गुडन्यूज : लालपरीचा लवकरच करता येईल प्रवास; हे आहे एसटी महामंडळाचे नियोजन! खामगाव (जि.बुलडाणा) : कोरोना संसर्गामुळे राज्यभरात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नागरिक वेगवेगळ्या शहरांमध्ये अडकून पडले आहेत, अशा नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी एसटी बस धावणार असून, ज्या व्यक्तींना बाहेरगावी प्रवास करायचा असेल त्यांनी खामगाव बसस्थानकातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन आगार एस. एफ. पवार यांनी केली आहे. लॉकडाउनमुळे मोठ्या संख्येने नागरिक वेगवेगळ्या शहरांमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये बाहेरगाववरून शहरात कामासाठी आलेले कामगार, मजूर वर्ग, नातेवाइकांना भेटण्यासाठी आलेले पाहणे तसेच बाहेरगावी नोकरी, शिक्षण आणि अन्य कामांसाठी अडकलेल्यांना पुन्हा घरी पोहोचविण्यासाठी परिवहन मंडळ सरसावले आहे. एसटी महामंडळाकडून राज्यातील सर्वच जिल्ह्यात व शहरांमध्ये प्रवाशांना पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महत्त्वाची बातमी - अकोल्यात एकाच दिवशी कोरोनाने चार मृत्यू; चिंतेसह चिंतन करण्याची वेळ जिल्ह्यातील सर्वच आगारातून या नागरिकांना आता प्रवासासाठी बसेस सोडण्यात येणार आहे. एका बसमध्ये फक्त 22 प्रवाशांनाच प्रवेश दिला जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंगकरिता एका बाकावर एक प्रवाशी बसविण्यात येणार आहे. प्रवाशांना प्रवासाकरिता फिटनेस सटीफिकेट आणि जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार कार्यालयाकडून प्रवासाचा परवाना घेणे आवश्यक आहे. तसेच प्रवाशाने त्याचेजवळ आधार कार्ड किंवा शासनाचे ओळखपत्र ठेवणे गरजेचे आहे. बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचे सुरुवातीचे ठिकाण ते शेवटचे ठिकाण अशाच प्रवासाला परवानगी देण्यात येणार आहे. हेही वाचा - माजी गृहराज्यमंत्र्यांची कन्या पुण्यात देतेय कोरोनाविरुद्ध लढा; फ्रंट लाईन वॉरियर म्हणून अविरत सेवा मार्गातील मधल्या थांब्यावर कोणालाही उतरता येणार नाही. एका शहराकडे जाणारे 22 प्रवासी पूर्ण होईपर्यंत बस सुटणार नाही. तसेच संपूर्ण प्रवासात प्रवाशांनी तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. नागरिकांनी बसमध्ये प्रवेश करण्याअगोदर सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे बंधनकारक आहे. प्रवासाअगोदर आगाराकडून प्रत्येक बस पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.  अधिक माहितीसाठी नागरिकांनी बसस्थानकावरील वाहक नियंत्रक धनोकार (9421495085), शहाणे (9766736375), काळणे (8805711704), थारकर (9011264871), भालदाणे (9767929661) या क्रमांकावर संपर्क करून चौकशी करावी, अशी माहिती आगार एस. एफ. पवार यांनी केली आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, May 7, 2020

गुडन्यूज : लालपरीचा लवकरच करता येईल प्रवास; हे आहे एसटी महामंडळाचे नियोजन! खामगाव (जि.बुलडाणा) : कोरोना संसर्गामुळे राज्यभरात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नागरिक वेगवेगळ्या शहरांमध्ये अडकून पडले आहेत, अशा नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी एसटी बस धावणार असून, ज्या व्यक्तींना बाहेरगावी प्रवास करायचा असेल त्यांनी खामगाव बसस्थानकातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन आगार एस. एफ. पवार यांनी केली आहे. लॉकडाउनमुळे मोठ्या संख्येने नागरिक वेगवेगळ्या शहरांमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये बाहेरगाववरून शहरात कामासाठी आलेले कामगार, मजूर वर्ग, नातेवाइकांना भेटण्यासाठी आलेले पाहणे तसेच बाहेरगावी नोकरी, शिक्षण आणि अन्य कामांसाठी अडकलेल्यांना पुन्हा घरी पोहोचविण्यासाठी परिवहन मंडळ सरसावले आहे. एसटी महामंडळाकडून राज्यातील सर्वच जिल्ह्यात व शहरांमध्ये प्रवाशांना पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महत्त्वाची बातमी - अकोल्यात एकाच दिवशी कोरोनाने चार मृत्यू; चिंतेसह चिंतन करण्याची वेळ जिल्ह्यातील सर्वच आगारातून या नागरिकांना आता प्रवासासाठी बसेस सोडण्यात येणार आहे. एका बसमध्ये फक्त 22 प्रवाशांनाच प्रवेश दिला जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंगकरिता एका बाकावर एक प्रवाशी बसविण्यात येणार आहे. प्रवाशांना प्रवासाकरिता फिटनेस सटीफिकेट आणि जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार कार्यालयाकडून प्रवासाचा परवाना घेणे आवश्यक आहे. तसेच प्रवाशाने त्याचेजवळ आधार कार्ड किंवा शासनाचे ओळखपत्र ठेवणे गरजेचे आहे. बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचे सुरुवातीचे ठिकाण ते शेवटचे ठिकाण अशाच प्रवासाला परवानगी देण्यात येणार आहे. हेही वाचा - माजी गृहराज्यमंत्र्यांची कन्या पुण्यात देतेय कोरोनाविरुद्ध लढा; फ्रंट लाईन वॉरियर म्हणून अविरत सेवा मार्गातील मधल्या थांब्यावर कोणालाही उतरता येणार नाही. एका शहराकडे जाणारे 22 प्रवासी पूर्ण होईपर्यंत बस सुटणार नाही. तसेच संपूर्ण प्रवासात प्रवाशांनी तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. नागरिकांनी बसमध्ये प्रवेश करण्याअगोदर सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे बंधनकारक आहे. प्रवासाअगोदर आगाराकडून प्रत्येक बस पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.  अधिक माहितीसाठी नागरिकांनी बसस्थानकावरील वाहक नियंत्रक धनोकार (9421495085), शहाणे (9766736375), काळणे (8805711704), थारकर (9011264871), भालदाणे (9767929661) या क्रमांकावर संपर्क करून चौकशी करावी, अशी माहिती आगार एस. एफ. पवार यांनी केली आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3cfVh7c

No comments:

Post a Comment