डिस्पोजल टॉवेल कुठं भेटन गा भौ? दिवसभर शोधाशोध...  नागपूर : तीन महिने बंद असलेल्या केशकर्तनालयांचा रविवारपासून "पुनश्‍च हरिओम' होत आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या स्वाक्षरीनिशी सलून व्यावसायिकांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यात डिस्पोजल टॉवेलचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. पण, डिस्पोजल टॉवेलसंदर्भात कुणालाही माहिती नसल्याने सलून व्यावसायिकांची शनिवारी शोधाशोध सुरू होती.  कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर सलूनची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. रविवार (ता. 28) पासून ही दुकाने पुन्हा सुरू होत आहेत. दुकाने उघडल्यावर ठरवून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमावलीसंदर्भात महापालिकेने शनिवारी परिपत्रकही काढले आहे.  या आदेशानुसार, ग्राहकांसाठी डिस्पोजल टॉवेल आणि नॅपकिनचा वापर आवश्‍यक आहे. सोबतच डिस्पोजेबल वस्तू ग्राहकांना सेवा दिल्यानंतर निर्जंतुकीकरण करून टाकून द्याव्या लागतील. दुपारपर्यंत या अटींची माहिती सलून मालकांना नव्हती. परिपत्रक येताच डिस्पोजल टॉवेलची अट खटकणारी ठरली. असे टॉवेल असतात का, ते कुठे मिळतात यासंदर्भातील विचारणा सलून व्यावसायिकांच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवरून सुरू झाली. कुणालाही त्याबाबत माहिती नसल्याने संभ्रमही होता. रात्रीपर्यंत ही चर्चा रंगली.  सलून आणि ब्युटी पार्लरमध्ये मर्यादित ग्राहकांनाच सेवा देण्यासाठी आणि तीसुद्धा पूर्वनिर्धारित वेळ घेऊन उघडण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे. सलूनमधून दाढी करण्यावर प्रतिबंध कायम आहे. केवळ हेअर कट, हेअर डाय, व्हॅक्‍सिन, थ्रेडिंग तेवढेच करता येईल. त्वचेशी निगडित कुठलीही सेवा देता येणार नाही. ग्राहकांच्या माहितीसाठी सर्व सलूनमालकांनी दुकानाच्या दर्शनी भागात या सर्व बाबींची माहिती देणारा फलक लावणेही अत्यावश्‍यक असल्याचे आदेशात म्हटले आहे.  हेही वाचा : धापेवाडा यात्रेची 280 वर्षांची परंपरा मोडीत निघणार; या कारणामुळे घडणार असे...  सलून, ब्युटी पार्लरच्या कर्मचाऱ्यांनी मास्क, ऍप्रन, मोजे वापरणे बंधनकारक आहे. ग्राहकांचा संपर्क येणाऱ्या खुर्चीसह अन्य वस्तूंचे प्रत्येक ग्राहकाला सेवा दिल्यानंतर निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक आहे. सोबतच दुकानाची संपूर्ण जागा आणि पृष्ठभाग प्रत्येक दोन तासांनंतर निर्जंतुक करावा लागणार आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 27, 2020

डिस्पोजल टॉवेल कुठं भेटन गा भौ? दिवसभर शोधाशोध...  नागपूर : तीन महिने बंद असलेल्या केशकर्तनालयांचा रविवारपासून "पुनश्‍च हरिओम' होत आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या स्वाक्षरीनिशी सलून व्यावसायिकांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यात डिस्पोजल टॉवेलचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. पण, डिस्पोजल टॉवेलसंदर्भात कुणालाही माहिती नसल्याने सलून व्यावसायिकांची शनिवारी शोधाशोध सुरू होती.  कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर सलूनची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. रविवार (ता. 28) पासून ही दुकाने पुन्हा सुरू होत आहेत. दुकाने उघडल्यावर ठरवून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमावलीसंदर्भात महापालिकेने शनिवारी परिपत्रकही काढले आहे.  या आदेशानुसार, ग्राहकांसाठी डिस्पोजल टॉवेल आणि नॅपकिनचा वापर आवश्‍यक आहे. सोबतच डिस्पोजेबल वस्तू ग्राहकांना सेवा दिल्यानंतर निर्जंतुकीकरण करून टाकून द्याव्या लागतील. दुपारपर्यंत या अटींची माहिती सलून मालकांना नव्हती. परिपत्रक येताच डिस्पोजल टॉवेलची अट खटकणारी ठरली. असे टॉवेल असतात का, ते कुठे मिळतात यासंदर्भातील विचारणा सलून व्यावसायिकांच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवरून सुरू झाली. कुणालाही त्याबाबत माहिती नसल्याने संभ्रमही होता. रात्रीपर्यंत ही चर्चा रंगली.  सलून आणि ब्युटी पार्लरमध्ये मर्यादित ग्राहकांनाच सेवा देण्यासाठी आणि तीसुद्धा पूर्वनिर्धारित वेळ घेऊन उघडण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे. सलूनमधून दाढी करण्यावर प्रतिबंध कायम आहे. केवळ हेअर कट, हेअर डाय, व्हॅक्‍सिन, थ्रेडिंग तेवढेच करता येईल. त्वचेशी निगडित कुठलीही सेवा देता येणार नाही. ग्राहकांच्या माहितीसाठी सर्व सलूनमालकांनी दुकानाच्या दर्शनी भागात या सर्व बाबींची माहिती देणारा फलक लावणेही अत्यावश्‍यक असल्याचे आदेशात म्हटले आहे.  हेही वाचा : धापेवाडा यात्रेची 280 वर्षांची परंपरा मोडीत निघणार; या कारणामुळे घडणार असे...  सलून, ब्युटी पार्लरच्या कर्मचाऱ्यांनी मास्क, ऍप्रन, मोजे वापरणे बंधनकारक आहे. ग्राहकांचा संपर्क येणाऱ्या खुर्चीसह अन्य वस्तूंचे प्रत्येक ग्राहकाला सेवा दिल्यानंतर निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक आहे. सोबतच दुकानाची संपूर्ण जागा आणि पृष्ठभाग प्रत्येक दोन तासांनंतर निर्जंतुक करावा लागणार आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3ghekzV

No comments:

Post a Comment