का केला जातो मेयो, मेडिकल हाउसफुल्ल़़ असल्याचा कांगावा ? वाचा नागपूर : मेयो, मेडिकलमध्ये निम्म्या खाटा रिकाम्या असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनीच स्थायी समितीच्या बैठकीत कबुल केले. मात्र, नागरिकांनी पालिकेच्या सुविधा केंद्रावर फोन केल्यास त्यांना मेयो, मेडिकलमध्ये जागा नसल्याचे सांगण्यात येत असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी केला. मेयो, मेडिकल, एम्सच्या तुलनेत खाजगी रुग्णालये शंभर टक्के हाऊसफूल्ल असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट झाले. त्यामुळे पालिकेकडून खाजगी रुग्णालयांना कोरोनाबाधितांची रसद तर पुरविली जात नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिकेत आज स्थायी समितीची बैठक पार पडली. स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी कोरोनासंदर्भात आढावा घेतला. या बैठकीत अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. शहरातील रुग्णालयातील खाटा किती रिकाम्या आहेत, याबाबत झलके यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली. मेडिकलमध्ये सहाशे खाटा असून सद्यस्थितीत ३०६ कोरोनाबाधित उपचार घेत आहे. मेयोमध्ये सहाशे खाटा असून येथे ३२४ कोरोनाबाधित आहेत. एम्समध्ये ६४ खाटा असून ३५ रुग्ण आहेत. लता मंगेशकर हॉस्पीटलमध्ये ९० खाटा असून केवळ चार रुग्ण आहेत. आयुक्त मुंढे व लोकप्रतिनिधी वादावर काय म्हणाले फडणवीस? वाचा शालिनीताई मेघे रुग्णालयात ३६० खाटांची सोय असून येथे केवळ दोन रुग्ण आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी स्थायी समिती अध्यक्षांना दिली. त्याचवेळी खाजगी रुग्णालये कोरोनाबाधितांनी शंभर टक्क्यांपर्यंत हाऊसफूल्ल असल्याचेही अधिकाऱ्यांनी नमुद केले. मात्र नागरिकांनी फोन केल्यानंतर महापालिकेकडून मेयो, मेडिकलमध्ये खाटा रिकाम्‍या नसल्याचे सांगण्यात येत असल्याचा गंभीर आरोप झलके यांनी केला. मनपा रुग्णालयांची कामे अपूर्ण या बैठकीत महापालिकेने तयार केलेल्या एकाही रुग्णालयात एकही कोरोनाबाधित नाही किंबहुना एकही खाट नाही. या रुग्णालयांचे काम अपूर्ण असल्याचे तसेच मनुष्यबळ व प्रशिक्षित कर्मचारी नसल्याची प्रांजळ कबुली देत अधिकाऱ्यांनीच पालिकेचे पितळ उघडे पाडले. एकही हॉस्पिटल अद्ययावत नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे झलके यांनी पत्रकारांपुढे नमुद केले. विशेष म्हणजे आयुक्तांनी या रुग्णालयांसाठी तत्काळ २४ तासांची निविदा काढून आता दोन महिन्यांचा अवधी होत आहे. अधिकाऱ्यांनी केले हात वर कोरोनाबाधितांबाबत महापालिकेची जबाबदारी काय? असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. पालिकेची जबाबदारी केवळ प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविणे एवढेच असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. असे आहे तर पाच हॉस्पिटलवर खर्च का केला? या प्रश्नावर एकाही अधिकाऱ्याला उत्तर देणे शक्य झाले नाही. एवढेच नव्हे मनपाने पॉझिटिव्ह घोषित केलेल्या रुग्णाला मेडिकलने निगेटिव्ह घोषित केल्याबाबत डॉ. सवाई अनभिज्ञ होते, असेही झलके यांनी सांगितले.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 3, 2020

का केला जातो मेयो, मेडिकल हाउसफुल्ल़़ असल्याचा कांगावा ? वाचा नागपूर : मेयो, मेडिकलमध्ये निम्म्या खाटा रिकाम्या असल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनीच स्थायी समितीच्या बैठकीत कबुल केले. मात्र, नागरिकांनी पालिकेच्या सुविधा केंद्रावर फोन केल्यास त्यांना मेयो, मेडिकलमध्ये जागा नसल्याचे सांगण्यात येत असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी केला. मेयो, मेडिकल, एम्सच्या तुलनेत खाजगी रुग्णालये शंभर टक्के हाऊसफूल्ल असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट झाले. त्यामुळे पालिकेकडून खाजगी रुग्णालयांना कोरोनाबाधितांची रसद तर पुरविली जात नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिकेत आज स्थायी समितीची बैठक पार पडली. स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी कोरोनासंदर्भात आढावा घेतला. या बैठकीत अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या. शहरातील रुग्णालयातील खाटा किती रिकाम्या आहेत, याबाबत झलके यांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली. मेडिकलमध्ये सहाशे खाटा असून सद्यस्थितीत ३०६ कोरोनाबाधित उपचार घेत आहे. मेयोमध्ये सहाशे खाटा असून येथे ३२४ कोरोनाबाधित आहेत. एम्समध्ये ६४ खाटा असून ३५ रुग्ण आहेत. लता मंगेशकर हॉस्पीटलमध्ये ९० खाटा असून केवळ चार रुग्ण आहेत. आयुक्त मुंढे व लोकप्रतिनिधी वादावर काय म्हणाले फडणवीस? वाचा शालिनीताई मेघे रुग्णालयात ३६० खाटांची सोय असून येथे केवळ दोन रुग्ण आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी स्थायी समिती अध्यक्षांना दिली. त्याचवेळी खाजगी रुग्णालये कोरोनाबाधितांनी शंभर टक्क्यांपर्यंत हाऊसफूल्ल असल्याचेही अधिकाऱ्यांनी नमुद केले. मात्र नागरिकांनी फोन केल्यानंतर महापालिकेकडून मेयो, मेडिकलमध्ये खाटा रिकाम्‍या नसल्याचे सांगण्यात येत असल्याचा गंभीर आरोप झलके यांनी केला. मनपा रुग्णालयांची कामे अपूर्ण या बैठकीत महापालिकेने तयार केलेल्या एकाही रुग्णालयात एकही कोरोनाबाधित नाही किंबहुना एकही खाट नाही. या रुग्णालयांचे काम अपूर्ण असल्याचे तसेच मनुष्यबळ व प्रशिक्षित कर्मचारी नसल्याची प्रांजळ कबुली देत अधिकाऱ्यांनीच पालिकेचे पितळ उघडे पाडले. एकही हॉस्पिटल अद्ययावत नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे झलके यांनी पत्रकारांपुढे नमुद केले. विशेष म्हणजे आयुक्तांनी या रुग्णालयांसाठी तत्काळ २४ तासांची निविदा काढून आता दोन महिन्यांचा अवधी होत आहे. अधिकाऱ्यांनी केले हात वर कोरोनाबाधितांबाबत महापालिकेची जबाबदारी काय? असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. पालिकेची जबाबदारी केवळ प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविणे एवढेच असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. असे आहे तर पाच हॉस्पिटलवर खर्च का केला? या प्रश्नावर एकाही अधिकाऱ्याला उत्तर देणे शक्य झाले नाही. एवढेच नव्हे मनपाने पॉझिटिव्ह घोषित केलेल्या रुग्णाला मेडिकलने निगेटिव्ह घोषित केल्याबाबत डॉ. सवाई अनभिज्ञ होते, असेही झलके यांनी सांगितले.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3fr8bjE

No comments:

Post a Comment