बापरे..आत्मदहनाचा इशारा..काय प्रकरण आहे वाचा सिंधुदुर्गनगरी - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चौपदरीकरण भूसंपादन नुकसान भरपाईबाबत 2018 मध्ये लवादामार्फत वाढीव नुकसान भरपाईचे आदेश होऊनही अद्याप भरपाई मिळाली नाही. तरी जून अखेरपर्यंत भरपाई न मिळाल्यास 1 जुलैला मुख्यमंत्री कार्यालयासमोर सामूहीक आत्मदहन करू, असा इशारा महामार्ग प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.  त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चौपदरीकरण भूसंपादन नुकसान भरपाईबाबत प्रकल्पग्रस्तांनी 2017 मध्ये जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे नियमानुसार तक्रार नोंदवून वाढवून भरपाई मिळावी, यासाठी कायदेशीर अर्ज दाखल केले होते. याबाबत लवदामार्फत वाढीव नुकसान भरपाईचा आदेश 2018 मध्ये देण्यात आलेले आहेत अशा प्रकल्पग्रस्तांना आज तीन वर्षे पूर्ण झाली. तरीही वाढीव नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्याकरिता गेली तीन वर्ष सर्व माध्यमातून प्रयत्न केले. गेली दोन महिने कोरोना महामारीमुळे प्रकल्पग्रस्त गप्प असून शासनाला सहकार्य करीत आहेत. येत्या महिन्यात पावसाळा सुरू होणार असून प्रकल्पग्रस्तांना अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. तरी प्रकल्पग्रस्तांना जून अखेरपर्यंत नुकसान भरपाई खात्यावर जमा करावी. अन्यथा सामूहिक आत्मदहनाशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील महामार्ग प्रकल्पग्रस्त 1 जुलैला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर सामुहीक आत्मदहन करतील आणि याला पूर्णपणे शासन जबाबदार राहील, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. या निवेदनावर गोविंद तुळसकर, स्मिता नाईक, संजय केसरकर, रेमी डिसोजा, आनंदी मांजरेकर, छाया राऊळ, विष्णू धुरी, संदीप धुरी, नंदकुमार माणगावकर आदींच्या स्वाक्षरी आहेत.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, May 26, 2020

बापरे..आत्मदहनाचा इशारा..काय प्रकरण आहे वाचा सिंधुदुर्गनगरी - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चौपदरीकरण भूसंपादन नुकसान भरपाईबाबत 2018 मध्ये लवादामार्फत वाढीव नुकसान भरपाईचे आदेश होऊनही अद्याप भरपाई मिळाली नाही. तरी जून अखेरपर्यंत भरपाई न मिळाल्यास 1 जुलैला मुख्यमंत्री कार्यालयासमोर सामूहीक आत्मदहन करू, असा इशारा महामार्ग प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.  त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 चौपदरीकरण भूसंपादन नुकसान भरपाईबाबत प्रकल्पग्रस्तांनी 2017 मध्ये जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे नियमानुसार तक्रार नोंदवून वाढवून भरपाई मिळावी, यासाठी कायदेशीर अर्ज दाखल केले होते. याबाबत लवदामार्फत वाढीव नुकसान भरपाईचा आदेश 2018 मध्ये देण्यात आलेले आहेत अशा प्रकल्पग्रस्तांना आज तीन वर्षे पूर्ण झाली. तरीही वाढीव नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्याकरिता गेली तीन वर्ष सर्व माध्यमातून प्रयत्न केले. गेली दोन महिने कोरोना महामारीमुळे प्रकल्पग्रस्त गप्प असून शासनाला सहकार्य करीत आहेत. येत्या महिन्यात पावसाळा सुरू होणार असून प्रकल्पग्रस्तांना अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. तरी प्रकल्पग्रस्तांना जून अखेरपर्यंत नुकसान भरपाई खात्यावर जमा करावी. अन्यथा सामूहिक आत्मदहनाशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील महामार्ग प्रकल्पग्रस्त 1 जुलैला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर सामुहीक आत्मदहन करतील आणि याला पूर्णपणे शासन जबाबदार राहील, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. या निवेदनावर गोविंद तुळसकर, स्मिता नाईक, संजय केसरकर, रेमी डिसोजा, आनंदी मांजरेकर, छाया राऊळ, विष्णू धुरी, संदीप धुरी, नंदकुमार माणगावकर आदींच्या स्वाक्षरी आहेत.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3c78gHo

No comments:

Post a Comment