"हॅलो, बँकेतून बोलतोय, तुमच्या क्रेडिट कार्डवर बोनस पॉईंट्स आहेत" सांगून झाली फसवणूक, तुम्ही सावधान राहा मुंबई : हॅलो, बँकेतून बोलत असल्याचे सांगून फसवणूक करणा-या टोळक्याशी संबधीत एकाला दिल्लीवरून अटक करण्यात माटुंगा पोलिसांना यश आले आहे. आरोपीने महाराष्ट्रासह देशातील अनेकांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. ३१ वर्षीय हिमांशु जगदीश लुथराया असं या अटक झलेल्या आरोपीचे नाव असून तो दिल्लीतील रोहिणी परिसरातील रहिवासी आहे. आरोपी बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डवर बोनस पाईंट देण्याचे आमिष दाखवायचा. त्यानंतर क्रेडिटकार्ड धारक त्यासाठी तयार झाल्यानंतर क्रेडिटकार्डची गोपनीय माहिती मिळवून क्रेडिट कार्डाच्या सहाय्याने खरेदी करायचा. महत्त्वाची बातमी : डायबिटीसग्रस्तांची चिंता मिटणार, 'डायबेटिक फूट अल्‍सर'वर वोक्‍सहिल ठरतंय गुणकारी दादर पूर्व येथील नायगाव परिसरात राहणारे आनंद जाधव यांना आरोपीने 14 एप्रिलला बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांच्या क्रेडिटकार्डची माहिती मिळवली होती. त्यानंतर त्यांच्या केडीटकार्डमधून 71,050 रुपयांची खरेदी केली होती. याप्रकरणी जाधव यांनी स्थानिक माटुंगा पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार माटुंगा पोलिसानी याप्रकरणी भादंवि कलम 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायदा कलम 66 (क), (ड)अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आरोपीचा मोबाईल आणि बँक खात्याच्या सहाय्याने आरोपी दिल्लीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथकाने दिल्लीत शोध मोहिम राबवून अखेर आरोपीला अटक केली. आरोपीने तक्रारदार जाधव यांच्यासह महाराष्ट्रातील नागरीकांसह देशाती अनेकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी माटुंगा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. ( संपादन - सुमित बागुल ) credit card fraud matunga police red handedly caught one from capital News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, October 5, 2020

"हॅलो, बँकेतून बोलतोय, तुमच्या क्रेडिट कार्डवर बोनस पॉईंट्स आहेत" सांगून झाली फसवणूक, तुम्ही सावधान राहा मुंबई : हॅलो, बँकेतून बोलत असल्याचे सांगून फसवणूक करणा-या टोळक्याशी संबधीत एकाला दिल्लीवरून अटक करण्यात माटुंगा पोलिसांना यश आले आहे. आरोपीने महाराष्ट्रासह देशातील अनेकांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. ३१ वर्षीय हिमांशु जगदीश लुथराया असं या अटक झलेल्या आरोपीचे नाव असून तो दिल्लीतील रोहिणी परिसरातील रहिवासी आहे. आरोपी बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडिट कार्डवर बोनस पाईंट देण्याचे आमिष दाखवायचा. त्यानंतर क्रेडिटकार्ड धारक त्यासाठी तयार झाल्यानंतर क्रेडिटकार्डची गोपनीय माहिती मिळवून क्रेडिट कार्डाच्या सहाय्याने खरेदी करायचा. महत्त्वाची बातमी : डायबिटीसग्रस्तांची चिंता मिटणार, 'डायबेटिक फूट अल्‍सर'वर वोक्‍सहिल ठरतंय गुणकारी दादर पूर्व येथील नायगाव परिसरात राहणारे आनंद जाधव यांना आरोपीने 14 एप्रिलला बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांच्या क्रेडिटकार्डची माहिती मिळवली होती. त्यानंतर त्यांच्या केडीटकार्डमधून 71,050 रुपयांची खरेदी केली होती. याप्रकरणी जाधव यांनी स्थानिक माटुंगा पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार माटुंगा पोलिसानी याप्रकरणी भादंवि कलम 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायदा कलम 66 (क), (ड)अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आरोपीचा मोबाईल आणि बँक खात्याच्या सहाय्याने आरोपी दिल्लीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पथकाने दिल्लीत शोध मोहिम राबवून अखेर आरोपीला अटक केली. आरोपीने तक्रारदार जाधव यांच्यासह महाराष्ट्रातील नागरीकांसह देशाती अनेकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी माटुंगा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. ( संपादन - सुमित बागुल ) credit card fraud matunga police red handedly caught one from capital News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3ljNBVU

No comments:

Post a Comment