महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापनाने तब्बल 33 कोटी रुपयांचे भाडे वसूल केले पुणे - राजकीय दबाव आणून कमी भाड्यात मोकळ्या जागा, इमारती घेतलेल्या आणि आता महिनोमहिने भाडे थकविलेल्यांना महापालिकेने वठणीवर आणले आहे. थकबाकीदारांकडील मिळकती काढण्याची कार्यवाही सुरू करीत, महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापनाने तब्बल 33 कोटी रुपयांचे भाडे वसूल केले आहे. विशेष म्हणजे, आर्थिक स्थिती नसल्याचे कारण सांगणाऱ्या "पीएमपी' व्यवस्थापनाकडूही थकबाकी वसूल केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेला थकबाकी वसुलीने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या मालकीच्या जागा, व्यापारी संकुले आणि सदनिका भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. त्यातून महापालिकेला वर्षाला 50 ते 60 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहेत. मात्र, कमी पैसे देऊन राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी या जागा ताब्यात घेतल्या. त्यासाठी किमान 11 महिन्यांपासून पाच वर्षांचा करारही केला आहे. करार संपल्यानंतर काही भाडेकरूंनी मुदतवाढही घेतली आहे. त्यानंतर मात्र, भाडे भरणाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने भाडेकरूंकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी होती. ती देण्याची सूचना करीत, नोटिसा, जागा ताब्यात घेण्याचा इशारा देऊनही थकबाकी भरली गेली नव्हती. ती वसूल करताना राजकीय हस्तक्षेप झाल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे महापालिकेला आपल्या हक्काचे उत्पन्न मिळणार का, याबाबत शंका होती.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा परंतु, काही मिळकतींना टाळे ठोकून, ठेकेदार, भाडेकरूंच्या मिळकती ताब्यात घेण्याची कार्यवाही महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने केली. त्यानंतर मात्र, 33 कोटी रुपयांचे भाडे वसल झाले आहे.  कोरोनामुळे आर्थिक संकट ओढविल्यानंतर उत्पन्नात वाढ करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यातून आपल्याकडील काही मिळकती विकण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. तेव्हाच, भाडेतत्त्वावरील मिळकती, त्यांची ठिकाणे ( त्या कुठच्या भागात आहेत ?), करारातील भाडे, प्रत्यक्ष भाडे याची ताळमेळ घालून भाड्याच्या रकमेबाबत नवे धोरण ठरविले जाणार असल्याचे महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी सांगितले.  जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा मिळकती भाडेतत्त्वावर देताना किमान सहा महिन्यांचे भाडे आगाऊ (डिपॉझिट) घेणे अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्येक भाडेकरूकडून ते घेण्यात येईल; ते न दिल्यास मिळकती "सील' करून नवा भाडेकरू नेमला जाईल.  - राजेंद्र मुठे, प्रमुख, मालमत्ता व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका  महापालिकेच्या मिळकती  व्यावसायिक गाळे 338  मोकळ्या जागा 1635  सदनिका 2994  वाहनतळ 26  क्रीडा संकुले 52  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, September 20, 2020

महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापनाने तब्बल 33 कोटी रुपयांचे भाडे वसूल केले पुणे - राजकीय दबाव आणून कमी भाड्यात मोकळ्या जागा, इमारती घेतलेल्या आणि आता महिनोमहिने भाडे थकविलेल्यांना महापालिकेने वठणीवर आणले आहे. थकबाकीदारांकडील मिळकती काढण्याची कार्यवाही सुरू करीत, महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापनाने तब्बल 33 कोटी रुपयांचे भाडे वसूल केले आहे. विशेष म्हणजे, आर्थिक स्थिती नसल्याचे कारण सांगणाऱ्या "पीएमपी' व्यवस्थापनाकडूही थकबाकी वसूल केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेला थकबाकी वसुलीने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या मालकीच्या जागा, व्यापारी संकुले आणि सदनिका भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. त्यातून महापालिकेला वर्षाला 50 ते 60 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहेत. मात्र, कमी पैसे देऊन राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी या जागा ताब्यात घेतल्या. त्यासाठी किमान 11 महिन्यांपासून पाच वर्षांचा करारही केला आहे. करार संपल्यानंतर काही भाडेकरूंनी मुदतवाढही घेतली आहे. त्यानंतर मात्र, भाडे भरणाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने भाडेकरूंकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी होती. ती देण्याची सूचना करीत, नोटिसा, जागा ताब्यात घेण्याचा इशारा देऊनही थकबाकी भरली गेली नव्हती. ती वसूल करताना राजकीय हस्तक्षेप झाल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे महापालिकेला आपल्या हक्काचे उत्पन्न मिळणार का, याबाबत शंका होती.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा परंतु, काही मिळकतींना टाळे ठोकून, ठेकेदार, भाडेकरूंच्या मिळकती ताब्यात घेण्याची कार्यवाही महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने केली. त्यानंतर मात्र, 33 कोटी रुपयांचे भाडे वसल झाले आहे.  कोरोनामुळे आर्थिक संकट ओढविल्यानंतर उत्पन्नात वाढ करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यातून आपल्याकडील काही मिळकती विकण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. तेव्हाच, भाडेतत्त्वावरील मिळकती, त्यांची ठिकाणे ( त्या कुठच्या भागात आहेत ?), करारातील भाडे, प्रत्यक्ष भाडे याची ताळमेळ घालून भाड्याच्या रकमेबाबत नवे धोरण ठरविले जाणार असल्याचे महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी सांगितले.  जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा मिळकती भाडेतत्त्वावर देताना किमान सहा महिन्यांचे भाडे आगाऊ (डिपॉझिट) घेणे अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्येक भाडेकरूकडून ते घेण्यात येईल; ते न दिल्यास मिळकती "सील' करून नवा भाडेकरू नेमला जाईल.  - राजेंद्र मुठे, प्रमुख, मालमत्ता व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका  महापालिकेच्या मिळकती  व्यावसायिक गाळे 338  मोकळ्या जागा 1635  सदनिका 2994  वाहनतळ 26  क्रीडा संकुले 52  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2ZTZPw4

No comments:

Post a Comment