Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, June 2, 2020

कोकणात जोरदार पाऊस, राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सक्रीय

कोकणात जोरदार पाऊस, राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सक्रीय

June 02, 2020 0 Comments
मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर कोकणातही अनेक ठिकाणी दोन दिवस पाऊस कोसळत आहे. चक्रीवादळाच्याआधी पाऊस सक्रीय झालेला दिसून येत आहे.   from Ze...
Read More
CycloneNisarg : 'निसर्ग' धडकल्यास संकटसमयी काय करावं आणि काय करु नये?
कोकण किनारपट्टीला १८९१ नंतर धडकणारे पहिलेच चक्रीवादळ, अशी घ्या काळजी

कोकण किनारपट्टीला १८९१ नंतर धडकणारे पहिलेच चक्रीवादळ, अशी घ्या काळजी

June 02, 2020 0 Comments
 कोकण किनापट्टीवर निसर्ग चक्रीवादळ दाखल झाले आहे. या वादळाचा वेग दुपारनंतर आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.   from Zee24 Taas: Maharashtra ...
Read More
निरोपाआधीच घेतला आरोग्ययोद्ध्याने ‘निरोप’, दंत महाविद्यालयाच्या चालकाची एक्झिटने चटका

औरंगाबाद ः गतवर्षी शासनाच्या महाआरोग्य शिबिरात हिरिरीने सहभाग घेतला. अविरत सेवा केली, आता अठ्ठावीस दिवसांनी म्हणजेच ३० जूनला ते निवृत्तच होणार होते. म्हणून त्यांचा सत्कार करून आभारही मानण्यात येणार होते; पण नियतीलाच ते मान्य नसावे.

निवृत्तीच्या निरोप समारंभाआधीच त्यांचा कोविड व इतर आजारामुळे मृत्यू झाला. त्यांची अचानक झालेली एक्झिट चटका लावणारी असून आरोग्य क्षेत्रात हळहळ होत आहे. 

शहागंज येथील ५८ वर्षीय आरोग्ययोद्धा शासकीय दंत महाविद्यालयात मोबाईल डेंटल व्हॅनवर चालक होते. येथे पाच वर्षांपासून ते काम करीत होते. यापूर्वी ते घाटीत रुजू होते. कामावर असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. 

त्यांना २३ मेपासून त्यांना ताप, खोकला व दम लागत होता. २७ मेरोजी त्यांना घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु त्यांचा उपचारादरम्यान दोन जूनला पहाटे एकच्या सुमारास कोरोना आणि इतर आजाराने मृत्यू झाला. येत्या ३० जूनला ते निवृत्त होणार होते. 

 coronavirus : जालन्यात अजून दोघांना बाधा, तिघे कोरोनामुक्त   

अविरत सेवेबद्दल त्यांचा शासकीय दंत महाविद्यालयातर्फे यथोचित सत्कार करून त्यांना निरोपही देण्यात येणार होता; परंतु निवृत्तीच्या आधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. शासकिय दंत महाविद्यालयातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

अभियानात योगदान 
गतवर्षी राज्य शासनाच्या महाआरोग्य शिबिरावेळी मोबाईल व्हॅनद्वारे त्यांनी पालघर, दीव-दमणसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सेवा बजावली. विशेषतः आदिवासी भागातही त्यांनी या अभियानात योगदान दिले होते. 

बॉलिवूडच्या या पिता-पुत्रीचे आहे अहल्याबाई होळकरांशी नाते, जाणून घ्या... 

  

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

निरोपाआधीच घेतला आरोग्ययोद्ध्याने ‘निरोप’, दंत महाविद्यालयाच्या चालकाची एक्झिटने चटका औरंगाबाद ः गतवर्षी शासनाच्या महाआरोग्य शिबिरात हिरिरीने सहभाग घेतला. अविरत सेवा केली, आता अठ्ठावीस दिवसांनी म्हणजेच ३० जूनला ते निवृत्तच होणार होते. म्हणून त्यांचा सत्कार करून आभारही मानण्यात येणार होते; पण नियतीलाच ते मान्य नसावे. निवृत्तीच्या निरोप समारंभाआधीच त्यांचा कोविड व इतर आजारामुळे मृत्यू झाला. त्यांची अचानक झालेली एक्झिट चटका लावणारी असून आरोग्य क्षेत्रात हळहळ होत आहे.  शहागंज येथील ५८ वर्षीय आरोग्ययोद्धा शासकीय दंत महाविद्यालयात मोबाईल डेंटल व्हॅनवर चालक होते. येथे पाच वर्षांपासून ते काम करीत होते. यापूर्वी ते घाटीत रुजू होते. कामावर असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते.  त्यांना २३ मेपासून त्यांना ताप, खोकला व दम लागत होता. २७ मेरोजी त्यांना घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु त्यांचा उपचारादरम्यान दोन जूनला पहाटे एकच्या सुमारास कोरोना आणि इतर आजाराने मृत्यू झाला. येत्या ३० जूनला ते निवृत्त होणार होते.   coronavirus : जालन्यात अजून दोघांना बाधा, तिघे कोरोनामुक्त    अविरत सेवेबद्दल त्यांचा शासकीय दंत महाविद्यालयातर्फे यथोचित सत्कार करून त्यांना निरोपही देण्यात येणार होता; परंतु निवृत्तीच्या आधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. शासकिय दंत महाविद्यालयातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  अभियानात योगदान  गतवर्षी राज्य शासनाच्या महाआरोग्य शिबिरावेळी मोबाईल व्हॅनद्वारे त्यांनी पालघर, दीव-दमणसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सेवा बजावली. विशेषतः आदिवासी भागातही त्यांनी या अभियानात योगदान दिले होते.  बॉलिवूडच्या या पिता-पुत्रीचे आहे अहल्याबाई होळकरांशी नाते, जाणून घ्या...     News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36SFiu4
Read More
Video : वाह! याला म्हणतात छंद; पिंपळे सौदागरातील खेळाडूची ही आगळीवेगळी आवड बघाच

पिंपरी : कोणाला जुनी नाणी अथवा टपाल तिकिटे जमा करण्याचा छंद असतो. तर कोणाला भटकंती करण्याचा. मात्र, पिंपळे सौदागर येथील माजी टेबल टेनिसपटू चंदर थवानी यांना देश-विदेशातील दिग्गज टेबल टेनिसपटूंच्या स्वाक्षऱ्या जमा करण्याचा छंद असून, त्यांनी आतापर्यंत सुमारे शंभरहून अधिक दिग्गज टेबल टेनिस खेळाडूंच्या रॅकेट अथवा चेंडूवर स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी कॅम्प येथील जयहिंद कनिष्ठ महाविद्यालय आणि पुढे मंघनमल उधाराम (एमयू) महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना थवानी यांना टेबल टेनिस खेळाची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानंतरच्या कालखंडात व्यवसायाकडे त्यांना अधिक लक्ष द्यावे लागल्याने त्यांना खेळापासून दूर जावे लागले. हॉंगकॉंगमध्ये व्यवसायानिमित्त सुमारे दहा वर्षे व्यतीत करताना थवानी हे परत टेबल टेनिसच्या जवळ आले. काही आंतरराष्ट्रीय स्पर्धा जवळून पाहता आल्या. त्यामुळे दिग्गज खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या जमा करण्याचा त्यांना छंद लागला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबद्दल बोलताना थवानी म्हणाले, "साधारणतः 2000 पासून टेबल टेनिस खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यास सुरुवात केली. चीनची अव्वल खेळाडू झांग यिनिंग हिची 2004 मध्ये महिला विश्‍वचषक स्पर्धेनिमित्त पहिली सही घेतली. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे 90 आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडू आणि 10 राष्ट्रीय खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. या सर्व स्वाक्षऱ्या टेबल टेनिसच्या रॅकेट आणि चेंडूवर घेतल्या आहेत. माझ्याकडे असे एकूण 8 रॅकेट आणि 6 चेंडू आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये मा लीन, वांग नान (चीन), थे याना (हॉंगकॉंग), किंग युंग आ (कोरिया), बोरोस तमारा (क्रोएशिया), बडेसकू ओटिलिया (रोमानिया) आदींचा समावेश आहे. तर राष्ट्रीय खेळाडूंमध्ये अचंता शरद कमल, एस. गनसेखरन, हरमित देसाई, मानव ठक्कर, अमल राज, सनील शेट्टी महिलांमध्ये मनिका बत्रा, मधुरिका पाटकर, मोमा दास आदी खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

थवानी यांनी आतापर्यंत आयटीटीएफ वर्ल्ड टूर हॉंगकॉंग ओपन, आयटीटीएफ वर्ल्ड टूर प्लॅटेनियन चायना ओपन, आयटीटीएफ चॅलेंज इंडोनेशिया ओपन आदी एकंदरित 20 टेबल टेनिस स्पर्धा जवळून पाहिल्या आहेत. कोरिया येथील यावर्षीच्या वर्ल्ड टेबल टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी जाण्याचा त्यांचा विचार आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : वाह! याला म्हणतात छंद; पिंपळे सौदागरातील खेळाडूची ही आगळीवेगळी आवड बघाच पिंपरी : कोणाला जुनी नाणी अथवा टपाल तिकिटे जमा करण्याचा छंद असतो. तर कोणाला भटकंती करण्याचा. मात्र, पिंपळे सौदागर येथील माजी टेबल टेनिसपटू चंदर थवानी यांना देश-विदेशातील दिग्गज टेबल टेनिसपटूंच्या स्वाक्षऱ्या जमा करण्याचा छंद असून, त्यांनी आतापर्यंत सुमारे शंभरहून अधिक दिग्गज टेबल टेनिस खेळाडूंच्या रॅकेट अथवा चेंडूवर स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पिंपरी कॅम्प येथील जयहिंद कनिष्ठ महाविद्यालय आणि पुढे मंघनमल उधाराम (एमयू) महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना थवानी यांना टेबल टेनिस खेळाची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानंतरच्या कालखंडात व्यवसायाकडे त्यांना अधिक लक्ष द्यावे लागल्याने त्यांना खेळापासून दूर जावे लागले. हॉंगकॉंगमध्ये व्यवसायानिमित्त सुमारे दहा वर्षे व्यतीत करताना थवानी हे परत टेबल टेनिसच्या जवळ आले. काही आंतरराष्ट्रीय स्पर्धा जवळून पाहता आल्या. त्यामुळे दिग्गज खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या जमा करण्याचा त्यांना छंद लागला.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा याबद्दल बोलताना थवानी म्हणाले, "साधारणतः 2000 पासून टेबल टेनिस खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यास सुरुवात केली. चीनची अव्वल खेळाडू झांग यिनिंग हिची 2004 मध्ये महिला विश्‍वचषक स्पर्धेनिमित्त पहिली सही घेतली. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे 90 आंतरराष्ट्रीय दिग्गज खेळाडू आणि 10 राष्ट्रीय खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. या सर्व स्वाक्षऱ्या टेबल टेनिसच्या रॅकेट आणि चेंडूवर घेतल्या आहेत. माझ्याकडे असे एकूण 8 रॅकेट आणि 6 चेंडू आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये मा लीन, वांग नान (चीन), थे याना (हॉंगकॉंग), किंग युंग आ (कोरिया), बोरोस तमारा (क्रोएशिया), बडेसकू ओटिलिया (रोमानिया) आदींचा समावेश आहे. तर राष्ट्रीय खेळाडूंमध्ये अचंता शरद कमल, एस. गनसेखरन, हरमित देसाई, मानव ठक्कर, अमल राज, सनील शेट्टी महिलांमध्ये मनिका बत्रा, मधुरिका पाटकर, मोमा दास आदी खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत.''  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  थवानी यांनी आतापर्यंत आयटीटीएफ वर्ल्ड टूर हॉंगकॉंग ओपन, आयटीटीएफ वर्ल्ड टूर प्लॅटेनियन चायना ओपन, आयटीटीएफ चॅलेंज इंडोनेशिया ओपन आदी एकंदरित 20 टेबल टेनिस स्पर्धा जवळून पाहिल्या आहेत. कोरिया येथील यावर्षीच्या वर्ल्ड टेबल टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी जाण्याचा त्यांचा विचार आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XXgAVc
Read More
आयुर्वेदाची मात्रा ठरली प्रभावी; कोरोनाबाधित अत्यवस्थ आजोबा आजारातून बरे 

पुणे - साठी ओलांडलेल्या उच्च रक्तदाबाच्या रुग्णाचे प्राण आयुर्वेदाच्या मात्रेमुळे वाचल्याचे पुण्यातील खासगी रुग्णालयात दिसून आले आहे. उपचार करणारे डॉक्टर, आयुर्वेदाची मात्रा देणारे वैद्य आणि आयुर्वेदिक औषधांचा आग्रह धरणाऱ्या नातेवाईकांना याचा प्रत्यय आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खासगी रुग्णालयात दाखल होतानाच या रुग्णाच्या छातीचा एक्स-रे काढण्यात आला तसेच कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यातून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊ लागले. त्यांना अतिदक्षता विभागात ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. नंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची आवश्यकता असल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. त्याचवेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी आयुर्वेदाच्या औषधांचा आग्रह धरला. रुग्णालयाने आणि डॉक्टरांनीही नातेवाईकांच्या जबाबदारीवर आयुर्वेदाच्या उपचारांना परवानगी दिली. एका बाजूला ऑक्सिजन सुरू होता व काही अत्यावश्यक औषधेही रुग्णाला देण्यात येत होती. त्याच वेळी, दुसरीकडे आयुर्वेदाची मात्रा. या गुंतागुंतीच्या स्थितीत आयुर्वेदाच्या औषधांची मात्रा परिणामकारक ठरू लागली. व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आली नाही. हळूहळू कृत्रिम पद्धतीने दिल्या जाणाऱ्या आँक्सिजनच्या प्रमाणाची गरज कमी होऊन रुग्ण स्वतःहून श्‍‍वासोच्छवास करू लागला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

संशोधनाचा आधार आवश्यक 
आयुर्वेदाच्या उपचाराने एका रुग्णाची प्रकृती सुधारली, तरीही प्रत्येक कोरोनाच्या रुग्णावर हेच उपचार प्रभावी ठरतील, असा दावा आत्ताच करता येणार नाही. त्यासाठी संशोधनाची गरज आहे, असे मत ॲलोपॅथीचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केले. 

आयुर्वेदाचे योगदान 
आयुर्वेदाचा भारतात तसेच जगभर प्रसार करताना आपण सुरू केलेली ‘रसायन’ ही शाश्वत आयुर्वेदीय संकल्पना व त्याचे महत्त्व आता संपूर्ण जगाला पटत आहे. सुमारे २५ वर्षांहून अधिक काळ आपण रसायानाद्वारे अनेक गंभीर आजाराच्या रुग्णांवर उपचार करीत आलो आहोत. आयुर्वेदाची रसायन ही अत्यंत उच्च प्रतीची शास्त्रीय संकल्पना असून, त्यावर आधारित औषधांमुळे सार्वदेहिक व्याधिप्रतिकारशक्ती वाढते तसेच मानसिक व्याधिप्रतिकारशक्ती देखील मोठ्या प्रमाणावर वाढते. 

केवळ एका रुग्णाच्या अनुभवावरून कोणताही दावा करता येणार नाही; परंतू आधुनिक शास्त्रातील अनेक वैद्यकीय शोध प्रथम एखाद्या रुग्णांवर आलेल्या निरीक्षणातून लागले आहेत. यात आयुर्वेदाच्या माध्यमातून आधुनिक संशोधनाला नवी दिशा मिळू शकते, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयुर्वेद पहिले शास्त्र 
‘सर्व रुग्णांना एकच औषध’ ही आधुनिक शास्त्रातील संकल्पना आता आधुनिकांनीच नाकारली आहे. प्रत्येक रुग्णाचे आरोग्य भिन्न असल्याने एकच औषध सर्वांना लागू पडत नाही, जगात हे सर्वप्रथम सांगणारे आयुर्वेद हे शास्त्र ठरले आहे. 

कोरोनामुळे उद्भवणारा व त्यामुळे संपूर्ण जगात मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचा बारकाईने अभ्यास करून यात धोका असणाऱ्या रुग्णांचे वर्गीकरण करून त्यांची आयुर्वेदीय रसायांनाद्वारे व्याधिप्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल, याची योजना करून राबवली जात आहे. अत्याधुनिक पद्धतीने हा संशोधन प्रकल्प राबविला जात आहे. यातील सुरुवातीचे निष्कर्ष अत्यंत समाधानकारक आहेत. यात आधुनिक शास्त्राचे तज्ज्ञ डॉक्टरही तसेच इतर शाखांतील शास्त्रज्ञही तितक्याच सकारात्मकतेने जोडले गेले आहेत. 
-वैद्य योगेश बेंडाळे, रसायू आयुर्वेद क्लिनिक 

-कोविड रुग्णाला आयुर्वेदातील रसायन आणि व्यक्तिसापेक्ष चिकित्सेचा फायदा 
-प्रतिबंधात्मक म्हणून आयुर्वेद उपचार पद्धतीस प्राधान्य 
-कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण पाहता आयुर्वेद एक आशेचा किरण 
-साथरोगात मानसिक आरोग्य आणि प्रतिकार शक्ती उपयुक्त ठरते, हा आयुर्वेद सिद्धांत 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आयुर्वेदाची मात्रा ठरली प्रभावी; कोरोनाबाधित अत्यवस्थ आजोबा आजारातून बरे  पुणे - साठी ओलांडलेल्या उच्च रक्तदाबाच्या रुग्णाचे प्राण आयुर्वेदाच्या मात्रेमुळे वाचल्याचे पुण्यातील खासगी रुग्णालयात दिसून आले आहे. उपचार करणारे डॉक्टर, आयुर्वेदाची मात्रा देणारे वैद्य आणि आयुर्वेदिक औषधांचा आग्रह धरणाऱ्या नातेवाईकांना याचा प्रत्यय आला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप खासगी रुग्णालयात दाखल होतानाच या रुग्णाच्या छातीचा एक्स-रे काढण्यात आला तसेच कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यातून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊ लागले. त्यांना अतिदक्षता विभागात ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. नंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची आवश्यकता असल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. त्याचवेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी आयुर्वेदाच्या औषधांचा आग्रह धरला. रुग्णालयाने आणि डॉक्टरांनीही नातेवाईकांच्या जबाबदारीवर आयुर्वेदाच्या उपचारांना परवानगी दिली. एका बाजूला ऑक्सिजन सुरू होता व काही अत्यावश्यक औषधेही रुग्णाला देण्यात येत होती. त्याच वेळी, दुसरीकडे आयुर्वेदाची मात्रा. या गुंतागुंतीच्या स्थितीत आयुर्वेदाच्या औषधांची मात्रा परिणामकारक ठरू लागली. व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आली नाही. हळूहळू कृत्रिम पद्धतीने दिल्या जाणाऱ्या आँक्सिजनच्या प्रमाणाची गरज कमी होऊन रुग्ण स्वतःहून श्‍‍वासोच्छवास करू लागला.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  संशोधनाचा आधार आवश्यक  आयुर्वेदाच्या उपचाराने एका रुग्णाची प्रकृती सुधारली, तरीही प्रत्येक कोरोनाच्या रुग्णावर हेच उपचार प्रभावी ठरतील, असा दावा आत्ताच करता येणार नाही. त्यासाठी संशोधनाची गरज आहे, असे मत ॲलोपॅथीचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केले.  आयुर्वेदाचे योगदान  आयुर्वेदाचा भारतात तसेच जगभर प्रसार करताना आपण सुरू केलेली ‘रसायन’ ही शाश्वत आयुर्वेदीय संकल्पना व त्याचे महत्त्व आता संपूर्ण जगाला पटत आहे. सुमारे २५ वर्षांहून अधिक काळ आपण रसायानाद्वारे अनेक गंभीर आजाराच्या रुग्णांवर उपचार करीत आलो आहोत. आयुर्वेदाची रसायन ही अत्यंत उच्च प्रतीची शास्त्रीय संकल्पना असून, त्यावर आधारित औषधांमुळे सार्वदेहिक व्याधिप्रतिकारशक्ती वाढते तसेच मानसिक व्याधिप्रतिकारशक्ती देखील मोठ्या प्रमाणावर वाढते.  केवळ एका रुग्णाच्या अनुभवावरून कोणताही दावा करता येणार नाही; परंतू आधुनिक शास्त्रातील अनेक वैद्यकीय शोध प्रथम एखाद्या रुग्णांवर आलेल्या निरीक्षणातून लागले आहेत. यात आयुर्वेदाच्या माध्यमातून आधुनिक संशोधनाला नवी दिशा मिळू शकते, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा आयुर्वेद पहिले शास्त्र  ‘सर्व रुग्णांना एकच औषध’ ही आधुनिक शास्त्रातील संकल्पना आता आधुनिकांनीच नाकारली आहे. प्रत्येक रुग्णाचे आरोग्य भिन्न असल्याने एकच औषध सर्वांना लागू पडत नाही, जगात हे सर्वप्रथम सांगणारे आयुर्वेद हे शास्त्र ठरले आहे.  कोरोनामुळे उद्भवणारा व त्यामुळे संपूर्ण जगात मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचा बारकाईने अभ्यास करून यात धोका असणाऱ्या रुग्णांचे वर्गीकरण करून त्यांची आयुर्वेदीय रसायांनाद्वारे व्याधिप्रतिकारशक्ती कशी वाढवता येईल, याची योजना करून राबवली जात आहे. अत्याधुनिक पद्धतीने हा संशोधन प्रकल्प राबविला जात आहे. यातील सुरुवातीचे निष्कर्ष अत्यंत समाधानकारक आहेत. यात आधुनिक शास्त्राचे तज्ज्ञ डॉक्टरही तसेच इतर शाखांतील शास्त्रज्ञही तितक्याच सकारात्मकतेने जोडले गेले आहेत.  -वैद्य योगेश बेंडाळे, रसायू आयुर्वेद क्लिनिक  -कोविड रुग्णाला आयुर्वेदातील रसायन आणि व्यक्तिसापेक्ष चिकित्सेचा फायदा  -प्रतिबंधात्मक म्हणून आयुर्वेद उपचार पद्धतीस प्राधान्य  -कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण पाहता आयुर्वेद एक आशेचा किरण  -साथरोगात मानसिक आरोग्य आणि प्रतिकार शक्ती उपयुक्त ठरते, हा आयुर्वेद सिद्धांत  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2U82L5o
Read More
पंधरा दिवसांत फेरफार मंजूर न केल्यास दिवसाला पाचशे रुपये दंड!

तलाठी तसेच मंडळ अधिकाऱ्यांनी शेतकरी अथवा नागरिकाकडून फेरफार करण्यासाठी आलेला अर्ज पंधरा दिवसांच्या आत निकाली काढणे गरजेचे आहे. पंधरा दिवसांच्या आत फेरफार मंजूर न केल्यास पुढील प्रत्येक दिवसाला संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून पाचशे रुपये दंड आकारणी केली जाईल, असे आदेश बीड येथील जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नुकतेच काढल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी उदय चौधरी हेदेखील बीडप्रमाणेच धडाकेबाज आदेश काढून वेळेत फेरफार न करणाऱ्या, तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना वठणीवर आणतील काय, असा प्रश्न औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांकडून; तसेच शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

चक्क! मृत शिक्षकाला चेकपोस्टवर ड्युटी...
 
अधिनियमालाच हरताळ 
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १५० नुसार संबंधित तलाठ्याकडे एखाद्या एखाद्या शेतकरी अथवा नागरिकाने फेरफार मंजुरीसाठी अर्ज सादर केल्यास, त्यावर १५ दिवसांच्या काळात कार्यवाही आवश्यक आहे; परंतु तसे होत नसल्याने नागरिकांना विनाकारण तलाठी सजामध्ये हेलपाटे मारावे लागतात. यातून अख्ख्या महसूल प्रशासनाची नाहक बदनामी होत आहे. 

भूमिअभिलेख आधुनिकीकरणालाही फाटा 
डिजिटल इंडिया भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत सातबारा संगणकीकरण व ई-फेरफार कार्यक्रम राज्यात प्रगतिपथावर आहे. यात नागरिकांना अचूक व संगणकीकृत अधिकार अभिलेख जलद गतीने पुरवण्याची जबाबदारी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर सोपविलेली आहे; परंतु या उपक्रमालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले जात असल्याच्या शेतकरी व नागरिकांच्या तक्रारी आहेत. 
  
तलाठ्यांवर ठपका 
बीडचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांच्याकडील रेकॉर्डची अचानक तपासणी केली असता सहा महिन्यांहून अधिक काळ होऊनही मोठ्या संख्येने फेरफार मंजूर केले नसल्याचे निदर्शनास आले; तसेच तलाठी यांच्याकडील लॉगिनमध्ये दस्त प्राप्त झाल्यानंतरही फेरफार तयार न करणे, नोटीस न बजावणे, नोटीस दिल्याचा दिनांक न भरणे, ई-फेरफार तसेच मंडळ अधिकारी यांच्याकडे फेरफार मंजुरीसाठी उपलब्ध होऊनही पंधरा दिवसांत मंजूर न करणे, आदी अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. औरंगाबाद जिल्ह्यातही असेच प्रकार झाल्याची दाट शक्यता आहे. 
 
औरंगाबाद जिल्ह्यातील दोषींवर कारवाई होणार का? 
जिल्ह्यातील संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडे प्रलंबित असलेल्या फेरफारबाबत, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी हेदेखील बीड जिल्हाधिकारी यांच्याप्रमाणेच आदेश पारित करून, फेरफार मंजुरीचे प्रकरणे वेळेत निकाली न काढणाऱ्या, संबंधित दोषी तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडून दंड वसूल करतील का, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. 

सेवा हमी कायद्याचाही विसर 
महानगरपालिका हद्दीतील तलाठी व मंडळ अधिकारी यांचे महसूल अभिलेखाची सुद्धा जिल्हाधिकारी चौधरी यांनी भरारी पथकामार्फत तपासणी करणे गरजेचे आहे. गाव नमुना एक ते एकवीस अद्ययावत आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी तहसीलदार, नायब तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी स्वतःहून महापालिका हद्दीतील तलाठी सजामधील अभिलेखाची संपूर्णपणे तपासणी करून ऑडिट करावे; तसेच त्या त्या सजामधील तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडे किती फेरफार प्रलंबित आहे याची शहानिशा करावी. सजामधील आवक-जावक रजिस्टरचीही कसून तपासणी करावी. असे केल्यास सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी होईल. तसेच शासनाचे नागरिकांच्या सनदेत ठरवून दिलेल्या वेळेनुसार तलाठ्याकडे अर्ज दिल्यानुसार त्यांनी तो अर्ज मंडळ अधिकारी यांच्याकडे फेरफार नोंदवून आवक रजिस्टरला नोंद घेऊन, दोन दिवसाच्या आत मंडळ अधिकारी यांच्याकडे सादर करावा, असे सेवा हमी कायद्यामध्ये तरतूद आहे. याची अंमलबजावणी झाल्यास अनेकांचे पितळ उघडे पडेल, अशी कुजबुज महसूलच्या वर्तुळात सुरू आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पंधरा दिवसांत फेरफार मंजूर न केल्यास दिवसाला पाचशे रुपये दंड! तलाठी तसेच मंडळ अधिकाऱ्यांनी शेतकरी अथवा नागरिकाकडून फेरफार करण्यासाठी आलेला अर्ज पंधरा दिवसांच्या आत निकाली काढणे गरजेचे आहे. पंधरा दिवसांच्या आत फेरफार मंजूर न केल्यास पुढील प्रत्येक दिवसाला संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून पाचशे रुपये दंड आकारणी केली जाईल, असे आदेश बीड येथील जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नुकतेच काढल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी उदय चौधरी हेदेखील बीडप्रमाणेच धडाकेबाज आदेश काढून वेळेत फेरफार न करणाऱ्या, तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना वठणीवर आणतील काय, असा प्रश्न औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांकडून; तसेच शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.  चक्क! मृत शिक्षकाला चेकपोस्टवर ड्युटी...   अधिनियमालाच हरताळ  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १५० नुसार संबंधित तलाठ्याकडे एखाद्या एखाद्या शेतकरी अथवा नागरिकाने फेरफार मंजुरीसाठी अर्ज सादर केल्यास, त्यावर १५ दिवसांच्या काळात कार्यवाही आवश्यक आहे; परंतु तसे होत नसल्याने नागरिकांना विनाकारण तलाठी सजामध्ये हेलपाटे मारावे लागतात. यातून अख्ख्या महसूल प्रशासनाची नाहक बदनामी होत आहे.  भूमिअभिलेख आधुनिकीकरणालाही फाटा  डिजिटल इंडिया भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत सातबारा संगणकीकरण व ई-फेरफार कार्यक्रम राज्यात प्रगतिपथावर आहे. यात नागरिकांना अचूक व संगणकीकृत अधिकार अभिलेख जलद गतीने पुरवण्याची जबाबदारी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर सोपविलेली आहे; परंतु या उपक्रमालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले जात असल्याच्या शेतकरी व नागरिकांच्या तक्रारी आहेत.     तलाठ्यांवर ठपका  बीडचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांच्याकडील रेकॉर्डची अचानक तपासणी केली असता सहा महिन्यांहून अधिक काळ होऊनही मोठ्या संख्येने फेरफार मंजूर केले नसल्याचे निदर्शनास आले; तसेच तलाठी यांच्याकडील लॉगिनमध्ये दस्त प्राप्त झाल्यानंतरही फेरफार तयार न करणे, नोटीस न बजावणे, नोटीस दिल्याचा दिनांक न भरणे, ई-फेरफार तसेच मंडळ अधिकारी यांच्याकडे फेरफार मंजुरीसाठी उपलब्ध होऊनही पंधरा दिवसांत मंजूर न करणे, आदी अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. औरंगाबाद जिल्ह्यातही असेच प्रकार झाल्याची दाट शक्यता आहे.    औरंगाबाद जिल्ह्यातील दोषींवर कारवाई होणार का?  जिल्ह्यातील संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडे प्रलंबित असलेल्या फेरफारबाबत, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी हेदेखील बीड जिल्हाधिकारी यांच्याप्रमाणेच आदेश पारित करून, फेरफार मंजुरीचे प्रकरणे वेळेत निकाली न काढणाऱ्या, संबंधित दोषी तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडून दंड वसूल करतील का, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.  सेवा हमी कायद्याचाही विसर  महानगरपालिका हद्दीतील तलाठी व मंडळ अधिकारी यांचे महसूल अभिलेखाची सुद्धा जिल्हाधिकारी चौधरी यांनी भरारी पथकामार्फत तपासणी करणे गरजेचे आहे. गाव नमुना एक ते एकवीस अद्ययावत आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी तहसीलदार, नायब तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी स्वतःहून महापालिका हद्दीतील तलाठी सजामधील अभिलेखाची संपूर्णपणे तपासणी करून ऑडिट करावे; तसेच त्या त्या सजामधील तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडे किती फेरफार प्रलंबित आहे याची शहानिशा करावी. सजामधील आवक-जावक रजिस्टरचीही कसून तपासणी करावी. असे केल्यास सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी होईल. तसेच शासनाचे नागरिकांच्या सनदेत ठरवून दिलेल्या वेळेनुसार तलाठ्याकडे अर्ज दिल्यानुसार त्यांनी तो अर्ज मंडळ अधिकारी यांच्याकडे फेरफार नोंदवून आवक रजिस्टरला नोंद घेऊन, दोन दिवसाच्या आत मंडळ अधिकारी यांच्याकडे सादर करावा, असे सेवा हमी कायद्यामध्ये तरतूद आहे. याची अंमलबजावणी झाल्यास अनेकांचे पितळ उघडे पडेल, अशी कुजबुज महसूलच्या वर्तुळात सुरू आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MqDqiS
Read More
दिल्लीः तुगलकाबाद में स्लम बस्ती में लगी आग, कोई हताहत नहीं https://ift.tt/2yUZONY

Monday, June 1, 2020

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा चढता आलेख 

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात मार्चमध्ये एक आणि एप्रिलमध्ये एक, असे केवळ दोन रुग्ण मिळाले होते; मात्र 5 मे ते 31 मे या 27 दिवसांत तब्बल 54 रुग्ण आढळले आहेत. तर 1 जून रोजी 133 अहवालांपैकी 14 अहवाल पॉझझिटिव्ह आले आहेत. 16 मार्च ते 30 एप्रिल लॉकडाउन राहून कंटाळलेल्या चाकरमान्यांनी मेमध्ये जिल्ह्यात आपापल्या गावात धाव घेतली. परिणामी रेड झोन व कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची संख्या वाढल्याने लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या वाढू लागली. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात ही संख्या सत्तरच्या जवळ पोहोचली आहे. 

ई-पासची खिरापत 
तिसरा टप्पा 1 मे रोजी जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्गात काही प्रमाणात लॉकडाउनमध्ये शिथिलता जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आणली. ई-पासची "खिरापत' मुंबई येथून सुरू झाली. त्याचा परिणाम मुंबई, पुणेसारख्या रेड झोनमध्ये वास्तव्यास असलेल्या सिंधुदुर्गवासीय मोठ्या संख्येने जिल्ह्यात येण्यास झाला. या महिन्यात तब्बल 58 हजार चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे याच महिन्यांत मिळालेले 54 कोरोना रुग्ण हे याच चाकरमान्यांतील आहेत. सिंधुदुर्गात नियंत्रणात असलेल्या कोरोनाने मेमध्ये जोरदार मुसंडी मारत प्रशासनाने केलेल्या नियोजनावर व नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादावर पाणी फिरले आहे. 

जिल्ह्यातील कोरोनाबाधित गावे 
* कणकवली : नडगिवे, ढालकाठी, डांबरे, शिवडाव, बावशी, हरकुळ खुर्द, हरकुळ बुद्रुक, पियाळी, वारगाव, बीडवाडी, कासार्डे, नाटळ, जानवली 
* कुडाळ : घोटगे, जांभवडे, नेरूर, पणदूर, कवठी 
* वेंगुर्ले - वायंगणी, मातोंड 
* देवगड : वाडा, कालवी-टेंबवली, नाद 
* मालवण : हिवाळे, सुकळवाड, हेदुळ 
* वैभववाडी : नाधवडे, तिरवडे, उंबर्डे, सडुरे 
* सावंतवाडी ः कारिवडे, बांदा, असनिये, माडखोल, डेगवे 
* दोडामार्ग : एकही नाही 

29 मेचा मोठा धक्का 
सिंधुदुर्गात पहिला रुग्ण 26 मार्चला मिळाला. दुसरा रुग्ण 35 दिवसांनी 29 एप्रिलला मिळाला. 5 मे रोजी तिसरा, 7 मे रोजी चौथा, 7 मेस पाचवा, 11 मे रोजी सहावा रुग्ण मिळाला. 14 मे रोजी तीन रुग्ण मिळाल्याने रुग्ण संख्या 9 झाली. 23 मे रोजी एकदम आठ रुग्ण मिळाले. त्यामुळे 17 रुग्ण झाले. 24 मे रोजी 1 रुग्ण मिळाल्याने 18 रुग्ण झाले. 28 मेस दिवसभरात सात व रात्री उशिरा 6 असे एकूण 13 रुग्ण मिळाले. त्यामुळे रुग्णसंख्या 31 झाली. तर 29 मे रोजी तब्बल 18 रुग्ण सापडले. 30 मे रोजी 5 रुग्ण सापडले. तर 31 मे रोजी 3 रुग्ण मिळाले. त्यामुळे ही संख्या थेट पन्नाशीच्या घरात 56 वर पोहोचली. 

अहवाल येण्याआधीच मृत्यू 
देवगड तालुक्‍यातील कालवी टेंबवली येथील 79 वर्षीय महिला 19 मे रोजी मुंबई येथून जिल्ह्यात आली होती. त्यानंतर तिला 20 रोजी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले होते. त्याच दिवशी तिचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. उपचार सुरू असताना तिचा 23 रोजी मृत्यू झाला. 20 रोजी घेतलेल्या अहवालाचा रिपोर्ट 28 रोजी रात्री उशिरा प्रशासनाला प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. तिला उच्च रक्तदाब व जुनाट श्‍वसनाचा आजार होता. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे; परंतु तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून "ती' कोरोनाची जिल्ह्यातील पहिला बळी ठरली आहे. 

कोरोनामुक्त रुग्ण 
*नडगिवे-1 
*घोटगे-1 
*जांभवडे-1 
*वायंगणी-1 
*नेरूर-1 
*वाडा-2 

26 मार्च ते 1 जून 
पर्यंत मिळाले 70 रुग्ण 

* 26 मार्च-1 
*29 एप्रिल-1 
*5 मे-1 
*7 मे-1 
*11 मे-1 
*14 मे-3 
*23 मे-8 
*24 मे-1 
*28 मे-13 
*29 मे-18 
*30 मे - 5 
*31 मे-3 
* 1 जून -14 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बाहेरून नागरिक दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांत रुग्ण तीव्र गतीने वाढत आहे. आता पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरू शकतात. या साथीच्या आजारात आढळणाऱ्या लक्षणात तापाचा समावेश होतो. त्यामुळे कोरोना तपासणी नमुने संख्या वाढणार आहे. यासाठी जिल्ह्यात कोरोना तपासणी लॅब आवश्‍यक आहे. त्यामुळे मंजूर झालेली लॅब तत्काळ सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. 
- उदय सामंत, पालकमंत्री, सिंधुदुर्ग 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा चढता आलेख  सिंधुदुर्ग - जिल्ह्यात मार्चमध्ये एक आणि एप्रिलमध्ये एक, असे केवळ दोन रुग्ण मिळाले होते; मात्र 5 मे ते 31 मे या 27 दिवसांत तब्बल 54 रुग्ण आढळले आहेत. तर 1 जून रोजी 133 अहवालांपैकी 14 अहवाल पॉझझिटिव्ह आले आहेत. 16 मार्च ते 30 एप्रिल लॉकडाउन राहून कंटाळलेल्या चाकरमान्यांनी मेमध्ये जिल्ह्यात आपापल्या गावात धाव घेतली. परिणामी रेड झोन व कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांची संख्या वाढल्याने लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात रुग्णसंख्या वाढू लागली. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात ही संख्या सत्तरच्या जवळ पोहोचली आहे.  ई-पासची खिरापत  तिसरा टप्पा 1 मे रोजी जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्गात काही प्रमाणात लॉकडाउनमध्ये शिथिलता जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आणली. ई-पासची "खिरापत' मुंबई येथून सुरू झाली. त्याचा परिणाम मुंबई, पुणेसारख्या रेड झोनमध्ये वास्तव्यास असलेल्या सिंधुदुर्गवासीय मोठ्या संख्येने जिल्ह्यात येण्यास झाला. या महिन्यात तब्बल 58 हजार चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे याच महिन्यांत मिळालेले 54 कोरोना रुग्ण हे याच चाकरमान्यांतील आहेत. सिंधुदुर्गात नियंत्रणात असलेल्या कोरोनाने मेमध्ये जोरदार मुसंडी मारत प्रशासनाने केलेल्या नियोजनावर व नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादावर पाणी फिरले आहे.  जिल्ह्यातील कोरोनाबाधित गावे  * कणकवली : नडगिवे, ढालकाठी, डांबरे, शिवडाव, बावशी, हरकुळ खुर्द, हरकुळ बुद्रुक, पियाळी, वारगाव, बीडवाडी, कासार्डे, नाटळ, जानवली  * कुडाळ : घोटगे, जांभवडे, नेरूर, पणदूर, कवठी  * वेंगुर्ले - वायंगणी, मातोंड  * देवगड : वाडा, कालवी-टेंबवली, नाद  * मालवण : हिवाळे, सुकळवाड, हेदुळ  * वैभववाडी : नाधवडे, तिरवडे, उंबर्डे, सडुरे  * सावंतवाडी ः कारिवडे, बांदा, असनिये, माडखोल, डेगवे  * दोडामार्ग : एकही नाही  29 मेचा मोठा धक्का  सिंधुदुर्गात पहिला रुग्ण 26 मार्चला मिळाला. दुसरा रुग्ण 35 दिवसांनी 29 एप्रिलला मिळाला. 5 मे रोजी तिसरा, 7 मे रोजी चौथा, 7 मेस पाचवा, 11 मे रोजी सहावा रुग्ण मिळाला. 14 मे रोजी तीन रुग्ण मिळाल्याने रुग्ण संख्या 9 झाली. 23 मे रोजी एकदम आठ रुग्ण मिळाले. त्यामुळे 17 रुग्ण झाले. 24 मे रोजी 1 रुग्ण मिळाल्याने 18 रुग्ण झाले. 28 मेस दिवसभरात सात व रात्री उशिरा 6 असे एकूण 13 रुग्ण मिळाले. त्यामुळे रुग्णसंख्या 31 झाली. तर 29 मे रोजी तब्बल 18 रुग्ण सापडले. 30 मे रोजी 5 रुग्ण सापडले. तर 31 मे रोजी 3 रुग्ण मिळाले. त्यामुळे ही संख्या थेट पन्नाशीच्या घरात 56 वर पोहोचली.  अहवाल येण्याआधीच मृत्यू  देवगड तालुक्‍यातील कालवी टेंबवली येथील 79 वर्षीय महिला 19 मे रोजी मुंबई येथून जिल्ह्यात आली होती. त्यानंतर तिला 20 रोजी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले होते. त्याच दिवशी तिचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. उपचार सुरू असताना तिचा 23 रोजी मृत्यू झाला. 20 रोजी घेतलेल्या अहवालाचा रिपोर्ट 28 रोजी रात्री उशिरा प्रशासनाला प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. तिला उच्च रक्तदाब व जुनाट श्‍वसनाचा आजार होता. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे; परंतु तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून "ती' कोरोनाची जिल्ह्यातील पहिला बळी ठरली आहे.  कोरोनामुक्त रुग्ण  *नडगिवे-1  *घोटगे-1  *जांभवडे-1  *वायंगणी-1  *नेरूर-1  *वाडा-2  26 मार्च ते 1 जून  पर्यंत मिळाले 70 रुग्ण  * 26 मार्च-1  *29 एप्रिल-1  *5 मे-1  *7 मे-1  *11 मे-1  *14 मे-3  *23 मे-8  *24 मे-1  *28 मे-13  *29 मे-18  *30 मे - 5  *31 मे-3  * 1 जून -14  सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बाहेरून नागरिक दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांत रुग्ण तीव्र गतीने वाढत आहे. आता पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरू शकतात. या साथीच्या आजारात आढळणाऱ्या लक्षणात तापाचा समावेश होतो. त्यामुळे कोरोना तपासणी नमुने संख्या वाढणार आहे. यासाठी जिल्ह्यात कोरोना तपासणी लॅब आवश्‍यक आहे. त्यामुळे मंजूर झालेली लॅब तत्काळ सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत.  - उदय सामंत, पालकमंत्री, सिंधुदुर्ग  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2yYfkc6
Read More
चक्रीवादळाचा सामना करण्यास सज्ज ः सामंत

ओरोस (सिंधुदुर्ग)-  हवामान खात्याने कोकण किनारपट्टीवर 2 जूनला चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. चक्रीवादळ झालेच तर त्याचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. यासाठी 21 बोटी उपलब्ध असून 22 व्यक्तींची एनडीआरएफची तुकडी जिल्ह्यात दाखल झाली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

सामंत यांनी जिल्हा प्रशासनासोबत चक्रीवादळ व पावसाळा पूर्व नियोजन बैठक जिल्हा नियोजनच्या नवीन सभागृहात घेतली. या वेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील आदी उपस्थित होते. यानंतर श्री. सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, नागेंद्र परब, अतुल रावराणे उपस्थित होते. 

सामंत म्हणाले, ""चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडे 7 फायबर बोटी, 9 रबर बोटी, पोलिसांकडे 5 फायबर बोटी उपलब्ध असून यासाठी प्रशासन सज्ज आहे. तसेच पावसाळी कालावधीत जिल्ह्यांची रस्ते स्थिती, प्राथमिक आरोग्य केंद्र स्थिती याची माहिती आपण घेतली आहे. एमएसीबीचा आढावा घेतला महामार्गाचे जिल्ह्यातील काम 85 टक्के पूर्ण झाले आहे. कणकवली ब्रीज 15 ऑक्‍टोबर पूर्वी पूर्ण करण्याचे आश्‍वासन महामार्ग प्राधिकरणने दिले आहे.'' 

ते म्हणाले, ""मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिलेल्या कोविड लॅबसाठी जिल्हा नियोजनमधून 61 लाख 33 हजार एवढा निधी मंजूर केला आहे. आज सायंकाळपर्यंत याचा अध्यादेश प्रशासनाला प्राप्त होईल. पुढील 4 ते 5 दिवसांत कोल्हापूर किंवा मुंबई येथून मशिनरी आणल्या जातील. याची जबाबदारी दिली आहे. त्यानंतरच्या पुढील 8 ते 10 दिवसांत लॅब सुरू होईल. जिल्हा रुग्णालयात लॅबसाठी आवश्‍यक 50 टक्के यंत्रणा उपलब्ध आहे. केवळ 50 टक्के यंत्रणा उभारायची आहे. जिल्हा रुग्णालयाला आवश्‍यक असलेला अधिकचा निधी सुद्धा दिला आहे, तसेच सावंतवाडी येथील मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल व कुडाळ येथील महिला रुग्णालय याबाबत मंगळवारी खासदार राऊत यांच्या समवेत दौरा करून प्रश्‍न सोडविणार आहोत. अपूर्ण असलेल्या धरणांची पाहणी करणार आहे.'' 

"त्या' ड्यूटीबाबत चौकशी करणार 
जिल्हा रुग्णालयातील कोरोना संशयित व नंतर पॉझिटिव्ह झालेल्या त्या परिचारिकेला तिचा स्वब घेतल्यानंतर लहान मुलांच्या वॉर्डमध्ये ड्यूटी दिल्याचा आरोप आमदार नीतेश राणे यांनी केला आहे. याबाबतमंत्री सामंत यांनी याबाबत चौकशी केली जाणार आहे. चौकशीत सत्यता आढळल्यास कारवाई करू, असे या वेळी सांगितले. 

...तर "त्या' सरपंचावर कारवाई करणार 
कोरोना बाधित आढळलेल्या परिचारिकेच्या कुटुंबाला वाळीत टाकण्याचा प्रकार परिचारिकेच्या गावातील सरपंचांनी घेतल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता पालकमंत्री सामंत यांनी एखाद्या कुटुंबाला अशाप्रकारे वाळीत टाकणे माणुसकीला धरून नाही. कायद्यानुसार तो गुन्हा ठरतो. असे कोण करत असेल ? तर त्याच्यावर कारवाई अटळ असते. शनिवारी रुग्णालयातील एक परिचारिका बाधित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर या परिचारिकेवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. दुसऱ्या दिवशी "त्या' सरपंचांनी ह्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना देणार असल्याचे सांगितले. 

गोव्यात जाणाऱ्यांची यादी तयार 
गोवा राज्यात नियमित जाणाऱ्यांची जिल्हा प्रशासनाने यादी तयार केली आहे. याबाबत यापूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी एकवेळ बोलणे झाले आहे. परंतु जिल्हावासियांना रोज गोवा राज्यात जावून यायचे आहे. त्याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी बोललो आहोत. त्यांनी 1 जून नंतर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चक्रीवादळाचा सामना करण्यास सज्ज ः सामंत ओरोस (सिंधुदुर्ग)-  हवामान खात्याने कोकण किनारपट्टीवर 2 जूनला चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. चक्रीवादळ झालेच तर त्याचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. यासाठी 21 बोटी उपलब्ध असून 22 व्यक्तींची एनडीआरएफची तुकडी जिल्ह्यात दाखल झाली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  सामंत यांनी जिल्हा प्रशासनासोबत चक्रीवादळ व पावसाळा पूर्व नियोजन बैठक जिल्हा नियोजनच्या नवीन सभागृहात घेतली. या वेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील आदी उपस्थित होते. यानंतर श्री. सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, नागेंद्र परब, अतुल रावराणे उपस्थित होते.  सामंत म्हणाले, ""चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडे 7 फायबर बोटी, 9 रबर बोटी, पोलिसांकडे 5 फायबर बोटी उपलब्ध असून यासाठी प्रशासन सज्ज आहे. तसेच पावसाळी कालावधीत जिल्ह्यांची रस्ते स्थिती, प्राथमिक आरोग्य केंद्र स्थिती याची माहिती आपण घेतली आहे. एमएसीबीचा आढावा घेतला महामार्गाचे जिल्ह्यातील काम 85 टक्के पूर्ण झाले आहे. कणकवली ब्रीज 15 ऑक्‍टोबर पूर्वी पूर्ण करण्याचे आश्‍वासन महामार्ग प्राधिकरणने दिले आहे.''  ते म्हणाले, ""मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिलेल्या कोविड लॅबसाठी जिल्हा नियोजनमधून 61 लाख 33 हजार एवढा निधी मंजूर केला आहे. आज सायंकाळपर्यंत याचा अध्यादेश प्रशासनाला प्राप्त होईल. पुढील 4 ते 5 दिवसांत कोल्हापूर किंवा मुंबई येथून मशिनरी आणल्या जातील. याची जबाबदारी दिली आहे. त्यानंतरच्या पुढील 8 ते 10 दिवसांत लॅब सुरू होईल. जिल्हा रुग्णालयात लॅबसाठी आवश्‍यक 50 टक्के यंत्रणा उपलब्ध आहे. केवळ 50 टक्के यंत्रणा उभारायची आहे. जिल्हा रुग्णालयाला आवश्‍यक असलेला अधिकचा निधी सुद्धा दिला आहे, तसेच सावंतवाडी येथील मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल व कुडाळ येथील महिला रुग्णालय याबाबत मंगळवारी खासदार राऊत यांच्या समवेत दौरा करून प्रश्‍न सोडविणार आहोत. अपूर्ण असलेल्या धरणांची पाहणी करणार आहे.''  "त्या' ड्यूटीबाबत चौकशी करणार  जिल्हा रुग्णालयातील कोरोना संशयित व नंतर पॉझिटिव्ह झालेल्या त्या परिचारिकेला तिचा स्वब घेतल्यानंतर लहान मुलांच्या वॉर्डमध्ये ड्यूटी दिल्याचा आरोप आमदार नीतेश राणे यांनी केला आहे. याबाबतमंत्री सामंत यांनी याबाबत चौकशी केली जाणार आहे. चौकशीत सत्यता आढळल्यास कारवाई करू, असे या वेळी सांगितले.  ...तर "त्या' सरपंचावर कारवाई करणार  कोरोना बाधित आढळलेल्या परिचारिकेच्या कुटुंबाला वाळीत टाकण्याचा प्रकार परिचारिकेच्या गावातील सरपंचांनी घेतल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता पालकमंत्री सामंत यांनी एखाद्या कुटुंबाला अशाप्रकारे वाळीत टाकणे माणुसकीला धरून नाही. कायद्यानुसार तो गुन्हा ठरतो. असे कोण करत असेल ? तर त्याच्यावर कारवाई अटळ असते. शनिवारी रुग्णालयातील एक परिचारिका बाधित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर या परिचारिकेवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. दुसऱ्या दिवशी "त्या' सरपंचांनी ह्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना देणार असल्याचे सांगितले.  गोव्यात जाणाऱ्यांची यादी तयार  गोवा राज्यात नियमित जाणाऱ्यांची जिल्हा प्रशासनाने यादी तयार केली आहे. याबाबत यापूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी एकवेळ बोलणे झाले आहे. परंतु जिल्हावासियांना रोज गोवा राज्यात जावून यायचे आहे. त्याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी बोललो आहोत. त्यांनी 1 जून नंतर तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MhTBPi
Read More
संशयित रुग्ण असूनही परिचारिकेला ड्यूटी ः नीतेश राणे

कणकवली (सिंधुदुर्ग) - जिल्हा रुग्णालयात लहान मुलांच्या वॉर्डमध्ये कार्यरत असलेली परिचारिका पॉझिटिव्ह निघाली आहे. तिला संशयित रुग्ण असतानाही ड्यूटी देण्यात आली. हा प्रकार धक्कादायक असून जिल्हा आरोग्य प्रशासन लोकांच्या आयुष्याशी खेळत आहे. या प्रकाराची चौकशी करून जिल्हा शल्यचिकित्सकांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी आमदार दीतेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे. याबाबात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे आपण त्या प्रकाराबाबत चौकशीची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. 

येथील नगरपंचायतीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राणे म्हणाले, ""जिल्हा रुग्णालयात घडलेला प्रकार हा धक्कादायक आहे. संबंधित परिचारिका संशयित रुग्ण होती. तिचे कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतले होते. यानंतर तिला क्‍वारंटाईन करणे आवश्‍यक होते; मात्र तिला कोणतीही विश्रांती न देता लहान मुलांच्या वॉर्डमध्ये काम दिले. लहान मुलांच्या आणि नागरिकांच्या आयुष्यावर खेळणारा हा प्रकार गंभीर आहे. याची दखल घ्यावी, असे पत्र आरोग्यमंत्री टोपे यांना पाठविले आहे.'' 

ते म्हणाले, ""लहान मुलांना काय झाले तर त्याला जबाबदार कोण? प्रशासनाकडून झालेली ही चूक समोर आणणे हा पक्षाचा किंवा राजकारणाचा कोणताही हेतू नाही. मुळात लॅब होत नाही, त्यामुळे या घटना गंभीरपणे पुढे येत आहेत. जिल्ह्यातील खासगी डॉक्‍टरांच्या मनातही भीती आहे. त्यांचेही स्वॅब घेतले जात नाहीत. आरोग्य विभागाचा हा बेजबाबदारपणा आहे. जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढला तर प्रशासन जबाबदार राहील. जिल्ह्यात जो प्रकार घडला आहे. त्या प्रकारात कुणीही कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करू नये. जिल्हा शल्यचिकित्सकांची बदली झाली पाहिजे आणि चौकशी झाली पाहिजे. जिल्ह्यात मुंबई किंवा इतर भागातून येणाऱ्या लोकांचे टेंपरेचर घेतले जात नाही. ही सुद्धा गंभीर बाब आहे. याबाबत पावसाळी अधिवेशनात मी आवाज उठवणार आहे.'' 

जिल्ह्यात क्वारंटाईन कक्षामध्ये असलेली मंडळी फुगडी घालतात हा गंभीर प्रकार आहे. अशा ह्या प्रकारामुळे अनेकजण बाधित होऊ शकतात. या प्रकारामुळे आणि जे काय घडत आहे त्यामुळे मी रात्रभर झोपलो नाही.'' 
- नीतेश राणे 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

संशयित रुग्ण असूनही परिचारिकेला ड्यूटी ः नीतेश राणे कणकवली (सिंधुदुर्ग) - जिल्हा रुग्णालयात लहान मुलांच्या वॉर्डमध्ये कार्यरत असलेली परिचारिका पॉझिटिव्ह निघाली आहे. तिला संशयित रुग्ण असतानाही ड्यूटी देण्यात आली. हा प्रकार धक्कादायक असून जिल्हा आरोग्य प्रशासन लोकांच्या आयुष्याशी खेळत आहे. या प्रकाराची चौकशी करून जिल्हा शल्यचिकित्सकांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी आमदार दीतेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे. याबाबात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे आपण त्या प्रकाराबाबत चौकशीची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.  येथील नगरपंचायतीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राणे म्हणाले, ""जिल्हा रुग्णालयात घडलेला प्रकार हा धक्कादायक आहे. संबंधित परिचारिका संशयित रुग्ण होती. तिचे कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतले होते. यानंतर तिला क्‍वारंटाईन करणे आवश्‍यक होते; मात्र तिला कोणतीही विश्रांती न देता लहान मुलांच्या वॉर्डमध्ये काम दिले. लहान मुलांच्या आणि नागरिकांच्या आयुष्यावर खेळणारा हा प्रकार गंभीर आहे. याची दखल घ्यावी, असे पत्र आरोग्यमंत्री टोपे यांना पाठविले आहे.''  ते म्हणाले, ""लहान मुलांना काय झाले तर त्याला जबाबदार कोण? प्रशासनाकडून झालेली ही चूक समोर आणणे हा पक्षाचा किंवा राजकारणाचा कोणताही हेतू नाही. मुळात लॅब होत नाही, त्यामुळे या घटना गंभीरपणे पुढे येत आहेत. जिल्ह्यातील खासगी डॉक्‍टरांच्या मनातही भीती आहे. त्यांचेही स्वॅब घेतले जात नाहीत. आरोग्य विभागाचा हा बेजबाबदारपणा आहे. जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढला तर प्रशासन जबाबदार राहील. जिल्ह्यात जो प्रकार घडला आहे. त्या प्रकारात कुणीही कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करू नये. जिल्हा शल्यचिकित्सकांची बदली झाली पाहिजे आणि चौकशी झाली पाहिजे. जिल्ह्यात मुंबई किंवा इतर भागातून येणाऱ्या लोकांचे टेंपरेचर घेतले जात नाही. ही सुद्धा गंभीर बाब आहे. याबाबत पावसाळी अधिवेशनात मी आवाज उठवणार आहे.''  जिल्ह्यात क्वारंटाईन कक्षामध्ये असलेली मंडळी फुगडी घालतात हा गंभीर प्रकार आहे. अशा ह्या प्रकारामुळे अनेकजण बाधित होऊ शकतात. या प्रकारामुळे आणि जे काय घडत आहे त्यामुळे मी रात्रभर झोपलो नाही.''  - नीतेश राणे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36VjC0u
Read More
आनंदवार्ता : परभणी जिल्ह्यातील ८२ पैकी २४ कोरोना मुक्त

परभणी : परभणी जिल्ह्यातील रहिवाश्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यातील ८२ पैकी २४ कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. या २४ जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवारी (ता.एक) रात्री दिली.

परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना तपासणी अहवाल प्रलंबित असल्याने रोजच जिल्हा वासीयांच्या नजरा या अहवालाकडे लागलेल्या असतात. आजच्या अहवालात जिल्हावासीयांना दिलासा मिळाला असून २४ कोरोना बाधित रूग्णांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. तसेच त्यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे नसल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयातून सुट्टी देवून घरी सोडण्यात आले आहे.

हेही वाचा - पोहण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा बुडून मृत्यू
 

तसेच आज नवीन एकही रुग्ण न वाढल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. तसेच या अहवालानूसार २३८ प्रलंबित तर ७० अनिर्णायक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात १ जून रोजी सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत एकूण १४ संशयीतांचे स्वॅब पाठवण्यात आले असून संशयितांची संख्या २३४४ पर्यंत पोचली आहे.

एकूण २३४४ पैकी २०८० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण ८२ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर ७० संशयितांचे अहवाल अनिर्णायक आहेत. ३१ जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचाही अहवाल मिळाला आहे. एकूण २३८ स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आले आहेत.

हे देखील वाचाच - Video : बाजारपेठ पूर्ववत सुरू; खरेदीसाठी उडाली झुंबड

परभणीत सोमवारी ४ जण पॉझिटिव्ह

परभणी : जिल्ह्यात सोमवारी (ता.एक) २४ कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाल्याचा आनंद होत असतानाच रात्री उशिरा आलेल्या अहवालात ४ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यात मानवत तालुक्यातील ३ तर जिंतूर तालुक्यातील एक रुग्णाचा समावेश आहे. आता कोरोना बाधित रुग्णाची संख्या ८७ झाली आहे. 

कोरोना मीटर

एकूण रुग्ण ८६

बरे झालेले २५

उपचार सुरू ५९

मृत्यू २

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आनंदवार्ता : परभणी जिल्ह्यातील ८२ पैकी २४ कोरोना मुक्त परभणी : परभणी जिल्ह्यातील रहिवाश्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यातील ८२ पैकी २४ कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. या २४ जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवारी (ता.एक) रात्री दिली. परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना तपासणी अहवाल प्रलंबित असल्याने रोजच जिल्हा वासीयांच्या नजरा या अहवालाकडे लागलेल्या असतात. आजच्या अहवालात जिल्हावासीयांना दिलासा मिळाला असून २४ कोरोना बाधित रूग्णांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. तसेच त्यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे नसल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयातून सुट्टी देवून घरी सोडण्यात आले आहे. हेही वाचा - पोहण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा बुडून मृत्यू   तसेच आज नवीन एकही रुग्ण न वाढल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. तसेच या अहवालानूसार २३८ प्रलंबित तर ७० अनिर्णायक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात १ जून रोजी सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत एकूण १४ संशयीतांचे स्वॅब पाठवण्यात आले असून संशयितांची संख्या २३४४ पर्यंत पोचली आहे. एकूण २३४४ पैकी २०८० जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण ८२ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. तर ७० संशयितांचे अहवाल अनिर्णायक आहेत. ३१ जणांचे स्वॅब तपासणीसाठी आवश्यक नसल्याचाही अहवाल मिळाला आहे. एकूण २३८ स्वॅबचे अहवाल प्रलंबीत आले आहेत. हे देखील वाचाच - Video : बाजारपेठ पूर्ववत सुरू; खरेदीसाठी उडाली झुंबड परभणीत सोमवारी ४ जण पॉझिटिव्ह परभणी : जिल्ह्यात सोमवारी (ता.एक) २४ कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाल्याचा आनंद होत असतानाच रात्री उशिरा आलेल्या अहवालात ४ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यात मानवत तालुक्यातील ३ तर जिंतूर तालुक्यातील एक रुग्णाचा समावेश आहे. आता कोरोना बाधित रुग्णाची संख्या ८७ झाली आहे.  कोरोना मीटर एकूण रुग्ण ८६ बरे झालेले २५ उपचार सुरू ५९ मृत्यू २ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eFA1bN
Read More
कोरोनामुळे फिरले लोकांचे डोके; मानसिक आजारांच्या सुनामीचा धोका 

न्यूयॉर्क - कामाचा व्याप आणि त्यामुळे येणारा ताणतणाव ही चाकरमाण्यांसाठी तशी रोजचीच गोष्ट ! पण कोरोनाचे संकट आल्यापासून या मानसिक समस्यांनी अधिकच तीव्र रूप धारण केले आहे. जगाचे आर्थिक नेतृत्व करणाऱ्या अमेरिकेतील सर्वच घटकांच्या मानसिक स्वास्थ्यावर कोरोनाने जबर आघात केल्याचे मानसशास्त्रीय अभ्यासातून दिसून येते. अमेरिकी मानसशास्त्रीय संघटनेच्या अहवालातून काही धक्कादायक बाबीसमोर आल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाहणीचे निष्कर्ष 
७० टक्के  - अमेरिकी नागरिकांना अर्थव्यवस्थेची चिंता 
६७ टक्के  - लोक संसर्गाचा सामना करण्याच्या सरकारी पद्धतीमुळे चिंतीत 
एक तृतीयांश  पेक्षाही अधिक  लोकांत नैराश्य 
५० टक्के   लोकच मानसिक  आरोग्यावर बोलतात 
पाचातील एकाच्या  आरोग्यावर विपरित परिणाम 
१८ टक्के  - लोकांना नैराश्य 
सहा महिन्यापूर्वी रोजगार  गेलेल्यांची अवस्था बिकट. 
कोरोनाचा सर्वाधिक ताण तरुणांवर 

परिणामासाठी वेळ लागणार 
कोरोनामुळे जगभर मानसिक आजारांची त्सुनामी येण्याची भीती काही अभ्यासकांनी व्यक्त केली असून कोरोनाचे नेमके मानसशास्त्रीय परिणाम काय असतील हे आताच सांगता येणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. सार्सच्या उद्रेकानंतर २००२-०४ मध्ये जी स्थिती निर्माण झाली होती तेव्हाची स्थिती पाहता आता परिस्थिती आणखी बिकट होईल अशी भीती त्यांना वाटते आहे. 

रुग्णांमध्ये संभ्रम 
जोनाथन रॉजर्स या संशोधकाने कोरोनाच्या काळात रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या साडेतीन हजार रुग्णांच्या मानसशास्त्रीय स्थितीचा अभ्यास केला असता त्यातून काही धक्कादायक निष्कर्ष हाती आले आहेत. या सर्व रुग्णांमध्ये एक प्रकारची संभ्रमावस्था दिसून आली. त्यांच्या मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने ही स्थिती निर्माण झाली असावी अशी शक्यता आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनामुळे फिरले लोकांचे डोके; मानसिक आजारांच्या सुनामीचा धोका  न्यूयॉर्क - कामाचा व्याप आणि त्यामुळे येणारा ताणतणाव ही चाकरमाण्यांसाठी तशी रोजचीच गोष्ट ! पण कोरोनाचे संकट आल्यापासून या मानसिक समस्यांनी अधिकच तीव्र रूप धारण केले आहे. जगाचे आर्थिक नेतृत्व करणाऱ्या अमेरिकेतील सर्वच घटकांच्या मानसिक स्वास्थ्यावर कोरोनाने जबर आघात केल्याचे मानसशास्त्रीय अभ्यासातून दिसून येते. अमेरिकी मानसशास्त्रीय संघटनेच्या अहवालातून काही धक्कादायक बाबीसमोर आल्या आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पाहणीचे निष्कर्ष  ७० टक्के  - अमेरिकी नागरिकांना अर्थव्यवस्थेची चिंता  ६७ टक्के  - लोक संसर्गाचा सामना करण्याच्या सरकारी पद्धतीमुळे चिंतीत  एक तृतीयांश  पेक्षाही अधिक  लोकांत नैराश्य  ५० टक्के   लोकच मानसिक  आरोग्यावर बोलतात  पाचातील एकाच्या  आरोग्यावर विपरित परिणाम  १८ टक्के  - लोकांना नैराश्य  सहा महिन्यापूर्वी रोजगार  गेलेल्यांची अवस्था बिकट.  कोरोनाचा सर्वाधिक ताण तरुणांवर  परिणामासाठी वेळ लागणार  कोरोनामुळे जगभर मानसिक आजारांची त्सुनामी येण्याची भीती काही अभ्यासकांनी व्यक्त केली असून कोरोनाचे नेमके मानसशास्त्रीय परिणाम काय असतील हे आताच सांगता येणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. सार्सच्या उद्रेकानंतर २००२-०४ मध्ये जी स्थिती निर्माण झाली होती तेव्हाची स्थिती पाहता आता परिस्थिती आणखी बिकट होईल अशी भीती त्यांना वाटते आहे.  रुग्णांमध्ये संभ्रम  जोनाथन रॉजर्स या संशोधकाने कोरोनाच्या काळात रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या साडेतीन हजार रुग्णांच्या मानसशास्त्रीय स्थितीचा अभ्यास केला असता त्यातून काही धक्कादायक निष्कर्ष हाती आले आहेत. या सर्व रुग्णांमध्ये एक प्रकारची संभ्रमावस्था दिसून आली. त्यांच्या मेंदूला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने ही स्थिती निर्माण झाली असावी अशी शक्यता आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MjS3UX
Read More