एप्रिलमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा होण्याची शक्‍यता  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. फेब्रुवारी 2020मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल लावण्यास उशीर झाला आहे. दरवर्षी साधारणत: ऑक्‍टोबरमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी सुरू होते. विद्यार्थ्यांचे अर्ज मागविले जातात. परंतु यंदा कोरोनामुळे निकालही उशीरा लागला. परिणामी यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती परीक्षा दोन महिने पुढे जाण्याची शक्‍यता आहे. एप्रिल 2021 मध्ये ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे नियोजन सध्या सुरू असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शिष्यवृत्तीच्या परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांची आकडेवारी  इयत्ता : परीक्षेसाठी नाव नोंदविलेले विद्यार्थी : परीक्षेला उपस्थित राहिलेले विद्यार्थी : पात्र  पाचवी : 5,74,576 : 5,51,056 : 1,36,820  आठवी : 3,97,523 : 3,81,783 : 57,557  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, October 20, 2020

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी  पुणे - राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल दिवाळीपूर्वी लागण्याची शक्‍यता आहे. तर जिल्हानिहाय गुणवत्ता यादी नोव्हेंबरमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या अंतिम निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना तसेच शाळांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा राज्यात 16 फेब्रुवारीला ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. यात पाच लाख 51 हजार 556 विद्यार्थ्यांनी पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा दिली. त्यातील एक लाख 36 हजार 820 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर तीन लाख 81 हजार 783 विद्यार्थ्यांनी आठवीसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा दिली. त्यातील 57 हजार 557 पात्र ठरले आहेत. या परीक्षेचा अंतरिम निकाल 9 ऑक्‍टोबरला जाहीर करण्यात आला. त्यानंतर गुणपडताळणीसाठी मंगळवारपर्यंत मुदत दिली होती. मंगळवारी दुपारपर्यंत पाचवीच्या 887 आणि आठवीच्या 555 असे एकूण एक हजार 442 विद्यार्थ्यांचे अर्ज गुणपडताळणीसाठी आले आहेत. राज्य परीक्षा परिषदेने पडताळणीचे कामही सुरु केले आहे. आतापर्यंत जवळपास दिडशे अर्ज निकाली काढले असून पडताळणी दरम्यान त्यात कोणत्याही बदल झालेला नाही. सर्व अर्ज आणि आक्षेप तपासणी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अंतिम निकालानंतर गुणवत्ता यादीही प्रसिद्ध होईल, असे राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी सांगितले.  महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा यंदा एप्रिलमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा होण्याची शक्‍यता  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. फेब्रुवारी 2020मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल लावण्यास उशीर झाला आहे. दरवर्षी साधारणत: ऑक्‍टोबरमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी सुरू होते. विद्यार्थ्यांचे अर्ज मागविले जातात. परंतु यंदा कोरोनामुळे निकालही उशीरा लागला. परिणामी यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती परीक्षा दोन महिने पुढे जाण्याची शक्‍यता आहे. एप्रिल 2021 मध्ये ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे नियोजन सध्या सुरू असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शिष्यवृत्तीच्या परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांची आकडेवारी  इयत्ता : परीक्षेसाठी नाव नोंदविलेले विद्यार्थी : परीक्षेला उपस्थित राहिलेले विद्यार्थी : पात्र  पाचवी : 5,74,576 : 5,51,056 : 1,36,820  आठवी : 3,97,523 : 3,81,783 : 57,557  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3dJ0KVL

No comments:

Post a Comment