Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, July 7, 2020

मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार - अशोक चव्हाण

मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार - अशोक चव्हाण

July 07, 2020 0 Comments
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात या विधेयकाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. परंतु, न्यायालयाने त्यांना कोणताही दि...
Read More
मशिन्सची खरेदी थांबविण्याचा केंद्राला आदेश; पुणेकर उद्योजकाचीही याचिका

पुणे - मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, स्वदेशीचा गाजावाजा करणाऱ्या केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाला दिल्ली उच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे. हे मंत्रालय खरेदी करीत असलेल्या मशिन्समध्ये स्थानिक उद्योगांना डावलून परदेशातील कंपन्यांना पायघड्या घातल्या जात आहेत, याबद्दल उद्योजकांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने केंद्राला खरेदी तूर्त थांबविण्याचा आदेश दिला आहे. पुण्यातील एका उद्योजकानेही दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ आणि कंपन्यांना मशिन टूल्स पुरविण्यासाठी केंद्र सरकारने देशात १५ टूल रूम आणि ट्रेनिंग सेंटर तयार केले. त्यासाठी १०० कोटी रुपयांची विविध मशिन टूल्स आणि मेजरिंग मशिन्स खरेदी करण्यासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने निविदा मागविल्या. त्यातील अटी परदेशातील कंपन्यांना पूरक असून देशातील एकही लघु आणि मध्यम उद्योग त्यात पात्र ठरणार नाही, अशा पद्धतीने त्या तयार केल्या आहेत. याबाबत महाराष्ट्रातील उद्योजकांनी लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांना तीन वेळा साकडे घातले आहे. तसेच, राजकोटमधील मॅकपॉवर, बंगळूरमधील भारत फ्रिटज वॉर्नर (बीएफडब्ल्यू) आणि पुण्यातील ॲक्‍युरेट गेजिंग अँड इन्स्ट्रुमेंट्‌स या कंपन्यांनी संबंधित मंत्रालयाविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यात मॅकपॉवरच्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादरीकरणाचा आदेश दिला असून तो पर्यंत मशिन्सची खरेदी करू नये, असा आदेश सोमवारी दिला. अन्य दोन याचिकांवरील सुनावणी प्रलंबित आहे. 

अजित पवारांनी दिली मोठी बातमी; राज्यात पोलिस शिपाई संवर्गातील 10 हजार जागा भरणार

मंत्रीस्तरावरून हालचाली गरजेच्या
केंद्रीय मंत्री गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील कंपन्यांची मशिन टूल्स अमेरिका, जर्मनी, इटली व रशियालाही निर्यात होत आहेत. त्यामुळे भारतीय उद्योगांना मदत करण्यासाठी मंत्रिस्तरावरूनच हालचाली होणे गरजेचे आहे. भारतीय कंपन्यांनी तयार केलेल्या मशिन टूल्सच्या दर्जाबद्दल काही संशय असेल तर, सेंट्रल टूल्स मशिन इन्स्टिट्यूट (सीएमटीआय), नॅशनल फिजिकल लॅब (एनपीएल) आणि इंडियन मशिन टूल मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन (आयएमटीएमए) यांची संयुक्त समिती स्थापन करून खात्री करून घ्यावी.

गोंधळात गोंधळ! आता या मनोरुग्णाकडे कुठून आला पीपीई किट? रस्त्यावर मुक्त वावर...

देशातील कंपन्यांची उत्पादने पाश्‍चिमात्य देशांच्या तुलनेत चांगल्या दर्जाची असून त्यांची किंमतही कमी आहे. देशातील लघु व मध्यम उद्योजक सुमारे १४०० प्रकारची मशिन टूल्स जीई, कावासाकी, बार्क अँड व्हिएसएससी, वोक्‍सवॅगन, टाटा, बोश्‍च आदी राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना पुरवीत आहेत. 
- विक्रम साळुंखे, ॲक्‍युरेट गेजिंग अँड इन्स्ट्रुमेंट्‌स कंपनी, पुणे 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मशिन्सची खरेदी थांबविण्याचा केंद्राला आदेश; पुणेकर उद्योजकाचीही याचिका पुणे - मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, स्वदेशीचा गाजावाजा करणाऱ्या केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाला दिल्ली उच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे. हे मंत्रालय खरेदी करीत असलेल्या मशिन्समध्ये स्थानिक उद्योगांना डावलून परदेशातील कंपन्यांना पायघड्या घातल्या जात आहेत, याबद्दल उद्योजकांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने केंद्राला खरेदी तूर्त थांबविण्याचा आदेश दिला आहे. पुण्यातील एका उद्योजकानेही दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ आणि कंपन्यांना मशिन टूल्स पुरविण्यासाठी केंद्र सरकारने देशात १५ टूल रूम आणि ट्रेनिंग सेंटर तयार केले. त्यासाठी १०० कोटी रुपयांची विविध मशिन टूल्स आणि मेजरिंग मशिन्स खरेदी करण्यासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने निविदा मागविल्या. त्यातील अटी परदेशातील कंपन्यांना पूरक असून देशातील एकही लघु आणि मध्यम उद्योग त्यात पात्र ठरणार नाही, अशा पद्धतीने त्या तयार केल्या आहेत. याबाबत महाराष्ट्रातील उद्योजकांनी लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांना तीन वेळा साकडे घातले आहे. तसेच, राजकोटमधील मॅकपॉवर, बंगळूरमधील भारत फ्रिटज वॉर्नर (बीएफडब्ल्यू) आणि पुण्यातील ॲक्‍युरेट गेजिंग अँड इन्स्ट्रुमेंट्‌स या कंपन्यांनी संबंधित मंत्रालयाविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यात मॅकपॉवरच्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादरीकरणाचा आदेश दिला असून तो पर्यंत मशिन्सची खरेदी करू नये, असा आदेश सोमवारी दिला. अन्य दोन याचिकांवरील सुनावणी प्रलंबित आहे.  अजित पवारांनी दिली मोठी बातमी; राज्यात पोलिस शिपाई संवर्गातील 10 हजार जागा भरणार मंत्रीस्तरावरून हालचाली गरजेच्या केंद्रीय मंत्री गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशातील कंपन्यांची मशिन टूल्स अमेरिका, जर्मनी, इटली व रशियालाही निर्यात होत आहेत. त्यामुळे भारतीय उद्योगांना मदत करण्यासाठी मंत्रिस्तरावरूनच हालचाली होणे गरजेचे आहे. भारतीय कंपन्यांनी तयार केलेल्या मशिन टूल्सच्या दर्जाबद्दल काही संशय असेल तर, सेंट्रल टूल्स मशिन इन्स्टिट्यूट (सीएमटीआय), नॅशनल फिजिकल लॅब (एनपीएल) आणि इंडियन मशिन टूल मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन (आयएमटीएमए) यांची संयुक्त समिती स्थापन करून खात्री करून घ्यावी. गोंधळात गोंधळ! आता या मनोरुग्णाकडे कुठून आला पीपीई किट? रस्त्यावर मुक्त वावर... देशातील कंपन्यांची उत्पादने पाश्‍चिमात्य देशांच्या तुलनेत चांगल्या दर्जाची असून त्यांची किंमतही कमी आहे. देशातील लघु व मध्यम उद्योजक सुमारे १४०० प्रकारची मशिन टूल्स जीई, कावासाकी, बार्क अँड व्हिएसएससी, वोक्‍सवॅगन, टाटा, बोश्‍च आदी राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना पुरवीत आहेत.  - विक्रम साळुंखे, ॲक्‍युरेट गेजिंग अँड इन्स्ट्रुमेंट्‌स कंपनी, पुणे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZMC9bV
Read More
"देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी'

पवनी : फिरत्या चाकावर ओल्या मातीला हाताने आकार देऊन कुंभार नानाविध भांडी तयार करतो. त्याच हाताने मातीतून देवाच्या सर्वांगसुंदर मूर्ती घडविल्या जातात. या पारंपरिक व्यवसायावरच शेकडो कुटुंबाच्या घरातील दोनवेळची चूल पेटते. परंतु, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या व्यवसायाला मोठी झळ बसली आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेली होरपळ संपलेली नाही. त्यामुळे उद्विग्न होऊन "देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, माझ्या या जिवाची आग लागू दे तुझ्या उरी' अशी आर्त साद मूर्ती घडविणारे कारागीर देवाला घालत आहेत.

कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसायसुद्धा त्यातून सुटलेला नाही. दररोज कष्ट करून, घाम गाळून राबणाऱ्या लोकांच्या या व्यवसायाची टाळेबंदीच्या काळात पूर्णपणे वाट लागली. मार्च महिन्यापासून उन्हाळा सुरू होतो. चार महिन्यांच्या कालावधीत माठ, सुरई, घागर ही थंड पाण्याची भांडी विकली जातात. याच काळात लग्नसराई असते. वैवाहिक कार्यक्रमासाठी कुंभारांकडून खास घंगाळ व मातीची भांडी तयार करवून घेतली जातात. परंतु, लॉकडाऊनच्या काळात हा धंदा पूर्णपणे बुडाला.

मातीचे तयार माठ न विकले गेल्याने कुंभारवाडीत हजारो रुपयांचा माल पडून आहे. माल ठेवायला जागा नाही. वर्षभर हे नाजूक सामान सांभाळून ठेवणे जोखमीचे काम आहे. माठ फुटल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. आता कुंभारांची उरलीसुरली भिस्त कान्होबा, गणेशोत्सव, नवरात्र व दिवाळीवर अवलंबून आहे. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवावरही नियंत्रण येणार आहे. त्यामुळे ही मंडळी घरगुती प्रतिष्ठापनेसाठी तयार होणाऱ्या मूर्ती घडविण्याच्या तयारीला लागले आहेत.

पोळा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव महिन्याभरावर आहे. निदान या काळात तरी आतापर्यंत झालेले नुकसान देवाच्या कृपेने भरून निघेल, अशी अपेक्षा त्यांना आहे. घरगुती गणेश मूर्ती, श्रीकृष्ण, गोपिका, यांच्या मूर्ती बनविण्यात कुंभार समाज बांधव व्यस्त झाले आहेत. टाळेबंदीमुळे चार फुटांच्या वर मूर्ती बसविण्यास गणेशोत्सव मंडळांना मनाई आहे. त्यामुळे शहरातील मोठे मूर्तिकारसुद्धा घरगुती लहान मूर्ती तयार करण्यात सारी मगरळ व निराशा झटकून कामाला लागले आहेत.

 

श्रमाचे मिळेना मोल

शहरातील नेताजी वॉर्डात वरवाडे व खडसे हे कुंभार समाजाचे कुटुंब मातीची मडकी, भांडी, दिवे, कुंडी व देवदेवतांच्या मूर्ती तयार करतात. महागाईच्या काळात मातीचे साहित्य विकणे कठीण झाले आहे. मेहनत जास्त आणि मिळकत कमी असा प्रकार आहे. शहरालगतच्या तलावातून कुंभार उन्हाळ्यातच माती आणून ठेवतात. तलावात पाणी राहत असल्याने माती मिळत नाही. काही खासगी जागेवरून माती आणली जाते. मात्र, मनाई केल्याने तोही मार्ग बंद झाल्याचे प्रतिभा वरवाडे यांनी सांगितले. मातीची भांडी भट्टीत तापविली जातात. त्यासाठी काड्या विकत घ्याव्या लागतात. उत्पादन खर्च अधिक आणि मोल कमी अशा अडचणींमुळे नव्या पिढीतील तरुण व्यवसायापासून दुरावल्याचे वसंता वरवाडे यांनी सांगितले.

अवश्य वाचा- रेल्वेतून पार्सल पाठवताय्‌ जरा सावध व्हा, हे प्रकार वाढले

घरगुती मूर्ती घडविण्यावर भर
दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात पाच ते दहा मोठ्या मूर्तींची ऑर्डर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून प्राप्त होते. आतापर्यंत एकच ऑर्डर आली. परंतु, कोरोना व लॉकडाउनमुळे यावेळी ही शक्‍यता फारच कमी आहे. त्यामुळे यंदा घरगुती गणेश व कान्होबा यांच्या मूर्ती घडविण्यावर भर आहे.
-प्रभाकर आरमोरीकर, मूर्तिकार, आझाद चौक

पुढील सणासुदीवर वर्षभराचे अर्थकारण
यावर्षी कोरोना व लॉकडाऊनमुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला. गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही आपले पोट कसे भरतो ते आम्हालाच ठाऊक. माझी तीन मुलेसुद्धा याच व्यवसायात आहेत. अत्यंत बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. वृद्ध असूनही कोणापुढे मदतीसाठी हात पसरले नाहीत. पुढील काळात देवांच्या सणाला सुरुवात होत आहे. आता त्यावरच आमचा पुढचा रोजगार अवलंबून आहे.
-राजाराम वरवाडे

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

"देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी' पवनी : फिरत्या चाकावर ओल्या मातीला हाताने आकार देऊन कुंभार नानाविध भांडी तयार करतो. त्याच हाताने मातीतून देवाच्या सर्वांगसुंदर मूर्ती घडविल्या जातात. या पारंपरिक व्यवसायावरच शेकडो कुटुंबाच्या घरातील दोनवेळची चूल पेटते. परंतु, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या व्यवसायाला मोठी झळ बसली आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेली होरपळ संपलेली नाही. त्यामुळे उद्विग्न होऊन "देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी, माझ्या या जिवाची आग लागू दे तुझ्या उरी' अशी आर्त साद मूर्ती घडविणारे कारागीर देवाला घालत आहेत. कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसायसुद्धा त्यातून सुटलेला नाही. दररोज कष्ट करून, घाम गाळून राबणाऱ्या लोकांच्या या व्यवसायाची टाळेबंदीच्या काळात पूर्णपणे वाट लागली. मार्च महिन्यापासून उन्हाळा सुरू होतो. चार महिन्यांच्या कालावधीत माठ, सुरई, घागर ही थंड पाण्याची भांडी विकली जातात. याच काळात लग्नसराई असते. वैवाहिक कार्यक्रमासाठी कुंभारांकडून खास घंगाळ व मातीची भांडी तयार करवून घेतली जातात. परंतु, लॉकडाऊनच्या काळात हा धंदा पूर्णपणे बुडाला. मातीचे तयार माठ न विकले गेल्याने कुंभारवाडीत हजारो रुपयांचा माल पडून आहे. माल ठेवायला जागा नाही. वर्षभर हे नाजूक सामान सांभाळून ठेवणे जोखमीचे काम आहे. माठ फुटल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. आता कुंभारांची उरलीसुरली भिस्त कान्होबा, गणेशोत्सव, नवरात्र व दिवाळीवर अवलंबून आहे. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवावरही नियंत्रण येणार आहे. त्यामुळे ही मंडळी घरगुती प्रतिष्ठापनेसाठी तयार होणाऱ्या मूर्ती घडविण्याच्या तयारीला लागले आहेत. पोळा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव महिन्याभरावर आहे. निदान या काळात तरी आतापर्यंत झालेले नुकसान देवाच्या कृपेने भरून निघेल, अशी अपेक्षा त्यांना आहे. घरगुती गणेश मूर्ती, श्रीकृष्ण, गोपिका, यांच्या मूर्ती बनविण्यात कुंभार समाज बांधव व्यस्त झाले आहेत. टाळेबंदीमुळे चार फुटांच्या वर मूर्ती बसविण्यास गणेशोत्सव मंडळांना मनाई आहे. त्यामुळे शहरातील मोठे मूर्तिकारसुद्धा घरगुती लहान मूर्ती तयार करण्यात सारी मगरळ व निराशा झटकून कामाला लागले आहेत.   श्रमाचे मिळेना मोल शहरातील नेताजी वॉर्डात वरवाडे व खडसे हे कुंभार समाजाचे कुटुंब मातीची मडकी, भांडी, दिवे, कुंडी व देवदेवतांच्या मूर्ती तयार करतात. महागाईच्या काळात मातीचे साहित्य विकणे कठीण झाले आहे. मेहनत जास्त आणि मिळकत कमी असा प्रकार आहे. शहरालगतच्या तलावातून कुंभार उन्हाळ्यातच माती आणून ठेवतात. तलावात पाणी राहत असल्याने माती मिळत नाही. काही खासगी जागेवरून माती आणली जाते. मात्र, मनाई केल्याने तोही मार्ग बंद झाल्याचे प्रतिभा वरवाडे यांनी सांगितले. मातीची भांडी भट्टीत तापविली जातात. त्यासाठी काड्या विकत घ्याव्या लागतात. उत्पादन खर्च अधिक आणि मोल कमी अशा अडचणींमुळे नव्या पिढीतील तरुण व्यवसायापासून दुरावल्याचे वसंता वरवाडे यांनी सांगितले. अवश्य वाचा- रेल्वेतून पार्सल पाठवताय्‌ जरा सावध व्हा, हे प्रकार वाढले घरगुती मूर्ती घडविण्यावर भर दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात पाच ते दहा मोठ्या मूर्तींची ऑर्डर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून प्राप्त होते. आतापर्यंत एकच ऑर्डर आली. परंतु, कोरोना व लॉकडाउनमुळे यावेळी ही शक्‍यता फारच कमी आहे. त्यामुळे यंदा घरगुती गणेश व कान्होबा यांच्या मूर्ती घडविण्यावर भर आहे. -प्रभाकर आरमोरीकर, मूर्तिकार, आझाद चौक पुढील सणासुदीवर वर्षभराचे अर्थकारण यावर्षी कोरोना व लॉकडाऊनमुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला. गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही आपले पोट कसे भरतो ते आम्हालाच ठाऊक. माझी तीन मुलेसुद्धा याच व्यवसायात आहेत. अत्यंत बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. वृद्ध असूनही कोणापुढे मदतीसाठी हात पसरले नाहीत. पुढील काळात देवांच्या सणाला सुरुवात होत आहे. आता त्यावरच आमचा पुढचा रोजगार अवलंबून आहे. -राजाराम वरवाडे News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Ce0bEQ
Read More
महाविद्यालयांची ग्रंथालयेही होणार आता ऑनलाइन

पुणे - कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण अनिवार्य झाले असताना महाविद्यालये, विद्यापीठांच्या ग्रंथालयांमध्येही बदल होत आहे. विद्यार्थी, प्राध्यापकांना जास्तीत जास्त ऑनलाइन ई साहित्य देण्यासाठी प्रयत्न सुरू असून ग्रंथपालांना प्रशिक्षण देऊन सज्ज केले जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उच्च शिक्षणात अभ्यासक्रमासह जास्तीत जास्त पुस्तकांचा संदर्भ घेऊन त्यातून ज्ञान घेण्यास महत्त्व असते.  यासाठी पुस्तके, शोधनिबंध, लेखमाला यांचा आधार घेतला जातो. ‘कोरोना’मुळे मार्चपासून महाविद्यालये, विद्यापीठे बंद आहेत. आता नवीन वर्षात अभ्यासक्रम शिकविण्यासाठी ऑनलाइन क्‍लासचा पर्याय समोर येत आहे. बहुतांश विद्यार्थी हे दुसऱ्या शहरात शिकत असल्याने व ते आता गावाकडे आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी ग्रंथालयात जाणे आवश्‍यक आहे.

राज्य सरकारमध्ये खरचं अस्वस्थता आहे का? वाचा शरद पवार यांचं उत्तर

तसेच अभ्यासासाठी साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे महाविद्यालये व विद्यापीठातील ग्रंथालयांना ऑनलाइन पोर्टलचा वापर करणे अनिवार्य झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाने लॉकडॉउनमध्ये यासाठी काम केले. तसेच विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना घरातून ऑनलाइन पुस्तके, जर्नल्स उपलब्ध व्हावीत, यासाठी लॉग ईनद्वारे ॲक्‍सेसही दिला होता.

वीजग्राहकांनी एका महिन्यात भरले तब्बल एवढे कोटी

ग्रंथपालांना प्रशिक्षण
भविष्यात ग्रंथालयांचे काम ऑनलाइन चालणार असल्याने विद्यीपाठ अनुदान आयोग (यूजीसी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यीपीठ आणि सेंट व्हिसेंट वाणिज्य महाविद्यालयाने दोन आठवड्यांचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम घेतला. त्यात लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम, ई सामग्री आणि वाड:मय चौर्य, शैक्षणिक व्हिडिओ संपादन, इ सामग्री निर्मितीसाठी ब्रॉडकास्टिंग सॉफ्टवेअर, योग्य संदर्भ पुस्तक देणे यासह अन्यबाबींचे प्रशिक्षण दिले. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, केरळ,  पश्‍चिम बंगाल, पंजाब, छत्तीसगड, गुजरात, तेलंगणासह अन्य राज्यांतून ३६७ ग्रंथपालांनी भाग घेतला होता. 

कोरोनामुळे शिक्षण पद्धतीत बदल होत असताना ग्रंथालयातही बदल होणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने ग्रंथपालांना प्रशिक्षण दिले. पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयातही ऑनलाइन सामग्री मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली आहे. त्याचाही लाभ विद्यार्थी, प्राध्यापकांना होणार आहे.
- डॉ. संजीव सोनवणे, अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पुणे विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय जर्नल्स, इ बुक, यासह कॅपीराईटमुक्त पुस्तके, हस्तलिखिते विद्यार्थी, प्राध्यापकांना ऑनलाइन दिली आहेत. यामध्ये ८ हजार जर्नल्स, ९ हजार पेक्षा ई बुक्‍सचा समावेश आहे.
- नागेश लोंढे, सहाय्यक ग्रंथपाल, जयकर ग्रंथालय

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महाविद्यालयांची ग्रंथालयेही होणार आता ऑनलाइन पुणे - कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण अनिवार्य झाले असताना महाविद्यालये, विद्यापीठांच्या ग्रंथालयांमध्येही बदल होत आहे. विद्यार्थी, प्राध्यापकांना जास्तीत जास्त ऑनलाइन ई साहित्य देण्यासाठी प्रयत्न सुरू असून ग्रंथपालांना प्रशिक्षण देऊन सज्ज केले जात आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा उच्च शिक्षणात अभ्यासक्रमासह जास्तीत जास्त पुस्तकांचा संदर्भ घेऊन त्यातून ज्ञान घेण्यास महत्त्व असते.  यासाठी पुस्तके, शोधनिबंध, लेखमाला यांचा आधार घेतला जातो. ‘कोरोना’मुळे मार्चपासून महाविद्यालये, विद्यापीठे बंद आहेत. आता नवीन वर्षात अभ्यासक्रम शिकविण्यासाठी ऑनलाइन क्‍लासचा पर्याय समोर येत आहे. बहुतांश विद्यार्थी हे दुसऱ्या शहरात शिकत असल्याने व ते आता गावाकडे आहेत. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी ग्रंथालयात जाणे आवश्‍यक आहे. राज्य सरकारमध्ये खरचं अस्वस्थता आहे का? वाचा शरद पवार यांचं उत्तर तसेच अभ्यासासाठी साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे महाविद्यालये व विद्यापीठातील ग्रंथालयांना ऑनलाइन पोर्टलचा वापर करणे अनिवार्य झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाने लॉकडॉउनमध्ये यासाठी काम केले. तसेच विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना घरातून ऑनलाइन पुस्तके, जर्नल्स उपलब्ध व्हावीत, यासाठी लॉग ईनद्वारे ॲक्‍सेसही दिला होता. वीजग्राहकांनी एका महिन्यात भरले तब्बल एवढे कोटी ग्रंथपालांना प्रशिक्षण भविष्यात ग्रंथालयांचे काम ऑनलाइन चालणार असल्याने विद्यीपाठ अनुदान आयोग (यूजीसी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यीपीठ आणि सेंट व्हिसेंट वाणिज्य महाविद्यालयाने दोन आठवड्यांचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम घेतला. त्यात लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम, ई सामग्री आणि वाड:मय चौर्य, शैक्षणिक व्हिडिओ संपादन, इ सामग्री निर्मितीसाठी ब्रॉडकास्टिंग सॉफ्टवेअर, योग्य संदर्भ पुस्तक देणे यासह अन्यबाबींचे प्रशिक्षण दिले. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, केरळ,  पश्‍चिम बंगाल, पंजाब, छत्तीसगड, गुजरात, तेलंगणासह अन्य राज्यांतून ३६७ ग्रंथपालांनी भाग घेतला होता.  कोरोनामुळे शिक्षण पद्धतीत बदल होत असताना ग्रंथालयातही बदल होणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने ग्रंथपालांना प्रशिक्षण दिले. पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयातही ऑनलाइन सामग्री मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली आहे. त्याचाही लाभ विद्यार्थी, प्राध्यापकांना होणार आहे. - डॉ. संजीव सोनवणे, अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय जर्नल्स, इ बुक, यासह कॅपीराईटमुक्त पुस्तके, हस्तलिखिते विद्यार्थी, प्राध्यापकांना ऑनलाइन दिली आहेत. यामध्ये ८ हजार जर्नल्स, ९ हजार पेक्षा ई बुक्‍सचा समावेश आहे. - नागेश लोंढे, सहाय्यक ग्रंथपाल, जयकर ग्रंथालय News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Zax9z0
Read More
लॉकडाउनने कुणाचे बिघडवले आरोग्य ! सविस्तर वाचा 

नागपूर : कुणाल वाचनेकर यांनी लाखो रुपये खर्च करून चार-पाच महिन्यांपूर्वी माधवनगरमध्ये जिम सुरू केला. शहरात फिटनेसचे "फॅड' वाढत चालल्याने हाती दोन पैसे येतील, अशी त्यांना आशा होती. मात्र उद्‌घाटन होऊन जेमतेम 40 दिवस लोटत नाही तोच लॉकडाउन लागला आणि सर्व आशेवर पाणी फिरले. व्यवसायाची गाडी रुळावर येण्यापूर्वीच रुळावरून घसरली. कोरोनाचा मार बसल्याचे हे एकमेव उदाहरण नाही. शहरातील शेकडो जिम व फिटनेस क्‍लब्सला कोरोनाचा फटका बसला. 

काही महिन्यांपूर्वी दुसऱ्याच्या जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करणारे व राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू असलेले कुणाल यांनी रोजगारासोबतच नागपूरकरांचे स्वास्थ्य सुधारण्याच्या उद्‌देशाने स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. जवळची थोडीफार जमापूंजी व कर्ज काढून "एक्‍स्ट्रा एज फिटनेस' नावाचा जिम उघडला. गेल्या दोन फेब्रुवारीला "मिस्टर युनिव्हर्स' किताब विजेता संग्राम चौगुले यांच्या हस्ते जिमचे थाटात उद्‌घाटनही झाले. व्यवसाय सुरू होऊन सव्वा महिना होत नाही तोच 13 मार्चला देशात लॉकडाउन लागला. तेव्हापासून जिमला कुलुप लागले. एका पैशाचीही कमाई नाही. त्यामुळे बॅंकेचे ईएमआय, भरमसाठ किराया, इलेक्‍ट्रिक बिल, ट्रेनर्स व कर्मचाऱ्यांचा पगार, मेंटेनन्ससाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. किराया थकल्याने घरमालकाने जिमला कुलुप ठोकले. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशाची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा मार्गही नाही. 

इनडोअर सभागृह सरावासाठी खुले करा हो !  प्रशिक्षकांचे प्रशासनाकडे आर्जव 
 

जिम बंद असल्यामुळे केवळ मालकच आर्थिक अडचणीत नाही, तर त्यावर उदरनिर्वाह असलेले कर्मचारीही बेरोजगार झाले आहेत. दैनंदिन खर्चासाठी पैसे नसल्यामुळे ते नैराश्‍येच्या वातावरणात आहेत. सध्याच्या घडीला शहराच्या विविध भागांत पाचशेच्या वर छोटेमोठे जिम व फिटनेस क्‍लब आहेत. कमीकधिक प्रमाणात त्यांचीही हीच अवस्था आहे. जिम मालकांच्या असोसिएशनने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्‌धव ठाकरे, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्‍तांना पत्र दिले. परंतु, अजूनपर्यंत यावर निर्णय झाला नाही. सरकारने अनेक दुकानांना परवानगी दिली. त्याचप्रमाणे जिमलाही हिरवी झेंडी दाखवावी, अशी त्यांची मागणी आहे.  

 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाउनने कुणाचे बिघडवले आरोग्य ! सविस्तर वाचा  नागपूर : कुणाल वाचनेकर यांनी लाखो रुपये खर्च करून चार-पाच महिन्यांपूर्वी माधवनगरमध्ये जिम सुरू केला. शहरात फिटनेसचे "फॅड' वाढत चालल्याने हाती दोन पैसे येतील, अशी त्यांना आशा होती. मात्र उद्‌घाटन होऊन जेमतेम 40 दिवस लोटत नाही तोच लॉकडाउन लागला आणि सर्व आशेवर पाणी फिरले. व्यवसायाची गाडी रुळावर येण्यापूर्वीच रुळावरून घसरली. कोरोनाचा मार बसल्याचे हे एकमेव उदाहरण नाही. शहरातील शेकडो जिम व फिटनेस क्‍लब्सला कोरोनाचा फटका बसला.  काही महिन्यांपूर्वी दुसऱ्याच्या जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करणारे व राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू असलेले कुणाल यांनी रोजगारासोबतच नागपूरकरांचे स्वास्थ्य सुधारण्याच्या उद्‌देशाने स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. जवळची थोडीफार जमापूंजी व कर्ज काढून "एक्‍स्ट्रा एज फिटनेस' नावाचा जिम उघडला. गेल्या दोन फेब्रुवारीला "मिस्टर युनिव्हर्स' किताब विजेता संग्राम चौगुले यांच्या हस्ते जिमचे थाटात उद्‌घाटनही झाले. व्यवसाय सुरू होऊन सव्वा महिना होत नाही तोच 13 मार्चला देशात लॉकडाउन लागला. तेव्हापासून जिमला कुलुप लागले. एका पैशाचीही कमाई नाही. त्यामुळे बॅंकेचे ईएमआय, भरमसाठ किराया, इलेक्‍ट्रिक बिल, ट्रेनर्स व कर्मचाऱ्यांचा पगार, मेंटेनन्ससाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. किराया थकल्याने घरमालकाने जिमला कुलुप ठोकले. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशाची वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा मार्गही नाही.  इनडोअर सभागृह सरावासाठी खुले करा हो !  प्रशिक्षकांचे प्रशासनाकडे आर्जव    जिम बंद असल्यामुळे केवळ मालकच आर्थिक अडचणीत नाही, तर त्यावर उदरनिर्वाह असलेले कर्मचारीही बेरोजगार झाले आहेत. दैनंदिन खर्चासाठी पैसे नसल्यामुळे ते नैराश्‍येच्या वातावरणात आहेत. सध्याच्या घडीला शहराच्या विविध भागांत पाचशेच्या वर छोटेमोठे जिम व फिटनेस क्‍लब आहेत. कमीकधिक प्रमाणात त्यांचीही हीच अवस्था आहे. जिम मालकांच्या असोसिएशनने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्‌धव ठाकरे, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्‍तांना पत्र दिले. परंतु, अजूनपर्यंत यावर निर्णय झाला नाही. सरकारने अनेक दुकानांना परवानगी दिली. त्याचप्रमाणे जिमलाही हिरवी झेंडी दाखवावी, अशी त्यांची मागणी आहे.       News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3ed3sRP
Read More

Monday, July 6, 2020

निर्णयाची वाट न बघता, स्वयंस्फुर्तीने पाळला "लॉकडाऊन' 

इचलकरंजी : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढताना अनेक घटकांनी लॉकडाउनची प्रतिक्षा केलीच नाही. शहराला वाचवण्यासाठी उत्स्फूर्तपणे आपापला व्यवसाय बंद करून प्रशासन व राजकीय लोकांच्या निर्णयापुढे नागरिकांनीच एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरातील या घटकांनी घेतलेला हा निर्णय नागरिकांच्यातही कौतुकास्पद ठरला. 

शहरात गेले 15 दिवस कोरोनाच्या रूग्णात प्रचंड वाढ झाली आहे. दररोज सरासरी 3 ते 11 रूग्ण शहरात सापडले आहेत. अनेक ठिकाणी संसर्ग झाल्याने संपूर्ण भागात कोरोनाचे रूग्ण दिसू लागले. वास्तविक प्रशासनाने कडक भूमिका न घेतल्याने अनेक नागरिक बिनधास्तपणे आणि कोणतीही सुरक्षितता न बाळगता फिरू लागले. याचा परिणाम रूग्ण वाढण्यावर झाला. वास्तविक प्रशासन इचलकरंजी संपूर्ण लॉकडाउन करेल अशी नागरिकांची मानसिकता होती. बहुतांश घटक इचलकरंजी वाचवण्यासाठी लॉकडाउन होणे गरजेचे आहे याचीच मागणी करत होते. मात्र शहराचा हा निर्णय विविध पातळ्यांच्या चर्चेवरच फिरत राहिला. त्यामुळे नागरिकांच्यात एकूणच या निर्णयावरून नाराजीचा सूर कायम होता. 

संसर्ग अधिकच वाढत असल्याने अनेक संघटना पुढे आल्या. प्रशासनाने निर्णय जाहीर करण्यापूर्वीच शहरातील नाभिक संघटना, सुवर्णकार संघटना, इलेक्‍ट्रॉनिक विक्री करणाऱ्या दुकानदारांची संघटना यासह अनेकांनी शहरातील व्यवहार काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही अनेकांनी कालपासूनच सुरू केली आहे. 
शहर वाचविण्यासाठी प्रशासनाची वाट न पाहता विविध घटकांनी टाकलेले हे पाऊल निश्‍चितच कौतुकास्पद ठरले आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी अशा अनेक घटकांनी पुढाकार घेतल्यास नक्कीच काही प्रश्‍नावर नागरिकच मार्ग काढतील अशी आशा निर्माण झाली आहे. 

दृष्टिक्षेप   
- इचलकरंजीत 15 दिवसांपासून वाढताहेत रूग्ण 
- दररोज आढळताहेत सरासरी 3 ते 11 रूग्ण 
- विविध संघटनांनी पुढाकार घेत व्यवसाय केले बंद 
- प्रशासनाने कठोर भूमिका न घेतल्याने नागरिक फिरत होते बिनधास्त 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

निर्णयाची वाट न बघता, स्वयंस्फुर्तीने पाळला "लॉकडाऊन'  इचलकरंजी : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढताना अनेक घटकांनी लॉकडाउनची प्रतिक्षा केलीच नाही. शहराला वाचवण्यासाठी उत्स्फूर्तपणे आपापला व्यवसाय बंद करून प्रशासन व राजकीय लोकांच्या निर्णयापुढे नागरिकांनीच एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरातील या घटकांनी घेतलेला हा निर्णय नागरिकांच्यातही कौतुकास्पद ठरला.  शहरात गेले 15 दिवस कोरोनाच्या रूग्णात प्रचंड वाढ झाली आहे. दररोज सरासरी 3 ते 11 रूग्ण शहरात सापडले आहेत. अनेक ठिकाणी संसर्ग झाल्याने संपूर्ण भागात कोरोनाचे रूग्ण दिसू लागले. वास्तविक प्रशासनाने कडक भूमिका न घेतल्याने अनेक नागरिक बिनधास्तपणे आणि कोणतीही सुरक्षितता न बाळगता फिरू लागले. याचा परिणाम रूग्ण वाढण्यावर झाला. वास्तविक प्रशासन इचलकरंजी संपूर्ण लॉकडाउन करेल अशी नागरिकांची मानसिकता होती. बहुतांश घटक इचलकरंजी वाचवण्यासाठी लॉकडाउन होणे गरजेचे आहे याचीच मागणी करत होते. मात्र शहराचा हा निर्णय विविध पातळ्यांच्या चर्चेवरच फिरत राहिला. त्यामुळे नागरिकांच्यात एकूणच या निर्णयावरून नाराजीचा सूर कायम होता.  संसर्ग अधिकच वाढत असल्याने अनेक संघटना पुढे आल्या. प्रशासनाने निर्णय जाहीर करण्यापूर्वीच शहरातील नाभिक संघटना, सुवर्णकार संघटना, इलेक्‍ट्रॉनिक विक्री करणाऱ्या दुकानदारांची संघटना यासह अनेकांनी शहरातील व्यवहार काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही अनेकांनी कालपासूनच सुरू केली आहे.  शहर वाचविण्यासाठी प्रशासनाची वाट न पाहता विविध घटकांनी टाकलेले हे पाऊल निश्‍चितच कौतुकास्पद ठरले आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी अशा अनेक घटकांनी पुढाकार घेतल्यास नक्कीच काही प्रश्‍नावर नागरिकच मार्ग काढतील अशी आशा निर्माण झाली आहे.  दृष्टिक्षेप    - इचलकरंजीत 15 दिवसांपासून वाढताहेत रूग्ण  - दररोज आढळताहेत सरासरी 3 ते 11 रूग्ण  - विविध संघटनांनी पुढाकार घेत व्यवसाय केले बंद  - प्रशासनाने कठोर भूमिका न घेतल्याने नागरिक फिरत होते बिनधास्त  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3f7qJ94
Read More
व्वा...आणखी सात जण पडले कोरोनाला भारी

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आणखी 7 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केल्याने आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 179 झाली आहे, तर जिल्ह्यात सक्रिय रुग्ण 58 राहिले आहेत. दरम्यान, अजून 28 कोरोना संशयित उपचाराखाली आहेत. जिल्ह्यात सध्या 30 कंटेन्मेंट झोन सक्रिय असून यांतील 20 झोन कणकवली तालुक्‍यात आहेत. 

जिल्ह्यात काल (ता. 5) रात्री आणखी एक कोरोना रुग्ण मिळाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 243 झाली होती. हा नव्याने सापडलेला रुग्ण कणकवली तालुक्‍यातील नाटळ येथील आहे. जिल्ह्यात सध्या 30 कंटेन्मेंट झोन आहेत. यांतील 20 कणकवली, देवगड आणि मालवणमध्ये प्रत्येकी 3, वैभववाडी आणि कुडाळ येथे प्रत्येकी दोन अशाप्रकारे कंटेन्मेंट झोन आहेत. जिल्हा कोरोना तपासणी केंद्राला नव्याने 40 कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील एकूण नमुने संख्या 4 हजार 157 एवढी झाली आहे. यांतील 4 हजार 104 अहवाल प्राप्त झाले आहेत.

प्राप्त अहवालात 3 हजार 823 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 243 बाधित आले आहेत. बाधितांपैकी 179 बरे होऊन घरी परतले आहेत. पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एक उपचारासाठी मुंबई येथे गेले आहेत. परिणामी जिल्ह्यात सक्रिय रुग्ण 58 आहेत. जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात सध्या 86 रुग्ण उपचार घेत आहेत. 

डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असलेल्या जिल्हा रुग्णालयात सध्या 31 कोरोनाबाधित, तर 26 कोरोना संशयित उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 13 कोरोनाबाधित आणि 2 कोरोना संशयित उपचार घेत आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये 14 बाधित उपचार घेत आहेत. आज जिल्ह्यातील आरोग्य पथकाने एक हजार 229 व्यक्तींची आरोग्य तपासणी केली.

जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 50 व्यक्ती कमी झाल्याने 15 हजार 441 व्यक्ती राहिल्या आहेत. शासकीय संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये एक व्यक्ती वाढल्याने 32 संख्या झाली आहे. गाव पातळीवरील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 53 व्यक्ती कमी झाल्याने 12 हजार 915 व्यक्ती आहेत. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये मात्र 63 व्यक्ती वाढल्याने येथील संख्या 2 हजार 495 झाली आहे, तर 2 मे पासून जिल्ह्यात दाखल झालेल्यांची संख्या एक लाख 22 हजार 817 झाली आहे. 

आणखी दोन कंटेन्मेंट झोन 
मालवण तालुक्‍यातील आचरा-पिरावाडीचा 300 मीटर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. कणकवली तालुक्‍यातील खारेपाटण - कोष्टीवाडी येथील 1 किलोमीटर परिघातील 249 घरे, 292 कुटुंबे, तसेच 1 हजार 161 लोकसंख्या असणारा सर्व परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या कंटेन्मेंट झोनमध्ये 18 जुलैला रात्री 12 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे. या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे-जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

व्वा...आणखी सात जण पडले कोरोनाला भारी ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आणखी 7 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केल्याने आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 179 झाली आहे, तर जिल्ह्यात सक्रिय रुग्ण 58 राहिले आहेत. दरम्यान, अजून 28 कोरोना संशयित उपचाराखाली आहेत. जिल्ह्यात सध्या 30 कंटेन्मेंट झोन सक्रिय असून यांतील 20 झोन कणकवली तालुक्‍यात आहेत.  जिल्ह्यात काल (ता. 5) रात्री आणखी एक कोरोना रुग्ण मिळाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 243 झाली होती. हा नव्याने सापडलेला रुग्ण कणकवली तालुक्‍यातील नाटळ येथील आहे. जिल्ह्यात सध्या 30 कंटेन्मेंट झोन आहेत. यांतील 20 कणकवली, देवगड आणि मालवणमध्ये प्रत्येकी 3, वैभववाडी आणि कुडाळ येथे प्रत्येकी दोन अशाप्रकारे कंटेन्मेंट झोन आहेत. जिल्हा कोरोना तपासणी केंद्राला नव्याने 40 कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील एकूण नमुने संख्या 4 हजार 157 एवढी झाली आहे. यांतील 4 हजार 104 अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालात 3 हजार 823 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 243 बाधित आले आहेत. बाधितांपैकी 179 बरे होऊन घरी परतले आहेत. पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एक उपचारासाठी मुंबई येथे गेले आहेत. परिणामी जिल्ह्यात सक्रिय रुग्ण 58 आहेत. जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात सध्या 86 रुग्ण उपचार घेत आहेत.  डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असलेल्या जिल्हा रुग्णालयात सध्या 31 कोरोनाबाधित, तर 26 कोरोना संशयित उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 13 कोरोनाबाधित आणि 2 कोरोना संशयित उपचार घेत आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये 14 बाधित उपचार घेत आहेत. आज जिल्ह्यातील आरोग्य पथकाने एक हजार 229 व्यक्तींची आरोग्य तपासणी केली. जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 50 व्यक्ती कमी झाल्याने 15 हजार 441 व्यक्ती राहिल्या आहेत. शासकीय संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये एक व्यक्ती वाढल्याने 32 संख्या झाली आहे. गाव पातळीवरील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 53 व्यक्ती कमी झाल्याने 12 हजार 915 व्यक्ती आहेत. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये मात्र 63 व्यक्ती वाढल्याने येथील संख्या 2 हजार 495 झाली आहे, तर 2 मे पासून जिल्ह्यात दाखल झालेल्यांची संख्या एक लाख 22 हजार 817 झाली आहे.  आणखी दोन कंटेन्मेंट झोन  मालवण तालुक्‍यातील आचरा-पिरावाडीचा 300 मीटर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. कणकवली तालुक्‍यातील खारेपाटण - कोष्टीवाडी येथील 1 किलोमीटर परिघातील 249 घरे, 292 कुटुंबे, तसेच 1 हजार 161 लोकसंख्या असणारा सर्व परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या कंटेन्मेंट झोनमध्ये 18 जुलैला रात्री 12 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे. या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे-जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2DayTiY
Read More
मुंबई- कांदिवलीतून आल्या मायलेकी, अन् अख्खे गाव तत्काळ लाॅकडाउन

खारेपाटण (सिंधुदुर्ग) - मुंबई-कांदिवली येथून आलेल्या माय-लेकीस कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर येथील कोष्टी आळीसह बाजारपेठ परिसर सील करण्यात आला. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील काही व्यक्‍ती बाजारपेठेतही फिरल्या असल्याने शहरातही भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, बाजारपेठ बंद असली तरी ग्राहकांना कंटन्मेंट झोनच्या बाहेर जीवनावश्‍यक वस्तूंच्या पुरवठ्याची व्यवस्था केल्याची माहिती सरपंच रमाकांत राऊत यांनी दिली. 

खारेपाटण बसस्थानक आणि बाजारपेठेच्या मागील बाजूस असलेल्या कोष्टी आळीमध्ये 28 जून रोजी एक कुटुंब मुंबईतून आले होते. घरीच क्‍वारंटाईन असलेल्या या कुटुंबातील दोन सदस्यांचे स्वॅब अहवाल 3 जुलै रोजी घेण्यात आले. यात या दोन्ही व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर खारेपाटण शहरात खळबळ उडाली. दोन कोरोना रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कोष्टी आळीसह बाजारपेठ परिसर कंटन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.

त्यामुळे 18 जुलैपर्यंत कोष्टी आळीसह बाजारपेठेतील नागरिकांना बाहेर जाण्यास, तर बाहेरील व्यक्‍तींना बाजारपेठेस येण्यास मनाई असणार आहे. सिंधुदुर्गातील लॉकडाउन 8 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे गुरुवार (ता. 9) पासून पुन्हा बाजारपेठ सुरू होण्याची प्रतीक्षा खारेपाटणसह लगतच्या 30 गावांतील नागरिकांना होती; मात्र 18 जुलैपर्यंत बाजारपेठ बंद राहणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे. तसेच व्यापाऱ्यांनाही नुकसानीस सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. 

आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण 
खारेपाटण कोष्टी आळीतील त्या कोरोनाबाधितांच्या अति निकटच्या आणि निकटच्या संपर्कातील व्यक्‍तींचे स्वॅब नमुने आरोग्य विभागाने घेतले आहेत. याखेरीज आरोग्य सेवक प्रशांत बुचडे, प्रसाद मांजरेकर, विस्तार अधिकारी महादेव धवणे, वैद्यकीय अधिकारी प्रिया वडाम, पोलिस जमादार अनमोल रावराणे, सरपंच रमाकांत राऊत आदींच्या माध्यमातून शहरात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. 

कंटेन्मेंट झोनमुळे बाजारपेठ बंद राहणार असली तरी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी दक्षता घेत आहोत. शहरातील ग्राहकांनी व्यापाऱ्यांकडे जीवनावश्‍यक वस्तूंची यादी दिली तर त्या वस्तू कंटेन्मेंट झोनबाहेर उपलब्ध करून देण्याचीही व्यवस्था व्यापारी बांधवांनी केली आहे. 
- रमाकांत राऊत, सरपंच, खारेपाटण. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुंबई- कांदिवलीतून आल्या मायलेकी, अन् अख्खे गाव तत्काळ लाॅकडाउन खारेपाटण (सिंधुदुर्ग) - मुंबई-कांदिवली येथून आलेल्या माय-लेकीस कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर येथील कोष्टी आळीसह बाजारपेठ परिसर सील करण्यात आला. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील काही व्यक्‍ती बाजारपेठेतही फिरल्या असल्याने शहरातही भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, बाजारपेठ बंद असली तरी ग्राहकांना कंटन्मेंट झोनच्या बाहेर जीवनावश्‍यक वस्तूंच्या पुरवठ्याची व्यवस्था केल्याची माहिती सरपंच रमाकांत राऊत यांनी दिली.  खारेपाटण बसस्थानक आणि बाजारपेठेच्या मागील बाजूस असलेल्या कोष्टी आळीमध्ये 28 जून रोजी एक कुटुंब मुंबईतून आले होते. घरीच क्‍वारंटाईन असलेल्या या कुटुंबातील दोन सदस्यांचे स्वॅब अहवाल 3 जुलै रोजी घेण्यात आले. यात या दोन्ही व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर खारेपाटण शहरात खळबळ उडाली. दोन कोरोना रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कोष्टी आळीसह बाजारपेठ परिसर कंटन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे 18 जुलैपर्यंत कोष्टी आळीसह बाजारपेठेतील नागरिकांना बाहेर जाण्यास, तर बाहेरील व्यक्‍तींना बाजारपेठेस येण्यास मनाई असणार आहे. सिंधुदुर्गातील लॉकडाउन 8 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे गुरुवार (ता. 9) पासून पुन्हा बाजारपेठ सुरू होण्याची प्रतीक्षा खारेपाटणसह लगतच्या 30 गावांतील नागरिकांना होती; मात्र 18 जुलैपर्यंत बाजारपेठ बंद राहणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे. तसेच व्यापाऱ्यांनाही नुकसानीस सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे.  आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण  खारेपाटण कोष्टी आळीतील त्या कोरोनाबाधितांच्या अति निकटच्या आणि निकटच्या संपर्कातील व्यक्‍तींचे स्वॅब नमुने आरोग्य विभागाने घेतले आहेत. याखेरीज आरोग्य सेवक प्रशांत बुचडे, प्रसाद मांजरेकर, विस्तार अधिकारी महादेव धवणे, वैद्यकीय अधिकारी प्रिया वडाम, पोलिस जमादार अनमोल रावराणे, सरपंच रमाकांत राऊत आदींच्या माध्यमातून शहरात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.  कंटेन्मेंट झोनमुळे बाजारपेठ बंद राहणार असली तरी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी दक्षता घेत आहोत. शहरातील ग्राहकांनी व्यापाऱ्यांकडे जीवनावश्‍यक वस्तूंची यादी दिली तर त्या वस्तू कंटेन्मेंट झोनबाहेर उपलब्ध करून देण्याचीही व्यवस्था व्यापारी बांधवांनी केली आहे.  - रमाकांत राऊत, सरपंच, खारेपाटण.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VSBcxU
Read More
अंतर्गत वादातूनच सरकार कोसळणार - फडणवीस

ठाणे - आम्हाला महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही, महाविकास आघाडीचे सरकार हे अंतर्गत वादातूनच पडेल, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी केला. आम्हाला सरकार पाडण्यापेक्षा राज्यातील १२ कोटी जनतेचे प्रश्‍न महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोमवारी फडणवीस यांनी ठाण्यातील भाईंदर पाडा येथील क्वारंटाइन सेंटर व कोव्हिड केअर सेंटरला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. राज्याच्या दृष्टिकोनातून एखादा विषय महत्त्वाचा असेल, सरकारचे अपयश झाकायचे असेल तेव्हा संजय राऊत हे कपोलकल्पित लेख लिहून विरोधक सरकार पाडण्याचे प्रयत्न करत असल्याचे लिहितात, परंतु आम्हाला सरकार पाडण्याची घाई नाही. याउलट आम्हाला राज्यातील १२ कोटी जनतेचे प्रश्‍न महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

मोठी बातमी - राज्यात ८ जुलैपासून हॉटेल्स आणि लॉज होणार सुरु, सरकारने दिली सशर्त परवानगी

पोलिसांच्या बदल्यांबाबत समन्वय नसल्याचे दिसून आले आहे. वास्तविक पाहता पोलिसांच्या अंतर्गत बदल्या करत असताना पोलिस आयुक्त हे गृहमंत्र्यांशी चर्चा करतात, त्यानंतर गृहमंत्र्यांनी याची माहिती मुख्यमंत्र्यांना द्यायची असते, परंतु असे काही झालेलेच दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अंतर्गत वादातूनच सरकार कोसळणार - फडणवीस ठाणे - आम्हाला महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची कोणतीही घाई नाही, महाविकास आघाडीचे सरकार हे अंतर्गत वादातूनच पडेल, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी केला. आम्हाला सरकार पाडण्यापेक्षा राज्यातील १२ कोटी जनतेचे प्रश्‍न महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सोमवारी फडणवीस यांनी ठाण्यातील भाईंदर पाडा येथील क्वारंटाइन सेंटर व कोव्हिड केअर सेंटरला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. राज्याच्या दृष्टिकोनातून एखादा विषय महत्त्वाचा असेल, सरकारचे अपयश झाकायचे असेल तेव्हा संजय राऊत हे कपोलकल्पित लेख लिहून विरोधक सरकार पाडण्याचे प्रयत्न करत असल्याचे लिहितात, परंतु आम्हाला सरकार पाडण्याची घाई नाही. याउलट आम्हाला राज्यातील १२ कोटी जनतेचे प्रश्‍न महत्त्वाचे असल्याचे सांगितले. मोठी बातमी - राज्यात ८ जुलैपासून हॉटेल्स आणि लॉज होणार सुरु, सरकारने दिली सशर्त परवानगी पोलिसांच्या बदल्यांबाबत समन्वय नसल्याचे दिसून आले आहे. वास्तविक पाहता पोलिसांच्या अंतर्गत बदल्या करत असताना पोलिस आयुक्त हे गृहमंत्र्यांशी चर्चा करतात, त्यानंतर गृहमंत्र्यांनी याची माहिती मुख्यमंत्र्यांना द्यायची असते, परंतु असे काही झालेलेच दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3gE22Sl
Read More
कोरोनाच्या संकटात वित्त आयोगाची सिंधुदुर्गवर काय झालीय कृपादृष्टी? वाचा

ओरोस (सिंधुदुर्ग) - केंद्राच्या पंधाराव्या वित्त आयोग निधीमधून सिंधुदुर्ग जिल्ह्याला 18 कोटी 32 लाख 40 हजार रुपये एवढा निधी प्राप्त झाला आहे. यातील 80 टक्के निधी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मिळणार आहे. तर 10 टक्के निधी जिल्हा परिषदेला आणि उर्वरित 10 टक्के निधी जिल्ह्यात 8 पंचायत समित्यांना विभागून देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एकीकडे शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाना निधी देण्यास बंद केले असताना 15व्या वित्त आयोगातून निधी प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 15व्या वित्त आयोगाच्या शिफरशीनुसार ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या बळकटीकरणासाठी 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2025 या पाच वर्षांत केंद्र शासनाकडून निधी पुरविण्यात येणार आहे.

2011च्या जनगणनेतील लोकसंख्येनुसार हा निधी वितरित करण्यात येत आहे. एका आर्थिक वर्षात दोन टप्प्यात हा निधी देण्यात येणार आहे. यातील पहिला टप्पा मूलभूत अनुदान तर दूसरा टप्पा बंधिन अनुदान असा आहे. मूलभूत अनुदानातून कर्मचारी अनुदान व आस्थापना वगळून इतर स्थानिक गरजेनुसार आवश्‍यक बाबींवर निधी खर्च करता येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील बंधिन अनुदानातून स्वच्छ्ता आणि हागणदारी मुक्त, पेयजल पाणी पुरवठा, जल पुनर भरण, पावसाच्या पाण्याची साठवन यासाठी 50 टक्के निधी खर्च करण्याचे बंधन राहणार आहे. 

2020-21 या आर्थिक वर्षातील पहिला मूलभूत हप्ता जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. यात 18 कोटी 32 लाख 40 हजार एवढ्या निधीचा समावेश आहे. यातील 80 टक्के म्हणजेच 14 कोटी 65 लाख 92 हजार एवढा निधी जिल्ह्यातील 432 ग्राम पंचायतींना 2011 च्या जनगणनेतील लोकसंख्येनुसार वितरित केला जाणार आहे. तर 10 टक्के म्हणजे एक कोटी 83 लाख 24 हजार रुपये निधी जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांना त्या-त्या लोकसंख्येनुसार दिला जाणार आहे. तर उर्वरित एक कोटी 83 लाख 24 हजार रुपये हा 10 टक्के निधी जिल्हा परिषदेजवळ राहणार आहे. प्रथम केंद्र शासनाकडून हा निधी राज्य शाससनाला प्राप्त झाला होता. राज्य शासनाने राज्यातील जिल्हा परिषदेला लोकसंख्येनुसार वितरीत केला आहे. जिल्हा परिषद आता हा निधी पंचायत समिती व ग्रामपंचायतींना वर्ग करणार आहे. 

आता मिळणार हक्काचा निधी 
केंद्राने चौदाव्या वित्त आयोगात जिल्हा परिषद व पंचायत समिती या ग्रामीण भागातील दोन स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी देण्यास बंद केले होते. त्यापूर्वीच्या वित्त आयोगात हा निधी मिळत होता. त्यामुळे या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थेवर लोकनियुक्त लोकप्रतिनिधींना हक्काचा निधी मिळत नव्हता. केवळ स्वनिधी मिळत होता; पण तो तटपुंजा होता. पंधराव्या वित्त आयोगात जिल्ह्याला मिळणाऱ्या एकूण निधीतील 10 टक्के निधी मिळणार असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना मिळणाऱ्या हक्काच्या निधित वाढ झाली आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाच्या संकटात वित्त आयोगाची सिंधुदुर्गवर काय झालीय कृपादृष्टी? वाचा ओरोस (सिंधुदुर्ग) - केंद्राच्या पंधाराव्या वित्त आयोग निधीमधून सिंधुदुर्ग जिल्ह्याला 18 कोटी 32 लाख 40 हजार रुपये एवढा निधी प्राप्त झाला आहे. यातील 80 टक्के निधी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मिळणार आहे. तर 10 टक्के निधी जिल्हा परिषदेला आणि उर्वरित 10 टक्के निधी जिल्ह्यात 8 पंचायत समित्यांना विभागून देण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एकीकडे शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थाना निधी देण्यास बंद केले असताना 15व्या वित्त आयोगातून निधी प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 15व्या वित्त आयोगाच्या शिफरशीनुसार ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या बळकटीकरणासाठी 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2025 या पाच वर्षांत केंद्र शासनाकडून निधी पुरविण्यात येणार आहे. 2011च्या जनगणनेतील लोकसंख्येनुसार हा निधी वितरित करण्यात येत आहे. एका आर्थिक वर्षात दोन टप्प्यात हा निधी देण्यात येणार आहे. यातील पहिला टप्पा मूलभूत अनुदान तर दूसरा टप्पा बंधिन अनुदान असा आहे. मूलभूत अनुदानातून कर्मचारी अनुदान व आस्थापना वगळून इतर स्थानिक गरजेनुसार आवश्‍यक बाबींवर निधी खर्च करता येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील बंधिन अनुदानातून स्वच्छ्ता आणि हागणदारी मुक्त, पेयजल पाणी पुरवठा, जल पुनर भरण, पावसाच्या पाण्याची साठवन यासाठी 50 टक्के निधी खर्च करण्याचे बंधन राहणार आहे.  2020-21 या आर्थिक वर्षातील पहिला मूलभूत हप्ता जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. यात 18 कोटी 32 लाख 40 हजार एवढ्या निधीचा समावेश आहे. यातील 80 टक्के म्हणजेच 14 कोटी 65 लाख 92 हजार एवढा निधी जिल्ह्यातील 432 ग्राम पंचायतींना 2011 च्या जनगणनेतील लोकसंख्येनुसार वितरित केला जाणार आहे. तर 10 टक्के म्हणजे एक कोटी 83 लाख 24 हजार रुपये निधी जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांना त्या-त्या लोकसंख्येनुसार दिला जाणार आहे. तर उर्वरित एक कोटी 83 लाख 24 हजार रुपये हा 10 टक्के निधी जिल्हा परिषदेजवळ राहणार आहे. प्रथम केंद्र शासनाकडून हा निधी राज्य शाससनाला प्राप्त झाला होता. राज्य शासनाने राज्यातील जिल्हा परिषदेला लोकसंख्येनुसार वितरीत केला आहे. जिल्हा परिषद आता हा निधी पंचायत समिती व ग्रामपंचायतींना वर्ग करणार आहे.  आता मिळणार हक्काचा निधी  केंद्राने चौदाव्या वित्त आयोगात जिल्हा परिषद व पंचायत समिती या ग्रामीण भागातील दोन स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी देण्यास बंद केले होते. त्यापूर्वीच्या वित्त आयोगात हा निधी मिळत होता. त्यामुळे या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थेवर लोकनियुक्त लोकप्रतिनिधींना हक्काचा निधी मिळत नव्हता. केवळ स्वनिधी मिळत होता; पण तो तटपुंजा होता. पंधराव्या वित्त आयोगात जिल्ह्याला मिळणाऱ्या एकूण निधीतील 10 टक्के निधी मिळणार असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना मिळणाऱ्या हक्काच्या निधित वाढ झाली आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2AzqLrm
Read More
आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०७ जुलै

पंचांग -
मंगळवार - आषाढ कृ. २, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय रा. ९.१५, चंद्रास्त स. ६.५६, भारतीय सौर १६, शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
महाकवी कालिदास दिन
१८५४ - कावसजी दादर यांनी मुंबईत कापडगिरणी सुरू केली. मुंबईतील ही पहिलीच कापडगिरणी.
१८९६ - मुंबईच्या फोर्ट विभागातील ‘एस्प्लनेड मॅन्शन’ या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमध्ये ऑगस्ते व लुई या ल्युनियर बंधूंनी भारतातील पहिल्या चित्रपटाचे दर्शन घडविले.
१९१० - इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळ ही संस्था स्थापन केली. 
१९९६ - भारतीय चित्रपटसृष्टीला १०० वर्षे पूर्ण.

दिनमान -
मेष : प्रॉपर्टीच्या संदर्भात काही प्रस्ताव समोर येतील. परंतु निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत. वृषभ : व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढणार आहे.
मिथुन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. गरजेपेक्षा वस्तूंचा अधिक साठा करू नये. 
कर्क : वैवाहिक सौख्य लाभेल. आरोग्य चांगले राहील. संततिसौख्य लाभेल.
सिंह : काहींना मानसिक अस्वास्थ्य लाभेल. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. 
कन्या : आरोग्य चांगले राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. 
तूळ : व्यवसायातील कामकाजाकडे लक्ष देणे गरजेचे भासेल. काहींना सुसंधी लाभेल.
वृश्‍चिक : महत्त्वाच्या कामामध्ये संयमाने कार्यरत राहावे. संततिसौख्य लाभेल.
धनू : वरिष्ठांचे व थोरामोठ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहील. 
मकर : कर्मचारी वर्गाकडे लक्ष द्याल. कला क्षेत्रातील व्यक्तींना यश लाभेल.
कुंभ : प्रॉपर्टीच्या संदर्भात कामे मार्गी लावू शकाल. प्रवास टाळावेत.
मीन : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. काहींना गुरुकृपा लाभेल.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०७ जुलै पंचांग - मंगळवार - आषाढ कृ. २, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय रा. ९.१५, चंद्रास्त स. ६.५६, भारतीय सौर १६, शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - महाकवी कालिदास दिन १८५४ - कावसजी दादर यांनी मुंबईत कापडगिरणी सुरू केली. मुंबईतील ही पहिलीच कापडगिरणी. १८९६ - मुंबईच्या फोर्ट विभागातील ‘एस्प्लनेड मॅन्शन’ या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमध्ये ऑगस्ते व लुई या ल्युनियर बंधूंनी भारतातील पहिल्या चित्रपटाचे दर्शन घडविले. १९१० - इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळ ही संस्था स्थापन केली.  १९९६ - भारतीय चित्रपटसृष्टीला १०० वर्षे पूर्ण. दिनमान - मेष : प्रॉपर्टीच्या संदर्भात काही प्रस्ताव समोर येतील. परंतु निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत. वृषभ : व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढणार आहे. मिथुन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. गरजेपेक्षा वस्तूंचा अधिक साठा करू नये.  कर्क : वैवाहिक सौख्य लाभेल. आरोग्य चांगले राहील. संततिसौख्य लाभेल. सिंह : काहींना मानसिक अस्वास्थ्य लाभेल. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल.  कन्या : आरोग्य चांगले राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील.  तूळ : व्यवसायातील कामकाजाकडे लक्ष देणे गरजेचे भासेल. काहींना सुसंधी लाभेल. वृश्‍चिक : महत्त्वाच्या कामामध्ये संयमाने कार्यरत राहावे. संततिसौख्य लाभेल. धनू : वरिष्ठांचे व थोरामोठ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहील.  मकर : कर्मचारी वर्गाकडे लक्ष द्याल. कला क्षेत्रातील व्यक्तींना यश लाभेल. कुंभ : प्रॉपर्टीच्या संदर्भात कामे मार्गी लावू शकाल. प्रवास टाळावेत. मीन : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. काहींना गुरुकृपा लाभेल. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Z2eQM6
Read More
चीनच्या भीतीने अजिबात दबून जाणार नाही; अमेरिकेकडून जोरदार प्रत्युत्तर

बीजिंग - दक्षिण चिनी समुद्रातील सरावाच्या बरोबरीने अमेरिका आणि चीन यांच्यातील शब्दयुद्धही कायम आहे. आपल्याकडे विमानवाहू युद्धनौकांना भेदणारी वैविध्यपूर्ण अस्त्रे आहेत आणि दक्षिण चिनी समुद्र पूर्णपणे चिनी लष्कराच्या पकडीखाली आहे, असा इशारा चीनने दिला. त्यावर, ‘आम्ही भीतीने दबून जाणार नाही,’ असे जोरदार प्रत्युत्तर अमेरिकी नौदलातर्फे देण्यात आले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनच्या इशाऱ्याबाबतचे वृत्त ‘ग्लोबल टाइम्स या सरकारी मुखपत्राने दिले. त्यानुसार चीनकडे ‘डीएफ-२१डी’ आणि ‘डीएफ-२६’ अशी विमानवाहू युद्धनौकांना उद्‌ध्वस्त करणारी क्षेपणास्त्रे आहेत. हा समुद्र पूर्णपणे ताब्यात असल्यामुळे अमेरिकी युद्धनौकांना कोणतीही हालचाल केली तर चिनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ला आनंदच होईल, अशी आक्रमक भाषा चीनने वापरली आहे. तशा वृत्ताचे ‘ट्‌वीट’ही करण्यात आले. 

पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात शिरला कोरोना; काल परराष्ट्रमंत्री तर आज खुद्द...

त्यानंतर अमेरिकी नौदलाच्या संपर्क प्रमुखांनी ट्विट केले. या सागरी क्षेत्रात लष्करी सरावासाठी पाठविलेल्या ‘युएसएस निमित्झ’ आणि ‘युएसएस रोनाल्ड रेगन’ या दोन विमानवाहू युद्धनौकांचा उल्लेख करण्यात आला. ‘ग्लोबल टाइम्समधील वृत्त ‘टॅग’ करून ‘आमच्या मर्जीनुसार असा ‘हॅशटॅग’ही वापरण्यात आला. त्यात म्हटले आहे की, (सागरी क्षेत्र तुमच्या पकडीखाली असूनही) आमच्या विमानवाहू युद्धनौका तेथे आहेत. दक्षिण चिनी समुद्रातील आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत आमच्या दोन युद्धनौका सक्रिय आहेत, ज्या कुणामुळेही दबून जाणाऱ्या नाहीत.

लष्करी सरावाची पार्श्‍वभूमी 
चीनने पॅरासेल बेटांजवळ लष्करी सराव सुरु ठेवला आहे. त्यास प्रत्यूत्तर म्हणून अमेरिकी युद्धनौकांवरील सैनिकांनीही सराव केला. चिनच्या सरावावर अमेरिकेसह इतर काही देशांनी टीका केली आहे. पॅरासेल बेटांवर चिन, फिलीपीन्स, व्हिएतनाम असे देश दावा करतात.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चीनच्या भीतीने अजिबात दबून जाणार नाही; अमेरिकेकडून जोरदार प्रत्युत्तर बीजिंग - दक्षिण चिनी समुद्रातील सरावाच्या बरोबरीने अमेरिका आणि चीन यांच्यातील शब्दयुद्धही कायम आहे. आपल्याकडे विमानवाहू युद्धनौकांना भेदणारी वैविध्यपूर्ण अस्त्रे आहेत आणि दक्षिण चिनी समुद्र पूर्णपणे चिनी लष्कराच्या पकडीखाली आहे, असा इशारा चीनने दिला. त्यावर, ‘आम्ही भीतीने दबून जाणार नाही,’ असे जोरदार प्रत्युत्तर अमेरिकी नौदलातर्फे देण्यात आले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चीनच्या इशाऱ्याबाबतचे वृत्त ‘ग्लोबल टाइम्स या सरकारी मुखपत्राने दिले. त्यानुसार चीनकडे ‘डीएफ-२१डी’ आणि ‘डीएफ-२६’ अशी विमानवाहू युद्धनौकांना उद्‌ध्वस्त करणारी क्षेपणास्त्रे आहेत. हा समुद्र पूर्णपणे ताब्यात असल्यामुळे अमेरिकी युद्धनौकांना कोणतीही हालचाल केली तर चिनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ला आनंदच होईल, अशी आक्रमक भाषा चीनने वापरली आहे. तशा वृत्ताचे ‘ट्‌वीट’ही करण्यात आले.  पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात शिरला कोरोना; काल परराष्ट्रमंत्री तर आज खुद्द... त्यानंतर अमेरिकी नौदलाच्या संपर्क प्रमुखांनी ट्विट केले. या सागरी क्षेत्रात लष्करी सरावासाठी पाठविलेल्या ‘युएसएस निमित्झ’ आणि ‘युएसएस रोनाल्ड रेगन’ या दोन विमानवाहू युद्धनौकांचा उल्लेख करण्यात आला. ‘ग्लोबल टाइम्समधील वृत्त ‘टॅग’ करून ‘आमच्या मर्जीनुसार असा ‘हॅशटॅग’ही वापरण्यात आला. त्यात म्हटले आहे की, (सागरी क्षेत्र तुमच्या पकडीखाली असूनही) आमच्या विमानवाहू युद्धनौका तेथे आहेत. दक्षिण चिनी समुद्रातील आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत आमच्या दोन युद्धनौका सक्रिय आहेत, ज्या कुणामुळेही दबून जाणाऱ्या नाहीत. लष्करी सरावाची पार्श्‍वभूमी  चीनने पॅरासेल बेटांजवळ लष्करी सराव सुरु ठेवला आहे. त्यास प्रत्यूत्तर म्हणून अमेरिकी युद्धनौकांवरील सैनिकांनीही सराव केला. चिनच्या सरावावर अमेरिकेसह इतर काही देशांनी टीका केली आहे. पॅरासेल बेटांवर चिन, फिलीपीन्स, व्हिएतनाम असे देश दावा करतात. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VWarIS
Read More
Horoscope Today 7 जुलाई: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/3f49shi