कसं काय बुवा ? तीन हजार कोटींचा कापड व्यवसाय बुडाला    नागपूर : तब्बल साडे तीन महिने टाळेबंदी, आता संसर्गाची भीती, मर्यादित वेळेत ठराविक दिवशीच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आणि अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे शहरातील कापड उद्योग अडचणीत सापडला आहे. सम-विषय नियम, जिल्हाबंदी आणि वेळेच्या बंधनामुळे साडे चार महिन्यांत तीन हजार कोटींचा कापड व्यवसाय बुडला असून दुकानाचे भाडे, वीज बिल, कामगारांचे वेतन व इतर खर्च भागवताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.  टाळेबंदीतून सवलत मिळाल्यानंतर कापड विक्रेत्यांची दुकाने सुरू झाली. लग्नसराईचा काळ टाळेबंदीत गेल्याने अनेकांकडे त्यापूर्वी भरलेला माल पडून आहे. या काळात गणवेश खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते. कोरोनामुळे यंदा शाळा सुरू न झाल्याने बाजारात वर्दळ नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तयार केलेल्या गणवेशांचे काय करायचे, हा प्रश्‍न आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेवर 31 जुलैला होणार निर्णय  सणासुदीच्या किंवा दिवाळीत मागणी वाढेल अशी अपेक्षा आहे. समारंभांवरील बंधनांमुळे दिवाळीनंतरची लग्नसराई होईल की नाही याबाबतही साशंकता आहे. व्यवसाय सावरण्यास मार्च 2021 उजाडेल, असे बोलले जात आहे. पाच जूनपासून व्यवसाय सुरु झाला असला तरी दीड महिन्यात प्रत्यक्षात 24 दिवसच दुकाने उघडता आली, याकडे व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.  कशामुळे होणार बालोद्यान, जपानी गार्डन बंद..सविस्तर वाचा  नागपूर हे मध्य भारतातील कपड्याची महत्वाची बाजारपेठ आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगडसह विदर्भातील इतरही जिल्ह्यातील व्यापारी आणि ग्राहक खरेदीसाठी नागपुरात येतात. आता जिल्हा आणि राज्य बंदी असल्याने ग्राहकांची वानवा आहे. त्यामुळेच कपड्याची वीण उसवली आहे, असे माजी अध्यक्ष दिनेश सारडा यांनी सांगितले.  सम-विषम नियम आणि सकाळी 10 ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे. कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहक दुपारी दोन ते रात्री आठ या वेळेत येतात. वेळेच्या गोंधळात ग्राहक अडकल्याने उत्पन्न घटले आहे. एकूणच विक्री 80 ते 85 टक्‍क्‍यांनी मंदावली असल्याची माहिती सचिव गोपाल मुलतानी यांनी दिली. शासनाने आर्थिक मदत करावी सध्या दुकान सुरू ठेवण्याचा खर्चच कसाबसा पूर्ण करावा लागत आहे. त्यामुळे अतिसंक्रमित भाग वगळता अन्यत्र सम-विषमचा नियम न लावता आठवड्यातील सहा दिवस दिवस दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी. रविवारी जनता कर्फ्यू लावावा. शासनाने या व्यवसायास आर्थिक मदत करावी.  अजय मदान, अध्यक्ष, होलसेल क्‍लॉथ ऍण्ड यार्न मर्चंट असोसिएशन.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, July 25, 2020

कसं काय बुवा ? तीन हजार कोटींचा कापड व्यवसाय बुडाला    नागपूर : तब्बल साडे तीन महिने टाळेबंदी, आता संसर्गाची भीती, मर्यादित वेळेत ठराविक दिवशीच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आणि अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे शहरातील कापड उद्योग अडचणीत सापडला आहे. सम-विषय नियम, जिल्हाबंदी आणि वेळेच्या बंधनामुळे साडे चार महिन्यांत तीन हजार कोटींचा कापड व्यवसाय बुडला असून दुकानाचे भाडे, वीज बिल, कामगारांचे वेतन व इतर खर्च भागवताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.  टाळेबंदीतून सवलत मिळाल्यानंतर कापड विक्रेत्यांची दुकाने सुरू झाली. लग्नसराईचा काळ टाळेबंदीत गेल्याने अनेकांकडे त्यापूर्वी भरलेला माल पडून आहे. या काळात गणवेश खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते. कोरोनामुळे यंदा शाळा सुरू न झाल्याने बाजारात वर्दळ नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तयार केलेल्या गणवेशांचे काय करायचे, हा प्रश्‍न आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेवर 31 जुलैला होणार निर्णय  सणासुदीच्या किंवा दिवाळीत मागणी वाढेल अशी अपेक्षा आहे. समारंभांवरील बंधनांमुळे दिवाळीनंतरची लग्नसराई होईल की नाही याबाबतही साशंकता आहे. व्यवसाय सावरण्यास मार्च 2021 उजाडेल, असे बोलले जात आहे. पाच जूनपासून व्यवसाय सुरु झाला असला तरी दीड महिन्यात प्रत्यक्षात 24 दिवसच दुकाने उघडता आली, याकडे व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.  कशामुळे होणार बालोद्यान, जपानी गार्डन बंद..सविस्तर वाचा  नागपूर हे मध्य भारतातील कपड्याची महत्वाची बाजारपेठ आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगडसह विदर्भातील इतरही जिल्ह्यातील व्यापारी आणि ग्राहक खरेदीसाठी नागपुरात येतात. आता जिल्हा आणि राज्य बंदी असल्याने ग्राहकांची वानवा आहे. त्यामुळेच कपड्याची वीण उसवली आहे, असे माजी अध्यक्ष दिनेश सारडा यांनी सांगितले.  सम-विषम नियम आणि सकाळी 10 ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे. कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहक दुपारी दोन ते रात्री आठ या वेळेत येतात. वेळेच्या गोंधळात ग्राहक अडकल्याने उत्पन्न घटले आहे. एकूणच विक्री 80 ते 85 टक्‍क्‍यांनी मंदावली असल्याची माहिती सचिव गोपाल मुलतानी यांनी दिली. शासनाने आर्थिक मदत करावी सध्या दुकान सुरू ठेवण्याचा खर्चच कसाबसा पूर्ण करावा लागत आहे. त्यामुळे अतिसंक्रमित भाग वगळता अन्यत्र सम-विषमचा नियम न लावता आठवड्यातील सहा दिवस दिवस दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी. रविवारी जनता कर्फ्यू लावावा. शासनाने या व्यवसायास आर्थिक मदत करावी.  अजय मदान, अध्यक्ष, होलसेल क्‍लॉथ ऍण्ड यार्न मर्चंट असोसिएशन.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3hB6S2X

No comments:

Post a Comment