छंद जोपासत त्यांनी मिळवले १०० टक्के; जाणून घ्या 'या' शतकवीर कलाकारांबद्दल! पुणे : दहावी आहे म्हणून अभ्यासाचे टेंशन घेतले नाही, जसा वेळ मिळत गेला तसा अभ्यास केला, याच सोबत गायन, नृत्य, तबलावादन आणि टेबल टेनिसचा कसून सराव केला. छंद जोपासत केलेल्या अभ्यासामुळे मुड एकमद फ्रेश रहायचा. अन 10वीच्या परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवले असाच काहीसा प्रकार घडला आहे. पुण्यात महाराष्ट्रीय मंडळ शाळेची आर्या कोशे, बाल शिक्षण मंदिरचा मल्हार कमलापूर आणि एसपीएमच्या अनीहा डिसोझा या तिघांनी 10वीच्या निकालात तडाखेबाज शतक लावले आहे - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  . आर्या ही उत्तम गायन करते, ती विशारद आहे. तर कथक्क नृत्य शिकत असून आत्तापर्यंत चार परीक्षा दिलेल्या आहेत. "सकाळ'शी बोलताना आर्या म्हणाली, "दहावीमध्ये 100 टक्के मिळविणे हे माझे स्वप्न होते, हे स्वप्न पूर्ण केले. आता कार्डीयाक सर्जन बनणे हे माझे स्वप्न आहे, ते मी पूर्ण करणार. मी 10वीत आल्यापासून अभ्यास सुरू केला आणि त्यात सातत्य ठेवले. माझी आई 11वी, 12वी आणि इंजिनियरींगचे क्‍लास घेते, त्यामुळे माझ्या 10वीच्या अभ्यासाकडे तिनेच लक्ष दिले, त्यामुळे माझ्या यशामध्ये शाळेसह आईचा मोठा वाटा आहे. मला गायन आणि कथ्थक नृत्य खूप आवडतं, त्यामुळे दहावीत आले म्हणून हे शिक्षण बंद केले नाही. आठवड्यातून एक तास गायन आणि तीन तास कथ्थक क्‍लास होता. मग उरलेला वेळ मी अभ्यासासाठी वापरला. - ना खासगी क्लास, ना अभ्यासाचं टेंशन; हसत खेळत तिनं मारली 'सेंच्युरी'!​ मल्हार कमलापूर म्हणाला, "माझ्या या यशामध्ये आई, वडील आणि शिक्षकांचा मोठा हातभार आहे, त्यांच्या सहकार्यामुळेच मला 100 टक्के गुण मिळाले. खासगी क्‍लास लावले नव्हते, रोज ठराविक तास अभ्यास केलाच पाहिजे असे नव्हते, पण वेळ मिळत गेला की घरच्या घरी अभ्यास केला, आलेल्या अडचणी शिक्षकांना लगेच विचारून घेत, त्यामुळे संकल्पना स्पष्ट होत. हा अभ्यास करताना तबल्याचा क्‍लासलाही मी जात असे. दहावी नंतर आता विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहे, त्यानंतर जशा संधी उपलब्ध होतील ते ठरवेन.'' - हम भी किसीसे कम नहीं; बोर्डाच्या परीक्षेत चमकली कष्टकऱ्यांची पोरं!​ टेबल टेनीसपट्टूने जिंकला गुणांचा 'सेट' टेबल टेनिसपट्टू असलेली अनीहा डिसोझा म्हणाली, "मी लहानपणापासून टेबल टेनिस खेळत आले आहे. आत्तापर्यंत तीन राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले आहे, पण त्यासोबत अभ्यासाकडे लक्ष दिले, रोजचा अभ्यास रोज केला, त्यामुळे अभ्यासाचे टेंशन आले नाही. हे गुण मिळण्यात माझे शिक्षक, टेबल टेनिसचे कोच आणि आई-वडील यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पुढे मला डॉक्‍टर व्हायचे आहे, त्यामुळे विज्ञान शाखेत प्रवेश घेईन. त्याचसोबत माझा खेळ सुरू राहील. तसेच शास्त्रीय संगीतात मध्यमा प्रथमा झालेले आहे, त्यापुढेही शिकणार आहे.'' - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, July 29, 2020

छंद जोपासत त्यांनी मिळवले १०० टक्के; जाणून घ्या 'या' शतकवीर कलाकारांबद्दल! पुणे : दहावी आहे म्हणून अभ्यासाचे टेंशन घेतले नाही, जसा वेळ मिळत गेला तसा अभ्यास केला, याच सोबत गायन, नृत्य, तबलावादन आणि टेबल टेनिसचा कसून सराव केला. छंद जोपासत केलेल्या अभ्यासामुळे मुड एकमद फ्रेश रहायचा. अन 10वीच्या परीक्षेत 100 पैकी 100 गुण मिळवले असाच काहीसा प्रकार घडला आहे. पुण्यात महाराष्ट्रीय मंडळ शाळेची आर्या कोशे, बाल शिक्षण मंदिरचा मल्हार कमलापूर आणि एसपीएमच्या अनीहा डिसोझा या तिघांनी 10वीच्या निकालात तडाखेबाज शतक लावले आहे - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  . आर्या ही उत्तम गायन करते, ती विशारद आहे. तर कथक्क नृत्य शिकत असून आत्तापर्यंत चार परीक्षा दिलेल्या आहेत. "सकाळ'शी बोलताना आर्या म्हणाली, "दहावीमध्ये 100 टक्के मिळविणे हे माझे स्वप्न होते, हे स्वप्न पूर्ण केले. आता कार्डीयाक सर्जन बनणे हे माझे स्वप्न आहे, ते मी पूर्ण करणार. मी 10वीत आल्यापासून अभ्यास सुरू केला आणि त्यात सातत्य ठेवले. माझी आई 11वी, 12वी आणि इंजिनियरींगचे क्‍लास घेते, त्यामुळे माझ्या 10वीच्या अभ्यासाकडे तिनेच लक्ष दिले, त्यामुळे माझ्या यशामध्ये शाळेसह आईचा मोठा वाटा आहे. मला गायन आणि कथ्थक नृत्य खूप आवडतं, त्यामुळे दहावीत आले म्हणून हे शिक्षण बंद केले नाही. आठवड्यातून एक तास गायन आणि तीन तास कथ्थक क्‍लास होता. मग उरलेला वेळ मी अभ्यासासाठी वापरला. - ना खासगी क्लास, ना अभ्यासाचं टेंशन; हसत खेळत तिनं मारली 'सेंच्युरी'!​ मल्हार कमलापूर म्हणाला, "माझ्या या यशामध्ये आई, वडील आणि शिक्षकांचा मोठा हातभार आहे, त्यांच्या सहकार्यामुळेच मला 100 टक्के गुण मिळाले. खासगी क्‍लास लावले नव्हते, रोज ठराविक तास अभ्यास केलाच पाहिजे असे नव्हते, पण वेळ मिळत गेला की घरच्या घरी अभ्यास केला, आलेल्या अडचणी शिक्षकांना लगेच विचारून घेत, त्यामुळे संकल्पना स्पष्ट होत. हा अभ्यास करताना तबल्याचा क्‍लासलाही मी जात असे. दहावी नंतर आता विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहे, त्यानंतर जशा संधी उपलब्ध होतील ते ठरवेन.'' - हम भी किसीसे कम नहीं; बोर्डाच्या परीक्षेत चमकली कष्टकऱ्यांची पोरं!​ टेबल टेनीसपट्टूने जिंकला गुणांचा 'सेट' टेबल टेनिसपट्टू असलेली अनीहा डिसोझा म्हणाली, "मी लहानपणापासून टेबल टेनिस खेळत आले आहे. आत्तापर्यंत तीन राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले आहे, पण त्यासोबत अभ्यासाकडे लक्ष दिले, रोजचा अभ्यास रोज केला, त्यामुळे अभ्यासाचे टेंशन आले नाही. हे गुण मिळण्यात माझे शिक्षक, टेबल टेनिसचे कोच आणि आई-वडील यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पुढे मला डॉक्‍टर व्हायचे आहे, त्यामुळे विज्ञान शाखेत प्रवेश घेईन. त्याचसोबत माझा खेळ सुरू राहील. तसेच शास्त्रीय संगीतात मध्यमा प्रथमा झालेले आहे, त्यापुढेही शिकणार आहे.'' - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2CTZS2K

No comments:

Post a Comment