नागपूर महापालिकेने कशामुळे खाल्ली हाय ? वाचा नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या कमी असताना उपाययोजनेचे मोठमोठे दावे करणाऱ्या महापालिकेने रुग्णसंख्या वाढताच पॉझिटिव्ह रुग्णांना विलगीकरणासाठी नेण्याबाबत खोटे आश्‍वासन दिले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांसोबत वस्तीतील नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही पॉझिटिव्ह रुग्णांना दोन तीन तास विविध शासकीय रुग्णालये फिरवल्यानंतर बेड नसल्याने परत घरी सोडले जात असल्याची धक्कादायक बाबही पुढे आल्याने ऐन मोक्‍याच्या क्षणी मनपा कच खात असल्याचे चित्र आहे.  शहरात जवळपास दररोज दीडशे ते पावणे दोनशे कोरोनाबाधित आढळून येत आहे. सद्यस्थितीत शहरात 1665 सक्रीय कोरोनाबाधित असून मेयो, मेडिकल, एम्ससह इतर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे. काल, सोमवारी पावणेपाचशे रुग्ण दाखल होण्याच्या प्रतीक्षेत होते. आतापर्यंत दाखल होण्यासाठी रुग्णांना कधीही प्रतीक्षा करावी लागली नाही. बाधितांच्या वाढत्या संख्येने पालिका यंत्रणाही हादरल्याचे चित्र आहे. शहराच्या विविध भागातून पॉझिटिव्ह रुग्णांच्या पालिकेबाबत तक्रारी वाढत आहेत. बाधितांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आता कोरोनाबाधितांना खोटी आश्‍वासने द्यावे लागत आहे. आता काही दिवसांपूर्वी महाल रोड, तुळशीबाग रोडवरील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. या घरातील कुटुंबीयांना महापालिकेला निदान चाचणी तरी करा, अशी विनंती केली. परंतु आज चार दिवस लोटूनही पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना संपर्कही केला नाही. एवढेच नव्हे एका पॉझिटिव्ह व्यक्तीला कर्मचाऱ्यांनी मेडिकल, मेयो, एम्समध्ये दाखल करण्यासाठी स्वतःसोबत तीन चार तास फिरवले. परंतु बेड न मिळाल्याने अखेर त्या पॉझिटिव्ह व्यक्तीने घरी सोडून देण्याची विनंती केली अन्‌ कर्मचाऱ्यांनीही मोकळा श्‍वास घेतला. हेही वाचा...नागपूरकरांसाठी दुसरी घटक चाचणी कोणती आणि का व्हावे लागेल उत्तीर्ण? स्वतःच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांसाठीही पालिका बेड उपलब्ध करून देऊ शकत नसल्याचेही काल उघडकीस आले. त्यामुळे सामान्य जनतेचे काय होणार ? असा प्रश्‍न आहे. "रोज मरे त्याला कोण रडे' या "मोड'मध्ये पालिका जात असल्याचे चित्र असून नागरिकांना आता स्वतःची आरोग्य सुरक्षा स्वतःच करावी लागणार आहे.  रिक्त पदाचे वास्तव विसरले प्रशासन  महापालिका प्रशासनाने कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ केअर सेंटर आदी उभारण्यात असल्याचे दावे केले. पालिकेच्या पाच रुग्णालयांचे नूतनीकरण करून तेथे बेडची व्यवस्था करण्यात येणार होती. परंतु या नूतनीकरण केलेल्या रुग्णालयात काम करणारे डॉक्‍टर, नर्सेस पालिकेकडे आहेत काय? याचा प्रशासनाला विसर पडल्याचे दिसून येत आहे. पालिकेत डॉक्‍टरची 12 तर नर्सेसची अनेक पदे रिक्त आहेत.  मेडिकलकडे केली मनुष्यबळाकडे मागणी  मनुष्यबळ नसल्याने मेडिकलकडे साडेचारशे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. परंतु मेडिकलकडेच अपुरे मनुष्यबळ असल्याने ही मागणी पूर्ण होणे शक्‍य नसल्याचे सुत्राने नमुद केले. पालिकेने इंदिरा गांधी रुग्णालयासाठी 195, पाचपावलीतील कोविड केअर सेंटरसाठी 168 तर आयसोलेशनसाठी 59 वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज मेडिकलकडे व्यक्त केली होती.  पाच रुग्णालयांतील 450 खाटांचे काय झाले?  केटीनगर हॉस्पीटल आणि आयुष हॉस्पीटल ही दोन नवीन रुग्णालये असून इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, आयसोलेशन हॉस्पीटल इमामवाडा आणि पाचपावली स्त्री रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून एकूण 450 खाटा उपलब्ध होणार असा दावा मनपा प्रशासनाने केला होता. परंतु मनुष्यबळ वाढविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने येथील किती खाटांवर रुग्णांचे उपचार सुरू आहे, हा संशोधनाचाच विषय झाला आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, July 28, 2020

नागपूर महापालिकेने कशामुळे खाल्ली हाय ? वाचा नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या कमी असताना उपाययोजनेचे मोठमोठे दावे करणाऱ्या महापालिकेने रुग्णसंख्या वाढताच पॉझिटिव्ह रुग्णांना विलगीकरणासाठी नेण्याबाबत खोटे आश्‍वासन दिले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांसोबत वस्तीतील नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही पॉझिटिव्ह रुग्णांना दोन तीन तास विविध शासकीय रुग्णालये फिरवल्यानंतर बेड नसल्याने परत घरी सोडले जात असल्याची धक्कादायक बाबही पुढे आल्याने ऐन मोक्‍याच्या क्षणी मनपा कच खात असल्याचे चित्र आहे.  शहरात जवळपास दररोज दीडशे ते पावणे दोनशे कोरोनाबाधित आढळून येत आहे. सद्यस्थितीत शहरात 1665 सक्रीय कोरोनाबाधित असून मेयो, मेडिकल, एम्ससह इतर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे. काल, सोमवारी पावणेपाचशे रुग्ण दाखल होण्याच्या प्रतीक्षेत होते. आतापर्यंत दाखल होण्यासाठी रुग्णांना कधीही प्रतीक्षा करावी लागली नाही. बाधितांच्या वाढत्या संख्येने पालिका यंत्रणाही हादरल्याचे चित्र आहे. शहराच्या विविध भागातून पॉझिटिव्ह रुग्णांच्या पालिकेबाबत तक्रारी वाढत आहेत. बाधितांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आता कोरोनाबाधितांना खोटी आश्‍वासने द्यावे लागत आहे. आता काही दिवसांपूर्वी महाल रोड, तुळशीबाग रोडवरील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. या घरातील कुटुंबीयांना महापालिकेला निदान चाचणी तरी करा, अशी विनंती केली. परंतु आज चार दिवस लोटूनही पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना संपर्कही केला नाही. एवढेच नव्हे एका पॉझिटिव्ह व्यक्तीला कर्मचाऱ्यांनी मेडिकल, मेयो, एम्समध्ये दाखल करण्यासाठी स्वतःसोबत तीन चार तास फिरवले. परंतु बेड न मिळाल्याने अखेर त्या पॉझिटिव्ह व्यक्तीने घरी सोडून देण्याची विनंती केली अन्‌ कर्मचाऱ्यांनीही मोकळा श्‍वास घेतला. हेही वाचा...नागपूरकरांसाठी दुसरी घटक चाचणी कोणती आणि का व्हावे लागेल उत्तीर्ण? स्वतःच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांसाठीही पालिका बेड उपलब्ध करून देऊ शकत नसल्याचेही काल उघडकीस आले. त्यामुळे सामान्य जनतेचे काय होणार ? असा प्रश्‍न आहे. "रोज मरे त्याला कोण रडे' या "मोड'मध्ये पालिका जात असल्याचे चित्र असून नागरिकांना आता स्वतःची आरोग्य सुरक्षा स्वतःच करावी लागणार आहे.  रिक्त पदाचे वास्तव विसरले प्रशासन  महापालिका प्रशासनाने कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ केअर सेंटर आदी उभारण्यात असल्याचे दावे केले. पालिकेच्या पाच रुग्णालयांचे नूतनीकरण करून तेथे बेडची व्यवस्था करण्यात येणार होती. परंतु या नूतनीकरण केलेल्या रुग्णालयात काम करणारे डॉक्‍टर, नर्सेस पालिकेकडे आहेत काय? याचा प्रशासनाला विसर पडल्याचे दिसून येत आहे. पालिकेत डॉक्‍टरची 12 तर नर्सेसची अनेक पदे रिक्त आहेत.  मेडिकलकडे केली मनुष्यबळाकडे मागणी  मनुष्यबळ नसल्याने मेडिकलकडे साडेचारशे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. परंतु मेडिकलकडेच अपुरे मनुष्यबळ असल्याने ही मागणी पूर्ण होणे शक्‍य नसल्याचे सुत्राने नमुद केले. पालिकेने इंदिरा गांधी रुग्णालयासाठी 195, पाचपावलीतील कोविड केअर सेंटरसाठी 168 तर आयसोलेशनसाठी 59 वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज मेडिकलकडे व्यक्त केली होती.  पाच रुग्णालयांतील 450 खाटांचे काय झाले?  केटीनगर हॉस्पीटल आणि आयुष हॉस्पीटल ही दोन नवीन रुग्णालये असून इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, आयसोलेशन हॉस्पीटल इमामवाडा आणि पाचपावली स्त्री रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून एकूण 450 खाटा उपलब्ध होणार असा दावा मनपा प्रशासनाने केला होता. परंतु मनुष्यबळ वाढविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने येथील किती खाटांवर रुग्णांचे उपचार सुरू आहे, हा संशोधनाचाच विषय झाला आहे.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/33725Cq

No comments:

Post a Comment