अत्याचारी भोंदूबाबावर कठोर कारवाई;  गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आदेश मुंबई -  ""पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या भोंदूबाबाच्या अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणात वेळ न घालवता कठोर कारवाई करण्यात येईल,'' असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी सांगितले. या घटनेचा तपास आणि आरोपीवरील कारवाईचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप  राज्यात गेल्या काही दिवसांत महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यावरून सर्वत्र हळहळ व्यक्त होताच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सोमनाथ चव्हाण या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे. भोंदूबाबाकडून झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. त्यानंतर या घटनेचा तपशील मागून तपासकार्य आणि पोलिसांच्या भूमिकेचा देशमुख यांनी आढावा घेतला आणि त्याची माहिती "सकाळ'ला दिली.  पिंपरीतील या अत्याचाराचा मुद्दा उपस्थितीत करीत आमदार मंदा म्हात्रे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. या प्रकरणातील भोंदूबाबाला कठोर शिक्षा करण्याची मागणी म्हात्रे यांनी केली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे सांगितले. देशमुख म्हणाले, ""राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहोत. अशा काळात घडत असलेली घटना फारच गंभीर आहे. त्यातील दोषींना अटक केल्यानंतर आता योग्यप्रकारे पुढील तपास करण्याचा आदेश देण्यात आला आहे.''  ऑनलाइन औषध विक्रीवर केंद्राच्या धर्तीवर धोरण  ऑनलाइन औषधे विक्रीबाबत केंद्र सरकार धोरण ठरवीत आहे. त्याचे मार्गदर्शन घेऊन महाराष्ट्रात स्वतंत्र कायदा करण्यासाठी पावले उचलण्यात येतील. मात्र, बेकायदा औषधे विक्री करणाऱ्यांविरोधातील कारवाईचा वेग फारसा नसला तरी तो आता वाढविण्याचा आदेश देण्यात आला आहे, असे आरोग्य मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. गर्भपाताच्या गोळ्यांची सर्रास विक्री होत असल्याचा मुद्दा उपस्थितीत करण्यात आला होता. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 26, 2020

अत्याचारी भोंदूबाबावर कठोर कारवाई;  गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आदेश मुंबई -  ""पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या भोंदूबाबाच्या अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणात वेळ न घालवता कठोर कारवाई करण्यात येईल,'' असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी सांगितले. या घटनेचा तपास आणि आरोपीवरील कारवाईचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप  राज्यात गेल्या काही दिवसांत महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यावरून सर्वत्र हळहळ व्यक्त होताच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सोमनाथ चव्हाण या भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे. भोंदूबाबाकडून झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. त्यानंतर या घटनेचा तपशील मागून तपासकार्य आणि पोलिसांच्या भूमिकेचा देशमुख यांनी आढावा घेतला आणि त्याची माहिती "सकाळ'ला दिली.  पिंपरीतील या अत्याचाराचा मुद्दा उपस्थितीत करीत आमदार मंदा म्हात्रे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. या प्रकरणातील भोंदूबाबाला कठोर शिक्षा करण्याची मागणी म्हात्रे यांनी केली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे सांगितले. देशमुख म्हणाले, ""राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करीत आहोत. अशा काळात घडत असलेली घटना फारच गंभीर आहे. त्यातील दोषींना अटक केल्यानंतर आता योग्यप्रकारे पुढील तपास करण्याचा आदेश देण्यात आला आहे.''  ऑनलाइन औषध विक्रीवर केंद्राच्या धर्तीवर धोरण  ऑनलाइन औषधे विक्रीबाबत केंद्र सरकार धोरण ठरवीत आहे. त्याचे मार्गदर्शन घेऊन महाराष्ट्रात स्वतंत्र कायदा करण्यासाठी पावले उचलण्यात येतील. मात्र, बेकायदा औषधे विक्री करणाऱ्यांविरोधातील कारवाईचा वेग फारसा नसला तरी तो आता वाढविण्याचा आदेश देण्यात आला आहे, असे आरोग्य मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. गर्भपाताच्या गोळ्यांची सर्रास विक्री होत असल्याचा मुद्दा उपस्थितीत करण्यात आला होता. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2VmUhbX

No comments:

Post a Comment