मटण खाताय मग ही बातमी वाचाच ; तपासणी न करताच विक्री  कोल्हापूर - महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून बकऱ्यांची तपासणी करून शिक्के न मारताच राजरोसपणे मटणाची विक्री केली जात असून नागरिकांच्या दृष्टीने हे धोकादायक आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी मटण दरवाढ कृती समितीने आज पुन्हा केली. दरम्यान, महापालिका आणि अन्न आणि औषध प्रशासनने संयुक्तपणे कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.  हे पण वाचा - इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाला गेल्या अन्‌... कृती समितीने निवेदनात म्हंटले आहे, गेले दोन ते अडीच महिन्यांपासून शहरात पालिकेने प्रमाणित न केलेले मटण विकले जात आहे. नागरिकांच्यादृष्टीने हे घातक आहे. कापले जाणारे बकरे हे खाण्यास योग्य आहे की, अयोग्य हे पाहूनच आरोग्य विभाग शिक्का मारून बकरे प्रमाणित करतो; पण असे प्रमाण खूपच कमी असून विक्रेत्यांकडून राजरोसपणे उघड्यावर बकरी कापून मटण विकले जात आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडे कर्मचारी कमी असल्याने त्यांना कारवाईवर मर्यादा आहेत, असा मुद्दा उपस्थित होताच, पालिका त्यांना पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी दिली. अशी दुकाने जर प्रदूषण करत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही सांगितले. तशा सूचना आरोग्य निरीक्षकांना त्यांनी दिल्या आहेत.  हे पण वाचा - `महाविकास आघाडीचे तीन चाकी सरकार लवकरच पडणार` कृती समितीचे ऍड. बाबा इंदूलकर यांनी याप्रकरणी पालिकेने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आहे. वेळप्रसंगी त्यांच्यावर फौजदारी करण्याची तरतूदही कायद्यात आहे. त्याप्रमाणे अन्न औषध प्रशासन, महापालिका कारवाई का करत नाही, अशी विचारणाही त्यांनी केली. यावेळी दुर्गेश लिंग्रज, अनिल कदम, रवी चौगुले, बाबा पार्टे, उदय पोवार, किशोर घाटगे, जयकुमार शिंदे, प्रसाद जाधव आदीसह कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.  एका दुकानावर कारवाई  शहरातील मटण मार्केटमध्ये बिनशिक्‍क्‍याचे बकरे कापून बेकायदेशीरपणे मटण विक्री करणाऱ्या विलास भोपळे यांच्यावर 2500 रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी दिल्या.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 26, 2020

मटण खाताय मग ही बातमी वाचाच ; तपासणी न करताच विक्री  कोल्हापूर - महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून बकऱ्यांची तपासणी करून शिक्के न मारताच राजरोसपणे मटणाची विक्री केली जात असून नागरिकांच्या दृष्टीने हे धोकादायक आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी मटण दरवाढ कृती समितीने आज पुन्हा केली. दरम्यान, महापालिका आणि अन्न आणि औषध प्रशासनने संयुक्तपणे कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले.  हे पण वाचा - इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाला गेल्या अन्‌... कृती समितीने निवेदनात म्हंटले आहे, गेले दोन ते अडीच महिन्यांपासून शहरात पालिकेने प्रमाणित न केलेले मटण विकले जात आहे. नागरिकांच्यादृष्टीने हे घातक आहे. कापले जाणारे बकरे हे खाण्यास योग्य आहे की, अयोग्य हे पाहूनच आरोग्य विभाग शिक्का मारून बकरे प्रमाणित करतो; पण असे प्रमाण खूपच कमी असून विक्रेत्यांकडून राजरोसपणे उघड्यावर बकरी कापून मटण विकले जात आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडे कर्मचारी कमी असल्याने त्यांना कारवाईवर मर्यादा आहेत, असा मुद्दा उपस्थित होताच, पालिका त्यांना पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी दिली. अशी दुकाने जर प्रदूषण करत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही सांगितले. तशा सूचना आरोग्य निरीक्षकांना त्यांनी दिल्या आहेत.  हे पण वाचा - `महाविकास आघाडीचे तीन चाकी सरकार लवकरच पडणार` कृती समितीचे ऍड. बाबा इंदूलकर यांनी याप्रकरणी पालिकेने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आहे. वेळप्रसंगी त्यांच्यावर फौजदारी करण्याची तरतूदही कायद्यात आहे. त्याप्रमाणे अन्न औषध प्रशासन, महापालिका कारवाई का करत नाही, अशी विचारणाही त्यांनी केली. यावेळी दुर्गेश लिंग्रज, अनिल कदम, रवी चौगुले, बाबा पार्टे, उदय पोवार, किशोर घाटगे, जयकुमार शिंदे, प्रसाद जाधव आदीसह कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.  एका दुकानावर कारवाई  शहरातील मटण मार्केटमध्ये बिनशिक्‍क्‍याचे बकरे कापून बेकायदेशीरपणे मटण विक्री करणाऱ्या विलास भोपळे यांच्यावर 2500 रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी दिल्या.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2PIxVhB

No comments:

Post a Comment