पोलिसाचा मुलगा दाऊद इब्राहिम असा बनला अंडरवर्ल्ड डॉन औरंगाबाद - दाऊद इब्राहिम कासकर याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे दाऊद पुन्हा एकदा चर्चेत आला. अनेक वर्षांपासून दाऊद भारताची डोकेदुखी बनला आहे. तो सध्या भारतात राहत नसला तरीही त्याचे क्रूर कारनामे सुरूच आहेत. पण, एका पोलिसाचा मुलगा असलेला दाऊद अंडरवर्ल्‍ड डॉन कसा झाला, हा प्रश्न अनेकांना पडतो, याचीच खास माहिती eSakal.com च्या वाचकांसासाठी.    माजी महासंचालक बी. व्ही. कुमार यांनी उलगडला प्रवास  महसूल गुप्तचर संचालनालयाचे माजी महासंचालक बी. व्ही. कुमार यांनी दाऊद इब्राहिमचा गुन्हेगारी विश्वातला अंडरवर्ल्ड डॉन बनण्यापर्यंतचा प्रवास ‘डीआरआय अँड द डॉन्स’ या आपल्या पुस्तकातून उलगडला आहे. बी. व्ही. कुमार यांनी दाऊदचा गुन्हेगारीचा प्रवास जवळून पाहिला. या शिवाय ८०-९० च्या दशकातील मुंबईमधील अनेक क्राइम रिपोर्टर्ससही दाऊदच्या डॉन होण्याच्या प्रवासाचे साक्षीदार आहेत.      असे गेले बालपण  अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे पूर्ण नाव दाऊद इब्राहिम कासकर आहे. त्याचा जन्म २७ डिसेंबर १९५५ ला रत्नागिरी जिल्‍ह्यामध्‍ये झाला. त्‍याचे वडील शेख इब्राहिम अली कासकर मुंबई पोलिस दलात शिपाई होते. त्‍यांना दाऊदसह‍ एकूण सात मुलं होती. दाऊदचे लहानपण मुंबईच्‍या डोंगरी परिसरामध्‍ये गेले. सात मुलं असल्याने त्याच्या आई-वडिलांचेही त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. कळायला लागल्यावर दाऊद ड्रग्स सप्लायर बनला. छोट्या-छोट्या चोऱ्याही करायला लागला. मित्रांच्या मदतीने लूटपाट करणेही त्‍याने सुरू केले. दाऊदचे जे थोडेफार शिक्षण झाले ते मराठीतून झाले. दाऊद उत्तम मराठी बोलतो. मराठीवर त्याचे भाषेवर खूप प्रेम आहे. त्यामुळे तो मराठीतूनच व्यक्त होतो. आपल्या कुण्या सहकाऱ्याला मराठी येत नसेल तर त्यांना मराठी शिकवण्याचा प्रयत्नही करतो, अशी आठवण त्याचे तत्कालीन निकटवर्तीय सांगतात.  औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात    वयाच्या १९ व्या वर्षी लुटली बॅंकेची कॅश  छोटे-छोटे गुन्हे करताना दाऊदचे धाडस वाढत गेले. त्या काळात मुंबईच्याच स्मगलिंग क्षेत्रात मस्तान आणि करीम लाला यांचे नाव होते. दाऊदने त्यांची गॅंग ज्वाइन केली. पुढे हाजी मस्तान राजकारणात गेला. त्यानंतर दाऊदने आपली वेगळीच गँग तयार केली. त्यावेळी त्याचे वय होते अवघे १९ वर्ष. त्यामुळे हाजी मस्तान आणि दाऊद यांच्यात खटके उडायला सुरवात झाली. आपले वर्चस्व दाखवण्यासाठी या गॅंगला सोबत घेऊन दाऊदने ४ डिसेंबर १९८७ च्या सायंकाळी हाजी मस्तान याची कॅश घेऊन जाणाऱ्या मेट्रोपॉलिटन बँकेची कारमधील ४.५ लाख रुपये लुटले. विशेष म्हणजे या दरोड्याचा तपास आला तो खुद्द दाऊदचे वडील इब्राहिम कासकर यांच्याकडे. त्यांनी दाऊद आणि त्याच्या मित्रांना अटक केली. आजही हे प्रकरण प्रलंबित आहे. इथूनच खऱ्या अर्थाने अंडरवर्ल्ड डॉन बनण्याचा दाऊदचा प्रवास सुरू झाला. पुढे दरोडा, सोने तस्करी, ड्रंग्ज सप्लाय अशा गुन्ह्यात दाऊदचे नाव अग्रक्रमावर यायला लागले. दाऊदने आपल्या पैशांच्या शक्तीचा वापर करीन बॉलिवूड आणि क्रिकेटच्या दुनियेत प्रस्थ निर्माण केले होते. १९९३ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील तो प्रमुख आरोपी बनल्यानंतर त्याने भारतातून पळ काढला.  मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 6, 2020

पोलिसाचा मुलगा दाऊद इब्राहिम असा बनला अंडरवर्ल्ड डॉन औरंगाबाद - दाऊद इब्राहिम कासकर याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे दाऊद पुन्हा एकदा चर्चेत आला. अनेक वर्षांपासून दाऊद भारताची डोकेदुखी बनला आहे. तो सध्या भारतात राहत नसला तरीही त्याचे क्रूर कारनामे सुरूच आहेत. पण, एका पोलिसाचा मुलगा असलेला दाऊद अंडरवर्ल्‍ड डॉन कसा झाला, हा प्रश्न अनेकांना पडतो, याचीच खास माहिती eSakal.com च्या वाचकांसासाठी.    माजी महासंचालक बी. व्ही. कुमार यांनी उलगडला प्रवास  महसूल गुप्तचर संचालनालयाचे माजी महासंचालक बी. व्ही. कुमार यांनी दाऊद इब्राहिमचा गुन्हेगारी विश्वातला अंडरवर्ल्ड डॉन बनण्यापर्यंतचा प्रवास ‘डीआरआय अँड द डॉन्स’ या आपल्या पुस्तकातून उलगडला आहे. बी. व्ही. कुमार यांनी दाऊदचा गुन्हेगारीचा प्रवास जवळून पाहिला. या शिवाय ८०-९० च्या दशकातील मुंबईमधील अनेक क्राइम रिपोर्टर्ससही दाऊदच्या डॉन होण्याच्या प्रवासाचे साक्षीदार आहेत.      असे गेले बालपण  अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे पूर्ण नाव दाऊद इब्राहिम कासकर आहे. त्याचा जन्म २७ डिसेंबर १९५५ ला रत्नागिरी जिल्‍ह्यामध्‍ये झाला. त्‍याचे वडील शेख इब्राहिम अली कासकर मुंबई पोलिस दलात शिपाई होते. त्‍यांना दाऊदसह‍ एकूण सात मुलं होती. दाऊदचे लहानपण मुंबईच्‍या डोंगरी परिसरामध्‍ये गेले. सात मुलं असल्याने त्याच्या आई-वडिलांचेही त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. कळायला लागल्यावर दाऊद ड्रग्स सप्लायर बनला. छोट्या-छोट्या चोऱ्याही करायला लागला. मित्रांच्या मदतीने लूटपाट करणेही त्‍याने सुरू केले. दाऊदचे जे थोडेफार शिक्षण झाले ते मराठीतून झाले. दाऊद उत्तम मराठी बोलतो. मराठीवर त्याचे भाषेवर खूप प्रेम आहे. त्यामुळे तो मराठीतूनच व्यक्त होतो. आपल्या कुण्या सहकाऱ्याला मराठी येत नसेल तर त्यांना मराठी शिकवण्याचा प्रयत्नही करतो, अशी आठवण त्याचे तत्कालीन निकटवर्तीय सांगतात.  औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात    वयाच्या १९ व्या वर्षी लुटली बॅंकेची कॅश  छोटे-छोटे गुन्हे करताना दाऊदचे धाडस वाढत गेले. त्या काळात मुंबईच्याच स्मगलिंग क्षेत्रात मस्तान आणि करीम लाला यांचे नाव होते. दाऊदने त्यांची गॅंग ज्वाइन केली. पुढे हाजी मस्तान राजकारणात गेला. त्यानंतर दाऊदने आपली वेगळीच गँग तयार केली. त्यावेळी त्याचे वय होते अवघे १९ वर्ष. त्यामुळे हाजी मस्तान आणि दाऊद यांच्यात खटके उडायला सुरवात झाली. आपले वर्चस्व दाखवण्यासाठी या गॅंगला सोबत घेऊन दाऊदने ४ डिसेंबर १९८७ च्या सायंकाळी हाजी मस्तान याची कॅश घेऊन जाणाऱ्या मेट्रोपॉलिटन बँकेची कारमधील ४.५ लाख रुपये लुटले. विशेष म्हणजे या दरोड्याचा तपास आला तो खुद्द दाऊदचे वडील इब्राहिम कासकर यांच्याकडे. त्यांनी दाऊद आणि त्याच्या मित्रांना अटक केली. आजही हे प्रकरण प्रलंबित आहे. इथूनच खऱ्या अर्थाने अंडरवर्ल्ड डॉन बनण्याचा दाऊदचा प्रवास सुरू झाला. पुढे दरोडा, सोने तस्करी, ड्रंग्ज सप्लाय अशा गुन्ह्यात दाऊदचे नाव अग्रक्रमावर यायला लागले. दाऊदने आपल्या पैशांच्या शक्तीचा वापर करीन बॉलिवूड आणि क्रिकेटच्या दुनियेत प्रस्थ निर्माण केले होते. १९९३ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील तो प्रमुख आरोपी बनल्यानंतर त्याने भारतातून पळ काढला.  मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2AcFyrV

No comments:

Post a Comment