माजी केंद्रीय गृहमंत्र्यांचे मोदी-ट्रम्प भेटीबाबत "हे' मोठे वक्तव्य  सोलापूर :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक पातळीवरील मैत्री ठिक आहे. पण त्या मैत्रीचा देशाला किती उपयोग होतो? दोन राष्ट्रप्रमुखांची मैत्री असली तरी, अमेरिकन जनता कितपत भारतासोबत आहे, असा प्रश्‍न माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थित केला.  हेही वाचा - सोलापूर लोकसभा पोटनिवडणुकीबाबत शिंदे म्हणाले... औज (ता. दक्षिण सोलापूर) येथे बुधवारी आयोजिलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कॉंग्रेसच्या दक्षिण तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हरीश पाटील यांचा सत्कार, औजमधील ग्रामशाखेचे उद्‌घाटन तसेच दक्षिणच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, सुरेश हसापुरे, जिल्हा परिषद सदस्य ऍड. संजय गायकवाड, जाफरताज पाटील, अशपाक बळोरगी, गौरव खरात, मल्लिकार्जुन पाटील, बाबा मिस्त्री, श्रीशैल नरोळे, चेतन नरोटे, बसवराज बगले, बाळासाहेब शेळके, चंद्रकांत सुर्वे, नुरुद्दीन मुल्ला, अप्पा धनके, भीमाशंकर जमादार, सरपंच भारत रुपनुरे, नूतन महिलाध्यक्ष चंद्रकला पाटील, नूतन सरचिटणीस इमाम शेख, विनोद पाटील, मोतीराम राठोड उपस्थित होते.  दक्षिण सोलापूर तालुक्यातील अौज येेथे आयोजिलेल्या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे यांनी मोदी-ट्रम्प भेटीबाबत वक्तव्य केले.  ""संपूर्ण भारतात मागील दोन दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची चर्चा आहे. एकीकडे देशात अर्थव्यवस्था बिघडलेली असताना मोदी हे मात्र ट्रम्प यांच्या मैत्रीचे गोडवे गात आहेत. '' असा प्रश्‍न माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थित केला.  आता मला लढायचे नाही....  आता मला लढायचे नाही, नव्यांना संधी देऊयात. जुन्यांनीही नव्यांना प्रोत्साहन देऊन पक्षाची ताकद वाढवूयात,'' असे सांगत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भविष्यात निवडणूक न लढविण्याचे संकेत दिले. दरम्यान, मोदी आणि ट्रम्प यांची मैत्री ठीक आहे परंतु अमेरिकेची जनता कितपत भारतासोबत आहे, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.  श्री. शिंदे म्हणाले,""तालुकाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच होती, तालुक्‍यात पक्षाला वाईट दिवस का आले याचे चिंतन कधी केलायं का, कधीतरी गटातटातील तंटे विसरा, एकत्र येऊन पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्या. गटातटातील तंटे विसरून पराभवाचे चिंतन करून कॉंग्रेसला दक्षिणमध्ये पुन्हा वैभव मिळवून द्या. कायम राजकारणातच राहायचे असे कोणी कपाळावर लिहून आणलेले नसते. त्यामुळे आता नव्यांना संधी देऊ या. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांनीही हा बदल स्वीकारून नव्यांना प्रोत्साहित करावे.'' या वेळी नूतन अध्यक्ष श्री. पाटील यांच्या कामाचे श्री. शिंदे यांनी कौतुक केले. ऍड. संजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.    News Story Feeds https://ift.tt/2T1oPhG - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 26, 2020

माजी केंद्रीय गृहमंत्र्यांचे मोदी-ट्रम्प भेटीबाबत "हे' मोठे वक्तव्य  सोलापूर :  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक पातळीवरील मैत्री ठिक आहे. पण त्या मैत्रीचा देशाला किती उपयोग होतो? दोन राष्ट्रप्रमुखांची मैत्री असली तरी, अमेरिकन जनता कितपत भारतासोबत आहे, असा प्रश्‍न माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थित केला.  हेही वाचा - सोलापूर लोकसभा पोटनिवडणुकीबाबत शिंदे म्हणाले... औज (ता. दक्षिण सोलापूर) येथे बुधवारी आयोजिलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कॉंग्रेसच्या दक्षिण तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हरीश पाटील यांचा सत्कार, औजमधील ग्रामशाखेचे उद्‌घाटन तसेच दक्षिणच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, सुरेश हसापुरे, जिल्हा परिषद सदस्य ऍड. संजय गायकवाड, जाफरताज पाटील, अशपाक बळोरगी, गौरव खरात, मल्लिकार्जुन पाटील, बाबा मिस्त्री, श्रीशैल नरोळे, चेतन नरोटे, बसवराज बगले, बाळासाहेब शेळके, चंद्रकांत सुर्वे, नुरुद्दीन मुल्ला, अप्पा धनके, भीमाशंकर जमादार, सरपंच भारत रुपनुरे, नूतन महिलाध्यक्ष चंद्रकला पाटील, नूतन सरचिटणीस इमाम शेख, विनोद पाटील, मोतीराम राठोड उपस्थित होते.  दक्षिण सोलापूर तालुक्यातील अौज येेथे आयोजिलेल्या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे यांनी मोदी-ट्रम्प भेटीबाबत वक्तव्य केले.  ""संपूर्ण भारतात मागील दोन दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची चर्चा आहे. एकीकडे देशात अर्थव्यवस्था बिघडलेली असताना मोदी हे मात्र ट्रम्प यांच्या मैत्रीचे गोडवे गात आहेत. '' असा प्रश्‍न माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थित केला.  आता मला लढायचे नाही....  आता मला लढायचे नाही, नव्यांना संधी देऊयात. जुन्यांनीही नव्यांना प्रोत्साहन देऊन पक्षाची ताकद वाढवूयात,'' असे सांगत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भविष्यात निवडणूक न लढविण्याचे संकेत दिले. दरम्यान, मोदी आणि ट्रम्प यांची मैत्री ठीक आहे परंतु अमेरिकेची जनता कितपत भारतासोबत आहे, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.  श्री. शिंदे म्हणाले,""तालुकाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच होती, तालुक्‍यात पक्षाला वाईट दिवस का आले याचे चिंतन कधी केलायं का, कधीतरी गटातटातील तंटे विसरा, एकत्र येऊन पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्या. गटातटातील तंटे विसरून पराभवाचे चिंतन करून कॉंग्रेसला दक्षिणमध्ये पुन्हा वैभव मिळवून द्या. कायम राजकारणातच राहायचे असे कोणी कपाळावर लिहून आणलेले नसते. त्यामुळे आता नव्यांना संधी देऊ या. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांनीही हा बदल स्वीकारून नव्यांना प्रोत्साहित करावे.'' या वेळी नूतन अध्यक्ष श्री. पाटील यांच्या कामाचे श्री. शिंदे यांनी कौतुक केले. ऍड. संजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.    News Story Feeds https://ift.tt/2T1oPhG


via News Story Feeds https://ift.tt/2vb2IfX

No comments:

Post a Comment