व्यायामशाळेत भरते पालिकेची शाळा भोसरी - शहरातील महापालिकेच्या काही शाळांमधील विद्यार्थी संख्या घटत असताना भोसरीतील इंद्रायणीनगरमधील महापालिकेच्या शाळेत ती वाढत आहे. मात्र ही शाळा महापालिकेच्या व्यायामशाळेत भरते. येथे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशा वर्गखोल्या नसल्याने पत्राशेडमध्ये बसावे लागते. यातून मार्ग काढण्याचे साकडे विद्यार्थी व शिक्षकांनी महापालिकेला घातले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप छत्रपती शिवाजी महाराज शाळेतील धावडेवस्ती, खंडेवस्ती, गुळवेवस्ती इंद्रायणीनगर परिसरातील वाढती विद्यार्थी संख्या विचारात घेऊन येथील व्यायाम शाळेत भागशाळा २०१० मध्ये सुरू करण्यात आली. त्या वेळी तीन खोल्या होत्या. २०१२ मध्ये स्वतंत्र शाळा म्हणून मान्यता मिळाली. २०१४ मध्ये आणखी दोन खोल्या बांधल्या. विद्यार्थी संख्या वाढल्याने आणखी तीन खोल्यांचे पत्राशेड उभारले. मात्र, तरीही विद्यार्थ्यांना पुरेशी बसण्यासाठी जागा उपलब्ध नाही.  बालवाडीचे काही वर्ग व्यासपीठावर भरतात. अनेकदा मुख्याध्यापकांच्या कार्यालयातही वर्ग भरतात. पावसाळ्यात मात्र, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. पटसंख्येनुसार आणखी दहा खोल्यांची आवश्‍यकता असल्याची माहिती मुख्याध्यापिका शैला मातेरे यांनी दिली. याबाबत पालिकेच्या स्थापत्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की या ठिकाणी शाळेचे आरक्षण नसल्याने प्राधिकरणाकडून पक्‍क्‍या खोल्या बांधण्याची परवानगी मिळत नाही. त्याचप्रमाणे इतर भागात शाळेच्या आरक्षणासाठीचा भूखंड नाही. मात्र, या शाळेच्या सध्याच्या ठिकाणी आणखी काही पत्राशेड बांधून देऊ. याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. तर व्यायामशाळेसाठी चेंजिंग रूम, सिटिंग रूम व स्वच्छतागृह बांधण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांची बसण्याची सोय करण्यात आली, असे स्वीकृत सदस्य संजय वाबळे यांनी सांगितले. तर एमआयडीसीमुळे या भागामध्ये कामगारांची संख्या अधिक असल्याने प्रामुख्याने त्यांचीच मुले या शाळेत शिकण्यास येतात. कष्टकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच त्यांना भौतिक सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांची आहे. शाळेकडे वर्ग खोल्या नसल्याने शाळेत ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक खोली, खेळाचे मैदान आदी सुविधा नाहीत. त्यामुळे ही शाळा अ दर्जाची असतानाही सुविधेअभावी ब दर्जा मिळत आहे. वर्गखोल्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले आहे. - शैला मातेरे, मुख्याध्यापिका विद्यार्थी म्हणतात... आम्ही पत्र्याच्या शेडमध्ये शिकतो. आम्हाला खूप गरम होते. बसायला जागाही नाही आणि बाकही नाहीत. संगणकही पाहायला मिळत नाही. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 26, 2020

व्यायामशाळेत भरते पालिकेची शाळा भोसरी - शहरातील महापालिकेच्या काही शाळांमधील विद्यार्थी संख्या घटत असताना भोसरीतील इंद्रायणीनगरमधील महापालिकेच्या शाळेत ती वाढत आहे. मात्र ही शाळा महापालिकेच्या व्यायामशाळेत भरते. येथे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशा वर्गखोल्या नसल्याने पत्राशेडमध्ये बसावे लागते. यातून मार्ग काढण्याचे साकडे विद्यार्थी व शिक्षकांनी महापालिकेला घातले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप छत्रपती शिवाजी महाराज शाळेतील धावडेवस्ती, खंडेवस्ती, गुळवेवस्ती इंद्रायणीनगर परिसरातील वाढती विद्यार्थी संख्या विचारात घेऊन येथील व्यायाम शाळेत भागशाळा २०१० मध्ये सुरू करण्यात आली. त्या वेळी तीन खोल्या होत्या. २०१२ मध्ये स्वतंत्र शाळा म्हणून मान्यता मिळाली. २०१४ मध्ये आणखी दोन खोल्या बांधल्या. विद्यार्थी संख्या वाढल्याने आणखी तीन खोल्यांचे पत्राशेड उभारले. मात्र, तरीही विद्यार्थ्यांना पुरेशी बसण्यासाठी जागा उपलब्ध नाही.  बालवाडीचे काही वर्ग व्यासपीठावर भरतात. अनेकदा मुख्याध्यापकांच्या कार्यालयातही वर्ग भरतात. पावसाळ्यात मात्र, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. पटसंख्येनुसार आणखी दहा खोल्यांची आवश्‍यकता असल्याची माहिती मुख्याध्यापिका शैला मातेरे यांनी दिली. याबाबत पालिकेच्या स्थापत्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की या ठिकाणी शाळेचे आरक्षण नसल्याने प्राधिकरणाकडून पक्‍क्‍या खोल्या बांधण्याची परवानगी मिळत नाही. त्याचप्रमाणे इतर भागात शाळेच्या आरक्षणासाठीचा भूखंड नाही. मात्र, या शाळेच्या सध्याच्या ठिकाणी आणखी काही पत्राशेड बांधून देऊ. याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. तर व्यायामशाळेसाठी चेंजिंग रूम, सिटिंग रूम व स्वच्छतागृह बांधण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांची बसण्याची सोय करण्यात आली, असे स्वीकृत सदस्य संजय वाबळे यांनी सांगितले. तर एमआयडीसीमुळे या भागामध्ये कामगारांची संख्या अधिक असल्याने प्रामुख्याने त्यांचीच मुले या शाळेत शिकण्यास येतात. कष्टकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच त्यांना भौतिक सुविधा पुरविण्याची मागणी नागरिकांची आहे. शाळेकडे वर्ग खोल्या नसल्याने शाळेत ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक खोली, खेळाचे मैदान आदी सुविधा नाहीत. त्यामुळे ही शाळा अ दर्जाची असतानाही सुविधेअभावी ब दर्जा मिळत आहे. वर्गखोल्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले आहे. - शैला मातेरे, मुख्याध्यापिका विद्यार्थी म्हणतात... आम्ही पत्र्याच्या शेडमध्ये शिकतो. आम्हाला खूप गरम होते. बसायला जागाही नाही आणि बाकही नाहीत. संगणकही पाहायला मिळत नाही. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3cb8Kh5

No comments:

Post a Comment