Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, June 18, 2020

पुण्यात यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने, मुख्यमंत्री-गणेश मंडळ बैठकीत निर्णय

पुण्यात यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने, मुख्यमंत्री-गणेश मंडळ बैठकीत निर्णय

June 18, 2020 0 Comments
यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय येथील गणेश मंडळांनी घेतला आहे. from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/3e...
Read More
राज्यात २५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प - ऊर्जामंत्री राऊत

राज्यात २५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प - ऊर्जामंत्री राऊत

June 18, 2020 0 Comments
महाराष्ट्र राज्याच्या भविष्यातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी  २५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   fr...
Read More
राज्यात आज दिवसभरात झाली एवढ्या रुग्णांची नोंद

मुंबई - राज्यात गुरुवारी कोरोनाच्या ३७५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांचा आकडा १ लाख २० हजार ५०४ झाला आहे. तर, दिवसभरात १०० रुग्ण दगावल्यामुळे मृतांची संख्या ५ हजार ७५१ वर पोहोचली आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिवसभरात १६७२ जणांना उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले असून, आत्तापर्यंत ५० हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात गुरुवारी ६६ पुरुष आणि ३४ महिला अशा १०० कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईत ६७, भिवंडीत २७, ठाण्यात चार, वसई-विरार आणि नागपूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.

- काय सांगता! आता मोबाईलवरही करता येणार भाडेकरार

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

राज्यात आज दिवसभरात झाली एवढ्या रुग्णांची नोंद मुंबई - राज्यात गुरुवारी कोरोनाच्या ३७५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांचा आकडा १ लाख २० हजार ५०४ झाला आहे. तर, दिवसभरात १०० रुग्ण दगावल्यामुळे मृतांची संख्या ५ हजार ७५१ वर पोहोचली आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिवसभरात १६७२ जणांना उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले असून, आत्तापर्यंत ५० हजार ८३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात गुरुवारी ६६ पुरुष आणि ३४ महिला अशा १०० कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईत ६७, भिवंडीत २७, ठाण्यात चार, वसई-विरार आणि नागपूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. - काय सांगता! आता मोबाईलवरही करता येणार भाडेकरार News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30W7dIH
Read More
जर्मनी, जपान, अमेरिकेला तळेगाव-चाकणची भुरळ!

पिंपरी : कोरोनाच्या संकटामुळे थंडावलेल्या अर्थचक्राला गती मिळावी, म्हणून देशातील अनेक राज्ये विदेशी गुंतवणुकदारांना आपल्याकडे येण्याचे निमंत्रण देत असले तरी जर्मनी, जपान आणि अमेरिकेत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांना मात्र, गुंतवणूकीसाठी महाराष्ट्रातील तळेगाव आणि चाकण परिसराची भुरळ पडली आहे. याठिकाणी उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात अनेक उद्योगांना स्वारस्य असून, त्यासंदर्भात एमआयडीसीकडे विचारणा सुरू असल्याने पुढील वर्षात आणखी नव्या विदेशी कंपन्यांची भर पडणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    

सद्य:स्थिती काय?

एमआयडीसीकडून तळेगावमधील टप्पा चारमध्ये औद्योगिक विकासासाठी 2200 हेक्‍टर जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. सध्या त्याठिकाणी जमिन मोजणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना पैसे वाटप करणे, जमिन ताब्यात घेणे, औद्योगिक भूखंडाचे नियोजन करणे यासाठी आठ ते नऊ महिन्यांचा अवधी जाणार आहे. त्यानंतर नव्या उद्योजकांना त्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील वर्षामध्ये याठिकाणी ऑटोमोबाइल, इलेक्‍ट्रॉनिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विदेशातील कंपन्या गुंतवणूक करू शकतील. याखेरीज चाकणमधील टप्पा पाचमध्ये देखील 637 हेक्‍टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येत आहे. त्याठिकाणी आतापर्यंत 200 हेक्‍टर क्षेत्र ताब्यात आले आहे. येत्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत याठिकाणची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार असून, त्यानंतर उद्योजकांना त्याचे वाटप सुरू होणार आहे. प्रामुख्याने ऑटोमोबाइल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांना इथे उत्पादन प्रकल्प सुरु करण्याची इच्छा आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या कारणांसाठी इथे गुंतवणुकीला प्राधान्य...

पुणे आणि परिसरातील चांगल्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठे असल्यामुळे इथे उत्तम शैक्षणिक सुविधा आहेत. त्यामुळे उद्योगांना आवश्‍यक असणारे कुशल मनुष्यबळ याठिकाणी सहजपणे उपलब्ध होत आहे. देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई अवघ्या चार तासांच्या अंतरावर आहे. पुण्याजवळील पुरंदर परिसरात नव्याने आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचे काम सुरू आहे. तळेगाव, चाकण परिसरात रिंगरोडचे काम प्रस्तावित आहे. त्याचा उद्योगांना फायदा होऊ शकतो. या औद्योगिक परिसरातील वातावरण चांगले आहे. त्यामुळेच विदेशातील कंपन्या इथेच गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

चाकण आणि तळेगावमध्ये गुंतवणूक करण्यास विदेशातील अनेक कंपन्या इच्छुक आहेत. आतापर्यंत जर्मनी, जपान, अमेरिका या देशातील कंपन्यांनी इथे गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवलेले आहे. तळेगावमधील टप्पा दोनमध्ये 800 हेक्‍टर जागेचे भूसंपादन करण्यात आले असून, त्याठिकाणी काही जागा विदेशातील कंपन्यांना उत्पादन प्रकल्पासाठी देण्यात आली आहे. तळेगावमधील टप्पा चार आणि चाकण भागातील टप्पा पाचमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सध्या सुरु आहे. 
- अविनाश हदगल, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

जर्मनी, जपान, अमेरिकेला तळेगाव-चाकणची भुरळ! पिंपरी : कोरोनाच्या संकटामुळे थंडावलेल्या अर्थचक्राला गती मिळावी, म्हणून देशातील अनेक राज्ये विदेशी गुंतवणुकदारांना आपल्याकडे येण्याचे निमंत्रण देत असले तरी जर्मनी, जपान आणि अमेरिकेत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांना मात्र, गुंतवणूकीसाठी महाराष्ट्रातील तळेगाव आणि चाकण परिसराची भुरळ पडली आहे. याठिकाणी उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात अनेक उद्योगांना स्वारस्य असून, त्यासंदर्भात एमआयडीसीकडे विचारणा सुरू असल्याने पुढील वर्षात आणखी नव्या विदेशी कंपन्यांची भर पडणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप     सद्य:स्थिती काय? एमआयडीसीकडून तळेगावमधील टप्पा चारमध्ये औद्योगिक विकासासाठी 2200 हेक्‍टर जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. सध्या त्याठिकाणी जमिन मोजणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना पैसे वाटप करणे, जमिन ताब्यात घेणे, औद्योगिक भूखंडाचे नियोजन करणे यासाठी आठ ते नऊ महिन्यांचा अवधी जाणार आहे. त्यानंतर नव्या उद्योजकांना त्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील वर्षामध्ये याठिकाणी ऑटोमोबाइल, इलेक्‍ट्रॉनिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विदेशातील कंपन्या गुंतवणूक करू शकतील. याखेरीज चाकणमधील टप्पा पाचमध्ये देखील 637 हेक्‍टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येत आहे. त्याठिकाणी आतापर्यंत 200 हेक्‍टर क्षेत्र ताब्यात आले आहे. येत्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत याठिकाणची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार असून, त्यानंतर उद्योजकांना त्याचे वाटप सुरू होणार आहे. प्रामुख्याने ऑटोमोबाइल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांना इथे उत्पादन प्रकल्प सुरु करण्याची इच्छा आहे.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा या कारणांसाठी इथे गुंतवणुकीला प्राधान्य... पुणे आणि परिसरातील चांगल्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठे असल्यामुळे इथे उत्तम शैक्षणिक सुविधा आहेत. त्यामुळे उद्योगांना आवश्‍यक असणारे कुशल मनुष्यबळ याठिकाणी सहजपणे उपलब्ध होत आहे. देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई अवघ्या चार तासांच्या अंतरावर आहे. पुण्याजवळील पुरंदर परिसरात नव्याने आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीचे काम सुरू आहे. तळेगाव, चाकण परिसरात रिंगरोडचे काम प्रस्तावित आहे. त्याचा उद्योगांना फायदा होऊ शकतो. या औद्योगिक परिसरातील वातावरण चांगले आहे. त्यामुळेच विदेशातील कंपन्या इथेच गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत.   पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  चाकण आणि तळेगावमध्ये गुंतवणूक करण्यास विदेशातील अनेक कंपन्या इच्छुक आहेत. आतापर्यंत जर्मनी, जपान, अमेरिका या देशातील कंपन्यांनी इथे गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखवलेले आहे. तळेगावमधील टप्पा दोनमध्ये 800 हेक्‍टर जागेचे भूसंपादन करण्यात आले असून, त्याठिकाणी काही जागा विदेशातील कंपन्यांना उत्पादन प्रकल्पासाठी देण्यात आली आहे. तळेगावमधील टप्पा चार आणि चाकण भागातील टप्पा पाचमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सध्या सुरु आहे.  - अविनाश हदगल, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fATHy6
Read More
यंदाच्या गणेशोत्सव होणार मिरवणुकांविना!

मुंबई - ‘कोरोनाचा धोका अद्यापही संपलेला नाही. नेहमीप्रमाणे यंदा गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्‍यात साजरा करता येणार नाही. त्यामुळे गर्दीही करता येणार नाही, तसेच मिरवणुका काढता येणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता, योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात आज मंत्रालय येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. साधेपणाने हा उत्सव साजरा करताना एक चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल. आपण महाराष्ट्रात ‘पुनःश्‍च हरिओम’ करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत.

पुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकास ६ दिवसांची पोलिस कोठडी; घराची झडती सुरू!

त्यामुळे हा उत्सव साजरा करताना देखील आपल्याला चौकटीत राहून साजरा करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही याची काळजी आपण घेऊ. यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा. त्याद्वारे जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करा, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 

- सलून व्यावसायिकांनी घेतला मोठा निर्णय; काय आहे वाचा सविस्तर

बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील व शंभूराज देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव अजोय मेहता, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल, मुंबई पोलिस आयुक्त परमविर सिंह, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर तसेच गणेश मंडळांचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

RTE : २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाला अखेर मुहूर्त मिळाला; वाचा सविस्तर!

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

यंदाच्या गणेशोत्सव होणार मिरवणुकांविना! मुंबई - ‘कोरोनाचा धोका अद्यापही संपलेला नाही. नेहमीप्रमाणे यंदा गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्‍यात साजरा करता येणार नाही. त्यामुळे गर्दीही करता येणार नाही, तसेच मिरवणुका काढता येणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता, योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात आज मंत्रालय येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. साधेपणाने हा उत्सव साजरा करताना एक चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल. आपण महाराष्ट्रात ‘पुनःश्‍च हरिओम’ करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत. पुणे : वरिष्ठ पोलिस निरीक्षकास ६ दिवसांची पोलिस कोठडी; घराची झडती सुरू! त्यामुळे हा उत्सव साजरा करताना देखील आपल्याला चौकटीत राहून साजरा करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही याची काळजी आपण घेऊ. यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा. त्याद्वारे जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करा, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.  - सलून व्यावसायिकांनी घेतला मोठा निर्णय; काय आहे वाचा सविस्तर बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील व शंभूराज देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव अजोय मेहता, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल, मुंबई पोलिस आयुक्त परमविर सिंह, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर तसेच गणेश मंडळांचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. RTE : २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाला अखेर मुहूर्त मिळाला; वाचा सविस्तर! News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2BiBpCU
Read More
कोरोनाला दूर ठेवण्यासाठी अशी वाढवा रोगप्रतिकारशक्ती

औरंगाबाद - निव्वळ कोरोनामुळे मृत्यू होणारांची संख्या नगण्य आहे. कोणतेही आजार नसतील, रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर कोरोना संसर्गानंतरही धोका फार कमी आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पुरेशी झोप घ्या. पाणी भरपूर प्या, असा सल्ला जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉ. अश्विन पाटील यांनी दिला.

धकाधकीच्या, स्पर्धेच्या काळात आपण सारखे कामात गुंतून असतो. आपले वैयक्तिक जीवन आणि आरोग्याकडेही लक्ष नसते; परंतु कोरोनाच्या प्रदुर्भावाने आपण एकाच जागी थांबलो. हा काळ आपल्यासमोर संकट म्हणून उभा ठाकलाच आहे. असे असले तरीही याच काळाने आपल्याला स्वतःकडे पाहण्याचे शिकविले. कुटुंबाला वेळ देण्यापासून आपले वैयक्तिक जीवन, स्वतःचा शोध घेण्याचेही शिकविले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वतःसह कुटुंबाच्या आरोग्याप्रती जागरूक राहण्याची आपली वृत्ती वाढत आहे. त्यातूनच आपली रोगप्रतिकारशक्तीलाही आपण महत्त्व देत आहोत. 

'मीटर रिडींग घेऊ द्या, नाहीतर...'; महावितरण देणार वीजग्राहकांना 'शॉक!'
 
तरीही रोगप्रतिकारक्षमता असू शकते कमी 
रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यासाठी आजार तर कारणीभूत आहेतच; परंतु तुम्हाला मधुमेह नाही, उच्चरक्तदाबही नाही; पण तुम्ही व्यसनी आहात किंवा जेवणच करीत नाहीत. अथवा मद्यसेवन खूप करीत असाल, शरीराची ऊर्जा व्यर्थ गोष्टींसाठी खर्च होत असेल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असू शकते, असे डॉ. पाटील म्हणाले.  
 
अशी ओळखा इम्युनिटी

वातावरण बदलले की व्हायरल इन्फेक्शन लगेच होणे. प्रकृती बिघडणे. 

जेवणात कमी जास्त झाल्यास आजारी पडणे.

वारंवार आजारी पडत असाल तर आपली प्रतिकारक्षमता कमी आहे हे समजून घ्या.

सुदृढ व्यक्ती वातावरणात बदल झाला अथवा जेवणात कमी जास्त झाले तरी तरी आजारी पडत नाही.

 
ही आहेत कारणे

रात्र-रात्र जागणे, खूप उशिरा झोपणे.

अत्यंत कमी पाणी पिणे. 

जेवण व्यवस्थित नसणे.

शरीरातील ऊर्जा विनाकारण खर्च करणे.

 
या गोष्टी करा 

पुरेशी झोप घ्या. पाणी भरपूर प्या. 

या काळात फास्टफूड टाळा.

चांगला व सकस आहार घ्या. 

रात्र-रात्र जागणे टाळा.

तब्येत चांगली ठेवा.

व्यायाम करा.  

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी अशी वाढवा रोगप्रतिकारशक्ती औरंगाबाद - निव्वळ कोरोनामुळे मृत्यू होणारांची संख्या नगण्य आहे. कोणतेही आजार नसतील, रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर कोरोना संसर्गानंतरही धोका फार कमी आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पुरेशी झोप घ्या. पाणी भरपूर प्या, असा सल्ला जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉ. अश्विन पाटील यांनी दिला. धकाधकीच्या, स्पर्धेच्या काळात आपण सारखे कामात गुंतून असतो. आपले वैयक्तिक जीवन आणि आरोग्याकडेही लक्ष नसते; परंतु कोरोनाच्या प्रदुर्भावाने आपण एकाच जागी थांबलो. हा काळ आपल्यासमोर संकट म्हणून उभा ठाकलाच आहे. असे असले तरीही याच काळाने आपल्याला स्वतःकडे पाहण्याचे शिकविले. कुटुंबाला वेळ देण्यापासून आपले वैयक्तिक जीवन, स्वतःचा शोध घेण्याचेही शिकविले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वतःसह कुटुंबाच्या आरोग्याप्रती जागरूक राहण्याची आपली वृत्ती वाढत आहे. त्यातूनच आपली रोगप्रतिकारशक्तीलाही आपण महत्त्व देत आहोत.  'मीटर रिडींग घेऊ द्या, नाहीतर...'; महावितरण देणार वीजग्राहकांना 'शॉक!'   तरीही रोगप्रतिकारक्षमता असू शकते कमी  रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यासाठी आजार तर कारणीभूत आहेतच; परंतु तुम्हाला मधुमेह नाही, उच्चरक्तदाबही नाही; पण तुम्ही व्यसनी आहात किंवा जेवणच करीत नाहीत. अथवा मद्यसेवन खूप करीत असाल, शरीराची ऊर्जा व्यर्थ गोष्टींसाठी खर्च होत असेल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असू शकते, असे डॉ. पाटील म्हणाले.     अशी ओळखा इम्युनिटी वातावरण बदलले की व्हायरल इन्फेक्शन लगेच होणे. प्रकृती बिघडणे.  जेवणात कमी जास्त झाल्यास आजारी पडणे. वारंवार आजारी पडत असाल तर आपली प्रतिकारक्षमता कमी आहे हे समजून घ्या. सुदृढ व्यक्ती वातावरणात बदल झाला अथवा जेवणात कमी जास्त झाले तरी तरी आजारी पडत नाही.   ही आहेत कारणे रात्र-रात्र जागणे, खूप उशिरा झोपणे. अत्यंत कमी पाणी पिणे.  जेवण व्यवस्थित नसणे. शरीरातील ऊर्जा विनाकारण खर्च करणे.   या गोष्टी करा  पुरेशी झोप घ्या. पाणी भरपूर प्या.  या काळात फास्टफूड टाळा. चांगला व सकस आहार घ्या.  रात्र-रात्र जागणे टाळा. तब्येत चांगली ठेवा. व्यायाम करा.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30SvgIt
Read More
काँग्रेसच्या नाराज मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; का ते वाचा सविस्तर

मुंबई - महाविकास आघाडी सरकारमध्ये धोरणात्मक निर्णय घेताना आम्हाला सामावून घेतले जात नाही, अशी नाराजी व्यक्त करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून, आम्ही नाराज नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काँग्रेसच्या नाराज मंत्र्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण बैठकीला ‘मातोश्री’वर आले होते. ‘आमची काही नाराजी नाही, सकारात्मक चर्चा झाली असून वादाचा काही विषय नाही,’ असे बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले. बैठकीपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊतही ‘मातोश्री’वर आले होते.

नितीन गडकरी म्हणतात, वीज ही भविष्यातील इंधन 

‘विधानपरिषद जागांबाबत समसमान जागावाटप केले जाईल. मंत्रिमंडळ जेव्हा स्थापन झाले तेव्हा त्या प्रमाणात मंत्रिपदे मिळाली. मात्र सत्तेतील अन्य वाटप समसमानच ठरले होते. विकासनिधी वाटपाचा मुद्दा सगळ्याच सरकारमध्ये असतो. आम्ही तो मुद्दा मांडला. विकासनिधी समसमान असला पाहिजे हीच भूमिका प्रत्येकाची असते. कोणत्याही अधिकाऱ्याची बदली किंवा वैयक्तिक विषय नाही,’’ असे थोरातांनी सांगितले.

आज मला अनलॉकिंगविषयी बोलायचे आहे; काय म्हणताहेत उद्धव ठाकरे

'‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘न्याय योजना’ देशासाठी मांडली आहे. गरिबांना काही मदत करता येते का याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली,’’ असेही थोरात यावेळी म्हणाले.

जवळपास गेल्या आठवड्याभरापासून काँग्रेस नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही निर्णय घेताना काँग्रेसला विचारात घेतले जात नाही, अशी नाराजी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची स्वतंत्र बैठकही झाली होती. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेते आपली बाजू मुख्यमंत्र्यांकडे मांडतील, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली होती. आम्हाला मुख्यमंत्र्यांना समोरासमोर भेटायचे आहे. आमचे प्रश्न हे जनतेशी निगडित आहेत, असेही ते म्हणाले होते.

साखर कारखान्यांच्या सॅनिटायझर निर्मितीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ 

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्यापाठोपाठ अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसचा वाढता नाराजीचा सूर लक्षात घेऊन अनिल देसाई यांनी बाळासाहेब थोरातांची भेट घेतली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे स्पष्टीकरण काँग्रेस नेत्यांनी दिले.

चार जागा हव्यात
विधानपरिषदेत नेमावयाच्या १२ जागांपैकी चार जागा काँग्रेसला हव्या आहेत, असे उद्धव ठाकरे यांना सांगितले असल्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले. ते म्हणाले की, सत्तेत समसमान वाटप हे सूत्र आहे. त्यानुसार काँग्रेसला चार जागा राज्यपाल नेमणार असलेल्या जागांमधून मिळायला हव्यात.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

काँग्रेसच्या नाराज मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; का ते वाचा सविस्तर मुंबई - महाविकास आघाडी सरकारमध्ये धोरणात्मक निर्णय घेताना आम्हाला सामावून घेतले जात नाही, अशी नाराजी व्यक्त करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून, आम्ही नाराज नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा काँग्रेसच्या नाराज मंत्र्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण बैठकीला ‘मातोश्री’वर आले होते. ‘आमची काही नाराजी नाही, सकारात्मक चर्चा झाली असून वादाचा काही विषय नाही,’ असे बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले. बैठकीपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊतही ‘मातोश्री’वर आले होते. नितीन गडकरी म्हणतात, वीज ही भविष्यातील इंधन  ‘विधानपरिषद जागांबाबत समसमान जागावाटप केले जाईल. मंत्रिमंडळ जेव्हा स्थापन झाले तेव्हा त्या प्रमाणात मंत्रिपदे मिळाली. मात्र सत्तेतील अन्य वाटप समसमानच ठरले होते. विकासनिधी वाटपाचा मुद्दा सगळ्याच सरकारमध्ये असतो. आम्ही तो मुद्दा मांडला. विकासनिधी समसमान असला पाहिजे हीच भूमिका प्रत्येकाची असते. कोणत्याही अधिकाऱ्याची बदली किंवा वैयक्तिक विषय नाही,’’ असे थोरातांनी सांगितले. आज मला अनलॉकिंगविषयी बोलायचे आहे; काय म्हणताहेत उद्धव ठाकरे '‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘न्याय योजना’ देशासाठी मांडली आहे. गरिबांना काही मदत करता येते का याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली,’’ असेही थोरात यावेळी म्हणाले. जवळपास गेल्या आठवड्याभरापासून काँग्रेस नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही निर्णय घेताना काँग्रेसला विचारात घेतले जात नाही, अशी नाराजी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची स्वतंत्र बैठकही झाली होती. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस नेते आपली बाजू मुख्यमंत्र्यांकडे मांडतील, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली होती. आम्हाला मुख्यमंत्र्यांना समोरासमोर भेटायचे आहे. आमचे प्रश्न हे जनतेशी निगडित आहेत, असेही ते म्हणाले होते. साखर कारखान्यांच्या सॅनिटायझर निर्मितीला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ  दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्यापाठोपाठ अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसचा वाढता नाराजीचा सूर लक्षात घेऊन अनिल देसाई यांनी बाळासाहेब थोरातांची भेट घेतली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे स्पष्टीकरण काँग्रेस नेत्यांनी दिले. चार जागा हव्यात विधानपरिषदेत नेमावयाच्या १२ जागांपैकी चार जागा काँग्रेसला हव्या आहेत, असे उद्धव ठाकरे यांना सांगितले असल्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले. ते म्हणाले की, सत्तेत समसमान वाटप हे सूत्र आहे. त्यानुसार काँग्रेसला चार जागा राज्यपाल नेमणार असलेल्या जागांमधून मिळायला हव्यात. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YSc8rv
Read More
गौरवास्पद! ‘अमेरिकन इंजिनिअर्स’च्या अध्यक्षपदी विराजमान झाला पहिला भारतीय!

पुणे : जगभरात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘अमेरिकन सोसायटी ऑफ मॅकेनिकल इंजिनिअर्स’ या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. महंतेश हिरेमठ यांची निवड झाली. हे पद भूषविणारे ते पहिले भारतीय आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. हिरेमठ हे पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीओईपी) तसेच मॉडर्न हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. अवकाश, ऊर्जा क्षेत्रांतील विविध उद्योगांमधील कामाचा त्यांना तीन दशकांचा अनुभव आहे. त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रशासनाच्या विज्ञान, अवकाश आणि तंत्रज्ञान समितीचे तांत्रिक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

- सलून व्यावसायिकांनी घेतला मोठा निर्णय; काय आहे वाचा सविस्तर

या सोसायटीची स्थापना १८८० मध्ये झाली आहे. उद्योजकांच्या लहान समूहाने स्थापन केलेल्या संस्थेचा मोठा विस्तार झाला आहे. आता या संस्थेचे १४० देशांत एक लाखाहून अधिक सदस्य आहेत. संस्थेच्या स्थापनेलाही १४० वर्षे झाली आहेत. या कार्यकाळात प्रथम भारतीय म्हणून संस्थेचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान डॉ. हिरेमठ यांना मिळाला आहे.

या निवडीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. माझ्या यशात माझ्या कुटुंबीयांबरोबरच मॉडर्न हायस्कूल आणि ‘सीओईपी’चा मोठा वाटा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

गौरवास्पद! ‘अमेरिकन इंजिनिअर्स’च्या अध्यक्षपदी विराजमान झाला पहिला भारतीय! पुणे : जगभरात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘अमेरिकन सोसायटी ऑफ मॅकेनिकल इंजिनिअर्स’ या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. महंतेश हिरेमठ यांची निवड झाली. हे पद भूषविणारे ते पहिले भारतीय आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा डॉ. हिरेमठ हे पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीओईपी) तसेच मॉडर्न हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. अवकाश, ऊर्जा क्षेत्रांतील विविध उद्योगांमधील कामाचा त्यांना तीन दशकांचा अनुभव आहे. त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रशासनाच्या विज्ञान, अवकाश आणि तंत्रज्ञान समितीचे तांत्रिक सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले आहे. - सलून व्यावसायिकांनी घेतला मोठा निर्णय; काय आहे वाचा सविस्तर या सोसायटीची स्थापना १८८० मध्ये झाली आहे. उद्योजकांच्या लहान समूहाने स्थापन केलेल्या संस्थेचा मोठा विस्तार झाला आहे. आता या संस्थेचे १४० देशांत एक लाखाहून अधिक सदस्य आहेत. संस्थेच्या स्थापनेलाही १४० वर्षे झाली आहेत. या कार्यकाळात प्रथम भारतीय म्हणून संस्थेचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान डॉ. हिरेमठ यांना मिळाला आहे. या निवडीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. माझ्या यशात माझ्या कुटुंबीयांबरोबरच मॉडर्न हायस्कूल आणि ‘सीओईपी’चा मोठा वाटा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UXKdoW
Read More
नागपुरात 'बंटी-बबली'ने लावला व्यापाऱ्यांना चुना

नागपूर : बंटी-बबली दाम्पत्याने व्यापार करण्याच्या नावाखाली इतवारी परिसरातील व्यापाऱ्यांना गंडवले. ही घटना लकडगंज पोलिस ठाण्यांतर्गत गुरुवारी उघडकीस आली. अरविंद बागडे आणि पूनम अरविंद बागडे असे आरोपी दाम्पत्याचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोषकुमार हजारीलाल अग्रवाल (72, रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, गांधीबाग) यांचा आर. एस. ट्रेडिंग नावाने स्मॉल फॅक्‍टरी एरियामध्ये धान्याचा व्यवसाय आहे. 1 जुलै 2019 ला बंटी व बबलीने त्यांच्याशी संपर्क करून तांदळाचा व्यवसाय करण्याची इच्छा दर्शवली. प्रथम लाखो रुपयांचे तांदूळ खरेदी केले व त्याचे पैसेही दिले. अशा प्रकारे व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करून 1 जुलै ते 30 ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये पुढील तारखेच्या धनादेश देऊन जवळपास 35 व्यापाऱ्यांकडून 57 लाख 75 हजार 681 रुपयांचे तांदूळ खरेदी केले. 

हेही वाचा : आता बोंबला! आरोपीला झाला कोरोना अन्‌ माजली खळबळ...

तांदूळ घेऊन बंटी-बबली निघून गेले. व्यापाऱ्यांनी महिनाभराने धनादेश बॅंकेत वटवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या खात्यांमध्ये पैसेच नसल्याची बाब समोर आली. व्यापाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. पण, आरोपी व्यापाऱ्यांना चुना लावून पसार झाले होते. शेवटी सर्वांनी मिळून संतोषकुमार यांच्या नावाने लकडगंज पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी सर्व व्यापाऱ्यांचे जबाब नोंदवून बंटी बबली दाम्पत्याविरुद्ध 57 लाख 75 हजार 681 रुपये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नागपुरात 'बंटी-बबली'ने लावला व्यापाऱ्यांना चुना नागपूर : बंटी-बबली दाम्पत्याने व्यापार करण्याच्या नावाखाली इतवारी परिसरातील व्यापाऱ्यांना गंडवले. ही घटना लकडगंज पोलिस ठाण्यांतर्गत गुरुवारी उघडकीस आली. अरविंद बागडे आणि पूनम अरविंद बागडे असे आरोपी दाम्पत्याचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोषकुमार हजारीलाल अग्रवाल (72, रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, गांधीबाग) यांचा आर. एस. ट्रेडिंग नावाने स्मॉल फॅक्‍टरी एरियामध्ये धान्याचा व्यवसाय आहे. 1 जुलै 2019 ला बंटी व बबलीने त्यांच्याशी संपर्क करून तांदळाचा व्यवसाय करण्याची इच्छा दर्शवली. प्रथम लाखो रुपयांचे तांदूळ खरेदी केले व त्याचे पैसेही दिले. अशा प्रकारे व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करून 1 जुलै ते 30 ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये पुढील तारखेच्या धनादेश देऊन जवळपास 35 व्यापाऱ्यांकडून 57 लाख 75 हजार 681 रुपयांचे तांदूळ खरेदी केले.  हेही वाचा : आता बोंबला! आरोपीला झाला कोरोना अन्‌ माजली खळबळ... तांदूळ घेऊन बंटी-बबली निघून गेले. व्यापाऱ्यांनी महिनाभराने धनादेश बॅंकेत वटवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या खात्यांमध्ये पैसेच नसल्याची बाब समोर आली. व्यापाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. पण, आरोपी व्यापाऱ्यांना चुना लावून पसार झाले होते. शेवटी सर्वांनी मिळून संतोषकुमार यांच्या नावाने लकडगंज पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी सर्व व्यापाऱ्यांचे जबाब नोंदवून बंटी बबली दाम्पत्याविरुद्ध 57 लाख 75 हजार 681 रुपये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UXsfml
Read More
ब्रिटेन में एक नाबालिग पर इस्लामी आतंकी हमले की साजिश का आरोप https://ift.tt/3hBftUl
भिलाईमध्ये 55 वर्षांपूर्वी ठरला होता विदर्भ शेरास सव्वाशेर

नागपूर : 1965 मध्ये भारत-चीन युद्धाचे वारे वाहत असतानाच घरगुती क्रिकेट मात्र ऐन भरात होते. त्यात विदर्भ रणजी संघाने भिलाईत रंगलेल्या सामन्यात यजमान मध्य प्रदेशवर 100 धावांनी दणदणीत विजय मिळवून क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. "लो स्कोअरिंग' लढतीत इम्रान अलींनी सर्वाधिक धावा व सिद्दीकी यांनी आठ गडी बाद करून विदर्भाच्या विजयात निर्णायक योगदान दिले होते. 

तीनदिवसीय सामन्यात विदर्भ संघात कर्णधार एस. ए. रहिम, ए. एम. बघे, विजय पिंप्रीकर, अरुण ओगिराल, के. वाय. प्रधान, पी. एन. खोत, आर. एन. अभ्यंकर, एस. के. पेंढारकर, इम्रान अली, एम. सिद्दीकी, पी. एस. साठेंसारखे दिग्गज क्रिकेटपटू होते. तर, चंदू सरवटे यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश संघात बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळेंचे बंधू अशोक जगदाळे, एम. के. जोशी, आर. भाटिया, व्ही. एन. पेंढारकर, बी. जी. खेर, एस. भगवानदास, सुरिंदरसिंग, जे. शाह, उदयसिंग व जे. खट्‌टरसारखे मोठे नाव होते. कागदावर दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने सामना रंगतदार होईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. परंतु, विदर्भाच्या फलंदाज व गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करून सामन्याचा निकाल एकतर्फी आपल्या बाजूने लावला. 

हेही वाचा  : अमरावतीकरांनी 40 वर्षांपूर्वी केली होती रणजी सामन्याला तुफान गर्दी
 

"मॅटिन विकेट'वर विदर्भाचा पहिला डाव अवघ्या 142 धावांमध्येच आटोपला. जगदाळे-खट्‌टर या मध्यमगती जोडीने सात गडी बाद करून विदर्भाची चांगलीच दाणादाण उडविली. ओगिराल यांच्या 39 धावा व अभ्यंकर यांच्या 25 धावा विदर्भाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले होते. विदर्भाच्या गोलंदाजांनीही मध्य प्रदेशचा डाव 134 धावांत गुंडाळून आठ धावांची निसटती आघाडी घेतली. फिरकीपटू सिद्दीकी यांनी सर्वाधिक चार विकेट्‌स घेऊन विदर्भाला आघाडी मिळवून दिली. पहिल्या डावातील चुकांपासून धडा घेत विदर्भाने दुसऱ्या डावात 220 धावा काढून सामन्याला निर्णायक कलाटणी दिली. आठव्या स्थानावर फलंदाजीस आलेल्या इम्रान अलींनी "टेलेंडर्स'च्या मदतीने किल्ला लढवत संघाला दोनशेपार नेले. अली यांची नाबाद 83 धावांची जिगरबाज खेळी सामन्याचा खऱ्या अर्थाने "टर्निंग पॉइंट' ठरली. सिद्दीकी यांचेही 26 धावांचे योगदान बहुमूल्य ठरले. 

 

विदर्भाने उतरविली रुळावरून रेल्वे! 28 वर्षांपूर्वी काय घडले वाचा सविस्तर
 

सिद्दीकी ठरले विजयाचे शिलेदार 

शेवटच्या दिवशी विदर्भाने विजयासाठी मध्य प्रदेशसमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले होते. खेळपट्‌टीचे स्वरूप लक्षात घेता विदर्भाचा विजय आणि मध्य प्रदेशचा पराभव निश्‍चित होता. विदर्भ किती वेळात विजयाची औपचारिकता पूर्ण करतो, याचीच क्रिकेटप्रेमींना उत्सुकता होती. विदर्भाच्या गोलंदाजांनी 53 षटकांतच मध्य प्रदेशचा दुसरा डाव 128 धावांत गुंडाळून 100 धावांनी दणदणीत विजयावर शिक्‍कामोर्तब केले. विजयाचे शिल्पकार सिद्दीकी यांनी पुन्हा चार गडी बाद करून विदर्भाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सांघिक कामगिरीचा तो विजय वैदर्भी क्रिकेटपटूंसाठी सर्वार्थाने आनंद व समाधान देणारा होता. 
 

 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

भिलाईमध्ये 55 वर्षांपूर्वी ठरला होता विदर्भ शेरास सव्वाशेर नागपूर : 1965 मध्ये भारत-चीन युद्धाचे वारे वाहत असतानाच घरगुती क्रिकेट मात्र ऐन भरात होते. त्यात विदर्भ रणजी संघाने भिलाईत रंगलेल्या सामन्यात यजमान मध्य प्रदेशवर 100 धावांनी दणदणीत विजय मिळवून क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. "लो स्कोअरिंग' लढतीत इम्रान अलींनी सर्वाधिक धावा व सिद्दीकी यांनी आठ गडी बाद करून विदर्भाच्या विजयात निर्णायक योगदान दिले होते.  तीनदिवसीय सामन्यात विदर्भ संघात कर्णधार एस. ए. रहिम, ए. एम. बघे, विजय पिंप्रीकर, अरुण ओगिराल, के. वाय. प्रधान, पी. एन. खोत, आर. एन. अभ्यंकर, एस. के. पेंढारकर, इम्रान अली, एम. सिद्दीकी, पी. एस. साठेंसारखे दिग्गज क्रिकेटपटू होते. तर, चंदू सरवटे यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश संघात बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळेंचे बंधू अशोक जगदाळे, एम. के. जोशी, आर. भाटिया, व्ही. एन. पेंढारकर, बी. जी. खेर, एस. भगवानदास, सुरिंदरसिंग, जे. शाह, उदयसिंग व जे. खट्‌टरसारखे मोठे नाव होते. कागदावर दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने सामना रंगतदार होईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. परंतु, विदर्भाच्या फलंदाज व गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करून सामन्याचा निकाल एकतर्फी आपल्या बाजूने लावला.  हेही वाचा  : अमरावतीकरांनी 40 वर्षांपूर्वी केली होती रणजी सामन्याला तुफान गर्दी   "मॅटिन विकेट'वर विदर्भाचा पहिला डाव अवघ्या 142 धावांमध्येच आटोपला. जगदाळे-खट्‌टर या मध्यमगती जोडीने सात गडी बाद करून विदर्भाची चांगलीच दाणादाण उडविली. ओगिराल यांच्या 39 धावा व अभ्यंकर यांच्या 25 धावा विदर्भाच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले होते. विदर्भाच्या गोलंदाजांनीही मध्य प्रदेशचा डाव 134 धावांत गुंडाळून आठ धावांची निसटती आघाडी घेतली. फिरकीपटू सिद्दीकी यांनी सर्वाधिक चार विकेट्‌स घेऊन विदर्भाला आघाडी मिळवून दिली. पहिल्या डावातील चुकांपासून धडा घेत विदर्भाने दुसऱ्या डावात 220 धावा काढून सामन्याला निर्णायक कलाटणी दिली. आठव्या स्थानावर फलंदाजीस आलेल्या इम्रान अलींनी "टेलेंडर्स'च्या मदतीने किल्ला लढवत संघाला दोनशेपार नेले. अली यांची नाबाद 83 धावांची जिगरबाज खेळी सामन्याचा खऱ्या अर्थाने "टर्निंग पॉइंट' ठरली. सिद्दीकी यांचेही 26 धावांचे योगदान बहुमूल्य ठरले.    विदर्भाने उतरविली रुळावरून रेल्वे! 28 वर्षांपूर्वी काय घडले वाचा सविस्तर   सिद्दीकी ठरले विजयाचे शिलेदार  शेवटच्या दिवशी विदर्भाने विजयासाठी मध्य प्रदेशसमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले होते. खेळपट्‌टीचे स्वरूप लक्षात घेता विदर्भाचा विजय आणि मध्य प्रदेशचा पराभव निश्‍चित होता. विदर्भ किती वेळात विजयाची औपचारिकता पूर्ण करतो, याचीच क्रिकेटप्रेमींना उत्सुकता होती. विदर्भाच्या गोलंदाजांनी 53 षटकांतच मध्य प्रदेशचा दुसरा डाव 128 धावांत गुंडाळून 100 धावांनी दणदणीत विजयावर शिक्‍कामोर्तब केले. विजयाचे शिल्पकार सिद्दीकी यांनी पुन्हा चार गडी बाद करून विदर्भाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सांघिक कामगिरीचा तो विजय वैदर्भी क्रिकेटपटूंसाठी सर्वार्थाने आनंद व समाधान देणारा होता.        News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eaufzb
Read More
लॉकडाउनमध्ये ३५ कोटींची शेतमाल तारण कर्जे वितरित

पुणे - कोरोना टाळेबंदीत बाजार समित्या बंदबरोबरच पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यानंतर शेतमालाचे दर घसरले होते. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांचा कल शेतमाल तारण योजनेकडे वाढला. गेल्या तीन महिन्यांत ९३ बाजार समित्यांद्वारे सुमारे साडेतीन हजार शेतकऱ्यांनी दीड लाख क्विंटल शेतमाल तारण ठेवून ३५ कोटींची कर्जे घेतली आहेत, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्‍ट्र राज्य कृषी पणन मंडळ हे शेतमाल तारण योजना राबविणारे देशातील एकमेव पणन मंडळ असून, याची दखल घेत केंद्र पातळीवर संपूर्ण देशात तारण योजना राबविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.

- काय सांगता! आता मोबाईलवरही करता येणार भाडेकरार

पवार म्हणाले, ‘‘कोरोना टाळेबंदीत बाजार समित्या बंद होत्या. देशांतर्गत वाहतूकही ठप्प होती. त्यामुळे शेतमालाची खरेदी विक्री थांबली होती. या परिस्थितीत काढणी झालेला शेतमाल कुठे ठेवायचा असा प्रश्‍न शेतकऱ्यांना होता. यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेत सहभागी होण्यासाठी पणन मंडळाने प्रयत्न केले. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणावर शेतमाल तारण ठेवून सुमारे ३५ कोटींचे कर्जे घेतली आहेत. बाजार समित्यांसह पुरवठा साखळी हळूहळू सुरळीत झाल्यावर शेतकऱ्यांना चांगले दर मिळतील. 

- सलून व्यावसायिकांनी घेतला मोठा निर्णय; काय आहे वाचा सविस्तर

अशी आहे योजना 
शेतमाल तारण योजनेत शेतकऱ्यांना बाजार समिती अथवा वखार महामंडळाच्या गोदामात शेतमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्के कर्ज ६ महिन्यांसाठी ६ टक्के व्याज दराने दिले जाते. यात तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, हरभरा, भात, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, घेवडा, काजू, बेदाणा, सुपारी, हळद आदी शेतमालाचा समावेश आहे. ही योजना राबविण्यासाठी ज्या बाजार समित्यांकडे स्वनिधी नसेल अशा बाजार समित्यांना ५ लाखांचा निधी पणन मंडळाकडून दिला जातो. 

- महावितरणकडून आवाहन, पावसाळ्यात अशी घ्या काळजी

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लॉकडाउनमध्ये ३५ कोटींची शेतमाल तारण कर्जे वितरित पुणे - कोरोना टाळेबंदीत बाजार समित्या बंदबरोबरच पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यानंतर शेतमालाचे दर घसरले होते. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांचा कल शेतमाल तारण योजनेकडे वाढला. गेल्या तीन महिन्यांत ९३ बाजार समित्यांद्वारे सुमारे साडेतीन हजार शेतकऱ्यांनी दीड लाख क्विंटल शेतमाल तारण ठेवून ३५ कोटींची कर्जे घेतली आहेत, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा महाराष्‍ट्र राज्य कृषी पणन मंडळ हे शेतमाल तारण योजना राबविणारे देशातील एकमेव पणन मंडळ असून, याची दखल घेत केंद्र पातळीवर संपूर्ण देशात तारण योजना राबविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. - काय सांगता! आता मोबाईलवरही करता येणार भाडेकरार पवार म्हणाले, ‘‘कोरोना टाळेबंदीत बाजार समित्या बंद होत्या. देशांतर्गत वाहतूकही ठप्प होती. त्यामुळे शेतमालाची खरेदी विक्री थांबली होती. या परिस्थितीत काढणी झालेला शेतमाल कुठे ठेवायचा असा प्रश्‍न शेतकऱ्यांना होता. यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेत सहभागी होण्यासाठी पणन मंडळाने प्रयत्न केले. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणावर शेतमाल तारण ठेवून सुमारे ३५ कोटींचे कर्जे घेतली आहेत. बाजार समित्यांसह पुरवठा साखळी हळूहळू सुरळीत झाल्यावर शेतकऱ्यांना चांगले दर मिळतील.  - सलून व्यावसायिकांनी घेतला मोठा निर्णय; काय आहे वाचा सविस्तर अशी आहे योजना  शेतमाल तारण योजनेत शेतकऱ्यांना बाजार समिती अथवा वखार महामंडळाच्या गोदामात शेतमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्के कर्ज ६ महिन्यांसाठी ६ टक्के व्याज दराने दिले जाते. यात तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, हरभरा, भात, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, घेवडा, काजू, बेदाणा, सुपारी, हळद आदी शेतमालाचा समावेश आहे. ही योजना राबविण्यासाठी ज्या बाजार समित्यांकडे स्वनिधी नसेल अशा बाजार समित्यांना ५ लाखांचा निधी पणन मंडळाकडून दिला जातो.  - महावितरणकडून आवाहन, पावसाळ्यात अशी घ्या काळजी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YNYgOH
Read More
एका क्‍लिकवर मिळवा जॉब... बेरोजगारांना जाळ्यात ओढताहेत सायबर क्रिमिनल्स 

नागपूर : कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेक कंपन्यांनी कामगार, नोकरदार, मजुरांना कामावरून कमी केले. तर परप्रांतीय कामगार घराकडे परतले. त्यामुळे सध्या अनेक कंपन्यांमध्ये जागा रिक्‍त आहेत. सध्या बेरोजगारांची संख्या पाहता सायबर क्रिमिनल्सची गॅंग सक्रिय झाली आहे. गलेलठ्ठ पगार, जॉब सिक्‍युरिटी, पीएफ आणि निवास यांसारख्या सुविधा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन नोंदणीच्या नावावर सावज टिपत आहेत. त्यासाठी फेसबुक, वॉट्‌सऍप, इंस्टाग्राम, ट्विटर आणि एसएमएसवरून बेरोजगारांना जाळे टाकण्याचा प्रयत्न सायबर किमिनल्स करीत आहेत. 

आठवी, दहावी आणि बारावीपासून ते इंजिनिअर्सपर्यंत नोकरी उपलब्ध आहे. नोकरीची सुवर्ण संधी... लॉकडाऊनमुळे त्वरित नोकरी देणे आहे... हॅंडसम सॅलरी, पॅकेज.. प्रॉव्हिडंट फंड, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था तसेच कंपनीतून घरापर्यंत प्रवासासाठी स्टाफबस... त्वरित नोंदणी करा किंवा त्वरित लिंकवर क्‍लिक करा... तुमचा एक फॉरवर्ड मॅसेज तुमच्या मित्रांना नोकरी मिळवून देऊ शकतो... असे असंख्य मॅसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत.

अधिक माहितीसाठी - नागपूरच्या या 'लेडी डॉन'ने केली अनेक पोलिस अधिकाऱ्यांची "शिकार"
 

तसेच अनेकांना एसएमएसच्या स्वरूपातही जाळे पसरविले जात आहे. सध्या नोकरी किंवा हाताला कामाच्या शोध असलेले शेकडो बेरोजगार आहेत. पगार आणि सुविधा बघता अनेक जण लिंकवर किंवा दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन करतात. चौकशी करतात आणि त्यांच्या जाळ्यात अलगद फसतात. 

असे अडकवितात जाळ्यात 

सायबर गुन्हेगारांनी पाठविलेल्या लिंकवर क्‍लिक केल्यानंतर एक फॉर्म येतो. त्यावर आपली स्वतःची माहिती भरावी लागते. त्यामध्ये बॅंकेला सलग्न असलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीसुद्धा आपण टाकतो. ही सर्व माहिती गोळा केल्यानंतर 500 ते हजार रुपये नोंदणी शुल्क भरण्यास सांगितले जाते. गरजवंत असल्याने 20 ते 30 हजार रुपये महिन्याच्या नोकरीसाठी तो पैसे टाकतो. 

असा करतात गेम 

जॉब कन्सल्टन्सी कंपनीतून बोलत असल्याचे सांगून पाच ते सहा ठिकाणी जॉब असल्याचे सांगितले जाते. पगार 30 हजार ते 40 हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली जाते. आमिषाला बळी पडल्यानंतर पुन्हा 2 ते 5 हजार रुपये "जॉब सर्चिंग चार्ज' म्हणून भरण्यास सांगितले जाते. पगाराचा आकडा पाहता तेवढे पैसे बॅंक खात्यात भरून अपॉइंटमेंट लेटरची वाट पाहण्यास सांगितले जाते. अशाप्रकारे दर आठ दिवसात कॉल करून असे शुल्क आकारतात. शेवटपर्यंत नोकरी मात्र मिळत नाही. 

अशी घ्या काळजी 

"नोकरीची सुवर्ण संधी' अशा सोशल मीडियावर व्हायरल मॅसेजवर विश्‍वास ठेवू नका 

स्वतःची शैक्षणिक पात्रता, कौशल्य पहा, त्यानुसार किती पगार आणि कोणते काम मिळू शकते, यावर विचार करा 

थेट कंपनीची वेबसाईट बघा, तेथील एचआर विभागाशी संपर्क करा 

 कोणत्याही दलालाच्या माध्यमातून नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करू नका 

  नोकरी मिळविण्यासाठी कुणालाही पैशाचा व्यवहार करू नका 

 

ओटीपी शेअर करू नका 
बेरोजगारांनी मोबाईल क्रमांकावर कॉल करू नका. कोणत्याही लिंकवर क्‍लिक करू नका. नव्याने बनावट बेवसाईट बनवू शकतात. वेबसाईट बनविल्याच्या तारखेवर लक्ष द्या. नुकताच बनविलेली असेल तर विश्‍वास ठेवू नका. शक्‍यतो बॅंक ट्रॅंझॅक्‍शन करू नका. ओटीपी किंवा बॅंक टिडेल्स शेअर करू नका. 
- डॉ. अर्जुन माने, सायबर एक्‍सपर्ट 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

एका क्‍लिकवर मिळवा जॉब... बेरोजगारांना जाळ्यात ओढताहेत सायबर क्रिमिनल्स  नागपूर : कोरोनाच्या महामारीमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेक कंपन्यांनी कामगार, नोकरदार, मजुरांना कामावरून कमी केले. तर परप्रांतीय कामगार घराकडे परतले. त्यामुळे सध्या अनेक कंपन्यांमध्ये जागा रिक्‍त आहेत. सध्या बेरोजगारांची संख्या पाहता सायबर क्रिमिनल्सची गॅंग सक्रिय झाली आहे. गलेलठ्ठ पगार, जॉब सिक्‍युरिटी, पीएफ आणि निवास यांसारख्या सुविधा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन नोंदणीच्या नावावर सावज टिपत आहेत. त्यासाठी फेसबुक, वॉट्‌सऍप, इंस्टाग्राम, ट्विटर आणि एसएमएसवरून बेरोजगारांना जाळे टाकण्याचा प्रयत्न सायबर किमिनल्स करीत आहेत.  आठवी, दहावी आणि बारावीपासून ते इंजिनिअर्सपर्यंत नोकरी उपलब्ध आहे. नोकरीची सुवर्ण संधी... लॉकडाऊनमुळे त्वरित नोकरी देणे आहे... हॅंडसम सॅलरी, पॅकेज.. प्रॉव्हिडंट फंड, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था तसेच कंपनीतून घरापर्यंत प्रवासासाठी स्टाफबस... त्वरित नोंदणी करा किंवा त्वरित लिंकवर क्‍लिक करा... तुमचा एक फॉरवर्ड मॅसेज तुमच्या मित्रांना नोकरी मिळवून देऊ शकतो... असे असंख्य मॅसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. अधिक माहितीसाठी - नागपूरच्या या 'लेडी डॉन'ने केली अनेक पोलिस अधिकाऱ्यांची "शिकार"   तसेच अनेकांना एसएमएसच्या स्वरूपातही जाळे पसरविले जात आहे. सध्या नोकरी किंवा हाताला कामाच्या शोध असलेले शेकडो बेरोजगार आहेत. पगार आणि सुविधा बघता अनेक जण लिंकवर किंवा दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन करतात. चौकशी करतात आणि त्यांच्या जाळ्यात अलगद फसतात.  असे अडकवितात जाळ्यात  सायबर गुन्हेगारांनी पाठविलेल्या लिंकवर क्‍लिक केल्यानंतर एक फॉर्म येतो. त्यावर आपली स्वतःची माहिती भरावी लागते. त्यामध्ये बॅंकेला सलग्न असलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीसुद्धा आपण टाकतो. ही सर्व माहिती गोळा केल्यानंतर 500 ते हजार रुपये नोंदणी शुल्क भरण्यास सांगितले जाते. गरजवंत असल्याने 20 ते 30 हजार रुपये महिन्याच्या नोकरीसाठी तो पैसे टाकतो.  असा करतात गेम  जॉब कन्सल्टन्सी कंपनीतून बोलत असल्याचे सांगून पाच ते सहा ठिकाणी जॉब असल्याचे सांगितले जाते. पगार 30 हजार ते 40 हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली जाते. आमिषाला बळी पडल्यानंतर पुन्हा 2 ते 5 हजार रुपये "जॉब सर्चिंग चार्ज' म्हणून भरण्यास सांगितले जाते. पगाराचा आकडा पाहता तेवढे पैसे बॅंक खात्यात भरून अपॉइंटमेंट लेटरची वाट पाहण्यास सांगितले जाते. अशाप्रकारे दर आठ दिवसात कॉल करून असे शुल्क आकारतात. शेवटपर्यंत नोकरी मात्र मिळत नाही.  अशी घ्या काळजी  "नोकरीची सुवर्ण संधी' अशा सोशल मीडियावर व्हायरल मॅसेजवर विश्‍वास ठेवू नका  स्वतःची शैक्षणिक पात्रता, कौशल्य पहा, त्यानुसार किती पगार आणि कोणते काम मिळू शकते, यावर विचार करा  थेट कंपनीची वेबसाईट बघा, तेथील एचआर विभागाशी संपर्क करा   कोणत्याही दलालाच्या माध्यमातून नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करू नका    नोकरी मिळविण्यासाठी कुणालाही पैशाचा व्यवहार करू नका    ओटीपी शेअर करू नका  बेरोजगारांनी मोबाईल क्रमांकावर कॉल करू नका. कोणत्याही लिंकवर क्‍लिक करू नका. नव्याने बनावट बेवसाईट बनवू शकतात. वेबसाईट बनविल्याच्या तारखेवर लक्ष द्या. नुकताच बनविलेली असेल तर विश्‍वास ठेवू नका. शक्‍यतो बॅंक ट्रॅंझॅक्‍शन करू नका. ओटीपी किंवा बॅंक टिडेल्स शेअर करू नका.  - डॉ. अर्जुन माने, सायबर एक्‍सपर्ट  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 18, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30SqJFT
Read More