महापालिकेचे आयुष हॉस्पिटल बंगल्यात नागपूर : गेल्या दोन महिन्यांपर्यंत अधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या बंगल्यात आता महापालिकेने आयुष हॉस्पिटल सुरू करण्याची तयारी केली. बंगल्याचे हॉस्पिटलमध्ये रुपांतर करण्यासाठी दुरुस्तीची कामे करण्यात येत आहे. या हॉस्पिटलमुळे महापालिकेच्या रुग्णालयातील एकूण खाटांमध्ये ४४ खाटांची आणखी भर पडणार आहे. येथील संपूर्ण बेड ऑक्सिजनयुक्त राहणार असल्याने नागरिकांना उपचारासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. सदर येथे महापालिकेचा बंगला असून गेल्या दोन महिन्यांपर्यंत निवृत्त झाल्यानंतरही माजी अतिरिक्त आयुक्त रिजवान सिद्दीकी यांचा ताबा होता. दोन महिन्यापूर्वी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंंढे यांनी सिद्दीकी यांना एनईएसएलच्या संचालकपदावरून मुक्त केले. शिवाय अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या सिद्दीकी यांंना या बंगल्यातूनही बाहेर काढले. शहरात वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेता महापालिकेने येथे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. महापालिका येथे आयुष नावाने हॉस्पिटल सुरू करणार आहे. त्या अनुषंगाने या बंगल्याचे रुपांतर रुग्णालयात करण्याचे काम सुरू झाले आहे. येथे एकच प्रवेशद्वार असून रुग्णांना ये-जा करण्यासाठी आता दोन द्वार तयार करण्यात येणार आहे. एका दरवाज्यातून रुग्ण आता जातील, दुसऱ्या दरवाज्यातून त्यांना बाहेर निघता येणार आहे. याशिवाय किरकोळ दुरुस्तीची कामेही सुरू आहेत. पुढील आठवड्यापासून हे रुग्णालय नागपूरकरांच्या सेवेत येण्याची शक्यता अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी ‘सकाळ'सोबत बोलताना व्यक्त केली. या रुग्णालयात ४४ ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था राहणार आहे. महापालिकेच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात ११० बेडची व्यवस्था आहे. सोने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय, भावात मोठी घसरण  याशिवाय साई मंदिर ट्रस्टला चालविण्यासाठी देण्यात आलेल्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये ३२ खाटा आहेत. पाचपावली रुग्णालयात १०० खाटांची व्यवस्था असून २५ खाटांचा वापर गर्भवती महिलांसाठी वापरण्यात येत आहे. केटीनगर येथील हॉस्पिटल सध्या मनुष्यबळाअभावी सुरू झाले नाही.   रेल्वेचे डॉक्टर देणार सेवा आयुष रुग्णालयात रेल्वेचे डॉक्टर रुग्णांना सेवा देणार आहे. त्यामुळे या हॉस्पिटलसाठी मनुष्यबळाची मोठी समस्या दूर झाली आहे. एका अर्थाने रेल्वेचेच डॉक्टर हे रुग्णालय चालविणार आहे. महापालिका येथे वीज, पाणी या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, September 27, 2020

महापालिकेचे आयुष हॉस्पिटल बंगल्यात नागपूर : गेल्या दोन महिन्यांपर्यंत अधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या बंगल्यात आता महापालिकेने आयुष हॉस्पिटल सुरू करण्याची तयारी केली. बंगल्याचे हॉस्पिटलमध्ये रुपांतर करण्यासाठी दुरुस्तीची कामे करण्यात येत आहे. या हॉस्पिटलमुळे महापालिकेच्या रुग्णालयातील एकूण खाटांमध्ये ४४ खाटांची आणखी भर पडणार आहे. येथील संपूर्ण बेड ऑक्सिजनयुक्त राहणार असल्याने नागरिकांना उपचारासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. सदर येथे महापालिकेचा बंगला असून गेल्या दोन महिन्यांपर्यंत निवृत्त झाल्यानंतरही माजी अतिरिक्त आयुक्त रिजवान सिद्दीकी यांचा ताबा होता. दोन महिन्यापूर्वी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंंढे यांनी सिद्दीकी यांना एनईएसएलच्या संचालकपदावरून मुक्त केले. शिवाय अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या सिद्दीकी यांंना या बंगल्यातूनही बाहेर काढले. शहरात वाढत्या कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेता महापालिकेने येथे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. महापालिका येथे आयुष नावाने हॉस्पिटल सुरू करणार आहे. त्या अनुषंगाने या बंगल्याचे रुपांतर रुग्णालयात करण्याचे काम सुरू झाले आहे. येथे एकच प्रवेशद्वार असून रुग्णांना ये-जा करण्यासाठी आता दोन द्वार तयार करण्यात येणार आहे. एका दरवाज्यातून रुग्ण आता जातील, दुसऱ्या दरवाज्यातून त्यांना बाहेर निघता येणार आहे. याशिवाय किरकोळ दुरुस्तीची कामेही सुरू आहेत. पुढील आठवड्यापासून हे रुग्णालय नागपूरकरांच्या सेवेत येण्याची शक्यता अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी ‘सकाळ'सोबत बोलताना व्यक्त केली. या रुग्णालयात ४४ ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था राहणार आहे. महापालिकेच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात ११० बेडची व्यवस्था आहे. सोने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय, भावात मोठी घसरण  याशिवाय साई मंदिर ट्रस्टला चालविण्यासाठी देण्यात आलेल्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये ३२ खाटा आहेत. पाचपावली रुग्णालयात १०० खाटांची व्यवस्था असून २५ खाटांचा वापर गर्भवती महिलांसाठी वापरण्यात येत आहे. केटीनगर येथील हॉस्पिटल सध्या मनुष्यबळाअभावी सुरू झाले नाही.   रेल्वेचे डॉक्टर देणार सेवा आयुष रुग्णालयात रेल्वेचे डॉक्टर रुग्णांना सेवा देणार आहे. त्यामुळे या हॉस्पिटलसाठी मनुष्यबळाची मोठी समस्या दूर झाली आहे. एका अर्थाने रेल्वेचेच डॉक्टर हे रुग्णालय चालविणार आहे. महापालिका येथे वीज, पाणी या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3ifJZSU

No comments:

Post a Comment