बनावट कागदपत्राद्वारे घेतली कार, अन् बॅंकेला 15 लाखांचा चूना लावून झाला भुर्रर्रर्र औरंगाबाद : बनावट कागदपत्राआधारे वाहन कर्जावर घेतलेली कार परस्पर नगर जिल्ह्यात विक्री करुन पिपल्स को - ऑपरेटिव्ह बँकेला १५ लाख ४० हजाराचा गंडा घातल्याप्रकरणी संशयिताला बुधवारी (ता.२६) पहाटे पोलिसांनी अटक केली. महेश शिरसाट (रा. इंदिरा अपार्ट, प्लॉट नं. ५, समर्थनगर) असे त्या संशयिताचे नाव आहे. पिपल्स बॅंकेचे शाखा अधिकारी महावीर लोढा (४८) यांच्या तक्रारीनुसार, नवीन कार घेण्यासाठी मंगेश शिरसाट यांनी बँकेकडे वाहन कर्जाची मागणी केली होती. त्यासाठी इतरही जामिनदारांची कागदपत्रे त्यांनी बँकेला दिली होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये वाहन खरेदीसाठी १५ लाख ४० हजार रुपये कर्ज त्यांना मंजूर करण्यात आले. कार खरेदी केल्यानंतर त्यांनी बँकेचा कधीच हप्ता भरला नाही. तसेच शिरसाट यांनी दिलेले धनादेशही बँकेत वटले नाहीत. शिरसाट यांचा शोध लागत नसल्यामुळे बँकेने एका एजन्सीला वाहन शोधण्याचे काम दिले. हेही वाचा-  दोन घोड्यांना देणार दया मरण...कुणी घेतला हा निर्णय नगर जिल्ह्यात सापडली कार शिरसाट यांनी खरेदी केलेली कार नगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये असल्याचे तसेच ही कार राजेंद्र दौंड यांनी विकत घेतल्याचे समोर आले. राजकीय संबंध असल्याने बँकेने तेथे कार जप्त केली नाही. चौकशीत मंगेशने कर्ज प्रक्रियेत खाते उतारा बनावट दिल्याचेही समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लोढा यांच्या तक्रारीवरुन मंगेश पंढरीनाथ शिरसाट, महेश पंढरीनाथ शिरसाट (दोघेही रा. समर्थनगर), सतीश ज्ञानसिंग पवार (रा. मुकुंदवाडी), विजय राऊत (रा. शेवगाव) व राजेंद्र शिवनाथ दौंड यांच्याविरुध्द वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. क्लिक करा- अंगाला लागणार होती हळद, असं काय झालं की शनिवारपर्यंत पोलिस कोठडी संशयित महेश शिरसाटला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीच्या चारही साथीदारांचा शोध घेऊन अटक करणे बाकी आहे. आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकीलांनी न्यायालयाकडे केली. सुनावणीदरम्यान आरोपी शिरसाट याला शनिवारपर्यंत (ता.२९) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी मंगला. ए. मोटे यांनी दिले. हे वाचलंत का?- सातारा-देवळाईतील बेकायदा बांधकामे पाहून भडकले आयुक्त   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, February 26, 2020

बनावट कागदपत्राद्वारे घेतली कार, अन् बॅंकेला 15 लाखांचा चूना लावून झाला भुर्रर्रर्र औरंगाबाद : बनावट कागदपत्राआधारे वाहन कर्जावर घेतलेली कार परस्पर नगर जिल्ह्यात विक्री करुन पिपल्स को - ऑपरेटिव्ह बँकेला १५ लाख ४० हजाराचा गंडा घातल्याप्रकरणी संशयिताला बुधवारी (ता.२६) पहाटे पोलिसांनी अटक केली. महेश शिरसाट (रा. इंदिरा अपार्ट, प्लॉट नं. ५, समर्थनगर) असे त्या संशयिताचे नाव आहे. पिपल्स बॅंकेचे शाखा अधिकारी महावीर लोढा (४८) यांच्या तक्रारीनुसार, नवीन कार घेण्यासाठी मंगेश शिरसाट यांनी बँकेकडे वाहन कर्जाची मागणी केली होती. त्यासाठी इतरही जामिनदारांची कागदपत्रे त्यांनी बँकेला दिली होती. नोव्हेंबर २०१८ मध्ये वाहन खरेदीसाठी १५ लाख ४० हजार रुपये कर्ज त्यांना मंजूर करण्यात आले. कार खरेदी केल्यानंतर त्यांनी बँकेचा कधीच हप्ता भरला नाही. तसेच शिरसाट यांनी दिलेले धनादेशही बँकेत वटले नाहीत. शिरसाट यांचा शोध लागत नसल्यामुळे बँकेने एका एजन्सीला वाहन शोधण्याचे काम दिले. हेही वाचा-  दोन घोड्यांना देणार दया मरण...कुणी घेतला हा निर्णय नगर जिल्ह्यात सापडली कार शिरसाट यांनी खरेदी केलेली कार नगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये असल्याचे तसेच ही कार राजेंद्र दौंड यांनी विकत घेतल्याचे समोर आले. राजकीय संबंध असल्याने बँकेने तेथे कार जप्त केली नाही. चौकशीत मंगेशने कर्ज प्रक्रियेत खाते उतारा बनावट दिल्याचेही समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लोढा यांच्या तक्रारीवरुन मंगेश पंढरीनाथ शिरसाट, महेश पंढरीनाथ शिरसाट (दोघेही रा. समर्थनगर), सतीश ज्ञानसिंग पवार (रा. मुकुंदवाडी), विजय राऊत (रा. शेवगाव) व राजेंद्र शिवनाथ दौंड यांच्याविरुध्द वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. क्लिक करा- अंगाला लागणार होती हळद, असं काय झालं की शनिवारपर्यंत पोलिस कोठडी संशयित महेश शिरसाटला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीच्या चारही साथीदारांचा शोध घेऊन अटक करणे बाकी आहे. आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकीलांनी न्यायालयाकडे केली. सुनावणीदरम्यान आरोपी शिरसाट याला शनिवारपर्यंत (ता.२९) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी मंगला. ए. मोटे यांनी दिले. हे वाचलंत का?- सातारा-देवळाईतील बेकायदा बांधकामे पाहून भडकले आयुक्त   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/383iw1F

No comments:

Post a Comment