Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, December 1, 2020

जनावरांच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांनी लावल्या संरक्षक जाळ्या

अमरापूर (अहमदनगर) : बिबटयाच्या वावरामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जाण्यास धजावत नसल्याने अनेक भागात शेतीची कामे ठप्प झाली आहेत. रात्री अपरात्री वस्तीवर राहणाऱ्या नागरीकांनी संरक्षणासाठी संरक्षक जाळ्या, तारकंपाऊंड करण्यास सुरुवात केली आहे. 

शेजारील पाथर्डी तालुक्यात तीन बालकांचा बळी घेत बिबटयाने रहिवाशी भागात धुमाकुळ घातला आहे. या भागाला लागूनच असलेल्या तालुक्यातील वाघोली, वडुले, दिंडेवाडी, आव्हाणे, ढोरजळगाव, अमरापूर, मळेगाव, सामनगाव या परिसरात बिबटयाचा वावर असल्याचा अनेक खुना शेतक-यांच्या निदर्शनास आल्या आहेत.

अनेक शेतक-यांनी बिबटयाचे समक्ष दर्शन झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी शेतात कामासाठी जातांना गटागटाने भितीच्या सावटाखाली जात आहेत. ऊस, तुर, ज्वारी, कपाशी, फळबागा ही पिके उंच वाढलेली असल्याने बिबटयास लपण्यासाठी नैसर्गिक आश्रय निर्माण झाला आहे. त्यातच रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी, कापूस वेचण्यासाठी शेतक-यांना शेतात जावे लागते. अशा स्थितीत महिला, लहान मुले प्रचंड दहशतीखाली आहेत.

पश्चिम भागात शेतात जाण्यासाठी शेतकरी धजावत नसल्याने शेतीचे कामे मोठया प्रमाणात खोळंबली आहेत. तर वाडी वस्तीवर राहणा-या कुटूंबांनी पाळीव प्राणी, जनावरे यांच्यासह स्वसंरक्षणासाठी वस्तीभोवती जाळ्या, तारकंपाऊंड बसवण्यास सुरुवात केली आहे. तर रात्री अपरात्री जागे राहात फटाके फोडून बिबटयांस हुसकावून लावण्यासाठी वातावरण निर्मीती केली जात आहे. वन विभागाने दक्षता घेवून बिबटया आढळून आलेल्या भागात पिंजरे लावावेत अशी मागणी अनेक गावातील ग्रामस्थांमधून पुढे येत आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जनावरांच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांनी लावल्या संरक्षक जाळ्या अमरापूर (अहमदनगर) : बिबटयाच्या वावरामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जाण्यास धजावत नसल्याने अनेक भागात शेतीची कामे ठप्प झाली आहेत. रात्री अपरात्री वस्तीवर राहणाऱ्या नागरीकांनी संरक्षणासाठी संरक्षक जाळ्या, तारकंपाऊंड करण्यास सुरुवात केली आहे.  शेजारील पाथर्डी तालुक्यात तीन बालकांचा बळी घेत बिबटयाने रहिवाशी भागात धुमाकुळ घातला आहे. या भागाला लागूनच असलेल्या तालुक्यातील वाघोली, वडुले, दिंडेवाडी, आव्हाणे, ढोरजळगाव, अमरापूर, मळेगाव, सामनगाव या परिसरात बिबटयाचा वावर असल्याचा अनेक खुना शेतक-यांच्या निदर्शनास आल्या आहेत. अनेक शेतक-यांनी बिबटयाचे समक्ष दर्शन झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी शेतात कामासाठी जातांना गटागटाने भितीच्या सावटाखाली जात आहेत. ऊस, तुर, ज्वारी, कपाशी, फळबागा ही पिके उंच वाढलेली असल्याने बिबटयास लपण्यासाठी नैसर्गिक आश्रय निर्माण झाला आहे. त्यातच रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी, कापूस वेचण्यासाठी शेतक-यांना शेतात जावे लागते. अशा स्थितीत महिला, लहान मुले प्रचंड दहशतीखाली आहेत. पश्चिम भागात शेतात जाण्यासाठी शेतकरी धजावत नसल्याने शेतीचे कामे मोठया प्रमाणात खोळंबली आहेत. तर वाडी वस्तीवर राहणा-या कुटूंबांनी पाळीव प्राणी, जनावरे यांच्यासह स्वसंरक्षणासाठी वस्तीभोवती जाळ्या, तारकंपाऊंड बसवण्यास सुरुवात केली आहे. तर रात्री अपरात्री जागे राहात फटाके फोडून बिबटयांस हुसकावून लावण्यासाठी वातावरण निर्मीती केली जात आहे. वन विभागाने दक्षता घेवून बिबटया आढळून आलेल्या भागात पिंजरे लावावेत अशी मागणी अनेक गावातील ग्रामस्थांमधून पुढे येत आहे.  संपादन : अशोक मुरुमकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33C6Bs3
Read More
कोरोनावर प्रभावी ठरतेय 'थायमोसीन अल्फा १', डॉक्टरांचा दावा

नागपूर : तीव्र श्वसन रोग असलेल्या कोविडचा प्रादुर्भाव जगात सुरू आहे. कोविड-१९ ची साथ रोखण्यासाठी विशिष्ट उपचार उपलब्ध नाही. कोविड रुग्णांचे जीव वाचविताना केवळ रोगप्रतिकाशक्ती वाढवणे हाच एक पर्याय आहे. कोविडच्या उद्रेकजन्य स्थितीत रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नवीन उपचार पद्धती म्हणून 'थायमोसीन अल्फा १' प्रभावी ठरत आहे. इम्युनोसिन अल्फा १ औषधातून पेशींच्या पूननिर्मितीद्वारे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढून रुग्णांचा रुग्णालयातील कालावधी कमी होत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. 

हेही वाचा - कारखान्याची इमारत पाहायला गेलेल्या तरुणाला सुरक्षारक्षकाची मारहाण, तरुणाचा मृत्यू

नागपुरातील कोविड-१९ टास्क फोर्समधील डॉ. निर्मल जयस्वाल तसेच अलेक्सिस हॉस्पिटलमधील अंतर्गत औषध तसेच संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी कोविड-१९ बाधित रुग्णांमधील लक्षणांच्या तीव्रतेनुसार रुग्णांच्या गंभीरतेवर ही उपचार पद्धती वापण्यात येत असल्याचे मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. डॉ. शिंदे म्हणाले, इम्युनोसिन अल्फा १ एक अद्भुत रेणू उपचार पद्धत आहे. साथ आजारावर उपचार पद्धत प्रभावी ठरत आहे. विशेष असे की, कोविडसह मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीच्या आजाराने ग्रासलेले आहेत तसेच वृद्ध रुग्णांवर या उपचारपद्धतीतून त्यांचीही रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होत आहे. डॉ. जयस्वाल म्हणाले, कोविड-१९ विषाणू व्यक्तीच्या रोगप्रतिकारक प्रणालीवर आक्रमण करतो. यामुळे ताप, खोकला, श्वास लागणे, थकवा येणे, शरीर दुखणे, डोकेदुखी, घसा खवखवणे, ही लक्षणे आढळतात. अशा रुग्णांवर थायमोसीन अल्फा १ उपचारपद्धती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी. 

हेही वाचा - सोयाबीनचे दर वधारले; उच्च दर्जाच्या सोयाबीनला...

२०० जणांना दिला डोस - 
ही पद्धती प्रायोगिक स्तरावर आहे. मात्र, २०० जणांवर याचा वापर केला आहे. या सर्व रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवत लिम्फोपेनिया पुर्नरचना करून ताप आणि रोगदाहकता कमी करते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसून आली. कोविड–१९ नंतरच्या गुंतागुंतीवरही प्रभावी असल्याचा दावा डॉक्टरांनी केला.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनावर प्रभावी ठरतेय 'थायमोसीन अल्फा १', डॉक्टरांचा दावा नागपूर : तीव्र श्वसन रोग असलेल्या कोविडचा प्रादुर्भाव जगात सुरू आहे. कोविड-१९ ची साथ रोखण्यासाठी विशिष्ट उपचार उपलब्ध नाही. कोविड रुग्णांचे जीव वाचविताना केवळ रोगप्रतिकाशक्ती वाढवणे हाच एक पर्याय आहे. कोविडच्या उद्रेकजन्य स्थितीत रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नवीन उपचार पद्धती म्हणून 'थायमोसीन अल्फा १' प्रभावी ठरत आहे. इम्युनोसिन अल्फा १ औषधातून पेशींच्या पूननिर्मितीद्वारे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढून रुग्णांचा रुग्णालयातील कालावधी कमी होत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.  हेही वाचा - कारखान्याची इमारत पाहायला गेलेल्या तरुणाला सुरक्षारक्षकाची मारहाण, तरुणाचा मृत्यू नागपुरातील कोविड-१९ टास्क फोर्समधील डॉ. निर्मल जयस्वाल तसेच अलेक्सिस हॉस्पिटलमधील अंतर्गत औषध तसेच संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी कोविड-१९ बाधित रुग्णांमधील लक्षणांच्या तीव्रतेनुसार रुग्णांच्या गंभीरतेवर ही उपचार पद्धती वापण्यात येत असल्याचे मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. डॉ. शिंदे म्हणाले, इम्युनोसिन अल्फा १ एक अद्भुत रेणू उपचार पद्धत आहे. साथ आजारावर उपचार पद्धत प्रभावी ठरत आहे. विशेष असे की, कोविडसह मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीच्या आजाराने ग्रासलेले आहेत तसेच वृद्ध रुग्णांवर या उपचारपद्धतीतून त्यांचीही रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होत आहे. डॉ. जयस्वाल म्हणाले, कोविड-१९ विषाणू व्यक्तीच्या रोगप्रतिकारक प्रणालीवर आक्रमण करतो. यामुळे ताप, खोकला, श्वास लागणे, थकवा येणे, शरीर दुखणे, डोकेदुखी, घसा खवखवणे, ही लक्षणे आढळतात. अशा रुग्णांवर थायमोसीन अल्फा १ उपचारपद्धती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी.  हेही वाचा - सोयाबीनचे दर वधारले; उच्च दर्जाच्या सोयाबीनला... २०० जणांना दिला डोस -  ही पद्धती प्रायोगिक स्तरावर आहे. मात्र, २०० जणांवर याचा वापर केला आहे. या सर्व रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवत लिम्फोपेनिया पुर्नरचना करून ताप आणि रोगदाहकता कमी करते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसून आली. कोविड–१९ नंतरच्या गुंतागुंतीवरही प्रभावी असल्याचा दावा डॉक्टरांनी केला. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3g9gkLL
Read More
शेतात ट्रॅक्टरने मशागत सुरु होती, शेजारच्या उसातून येऊ लागला उग्रवास

शिर्डी (अहमदनगर) : वाकडी ममदापूर शिवारात अनोळखी व्यक्तीचा कूजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.हा प्रकार हत्या, आत्महत्या की बिबटयाचा हल्ला याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या आधी साधारण तीन वर्ष पूर्वी याच परिसरात एका फळबागेत असाच एक कूजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता.

नांदूर रस्त्यावरील ममदापूर वाकडी शिवारात रस्त्यालगत एक शेतकरी शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करत असताना शेजारी असलेल्या उसाच्या शेतातून उग्रवास येत असल्याने या शेतात एखादा प्राणी कूजलेला आहे की ही खात्री करण्यासाठी आणखी काही शेतकरी जमा करून घटनास्थळी गेले असता त्याठिकाणी एका पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह कूजलेल्या अवस्थेत आढळून आला. 35 ते 40 दरम्यान वयवर्ष असलेल्या या व्यक्तीच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट व खाकी कलरची पॅन्ट आहे. मृतदेह अत्यंत कूजलेला असल्यामुळे या व्यक्तीची ओळख पटविणे मुशकील आहे. या घटनेची माहिती वाकडी गावचे पोलिस पाटील मछिंद्र अभंग, सरपंच डॉ. संपतराव शेळके यांना दिली.

त्यांनी पोलिसांसोबत संपर्क साधला. त्यानंतर श्रीरामपूर ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मसुद खान पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले डॉक्टरांचे पथक बोलावून जागेवर शवविछेदन करण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांनीही भेट दिली. याश्रीरामपूर ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मसूद खान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवलदार अढांगळे करीत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

शेतात ट्रॅक्टरने मशागत सुरु होती, शेजारच्या उसातून येऊ लागला उग्रवास शिर्डी (अहमदनगर) : वाकडी ममदापूर शिवारात अनोळखी व्यक्तीचा कूजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.हा प्रकार हत्या, आत्महत्या की बिबटयाचा हल्ला याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या आधी साधारण तीन वर्ष पूर्वी याच परिसरात एका फळबागेत असाच एक कूजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. नांदूर रस्त्यावरील ममदापूर वाकडी शिवारात रस्त्यालगत एक शेतकरी शेतात ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत करत असताना शेजारी असलेल्या उसाच्या शेतातून उग्रवास येत असल्याने या शेतात एखादा प्राणी कूजलेला आहे की ही खात्री करण्यासाठी आणखी काही शेतकरी जमा करून घटनास्थळी गेले असता त्याठिकाणी एका पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह कूजलेल्या अवस्थेत आढळून आला. 35 ते 40 दरम्यान वयवर्ष असलेल्या या व्यक्तीच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट व खाकी कलरची पॅन्ट आहे. मृतदेह अत्यंत कूजलेला असल्यामुळे या व्यक्तीची ओळख पटविणे मुशकील आहे. या घटनेची माहिती वाकडी गावचे पोलिस पाटील मछिंद्र अभंग, सरपंच डॉ. संपतराव शेळके यांना दिली. त्यांनी पोलिसांसोबत संपर्क साधला. त्यानंतर श्रीरामपूर ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मसुद खान पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले डॉक्टरांचे पथक बोलावून जागेवर शवविछेदन करण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांनीही भेट दिली. याश्रीरामपूर ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मसूद खान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवलदार अढांगळे करीत आहे. संपादन : अशोक मुरुमकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37s6oJe
Read More
झूम... : ‘फॅमिली मॅन’साठी एमयूव्ही

आजच्या तरुणाईला एसयूव्ही अर्थात स्पोर्ट्‌स युटिलिटी व्हेईकलचे मोठे आकर्षण आहे. मात्र, एखाद्या मोठ्या फॅमिलीला एकत्र मोठा व आरामदायी प्रवास करण्यासाठी गरज पडते ती एमयूव्ही म्हणजेच मल्टी युटिलिटी व्हेईकलची. लुक, भरपूर स्पेस, इंजिन आदी सर्वच बाबतीत एमयूव्ही एसयूव्हीसारखीच असते. फरक असतो तो ‘ऑफ रोड’ ड्रायव्हिंगचा. एमयूव्ही ऑफ रोडसाठी बनविलेल्या नसतात. मात्र, फॅमिली मॅन असलेल्यांसाठी ती खूपच सोयीची ठरते. जाणून घेऊयात भारतातील काही एमयूव्हींबद्दल...

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा

इंजिन : २६९९ सीसी

बीएचपी : १६४

सीट्स : ७

किंमत : १६.२६ ते २४.३३ लाख रुपये

मारुती एक्सएल ६

इंजिन : १४६२२६९४ सीसी

बीएचपी : १०३.२

सीट्स : ६

किंमत : ९.८४ ते ११.५१ लाख रुपये

किया कार्निव्हल

इंजिन - २१९९ सीसी

बीएचपी - १६४

सीट्स - ९

किंमत - २४.९५ ते ३३.९५ लाख रुपये

रेनॉल्ट  ट्रिबर

इंजिन - ९९९ सीसी

बीएचपी - ७२

सीट्स - ६

किंमत - ५.१२ ते ७.२६ लाख रुपये

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

झूम... : ‘फॅमिली मॅन’साठी एमयूव्ही आजच्या तरुणाईला एसयूव्ही अर्थात स्पोर्ट्‌स युटिलिटी व्हेईकलचे मोठे आकर्षण आहे. मात्र, एखाद्या मोठ्या फॅमिलीला एकत्र मोठा व आरामदायी प्रवास करण्यासाठी गरज पडते ती एमयूव्ही म्हणजेच मल्टी युटिलिटी व्हेईकलची. लुक, भरपूर स्पेस, इंजिन आदी सर्वच बाबतीत एमयूव्ही एसयूव्हीसारखीच असते. फरक असतो तो ‘ऑफ रोड’ ड्रायव्हिंगचा. एमयूव्ही ऑफ रोडसाठी बनविलेल्या नसतात. मात्र, फॅमिली मॅन असलेल्यांसाठी ती खूपच सोयीची ठरते. जाणून घेऊयात भारतातील काही एमयूव्हींबद्दल... - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा टोयोटा इनोव्हा क्रिस्टा इंजिन : २६९९ सीसी बीएचपी : १६४ सीट्स : ७ किंमत : १६.२६ ते २४.३३ लाख रुपये मारुती एक्सएल ६ इंजिन : १४६२२६९४ सीसी बीएचपी : १०३.२ सीट्स : ६ किंमत : ९.८४ ते ११.५१ लाख रुपये किया कार्निव्हल इंजिन - २१९९ सीसी बीएचपी - १६४ सीट्स - ९ किंमत - २४.९५ ते ३३.९५ लाख रुपये रेनॉल्ट  ट्रिबर इंजिन - ९९९ सीसी बीएचपी - ७२ सीट्स - ६ किंमत - ५.१२ ते ७.२६ लाख रुपये Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2HX6QGu
Read More
वीज मंडळाच्या कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाची धडक! रखडलेली नोकरभरती पूर्ण करण्याची मागणी

मुंबई ः राज्य वीज मंडळात उपकेंद्र सहायक पदावर जानेवारीतच आरक्षित गटातून नियुक्त झालेल्या मराठा उमेदवारांवर केवळ कोरोनाकाळात झालेल्या विलंबामुळे आता नोकऱ्या न मिळण्याचे संकट आले आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घ्यावा, अशी मागणी आज मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चातर्फे आज वीज मंडळाच्या ठाणे, रायगड आणि वांद्रे येथील प्रकाशगड या मुख्यालयावर निदर्शने करण्यात आली. 

हेही वाचा - ऑनलाईन वर्ग, गॅझेट्‌सच्या अतिवापरामुळे किशोरवयीन मुलांच्या स्नायूंवर ताण; तज्ज्ञांची माहिती

आरक्षित गटातील या मराठा उमेदवारांची जानेवारीत निवड झाली व मार्चमध्ये नियुक्तीचा आदेश घेऊन ते एप्रिलपासून कामावर रुजू होणार होते; मात्र मार्चअखेरपासून लॉकडाऊन सुरू झाले व 9 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे उमेदवारांच्या नोकरीची प्रक्रियाही रखडली. लॉकडाऊनचा विलंब झाला नसता तर उमेदवारांना नोकरी मिळाली असती, हेही ध्यानात घ्यावे, अशी मागणी केली जात आहे. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आज होणार होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे आता आरक्षित गटातील मराठा उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चातर्फे आज वीज मंडळाच्या ठाणे व रायगड केंद्रांवर तसेच वांद्रे येथील प्रकाशगड या मुख्यालयावर निदर्शने करण्यात आली. समन्वयक विरेन पवार आदींनी यापुढे या मराठा उमेदवारांसमोर येणाऱ्या अडचणींची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. 

हेही वाचा - एका चुकीच्या क्‍लिकमुळे हुकला आयआयटी प्रवेश; विद्यार्थ्याची सर्वोच्च न्यायालयात धाव!

मुळात सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश नव्या नोकरभरतीला लागू आहे. त्यामुळे तो जुन्या नोकरभरतीला लागू नसल्यासंदर्भात स्पष्टीकरण घेणे आवश्‍यक होते. अजूनही तसे स्पष्टीकरण घेऊन मराठा उमेदवारांना नोकऱ्या द्या. तोपर्यंत ही नोकरभरती थांबवा आणि स्पष्टीकरण घेऊन मराठा उमेदवारांसह पुढील नोकरभरती प्रक्रिया सुरू करा. या मागण्यांवर विचार करून सुयोग्य निर्णय घेतला जाईल. यासंदर्भात महाधिवक्‍त्यांचा सल्लाही घेण्यात येईल, असेही आश्‍वासन शिष्टमंडळाला दिल्याचे पवार यांनी सांगितले. 

Maratha Kranti Morcha strikes power board office Demand for completion of stagnant recruitment

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वीज मंडळाच्या कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाची धडक! रखडलेली नोकरभरती पूर्ण करण्याची मागणी मुंबई ः राज्य वीज मंडळात उपकेंद्र सहायक पदावर जानेवारीतच आरक्षित गटातून नियुक्त झालेल्या मराठा उमेदवारांवर केवळ कोरोनाकाळात झालेल्या विलंबामुळे आता नोकऱ्या न मिळण्याचे संकट आले आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घ्यावा, अशी मागणी आज मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चातर्फे आज वीज मंडळाच्या ठाणे, रायगड आणि वांद्रे येथील प्रकाशगड या मुख्यालयावर निदर्शने करण्यात आली.  हेही वाचा - ऑनलाईन वर्ग, गॅझेट्‌सच्या अतिवापरामुळे किशोरवयीन मुलांच्या स्नायूंवर ताण; तज्ज्ञांची माहिती आरक्षित गटातील या मराठा उमेदवारांची जानेवारीत निवड झाली व मार्चमध्ये नियुक्तीचा आदेश घेऊन ते एप्रिलपासून कामावर रुजू होणार होते; मात्र मार्चअखेरपासून लॉकडाऊन सुरू झाले व 9 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे उमेदवारांच्या नोकरीची प्रक्रियाही रखडली. लॉकडाऊनचा विलंब झाला नसता तर उमेदवारांना नोकरी मिळाली असती, हेही ध्यानात घ्यावे, अशी मागणी केली जात आहे. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आज होणार होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे आता आरक्षित गटातील मराठा उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चातर्फे आज वीज मंडळाच्या ठाणे व रायगड केंद्रांवर तसेच वांद्रे येथील प्रकाशगड या मुख्यालयावर निदर्शने करण्यात आली. समन्वयक विरेन पवार आदींनी यापुढे या मराठा उमेदवारांसमोर येणाऱ्या अडचणींची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.  हेही वाचा - एका चुकीच्या क्‍लिकमुळे हुकला आयआयटी प्रवेश; विद्यार्थ्याची सर्वोच्च न्यायालयात धाव! मुळात सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश नव्या नोकरभरतीला लागू आहे. त्यामुळे तो जुन्या नोकरभरतीला लागू नसल्यासंदर्भात स्पष्टीकरण घेणे आवश्‍यक होते. अजूनही तसे स्पष्टीकरण घेऊन मराठा उमेदवारांना नोकऱ्या द्या. तोपर्यंत ही नोकरभरती थांबवा आणि स्पष्टीकरण घेऊन मराठा उमेदवारांसह पुढील नोकरभरती प्रक्रिया सुरू करा. या मागण्यांवर विचार करून सुयोग्य निर्णय घेतला जाईल. यासंदर्भात महाधिवक्‍त्यांचा सल्लाही घेण्यात येईल, असेही आश्‍वासन शिष्टमंडळाला दिल्याचे पवार यांनी सांगितले.  Maratha Kranti Morcha strikes power board office Demand for completion of stagnant recruitment ------------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3qiDlQK
Read More
यशवंत जाधव यांच्या ध्वनीफितीवरून भाजप-शिवसेनेत वाकयुद्ध; कंत्राटदाराला धमकी दिल्याचा आरोप

मुंबई : महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या कथित ध्वनीफितीवरून शिवसेना-भाजपमध्ये चांगलेच वाकयुध्द रंगले आहे. जाधव यांनी तत्काळ अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. तर माझ्याकडेही चार ध्वनीफिती असून कंत्राटदाराचा बोलवता धनी कोण, हे योग्य वेळी जाहीर करू, असे सांगत जाधव यांनी अप्रत्यक्षपणे भाजपकडे बोट दाखवले. 

हेही वाचा - जलयुक्त शिवारच्या चौकशीसाठी समिती गठित; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

यश कॉर्पोरेशन या कंत्राटदाराने स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी फोनवरून धमकी दिल्याचा आरोप केला. या धमकीची कथित ध्वनीफीत त्यांनी जारी केली आहे. तसेच पोलिस आणि महापालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांच्याकडे लेखी तक्रार करून संरक्षणाची मागणी केली आहे. या प्रकरणावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये वाकयुध्द रंगले आहे. "मुलूंडमध्ये काम करणारा कंत्राटदार थेट भायखळ्यात कसा येतो, त्यावरुन त्याचा उद्देश काय हे स्पष्ट होते, ज्या कंत्राटदाराशी संबंध नाही, त्याला धमकावण्याचा प्रश्‍न नाही. या ध्वनीफितीचा बोलवता धनी कोण, याचा लवकरच पर्दाफाश करू. माझ्या जवळही चार ध्वनीफित आहेत', असेही जाधव यांनी नमुद केले.

दाऊद इब्राहिमच्या तीन मालमत्तांचा लिलाव, तब्बल 1.10 कोटींना विकली गेली मालमत्ता

मुलूंडमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. तेथे सर्व नगरसेवक हे भाजपचे आहे. त्यामुळे जाधव यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला इशारा दिला आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भाजपनेही यात संधी साधून जाधव यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जाधव यांनी राजीनामा देऊन या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली. 

BJP ShivSena war over Yashwant Jadhavs audio recording 

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

यशवंत जाधव यांच्या ध्वनीफितीवरून भाजप-शिवसेनेत वाकयुद्ध; कंत्राटदाराला धमकी दिल्याचा आरोप मुंबई : महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या कथित ध्वनीफितीवरून शिवसेना-भाजपमध्ये चांगलेच वाकयुध्द रंगले आहे. जाधव यांनी तत्काळ अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. तर माझ्याकडेही चार ध्वनीफिती असून कंत्राटदाराचा बोलवता धनी कोण, हे योग्य वेळी जाहीर करू, असे सांगत जाधव यांनी अप्रत्यक्षपणे भाजपकडे बोट दाखवले.  हेही वाचा - जलयुक्त शिवारच्या चौकशीसाठी समिती गठित; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय यश कॉर्पोरेशन या कंत्राटदाराने स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी फोनवरून धमकी दिल्याचा आरोप केला. या धमकीची कथित ध्वनीफीत त्यांनी जारी केली आहे. तसेच पोलिस आणि महापालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांच्याकडे लेखी तक्रार करून संरक्षणाची मागणी केली आहे. या प्रकरणावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये वाकयुध्द रंगले आहे. "मुलूंडमध्ये काम करणारा कंत्राटदार थेट भायखळ्यात कसा येतो, त्यावरुन त्याचा उद्देश काय हे स्पष्ट होते, ज्या कंत्राटदाराशी संबंध नाही, त्याला धमकावण्याचा प्रश्‍न नाही. या ध्वनीफितीचा बोलवता धनी कोण, याचा लवकरच पर्दाफाश करू. माझ्या जवळही चार ध्वनीफित आहेत', असेही जाधव यांनी नमुद केले. दाऊद इब्राहिमच्या तीन मालमत्तांचा लिलाव, तब्बल 1.10 कोटींना विकली गेली मालमत्ता मुलूंडमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. तेथे सर्व नगरसेवक हे भाजपचे आहे. त्यामुळे जाधव यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला इशारा दिला आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भाजपनेही यात संधी साधून जाधव यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जाधव यांनी राजीनामा देऊन या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.  BJP ShivSena war over Yashwant Jadhavs audio recording  ------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lxgAVE
Read More
‘डिअर मम्मी-पप्पा, तुम्ही वेळ देत नाही आम्ही घर सोडतोय’; दोघ्या बहिणींचे इंस्टाग्राम प्रेम

नागपूर : ‘डिअर मम्मी-पप्पा... तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये नेहमी गुंतलेले असता... आम्हाला तुमच्या प्रेमाची, मायेची गरज आहे... पण, आम्हाला अजिबात वेळ देत नाही. आमच्यावर प्रेम करणारे आणि जीव लावणाऱ्यांचा शोध आम्ही घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमासाठी आम्ही घर सोडतोय... सॉरी, प्लिज आमचा शोध घेऊ नका...’ अशी चिठ्ठी लिहून १५ व १७ वर्षीय बहिणींनी घर सोडले आणि प्रियकराच्या भेटीसाठी थेट गुजरात गाठले... परंतु, यशोधरानगर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कोणताही अनर्थ होण्यापूर्वीच दोघ्या बहिणींना गुजरातमधून ताब्यात घेतले. त्यांना आई-वडिलांच्या स्वाधीन केले... पालक वर्गाचे खाडकन डोळे उघडणारी घटना नागपुरात उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चशिक्षित दाम्पत्य उपराजधानीतील यशोधरानगर परिसरात राहते. नामांकित कंपनीत मोठ्या पगारावर कार्यरत असतानाच दोघांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांना दोन मुली. मोठी प्रिया १७ वर्षांची बारावीत तर लहान रिया १५ वर्षाची दहावीत (काल्पनिक नाव). दोघीही नामांकित कॉंव्हेंटमध्ये शिकतात.

अधिक वाचा - सोयाबीनचे दर वधारले; उच्च दर्जाच्या सोयाबीनलाही कमी भाव

बिझनेसमुळे आई-वडिलाचे दोन्ही मुलींकडे दुर्लक्ष झाले. त्यांना पाहिजे तेवढा वेळ देत नव्हते. ‘आई-वडिलांचे आपल्यावर प्रेम नाही. त्यांचा आपल्यावर जीव नाही.’ असा समज त्यांना झाला. त्यामुळे दोघीही बहिणी आई-वडिलावर नाराज राहत होत्या.

लॉकडाऊनमुळे वडिलांनी त्यांना लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन दिला. ऑनलाईन क्लास अटेंड केल्यानंतर प्रियाने इंस्टाग्रामवर अकाऊंट उघडले. तसेच तिने रियालाही अकाऊंट उघडून दिले. दोघीही क्लास झाल्यावर तासनतास ऑनलाईन राहत होत्या. त्यातून त्यांची अहमदाबादमधील दोन युवकांशी ओळख झाली.

जाणून घ्या - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला

इंस्टाग्रामवर भेटला इरफान

प्रियाची इंस्टाग्रामवरून गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका कंपनीत जॉब करणाऱ्या इरफानशी ओळख झाली. दोघांची रोच चॅटिंग सुरू झाली. तिने घरात आम्ही दोघी बहिणी एकाकी असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याने तिच्या बहिणीलाही आपला युसूफ नावाचा मित्र शोधून दिला. दोघ्याही बहिणी दोघांच्याही प्रेमात पडल्या. इंस्टाग्रामवरून त्या संपर्कात होत्या.

प्रेमात झाल्या वेड्या

प्रिया आणि रिया यांना इरफान आणि युसूफच्या प्रेमात वेड्या झाल्या. दोघांनीही त्यांना जीव लावला. त्यांना थेट लग्नाचे आमिष दाखवले. आई-वडिलांवर नाराज असलेल्या दोघेही बहिणींनी उर्वरित आयुष्य प्रियकरासोबत घालविण्याचा विचार केला. शुक्रवारी (ता. २७) घर सोडून जात असल्याची चिठ्ठी लिहिली आणि थेट बस पकडून अहमदाबाद शहर गाठले. तेथे प्रियकर त्यांची वाट पाहत उभे होते.

हेही वाचा - बाबांचे समाधीस्थळ असलेल्या स्मृतीवनात डॉ. शीतल आमटेंचा दफनविधी, रात्री उशिरा होणार अंत्यसंस्कार

पोलिसांमुळे टळला अनर्थ

मुलींच्या वडिलांनी यशोधरानगर पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक रमाकांत दुर्गे यांची भेट घेऊन हकिकत सांगितली. त्यांनी पोलिस निरीक्षक दीपक चव्हाण यांना लगेच तांत्रिक तपास करण्यास सांगितले. पीएसआय चव्हाण यांनी मुलींचा लॅपटॉप ताब्यात घेतला. लॅपटॉपमधून इंस्टाग्राम प्रियकराबाबत माहिती मिळाली. त्यांनी लगेच अहमदाबाद पोलिसांशी संपर्क केला. त्यांनी दोन्ही प्रियकरांना ताब्यात घेतले तर बसने अहमदाबाद पोहोचताच नागपूर पोलिसांनी मुलींना ताब्यात घेतले. अशाप्रकारे यशोधरानगर पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला.

संपादन - नीलेश डाखोरे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘डिअर मम्मी-पप्पा, तुम्ही वेळ देत नाही आम्ही घर सोडतोय’; दोघ्या बहिणींचे इंस्टाग्राम प्रेम नागपूर : ‘डिअर मम्मी-पप्पा... तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये नेहमी गुंतलेले असता... आम्हाला तुमच्या प्रेमाची, मायेची गरज आहे... पण, आम्हाला अजिबात वेळ देत नाही. आमच्यावर प्रेम करणारे आणि जीव लावणाऱ्यांचा शोध आम्ही घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमासाठी आम्ही घर सोडतोय... सॉरी, प्लिज आमचा शोध घेऊ नका...’ अशी चिठ्ठी लिहून १५ व १७ वर्षीय बहिणींनी घर सोडले आणि प्रियकराच्या भेटीसाठी थेट गुजरात गाठले... परंतु, यशोधरानगर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कोणताही अनर्थ होण्यापूर्वीच दोघ्या बहिणींना गुजरातमधून ताब्यात घेतले. त्यांना आई-वडिलांच्या स्वाधीन केले... पालक वर्गाचे खाडकन डोळे उघडणारी घटना नागपुरात उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चशिक्षित दाम्पत्य उपराजधानीतील यशोधरानगर परिसरात राहते. नामांकित कंपनीत मोठ्या पगारावर कार्यरत असतानाच दोघांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांना दोन मुली. मोठी प्रिया १७ वर्षांची बारावीत तर लहान रिया १५ वर्षाची दहावीत (काल्पनिक नाव). दोघीही नामांकित कॉंव्हेंटमध्ये शिकतात. अधिक वाचा - सोयाबीनचे दर वधारले; उच्च दर्जाच्या सोयाबीनलाही कमी भाव बिझनेसमुळे आई-वडिलाचे दोन्ही मुलींकडे दुर्लक्ष झाले. त्यांना पाहिजे तेवढा वेळ देत नव्हते. ‘आई-वडिलांचे आपल्यावर प्रेम नाही. त्यांचा आपल्यावर जीव नाही.’ असा समज त्यांना झाला. त्यामुळे दोघीही बहिणी आई-वडिलावर नाराज राहत होत्या. लॉकडाऊनमुळे वडिलांनी त्यांना लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन दिला. ऑनलाईन क्लास अटेंड केल्यानंतर प्रियाने इंस्टाग्रामवर अकाऊंट उघडले. तसेच तिने रियालाही अकाऊंट उघडून दिले. दोघीही क्लास झाल्यावर तासनतास ऑनलाईन राहत होत्या. त्यातून त्यांची अहमदाबादमधील दोन युवकांशी ओळख झाली. जाणून घ्या - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला इंस्टाग्रामवर भेटला इरफान प्रियाची इंस्टाग्रामवरून गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका कंपनीत जॉब करणाऱ्या इरफानशी ओळख झाली. दोघांची रोच चॅटिंग सुरू झाली. तिने घरात आम्ही दोघी बहिणी एकाकी असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याने तिच्या बहिणीलाही आपला युसूफ नावाचा मित्र शोधून दिला. दोघ्याही बहिणी दोघांच्याही प्रेमात पडल्या. इंस्टाग्रामवरून त्या संपर्कात होत्या. प्रेमात झाल्या वेड्या प्रिया आणि रिया यांना इरफान आणि युसूफच्या प्रेमात वेड्या झाल्या. दोघांनीही त्यांना जीव लावला. त्यांना थेट लग्नाचे आमिष दाखवले. आई-वडिलांवर नाराज असलेल्या दोघेही बहिणींनी उर्वरित आयुष्य प्रियकरासोबत घालविण्याचा विचार केला. शुक्रवारी (ता. २७) घर सोडून जात असल्याची चिठ्ठी लिहिली आणि थेट बस पकडून अहमदाबाद शहर गाठले. तेथे प्रियकर त्यांची वाट पाहत उभे होते. हेही वाचा - बाबांचे समाधीस्थळ असलेल्या स्मृतीवनात डॉ. शीतल आमटेंचा दफनविधी, रात्री उशिरा होणार अंत्यसंस्कार पोलिसांमुळे टळला अनर्थ मुलींच्या वडिलांनी यशोधरानगर पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक रमाकांत दुर्गे यांची भेट घेऊन हकिकत सांगितली. त्यांनी पोलिस निरीक्षक दीपक चव्हाण यांना लगेच तांत्रिक तपास करण्यास सांगितले. पीएसआय चव्हाण यांनी मुलींचा लॅपटॉप ताब्यात घेतला. लॅपटॉपमधून इंस्टाग्राम प्रियकराबाबत माहिती मिळाली. त्यांनी लगेच अहमदाबाद पोलिसांशी संपर्क केला. त्यांनी दोन्ही प्रियकरांना ताब्यात घेतले तर बसने अहमदाबाद पोहोचताच नागपूर पोलिसांनी मुलींना ताब्यात घेतले. अशाप्रकारे यशोधरानगर पोलिसांमुळे मोठा अनर्थ टळला. संपादन - नीलेश डाखोरे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fX4yng
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 डिसेंबर

पंचांग -
बुधवार - कार्तिक कृष्ण २, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.५२ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ७.३५, चंद्रास्त सकाळी ८.२२, भारतीय सौर मार्गशीर्ष ११ शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन (युनेस्को)
१९०५ - मराठी लेखक, कवी, पत्रकार अनंत काणेकर यांचा जन्म. त्यांचे ‘पिकली पाने’, ‘शिंपले आणि मोती’,  ‘तुटलेले तारे’,  ‘प्रकाशाची दारे’ इ. लघुनिबंध संग्रह प्रसिद्ध झाले. भारत सरकारतर्फे त्यांना ‘पद्मश्री’ या किताबाने गौरविले.
१९९९ - काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन (फेमा) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर.
२००४ - ईडन गार्डन्सवरील भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात अव्वल लेगस्पिनर अनिल कुंबळेने कपिलदेव यांच्या ४३४ कसोटी बळींच्या कामगिरीशी बरोबरी केली.

दिनमान -
मेष : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आर्थिक लाभाचे प्रमाणवाढेल.
मिथुन : उत्साह, उमेद वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आपली मते इतरांना पटवून द्याल.
कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवासात दक्षता घ्यावी.
सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.
कन्या : शासकीय कामे पार पडतील. सामाजिक, राजकीय क्षेत्रात प्रगती होईल.
तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वृश्‍चिक : अचानक धनलाभाची शक्‍यता. प्रकृतीकडे लक्ष द्यावे.
धनु : हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.
मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.
कुंभ : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
मीन : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द वाढेल.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 डिसेंबर पंचांग - बुधवार - कार्तिक कृष्ण २, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.५२ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ७.३५, चंद्रास्त सकाळी ८.२२, भारतीय सौर मार्गशीर्ष ११ शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन (युनेस्को) १९०५ - मराठी लेखक, कवी, पत्रकार अनंत काणेकर यांचा जन्म. त्यांचे ‘पिकली पाने’, ‘शिंपले आणि मोती’,  ‘तुटलेले तारे’,  ‘प्रकाशाची दारे’ इ. लघुनिबंध संग्रह प्रसिद्ध झाले. भारत सरकारतर्फे त्यांना ‘पद्मश्री’ या किताबाने गौरविले. १९९९ - काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन (फेमा) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर. २००४ - ईडन गार्डन्सवरील भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात अव्वल लेगस्पिनर अनिल कुंबळेने कपिलदेव यांच्या ४३४ कसोटी बळींच्या कामगिरीशी बरोबरी केली. दिनमान - मेष : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. वृषभ : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आर्थिक लाभाचे प्रमाणवाढेल. मिथुन : उत्साह, उमेद वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आपली मते इतरांना पटवून द्याल. कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवासात दक्षता घ्यावी. सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. कन्या : शासकीय कामे पार पडतील. सामाजिक, राजकीय क्षेत्रात प्रगती होईल. तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृश्‍चिक : अचानक धनलाभाची शक्‍यता. प्रकृतीकडे लक्ष द्यावे. धनु : हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. कुंभ : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. मीन : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द वाढेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ltXZtI
Read More
मुख्यालयात राहण्याची सक्‍ती त्रासदायक ः शिक्षक

ओरोस (सिंधुदुर्ग) - राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गच्या वतीने काल (ता. 30) आमदार नीतेश राणे यांची भेट घेण्यात आली. जिल्ह्यातील शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत होत असलेली सक्ती त्रासदायक असल्याचे आमदार राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आमदार राणे यांनी शिक्षण सभापती सावी लोके यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. सर्व जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य यांच्यासोबत चर्चा करून मुख्यालयी राहण्याबाबतच्या सक्तीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. 

यावेळी आमदार राणे यांच्याकडे विविध मागण्या मांडल्या. त्यात आंतरजिल्हा बदलीसाठी 10 टक्के रिक्त पदाची अट शिथिल करण्यात यावी, कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत, जिल्हा डोंगराळ भाग असल्याने पूर्वीप्रमाणे डोंगरी भागाचे निकष कायम ठेवून मुख्याध्यापक पद 1 ते 7 साठी विनाअट मुख्याध्यापक पद देण्यात यावे, ग्रामपंचायत 15 व्या वित्त आयोगातून शाळांची वीज बिल भरण्यात यावीत, अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, कोविड-19 च्या प्रादुर्भावानंतर शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शाळांचे सॅनिटायझेशन, थर्मल गन, ऑक्‍सिमिटर, मास्क इत्यादी सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा विकास निधी व जिल्हा परिषद सेस फंडातून शाळांना निधी देण्यात यावा, पदवीधर प्रमोशन व पदवीधर तसेच उपशिक्षकांची रिक्त पदांची भरती करण्यात यावी, जिल्हा परिषदमार्फत देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात यावेत. राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना 30 एप्रिल 1984 च्या शासन निर्णयानुसार दोन आगाऊ वेतनवाढ देण्याची पद्धत होती; मात्र हा निर्णय राज्यशासनाने 2013-14 ला बंद करण्यात येऊन रोख रकम देण्याचा शासन निर्णय करण्यात आला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. 

यावेळी राज्य उपाध्यक्ष दया नाईक, जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, महिला आघाडी अध्यक्षा आशा गुणीजन, जिल्हा सरचिटणीस अरुण पवार, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश खांबळकर, जिल्हा मुख्य संघटक रामचंद्र डोईफोडे, जिल्हा प्रतिनिधी रामचंद्र सातवसे, तालुकाध्यक्ष मालवण संतोष कोचरेकर, तालुकाध्यक्ष कणकवली दशरथ शिंगारे, तालुका सरचिटणीस दोडामार्ग सखाराम झोरे, तालुका सरचिटणीस मालवण संतोष परब, देवेंद्र चव्हाण, संजय जाधव, दिनकर शिरवलकर, सागर कुराडे, रामकृष्ण संत्रे उपस्थित होते. 

राणेंकडून मागण्यांची दखल 
प्राप्त शिक्षकांच्या मागणीनुसार, पूर्वीप्रमाणे दोन आगाऊ वेतनवाढ निर्णय करण्यात यावा. राज्य पुरस्कार शिक्षकांना रेल्वे किंवा बस मोफत पास सवलत कायमस्वरूपी ओळखपत्र, तसेच इतर राज्यांतील पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देण्यात येणाऱ्या सुविधा आपल्या राज्यातील शिक्षकांना राज्य शासनाने देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली. मागण्यांचा पाठपुरावा करून प्रश्‍न सोडविले जातील, असे आश्‍वासन आमदार राणेंनी दिले. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुख्यालयात राहण्याची सक्‍ती त्रासदायक ः शिक्षक ओरोस (सिंधुदुर्ग) - राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गच्या वतीने काल (ता. 30) आमदार नीतेश राणे यांची भेट घेण्यात आली. जिल्ह्यातील शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत होत असलेली सक्ती त्रासदायक असल्याचे आमदार राणे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आमदार राणे यांनी शिक्षण सभापती सावी लोके यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. सर्व जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य यांच्यासोबत चर्चा करून मुख्यालयी राहण्याबाबतच्या सक्तीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.  यावेळी आमदार राणे यांच्याकडे विविध मागण्या मांडल्या. त्यात आंतरजिल्हा बदलीसाठी 10 टक्के रिक्त पदाची अट शिथिल करण्यात यावी, कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत, जिल्हा डोंगराळ भाग असल्याने पूर्वीप्रमाणे डोंगरी भागाचे निकष कायम ठेवून मुख्याध्यापक पद 1 ते 7 साठी विनाअट मुख्याध्यापक पद देण्यात यावे, ग्रामपंचायत 15 व्या वित्त आयोगातून शाळांची वीज बिल भरण्यात यावीत, अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, कोविड-19 च्या प्रादुर्भावानंतर शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शाळांचे सॅनिटायझेशन, थर्मल गन, ऑक्‍सिमिटर, मास्क इत्यादी सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा विकास निधी व जिल्हा परिषद सेस फंडातून शाळांना निधी देण्यात यावा, पदवीधर प्रमोशन व पदवीधर तसेच उपशिक्षकांची रिक्त पदांची भरती करण्यात यावी, जिल्हा परिषदमार्फत देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात यावेत. राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना 30 एप्रिल 1984 च्या शासन निर्णयानुसार दोन आगाऊ वेतनवाढ देण्याची पद्धत होती; मात्र हा निर्णय राज्यशासनाने 2013-14 ला बंद करण्यात येऊन रोख रकम देण्याचा शासन निर्णय करण्यात आला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.  यावेळी राज्य उपाध्यक्ष दया नाईक, जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, महिला आघाडी अध्यक्षा आशा गुणीजन, जिल्हा सरचिटणीस अरुण पवार, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश खांबळकर, जिल्हा मुख्य संघटक रामचंद्र डोईफोडे, जिल्हा प्रतिनिधी रामचंद्र सातवसे, तालुकाध्यक्ष मालवण संतोष कोचरेकर, तालुकाध्यक्ष कणकवली दशरथ शिंगारे, तालुका सरचिटणीस दोडामार्ग सखाराम झोरे, तालुका सरचिटणीस मालवण संतोष परब, देवेंद्र चव्हाण, संजय जाधव, दिनकर शिरवलकर, सागर कुराडे, रामकृष्ण संत्रे उपस्थित होते.  राणेंकडून मागण्यांची दखल  प्राप्त शिक्षकांच्या मागणीनुसार, पूर्वीप्रमाणे दोन आगाऊ वेतनवाढ निर्णय करण्यात यावा. राज्य पुरस्कार शिक्षकांना रेल्वे किंवा बस मोफत पास सवलत कायमस्वरूपी ओळखपत्र, तसेच इतर राज्यांतील पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देण्यात येणाऱ्या सुविधा आपल्या राज्यातील शिक्षकांना राज्य शासनाने देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली. मागण्यांचा पाठपुरावा करून प्रश्‍न सोडविले जातील, असे आश्‍वासन आमदार राणेंनी दिले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3lCjPeN
Read More
सिंधुदुर्गात अवघ्या 58 टक्के शाळा सुरू 

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या 144 शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात केवळ 58 टक्के शाळा सुरू झाल्या असून 42 टक्के शाळांची घंटा अजून वाजलेली नाही. राज्य शासनाने कोरोनामुळे जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरु होवून सुद्धा शाळा सुरू करण्यास परवानगी दिली नव्हती. शाळा सुरू झाल्यास कोरोनाचा प्रसार वाढेल या भीतीने 2020-21 चे शैक्षणिक वर्ष सुरुच केले नव्हते; मात्र नोव्हेंबरमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याने शासनाने 23 नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावी वर्ग भरविण्यास परवानगी दिली. त्यानुसार जिल्ह्यात पहिल्याच दिवशी 82 शाळा भरल्या होत्या. दुसऱ्या दिवशी 5 शाळा सुरू झाल्या होत्या. 

जिल्ह्यात आता शाळा सुरू होण्यास वेग आला आहे. पाहिल्या आठ दिवसांत 144 शाळा सुरू झाल्या आहेत. एकूण 242 शाळा असून त्यातील 98 शाळा सुरू झालेल्या नाहीत. जिल्ह्यात एकूण 2 हजार 318 शिक्षक आहेत. त्यातील 2 हजार 146 शिक्षकांची टेस्ट घेण्यात आली. 850 या सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची टेस्ट घेण्यात आली आहे. 42 हजार एवढे विद्यार्थी असून यातील 9 हजार 46 विद्यार्थी शाळेत दाखल झालेले आहेत. एकूण विद्यार्थ्यांच्या 21 टक्के विद्यार्थी शाळेत हजर झाले असून तब्बल 79 टक्के विद्यार्थी अजुन दाखल झालेले नाहीत. 

"त्या' मुख्याध्यापकांना नोटीस 
कुडाळ तालुक्‍यातील माणगाव परिसरातील एका हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांची कोरोना टेस्ट अहवाल येण्यापुर्वी शाळा सुरू केली. टेस्ट दिलेला एक शिक्षक कोरोना बाधित आला होता. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना विचारले असता त्यांनी याबाबत मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्या शिक्षकाच्या संपर्कात आलेली मुलगे आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली आहेत. आरोग्य विभागाने शाळा सुरू करण्यास मान्यता दिल्यावर ही शाळा सुरू होईल, असे सांगितले. 

एकूण 25 बाधित 
जिल्ह्यातील 2 हजार 146 पैकी 19 शिक्षक तर 850 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपैकी 6 कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. एकूण 25 बाधित आढळले आहेत. 

मुलांच्या प्रवासाचा प्रश्‍न 
देवगड - शासनाच्या निर्णयानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा फतवा आला असल्याने विविध ठिकाणच्या शाळा सुरू झाल्या; मात्र शाळांमध्ये अजूनही म्हणावा तसा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील शाळांमध्ये येण्यामध्ये काही अडचणी असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना पार्श्‍वभूमीवर सुमारे मार्चपासून शाळांची घंटा वाजलेली नाही. चालू शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्याची विद्यार्थ्यांसह पालकांना प्रतिक्षा असताना अलीकडे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. या पार्श्‍वभूमीवर शिक्षकांची कोरोनाच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली. त्यानंतरच शाळा सुरू झाल्या. अलीकडे तालुक्‍यातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी त्याला विद्यार्थ्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याचे दिसते. दूरवरच्या शाळांमध्ये जाण्यासाठी एसटीची सोय आवश्‍यक आहे; मात्र पाचवीपासून वर्ग सुरू झाले नसल्याने एसटी प्रशासनाने शालेय फेऱ्या अद्याप सुरू केलेल्या नाहीत. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील शाळेत येण्यासाठी एसटीची सोय नसल्याचेही यामध्ये कारण सांगितले जात आहे. तसेच काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला असल्याचे सांगितले जाते. 

 

जिल्ह्यात सध्या 144 शाळा सुरू झाल्या असल्या तरी उर्वरित 98 शाळा लवकरच सुरू होतील. जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्यात येणार आहेत. 
- अशोक कडूस, माध्यमिक शिक्षणाधिकारी 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्गात अवघ्या 58 टक्के शाळा सुरू  ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या 144 शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात केवळ 58 टक्के शाळा सुरू झाल्या असून 42 टक्के शाळांची घंटा अजून वाजलेली नाही. राज्य शासनाने कोरोनामुळे जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरु होवून सुद्धा शाळा सुरू करण्यास परवानगी दिली नव्हती. शाळा सुरू झाल्यास कोरोनाचा प्रसार वाढेल या भीतीने 2020-21 चे शैक्षणिक वर्ष सुरुच केले नव्हते; मात्र नोव्हेंबरमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याने शासनाने 23 नोव्हेंबरपासून राज्यातील नववी ते बारावी वर्ग भरविण्यास परवानगी दिली. त्यानुसार जिल्ह्यात पहिल्याच दिवशी 82 शाळा भरल्या होत्या. दुसऱ्या दिवशी 5 शाळा सुरू झाल्या होत्या.  जिल्ह्यात आता शाळा सुरू होण्यास वेग आला आहे. पाहिल्या आठ दिवसांत 144 शाळा सुरू झाल्या आहेत. एकूण 242 शाळा असून त्यातील 98 शाळा सुरू झालेल्या नाहीत. जिल्ह्यात एकूण 2 हजार 318 शिक्षक आहेत. त्यातील 2 हजार 146 शिक्षकांची टेस्ट घेण्यात आली. 850 या सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची टेस्ट घेण्यात आली आहे. 42 हजार एवढे विद्यार्थी असून यातील 9 हजार 46 विद्यार्थी शाळेत दाखल झालेले आहेत. एकूण विद्यार्थ्यांच्या 21 टक्के विद्यार्थी शाळेत हजर झाले असून तब्बल 79 टक्के विद्यार्थी अजुन दाखल झालेले नाहीत.  "त्या' मुख्याध्यापकांना नोटीस  कुडाळ तालुक्‍यातील माणगाव परिसरातील एका हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांची कोरोना टेस्ट अहवाल येण्यापुर्वी शाळा सुरू केली. टेस्ट दिलेला एक शिक्षक कोरोना बाधित आला होता. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना विचारले असता त्यांनी याबाबत मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्या शिक्षकाच्या संपर्कात आलेली मुलगे आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली आहेत. आरोग्य विभागाने शाळा सुरू करण्यास मान्यता दिल्यावर ही शाळा सुरू होईल, असे सांगितले.  एकूण 25 बाधित  जिल्ह्यातील 2 हजार 146 पैकी 19 शिक्षक तर 850 शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपैकी 6 कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. एकूण 25 बाधित आढळले आहेत.  मुलांच्या प्रवासाचा प्रश्‍न  देवगड - शासनाच्या निर्णयानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा फतवा आला असल्याने विविध ठिकाणच्या शाळा सुरू झाल्या; मात्र शाळांमध्ये अजूनही म्हणावा तसा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील शाळांमध्ये येण्यामध्ये काही अडचणी असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना पार्श्‍वभूमीवर सुमारे मार्चपासून शाळांची घंटा वाजलेली नाही. चालू शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्याची विद्यार्थ्यांसह पालकांना प्रतिक्षा असताना अलीकडे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. या पार्श्‍वभूमीवर शिक्षकांची कोरोनाच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली. त्यानंतरच शाळा सुरू झाल्या. अलीकडे तालुक्‍यातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी त्याला विद्यार्थ्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याचे दिसते. दूरवरच्या शाळांमध्ये जाण्यासाठी एसटीची सोय आवश्‍यक आहे; मात्र पाचवीपासून वर्ग सुरू झाले नसल्याने एसटी प्रशासनाने शालेय फेऱ्या अद्याप सुरू केलेल्या नाहीत. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील शाळेत येण्यासाठी एसटीची सोय नसल्याचेही यामध्ये कारण सांगितले जात आहे. तसेच काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला असल्याचे सांगितले जाते.    जिल्ह्यात सध्या 144 शाळा सुरू झाल्या असल्या तरी उर्वरित 98 शाळा लवकरच सुरू होतील. जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्यात येणार आहेत.  - अशोक कडूस, माध्यमिक शिक्षणाधिकारी  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VpNEV4
Read More
आई म्हणून जन्मदात्रीने आपले कर्तव्य पार पाडले; मात्र, मुलांनी सोडले वाऱ्यावर!

नागपूर : तिने मुलांना जन्म दिला... पालनपोषण करून लहानाचे मोठे केले... त्या मोबदल्यात मुलांनी म्हातारपणी आपला सांभाळ करावा, एवढीच माफक अपेक्षा तिने केली होती... मात्र, स्वार्थी व बेफिकीर मुलांनी तिला घरातून हाकलून रस्त्यावर सोडून दिले... कोरोनाच्या काळात गेल्या काही दिवसांपासून तिची भटकंती सुरू आहे...

सावित्रीनगर (बगडगंज) येथे राहणाऱ्या ७३ वर्षीय मालू बेलसरे यांना दोन मुले व एक मुलगी आहे. पतीचे निधन झाल्यानंतर मुलांची सर्व जबाबदारी घेत त्यांनी आपल्या परीने पालनपोषण केले. लग्न करून त्यांना आपल्या पायावर उभे केले. स्वतःचे घर धाकट्याच्या स्वाधीन केले. थोरल्यालाही हिंगणा परिसरात नवीन फ्लॅट विकत घेऊन दिला. आई म्हणून जन्मदात्रीने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले.

सविस्तर वाचा - शेतजमिनीला मोल येताच नात्यात कटुता, एक स्वाक्षरी लाखोंची

मात्र, मुलांनी तिच्या कष्टाची व त्यागाची जाण ठेवली नाही. धाकटा मुलगा, सून व नातवंडांसोबत वारंवार खटके उडाल्याने कंटाळून त्यांनी घर सोडले. चार-सहा महिने इकडून तिकडे भटकंती केल्यानंतर अभ्यंकरनगरात राहणाऱ्या एका घरी आश्रय घेतला. दिवसा मालिशचे काम करून त्यातून मिळणाऱ्या पैशाने पोट भरायची आणि रात्री तिथेच झोपी जात असत...

लॉकडाऊन काळात त्या पुन्हा आपल्या घरी गेल्या. मात्र, भांडणे दिवसेंदिवस वाढत गेल्याने तिला पुन्हा घर सोडावे लागले. भुकेने व्याकूळ असताना एकेदिवशी सामाजिक कार्यकर्त्या ज्योती मुदलियार यांच्या दृष्टीस त्या पडल्या. त्यांनी तिला जेवू-खाऊ घातले. आपल्या घरी आश्रय दिला. मालू यांनी आपली आपबिती त्यांना सांगितली.

ज्योती यांनी पुढाकार घेत मुलाला फोन करून आईला घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र, मुलाने याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी शंभर नंबरवरही संपर्क साधला. मात्र, कुणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. आता तर मुलांचेही फोन ‘स्वीच्ड ऑफ’ असल्याचे ज्योती यांनी सांगितले.

क्लिक करा - War and Peace' : आत्महत्येच्या काही तासांपूर्वी डॉ. शीतल आमटेंचे ट्विट; नेमके काय सांगायचे होते 'बाबां'च्या नातीला?

घरच्यांनी दूर लोटल्याने मालू दुःखी आहेत. ते आपल्याला मारपीट, मुजोरी, शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी देतात, असा त्यांचा आरोप आहे. शिवाय किरायेदारावरही रोष दिसून आला. तिनेच मुलाला व सुनेला भडकवल्याचे मालू यांचे म्हणणे आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

 News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आई म्हणून जन्मदात्रीने आपले कर्तव्य पार पाडले; मात्र, मुलांनी सोडले वाऱ्यावर! नागपूर : तिने मुलांना जन्म दिला... पालनपोषण करून लहानाचे मोठे केले... त्या मोबदल्यात मुलांनी म्हातारपणी आपला सांभाळ करावा, एवढीच माफक अपेक्षा तिने केली होती... मात्र, स्वार्थी व बेफिकीर मुलांनी तिला घरातून हाकलून रस्त्यावर सोडून दिले... कोरोनाच्या काळात गेल्या काही दिवसांपासून तिची भटकंती सुरू आहे... सावित्रीनगर (बगडगंज) येथे राहणाऱ्या ७३ वर्षीय मालू बेलसरे यांना दोन मुले व एक मुलगी आहे. पतीचे निधन झाल्यानंतर मुलांची सर्व जबाबदारी घेत त्यांनी आपल्या परीने पालनपोषण केले. लग्न करून त्यांना आपल्या पायावर उभे केले. स्वतःचे घर धाकट्याच्या स्वाधीन केले. थोरल्यालाही हिंगणा परिसरात नवीन फ्लॅट विकत घेऊन दिला. आई म्हणून जन्मदात्रीने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले. सविस्तर वाचा - शेतजमिनीला मोल येताच नात्यात कटुता, एक स्वाक्षरी लाखोंची मात्र, मुलांनी तिच्या कष्टाची व त्यागाची जाण ठेवली नाही. धाकटा मुलगा, सून व नातवंडांसोबत वारंवार खटके उडाल्याने कंटाळून त्यांनी घर सोडले. चार-सहा महिने इकडून तिकडे भटकंती केल्यानंतर अभ्यंकरनगरात राहणाऱ्या एका घरी आश्रय घेतला. दिवसा मालिशचे काम करून त्यातून मिळणाऱ्या पैशाने पोट भरायची आणि रात्री तिथेच झोपी जात असत... लॉकडाऊन काळात त्या पुन्हा आपल्या घरी गेल्या. मात्र, भांडणे दिवसेंदिवस वाढत गेल्याने तिला पुन्हा घर सोडावे लागले. भुकेने व्याकूळ असताना एकेदिवशी सामाजिक कार्यकर्त्या ज्योती मुदलियार यांच्या दृष्टीस त्या पडल्या. त्यांनी तिला जेवू-खाऊ घातले. आपल्या घरी आश्रय दिला. मालू यांनी आपली आपबिती त्यांना सांगितली. ज्योती यांनी पुढाकार घेत मुलाला फोन करून आईला घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र, मुलाने याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी शंभर नंबरवरही संपर्क साधला. मात्र, कुणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. आता तर मुलांचेही फोन ‘स्वीच्ड ऑफ’ असल्याचे ज्योती यांनी सांगितले. क्लिक करा - War and Peace' : आत्महत्येच्या काही तासांपूर्वी डॉ. शीतल आमटेंचे ट्विट; नेमके काय सांगायचे होते 'बाबां'च्या नातीला? घरच्यांनी दूर लोटल्याने मालू दुःखी आहेत. ते आपल्याला मारपीट, मुजोरी, शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी देतात, असा त्यांचा आरोप आहे. शिवाय किरायेदारावरही रोष दिसून आला. तिनेच मुलाला व सुनेला भडकवल्याचे मालू यांचे म्हणणे आहे. संपादन - नीलेश डाखोरे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3mtbqLS
Read More
अजब! तब्बल 14 वर्षांच्या संघर्षानंतर घरात वीज 

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - वीज ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यावश्‍यक गोष्ट; पण भाऊबंदकी आणि राजकीय सुंदोपसुंदीने एखाद्या कुटुंबाला वर्षानुवर्षे विजेपासून वंचित ठेवले तर? होय, अशी घटना दोडामार्ग तालुक्‍यातील कोनाळ गावात घडलीय. कोनाळ गवसवाडी येथील उदय गवस यांच्या कुटुंबाला तब्बल 14 वर्षे काळोखात काढावी लागली. भाजपचे तत्कालीन तालुकाध्यक्ष सुधीर दळवी आणि ग्रामपंचायत सदस्य महेश लोंढे यांनी पुढाकार घेतल्याने त्या कुटुंबाचा 14 वर्षांचा वनवास संपला आणि घरातील दिवे पेटले. चौदा वर्षानंतर त्या कुटुंबाने खरीखुरी दिवाळी अनुभवली. 

कोनाळ-भरडोंगरवाडी तिलारी प्रकल्पामुळे बाधित झाली. अनेक कुटुंबे विस्थापित झाली. त्यात गवस यांचेही कुटुंब होते. तिलारी पाटबंधारे खात्यामध्ये ते पर्जन्यजल मोजमाप केंद्रात कार्यरत आहेत. विस्थापित झाल्यानंतर त्यांनी भावाकडील पाच गुंठे जमीन घेवून घर बांधले; पण त्यांना विजजोडणी मात्र मिळाली नव्हती. त्यातच त्यांची वैभववाडीला बदली झाली आणि सगळा भार पत्नीवर पडला. त्यांची दोन मुले, एक मूल चौथीत तर एक सहावीत होते. घरात लाईट नसल्याने मुलांना दिव्याच्या प्रकाशावर अभ्यास करावा लागे; पण रॉकेल मिळत नव्हते. त्यामुळे त्यांची फरफट व्हायची. अशी चौदा वर्षे गेली. काळोखात अभ्यास करुन मुलांनी दहावी, बारावी आणि पदवी परीक्षाही दिली. 

अखेर ग्रामपंचायत सदस्य महेश लोंढे आणि गवस यांनी भाजपाचे तत्कालिन तालुकाध्यक्ष दळवी यांच्या कानावर ती गोष्ट घालून वीजपुरवठा करण्याची विनंती केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घर तेथे वीज जोडणी या योजनेतून वीजजोडणी देण्याचा प्रस्ताव तयार केला. काम सुरूही झाले; पण भाऊबंदकी आणि राजकारण आडव आलं. अनेकांनी त्यांचे काम रोखण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे जिथे दोन खांब लागणार होते तिथे पंधरा खांब घालून वीज आणावी लागली. त्यासाठी बांदेकर कुटुंबीय आणि केरळीयन श्री. साजी यांनी सहकार्य केले. 

...अन्‌ दिवाळी साजरी 
शिवाय साटेली भेडशी सरपंच लखू खरवत, उपसरपंच सूर्यकांत धर्णे, कुडाळचे कार्यकारी अभियंता श्री. लोकरे, दोडामार्गचे उपकार्यकारी अभियंता रवींद्र देहारे व अतुल पाटील, साटेली भेडशीचे शाखा अभियंता जीवन चराटे आदींनी खूप सहकार्य केले. त्यामुळे या दिवाळीत त्यांच्या घरात वीज पोचली आणि चौदा वर्षांचा वनवास संपला. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अजब! तब्बल 14 वर्षांच्या संघर्षानंतर घरात वीज  दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - वीज ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यावश्‍यक गोष्ट; पण भाऊबंदकी आणि राजकीय सुंदोपसुंदीने एखाद्या कुटुंबाला वर्षानुवर्षे विजेपासून वंचित ठेवले तर? होय, अशी घटना दोडामार्ग तालुक्‍यातील कोनाळ गावात घडलीय. कोनाळ गवसवाडी येथील उदय गवस यांच्या कुटुंबाला तब्बल 14 वर्षे काळोखात काढावी लागली. भाजपचे तत्कालीन तालुकाध्यक्ष सुधीर दळवी आणि ग्रामपंचायत सदस्य महेश लोंढे यांनी पुढाकार घेतल्याने त्या कुटुंबाचा 14 वर्षांचा वनवास संपला आणि घरातील दिवे पेटले. चौदा वर्षानंतर त्या कुटुंबाने खरीखुरी दिवाळी अनुभवली.  कोनाळ-भरडोंगरवाडी तिलारी प्रकल्पामुळे बाधित झाली. अनेक कुटुंबे विस्थापित झाली. त्यात गवस यांचेही कुटुंब होते. तिलारी पाटबंधारे खात्यामध्ये ते पर्जन्यजल मोजमाप केंद्रात कार्यरत आहेत. विस्थापित झाल्यानंतर त्यांनी भावाकडील पाच गुंठे जमीन घेवून घर बांधले; पण त्यांना विजजोडणी मात्र मिळाली नव्हती. त्यातच त्यांची वैभववाडीला बदली झाली आणि सगळा भार पत्नीवर पडला. त्यांची दोन मुले, एक मूल चौथीत तर एक सहावीत होते. घरात लाईट नसल्याने मुलांना दिव्याच्या प्रकाशावर अभ्यास करावा लागे; पण रॉकेल मिळत नव्हते. त्यामुळे त्यांची फरफट व्हायची. अशी चौदा वर्षे गेली. काळोखात अभ्यास करुन मुलांनी दहावी, बारावी आणि पदवी परीक्षाही दिली.  अखेर ग्रामपंचायत सदस्य महेश लोंढे आणि गवस यांनी भाजपाचे तत्कालिन तालुकाध्यक्ष दळवी यांच्या कानावर ती गोष्ट घालून वीजपुरवठा करण्याची विनंती केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घर तेथे वीज जोडणी या योजनेतून वीजजोडणी देण्याचा प्रस्ताव तयार केला. काम सुरूही झाले; पण भाऊबंदकी आणि राजकारण आडव आलं. अनेकांनी त्यांचे काम रोखण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे जिथे दोन खांब लागणार होते तिथे पंधरा खांब घालून वीज आणावी लागली. त्यासाठी बांदेकर कुटुंबीय आणि केरळीयन श्री. साजी यांनी सहकार्य केले.  ...अन्‌ दिवाळी साजरी  शिवाय साटेली भेडशी सरपंच लखू खरवत, उपसरपंच सूर्यकांत धर्णे, कुडाळचे कार्यकारी अभियंता श्री. लोकरे, दोडामार्गचे उपकार्यकारी अभियंता रवींद्र देहारे व अतुल पाटील, साटेली भेडशीचे शाखा अभियंता जीवन चराटे आदींनी खूप सहकार्य केले. त्यामुळे या दिवाळीत त्यांच्या घरात वीज पोचली आणि चौदा वर्षांचा वनवास संपला.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3mvVEQ6
Read More
सोनुर्ली जत्रोत्सवाने जपला साधेपणा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -  दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव आज झाला; मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव करण्यात आला. 
जत्रोत्सवानिमित्ताने श्री देवी माऊलीच्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती.

माऊलीचे उत्सवानिमित्त सजविलेले देखणे मनोहारी रूप अधिकच खुलून दिसत आहे. मंदिर व मंदिर परिसरातही आकर्षक विद्युत रोषणाई आहे. कोरोनामुळे भाविकांनी दर्शनाला येऊ नये तसेच गर्दी टाळावी, या देवस्थान कमिटीने केलेल्या आवाहनाला भाविकांनी प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. 
लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जत्रोत्सवात काही स्थानिक मोजक्‍याच नोंदणीकृत भाविकांची लोटांगणे घालण्यात आली.

सोनुर्ली व मळगाव गावातील काही मोजक्‍याच भाविकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दर्शन घेतले. प्रशासनानेही आरोग्यविषयक चोख व्यवस्था होती. कडेकोट पोलिस बंदोबस्तही होता. यावर्षी कोणत्याही प्रकारचे पार्किंग, दर्शन मंडप, दुकाने, हॉटेल्स नसल्याने मंदिर परिसर मात्र सुनासुना होता. कोरोनाची दुसरी लाट संभवत असल्याने प्रशासन व देवस्थान कमिटीकडूनही योग्य ती खबरदारी घेतली जात होती. यावर्षी हॉटेल, दुकाने लावू नयेत, असे आवाहन देवस्थान कमिटीने केल्यामुळे स्थानिक भाविकांकरिता सोय म्हणून केवळ चार दुकाने होती. 

रात्री होणाऱ्या मुख्य पालखी उत्सवावेळीदेखील सोनुर्ली व मळगाव येथील काही प्रमुख मानकरी व भाविकांच्या उपस्थितीत काही ठराविक जणांची लोटांगणे घालण्यात आली. त्यासाठी आवश्‍यक नाव नोंदणी स्थानिक भाविकांनी देवस्थान कमिटीकडे केली होती. उर्वरित लोटांगण घेण्यास इच्छुक असलेल्या भाविकांनी उपवास करून रात्री दोन वाजता तो सोडावा, असे आवाहन देवस्थान कमिटीने केले होते. 

देवस्थान कमिटीने जत्रोत्सवासाठी खास नियमावली राबविताना सोनुर्ली गावातील भाविक भक्तांची गर्दी होऊ नये, यासाठी दिवसातील ठराविक वेळ त्या-त्या वाडीसाठी निश्‍चित केला होता; मात्र लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांना दर्शनासाठी न येण्याचे कळकळीचे आवाहन केले होते. भाविकांकडूनही देवस्थान कमिटीच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मंदिर परिसरात दरवर्षी दिसणारी गर्दी यावर्षी दिसून आली नाही. 

प्रशासनाकडून चोख व्यवस्था 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून गर्दी टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासाठी पोलिसांची विशेष कुमक तैनात करण्यात आली होती. सोनुर्ली माऊलीच्या मंदिराकडे येणाऱ्या दोन्ही मार्गावर पोलिसांसोबतच देवस्थान कमिटीचे स्वयंसेवक उपस्थित होते. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांची कसून चौकशी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत होता. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आरोग्य विभागाकडून पथक तैनात करण्यात आले होते. माऊलीच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक स्थानिक भाविकाची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात येत होती. सॅनिटायझरचाही वापर सक्तीचा करण्यात आला होता. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर नियम पाळूनच देवस्थान कमिटीच्या स्वयंसेवकांकडून विशेष काळजी घेत माऊलीच्या दर्शनासाठी स्थानिक भाविकांना सोडण्यात येत होते. 

व्यावसायिकांना फटका 
सोनुर्ली माऊलीचा जत्रोत्सव हा जिल्ह्यातील प्रमुख जत्रोत्सव यापैकी महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी माऊलीच्या मंदिराच्या दोन्ही बाजूने एक किलोमीटरच्या अंतरावर शेकडो दुकाने, हॉटेल्स व लहान-मोठे व्यावसायिक आपले व्यवसाय थाटायचे. हजारो भाविकांची उपस्थिती व त्यामुळे होणारी लाखो रुपयांची उलाढाल होते. यंदा कोरोनामुळे मोठा फटका बसला. भाविकांना दर्शनासाठी बंदी केल्यामुळे एसटी प्रशासनालाही त्याचा मोठा फटका बसला असून लाखोचे नुकसान झाले. 

संपादन - राहुल पाटील

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सोनुर्ली जत्रोत्सवाने जपला साधेपणा सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -  दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव आज झाला; मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव करण्यात आला.  जत्रोत्सवानिमित्ताने श्री देवी माऊलीच्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. माऊलीचे उत्सवानिमित्त सजविलेले देखणे मनोहारी रूप अधिकच खुलून दिसत आहे. मंदिर व मंदिर परिसरातही आकर्षक विद्युत रोषणाई आहे. कोरोनामुळे भाविकांनी दर्शनाला येऊ नये तसेच गर्दी टाळावी, या देवस्थान कमिटीने केलेल्या आवाहनाला भाविकांनी प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे.  लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जत्रोत्सवात काही स्थानिक मोजक्‍याच नोंदणीकृत भाविकांची लोटांगणे घालण्यात आली. सोनुर्ली व मळगाव गावातील काही मोजक्‍याच भाविकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दर्शन घेतले. प्रशासनानेही आरोग्यविषयक चोख व्यवस्था होती. कडेकोट पोलिस बंदोबस्तही होता. यावर्षी कोणत्याही प्रकारचे पार्किंग, दर्शन मंडप, दुकाने, हॉटेल्स नसल्याने मंदिर परिसर मात्र सुनासुना होता. कोरोनाची दुसरी लाट संभवत असल्याने प्रशासन व देवस्थान कमिटीकडूनही योग्य ती खबरदारी घेतली जात होती. यावर्षी हॉटेल, दुकाने लावू नयेत, असे आवाहन देवस्थान कमिटीने केल्यामुळे स्थानिक भाविकांकरिता सोय म्हणून केवळ चार दुकाने होती.  रात्री होणाऱ्या मुख्य पालखी उत्सवावेळीदेखील सोनुर्ली व मळगाव येथील काही प्रमुख मानकरी व भाविकांच्या उपस्थितीत काही ठराविक जणांची लोटांगणे घालण्यात आली. त्यासाठी आवश्‍यक नाव नोंदणी स्थानिक भाविकांनी देवस्थान कमिटीकडे केली होती. उर्वरित लोटांगण घेण्यास इच्छुक असलेल्या भाविकांनी उपवास करून रात्री दोन वाजता तो सोडावा, असे आवाहन देवस्थान कमिटीने केले होते.  देवस्थान कमिटीने जत्रोत्सवासाठी खास नियमावली राबविताना सोनुर्ली गावातील भाविक भक्तांची गर्दी होऊ नये, यासाठी दिवसातील ठराविक वेळ त्या-त्या वाडीसाठी निश्‍चित केला होता; मात्र लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांना दर्शनासाठी न येण्याचे कळकळीचे आवाहन केले होते. भाविकांकडूनही देवस्थान कमिटीच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मंदिर परिसरात दरवर्षी दिसणारी गर्दी यावर्षी दिसून आली नाही.  प्रशासनाकडून चोख व्यवस्था  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून गर्दी टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासाठी पोलिसांची विशेष कुमक तैनात करण्यात आली होती. सोनुर्ली माऊलीच्या मंदिराकडे येणाऱ्या दोन्ही मार्गावर पोलिसांसोबतच देवस्थान कमिटीचे स्वयंसेवक उपस्थित होते. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांची कसून चौकशी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत होता. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आरोग्य विभागाकडून पथक तैनात करण्यात आले होते. माऊलीच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक स्थानिक भाविकाची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात येत होती. सॅनिटायझरचाही वापर सक्तीचा करण्यात आला होता. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर नियम पाळूनच देवस्थान कमिटीच्या स्वयंसेवकांकडून विशेष काळजी घेत माऊलीच्या दर्शनासाठी स्थानिक भाविकांना सोडण्यात येत होते.  व्यावसायिकांना फटका  सोनुर्ली माऊलीचा जत्रोत्सव हा जिल्ह्यातील प्रमुख जत्रोत्सव यापैकी महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी माऊलीच्या मंदिराच्या दोन्ही बाजूने एक किलोमीटरच्या अंतरावर शेकडो दुकाने, हॉटेल्स व लहान-मोठे व्यावसायिक आपले व्यवसाय थाटायचे. हजारो भाविकांची उपस्थिती व त्यामुळे होणारी लाखो रुपयांची उलाढाल होते. यंदा कोरोनामुळे मोठा फटका बसला. भाविकांना दर्शनासाठी बंदी केल्यामुळे एसटी प्रशासनालाही त्याचा मोठा फटका बसला असून लाखोचे नुकसान झाले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

December 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VrOIb3
Read More