काय राजे हो... चहाचाही घोट महागला    नागपूर :  देशातील चहा मळ्यांना कोरोना महामारीचा फटका बसल्याने चहाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे घाऊक बाजारात चहाच्या दरात १०० ते १५० रुपये प्रति किलो चहाच्या दरात वाढ झालेली आहे. कोरोनामुळे महागाई, नोकरकपात आणि वेतन कपातीमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडला असताना आता चहाची तलफ भागविण्यासाठी ग्राहकांना अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.  देशात नवीन चहाचे उत्पादन मार्च, एप्रिल महिन्यात सुरू होते. याच कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि त्याचा फटका चहा व्यवसायाला बसला. गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिलमध्ये देशात चहापत्तीचे उत्पादन १८८.१० दशलक्ष किलो होते. यंदा ते ११३.३६ दशलक्षवर आले आहे. अंदाजे ४५ ते ५० टक्के उत्पादन घटले आहे. टाळेबंदी, उद्योग बंद, ठप्प वाहतूक व्यवस्था याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. अद्यापही कोरोनाच्या महामारीचे संकट कायम आहे. नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्टीमुळे चहाच्या मळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा फटका उत्पादनाला बसला असताना मागणीही वाढलेली आहे. तसेच चहावर १०० टक्के आयात शुल्क आकारण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. चहाची आयात थांबल्याने भाववाढ झालेली आहे.  आता कोरोना घेणार चक्क विद्यापीठाचीच परीक्षा.. चांगलाच लागणार कस; वाचा सविस्तर भारतात गुवाहाटी, सिलिगुडी, दार्जिलिंग, कोलकाता येथे चहापत्तीचे उत्पादन होते. परंतु तेथेच अडचणी निर्माण झाल्याने चहाच्या किमती किलोमागे १०० ते १५० रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे ३०० रुपये किलो असलेल्या चहाचे दर ४५० रुपये तर २०० रुपये प्रति किलो असलेले चहाचे दर ३०० रुपयावर पोहोचले आहेत.कोचिन आणि कोईम्बतूर येथेही चहाच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे. चहाची टंचाई हेच भाववाढीचे मुख्य कारण असल्याचे चहा विक्रेत्यांचे म्हणणे आहे.  भारतात चहाचे उत्पादन कमी असल्याने चहावर केंद्र शासनाने आकारलेल्या १०० टक्के आयात शुल्क कमी करावी अशी मागणी ऑल इंडिया टी ट्रेडर्स असोसिएशनने केंद्र शासनाकडे केलेली आहे. चहावर केंद्र शासनाने आयात शुल्क कमी केल्यास ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.  चहावरील आयात शुल्क कमी करा चहाचे उत्पादन कमी असल्याने चहाच्या दरात प्रथमच विक्रमी भाव वाढ झालेली आहे. भाववाढीवर निर्बंध आणण्यासाठी चहावरील आयात शुल्क कमी करावे अशी मागणी केंद्र शासनाकडे असोसिएशनने केलेली आहे.  अनिल अहिरकर, कार्यकारिणी सदस्य, ऑल इंडिया टी ट्रेडर्स असोसिएशन  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, August 28, 2020

काय राजे हो... चहाचाही घोट महागला    नागपूर :  देशातील चहा मळ्यांना कोरोना महामारीचा फटका बसल्याने चहाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे घाऊक बाजारात चहाच्या दरात १०० ते १५० रुपये प्रति किलो चहाच्या दरात वाढ झालेली आहे. कोरोनामुळे महागाई, नोकरकपात आणि वेतन कपातीमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडला असताना आता चहाची तलफ भागविण्यासाठी ग्राहकांना अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.  देशात नवीन चहाचे उत्पादन मार्च, एप्रिल महिन्यात सुरू होते. याच कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि त्याचा फटका चहा व्यवसायाला बसला. गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिलमध्ये देशात चहापत्तीचे उत्पादन १८८.१० दशलक्ष किलो होते. यंदा ते ११३.३६ दशलक्षवर आले आहे. अंदाजे ४५ ते ५० टक्के उत्पादन घटले आहे. टाळेबंदी, उद्योग बंद, ठप्प वाहतूक व्यवस्था याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. अद्यापही कोरोनाच्या महामारीचे संकट कायम आहे. नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्टीमुळे चहाच्या मळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा फटका उत्पादनाला बसला असताना मागणीही वाढलेली आहे. तसेच चहावर १०० टक्के आयात शुल्क आकारण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. चहाची आयात थांबल्याने भाववाढ झालेली आहे.  आता कोरोना घेणार चक्क विद्यापीठाचीच परीक्षा.. चांगलाच लागणार कस; वाचा सविस्तर भारतात गुवाहाटी, सिलिगुडी, दार्जिलिंग, कोलकाता येथे चहापत्तीचे उत्पादन होते. परंतु तेथेच अडचणी निर्माण झाल्याने चहाच्या किमती किलोमागे १०० ते १५० रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे ३०० रुपये किलो असलेल्या चहाचे दर ४५० रुपये तर २०० रुपये प्रति किलो असलेले चहाचे दर ३०० रुपयावर पोहोचले आहेत.कोचिन आणि कोईम्बतूर येथेही चहाच्या दरात विक्रमी वाढ झालेली आहे. चहाची टंचाई हेच भाववाढीचे मुख्य कारण असल्याचे चहा विक्रेत्यांचे म्हणणे आहे.  भारतात चहाचे उत्पादन कमी असल्याने चहावर केंद्र शासनाने आकारलेल्या १०० टक्के आयात शुल्क कमी करावी अशी मागणी ऑल इंडिया टी ट्रेडर्स असोसिएशनने केंद्र शासनाकडे केलेली आहे. चहावर केंद्र शासनाने आयात शुल्क कमी केल्यास ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.  चहावरील आयात शुल्क कमी करा चहाचे उत्पादन कमी असल्याने चहाच्या दरात प्रथमच विक्रमी भाव वाढ झालेली आहे. भाववाढीवर निर्बंध आणण्यासाठी चहावरील आयात शुल्क कमी करावे अशी मागणी केंद्र शासनाकडे असोसिएशनने केलेली आहे.  अनिल अहिरकर, कार्यकारिणी सदस्य, ऑल इंडिया टी ट्रेडर्स असोसिएशन  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2QxSbSK

No comments:

Post a Comment