पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावरून एकाचा खून परंडा (जि. उस्मानाबाद) : शेतरस्त्याचे काम, तसेच जुगार अड्ड्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून देवळाली (ता. भूम) येथे शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्याचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी (ता. २६) रात्री साडेआठच्या सुमारास देवळाली येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडली. याप्रकरणी परंडा येथील पोलिस ठाण्यात बारा जणांविरोधात बुधवारी (ता. २७) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चारजणांना ताब्यात घेतले आहे. देवळाली ते वंजारवाडी शेतरस्त्याच्या कारणावरून संशयित आरोपीचे भूम पंचायत समितीचे सदस्य बाजीराव तांबे (वय ४५, रा. देवळाली, ता. भूम) यांच्यासोबत नऊ मे रोजी कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर प्रकाश भागवत गोरे यांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली होती. जुगार अड्ड्याची माहिती बाजीराव तांबे यांनीच पोलिसांना दिली, असा संशय खून प्रकरणातील संशयित आरोपींनी घेतला होता. औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा याचा राग धरून चंद्रकांत तांबे, सूर्यकांत तांबे, मधुकर तांबे, रामनाथ तांबे, किरण तांबे, प्रवीण शेटे, अभिजित शेटे, श्रीपती विधाते, प्रकाश गोरे, दिनकर ऊर्फ दिनेश गोरे, भागवत गोरे व चंद्रकांत शेटे (सर्व रा. देवळाली) यांनी मंगळवारी रात्री सव्वाआठच्या दरम्यान दुचाकीने बार्शीकडे जाणाऱ्या बाजीराव तांबे यांना ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्त्यावर अडविले. त्यानंतर धारदार शस्त्राने बाजीराव तांबे यांच्या पोटात व हातावर वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. जखमी बाजीराव तांबे यांना तत्काळ बार्शी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु त्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल खांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक इक्बाल सय्यद, सहायक पोलिस निरीक्षक साहेबराव राठोड, पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब बनसोडे आदींसह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा याप्रकरणी बाजीराव तांबे यांचे भाऊ अंकुश कल्याण तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारा जणांविरोधात परंडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक इक्बाल सय्यद तपास करीत आहेत. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल खांबे, स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक डी. एम. शेख आदी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, May 27, 2020

पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावरून एकाचा खून परंडा (जि. उस्मानाबाद) : शेतरस्त्याचे काम, तसेच जुगार अड्ड्याची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून देवळाली (ता. भूम) येथे शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्याचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी (ता. २६) रात्री साडेआठच्या सुमारास देवळाली येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडली. याप्रकरणी परंडा येथील पोलिस ठाण्यात बारा जणांविरोधात बुधवारी (ता. २७) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चारजणांना ताब्यात घेतले आहे. देवळाली ते वंजारवाडी शेतरस्त्याच्या कारणावरून संशयित आरोपीचे भूम पंचायत समितीचे सदस्य बाजीराव तांबे (वय ४५, रा. देवळाली, ता. भूम) यांच्यासोबत नऊ मे रोजी कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर प्रकाश भागवत गोरे यांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली होती. जुगार अड्ड्याची माहिती बाजीराव तांबे यांनीच पोलिसांना दिली, असा संशय खून प्रकरणातील संशयित आरोपींनी घेतला होता. औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा याचा राग धरून चंद्रकांत तांबे, सूर्यकांत तांबे, मधुकर तांबे, रामनाथ तांबे, किरण तांबे, प्रवीण शेटे, अभिजित शेटे, श्रीपती विधाते, प्रकाश गोरे, दिनकर ऊर्फ दिनेश गोरे, भागवत गोरे व चंद्रकांत शेटे (सर्व रा. देवळाली) यांनी मंगळवारी रात्री सव्वाआठच्या दरम्यान दुचाकीने बार्शीकडे जाणाऱ्या बाजीराव तांबे यांना ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्त्यावर अडविले. त्यानंतर धारदार शस्त्राने बाजीराव तांबे यांच्या पोटात व हातावर वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. जखमी बाजीराव तांबे यांना तत्काळ बार्शी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु त्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल खांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक इक्बाल सय्यद, सहायक पोलिस निरीक्षक साहेबराव राठोड, पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब बनसोडे आदींसह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा याप्रकरणी बाजीराव तांबे यांचे भाऊ अंकुश कल्याण तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारा जणांविरोधात परंडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक इक्बाल सय्यद तपास करीत आहेत. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल खांबे, स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक डी. एम. शेख आदी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3erwPR7

No comments:

Post a Comment