Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, April 5, 2020

बीकानेर में कोरोना के 6 नए मामले, जयपुर का एक मोहल्ला बना एपिसेंटर https://ift.tt/2NfH8z5
कोरोना: US में एक दिन में गई 1200 की जान, 10 हजार के पास पहुंचा मौत का आंकड़ा https://ift.tt/34aYHoK
Horoscope Today, 6 April: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2Xb5Jbr
कोरोना वायरस से संक्रमित ब्रिटिश PM बोरिस जॉनसन अस्पताल में भर्ती https://ift.tt/2wWNkER
लॉकडाउन से उत्तराखंड में फंसे थे 154 अमेरिकी, वतन वापसी का रास्ता खुला https://ift.tt/2JEyipO
तबलीगी जमात के मरकज की इमारत का 70% हिस्सा अवैध, होगी कार्रवाई https://ift.tt/2x5f7mo
दिलीप कुमार संग किया था सुचित्रा सेन ने डेब्यू, पारो का रोल कर हुईं हिट https://ift.tt/39GoRAM
Video : घर बैठे बैठे क्‍या करे म्हणत दोन बहिणींनी केले हे...

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : लॉकडाऊनमुळे सार काही थांबलं आहे. लोकांना घरी बसन्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. या काळात काहींनी पुस्तकांचा आधार घेतला तर काही आयुष्यात कधी न केलेली काम करू लागली आहेत. काही जण सोशल मीडियावर आपला वेळ घालवत आहे. मात्र, वेळेचा सदउपयोग कसा करावा ते शिकाव तर या दोन बहिणींकडून... 

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुका... तालुक्‍यातील खराळपेठ येथील रहिवासी विनोद दुर्गे... व्यवसायाने शेतकरी... त्यांना प्रेरणा व अर्पणा नावाच्या दोन मुली... त्यांच्या घराला लागूनच अडीच एकर शेती... शेतीच्या कामासाठी त्यांनी ट्रॅक्‍टर खरेदी केला... मात्र, लॉकडाऊनमुळे सारे काम थांबले. अशात काय कराव म्हणून विनोद दुर्गे यांनी दोन्ही मुलींना ट्रॅक्‍टर शिकविण्याचा निर्णय घेतला. मुलींनी अतिशय उत्साहाने ट्रॅक्‍टर शिकण्यास तयार झाल्या. 

अधिक माहितीसाठी - अंबर दिव्याच्या गाडीतून उतरलेल्या अधिकाऱ्यातील माणूस बघून ते झाले भावुक...

सुरुवातीला मोठी मुलगी प्रेरणा ट्रॅक्‍टर चालवायला शिकली. यांनतर तिने आपल्या लहान बहिणीलाही ट्रक्‍टर शिकवले. दोन्ही बहिणी आता ट्रॅक्‍टर चालविण्यात तरबेज झाल्या आहेत. प्रेरणा अकरावीत तर अर्पणा दहावीत शिकते. अभ्यासातही त्या हुशार आहेत. पण, आपल्या अंगी कला असाव्यात व त्याचा आपल्या कुटुबींयाना फायदा व्हावा या हेतून आपण ट्रॅक्‍टर शिकण्याचा निर्णय घेतल्याचे प्रेरणानी सांगितले. 

विनोद दुर्गे व पत्नी दोघेही शेतात मेहनत घेतात. त्यांच दुसर शेत गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. घराला लागून असलेल्या अडीच एकर शेती व गावापासून दूर असलेल्या दोन एकर शेतात कामाच नियोजन करताना आई-वडिलांना होणारा त्रास दोघी बहिणींनी अगदी जवळून बघितला आहे. आता ट्रॅक्‍टर शिकण्यामुळे आई-वडिलांना होणारा त्रास बरासचा कमी होईल असा आशावाद त्यांना आहे. 

21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे अनेक जण आपल्या घरीच असले तरी काही लोक या लॉकडाऊनचा सकारात्मक फायदा घेत आहेत. विनोद दुर्गे या शेतकीयाच्या दोन्ही मुलीन हे आपल्या कौशल्यातून सिद्ध केल आहे. आता तर त्या कपाशीचे फणकट काढण्यासाठी ट्रॅक्‍टरचा उपयोग करू लागल्या आहेत. 

अधिक वाचा - मला नकोय बलात्कारातून राहिलेला गर्भ, नागपूर उच्च न्यालायात याचिका

गावातील मंडळी तोंडात बोट घालू लागली

महाराष्ट्रासह देशात कोरोना विषाणूने दहशत निर्माण केली आहे. कोरोनाला हरविण्यासाठी प्रशासन, सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. याचाच एक भाग म्हणून देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशावेळी लोकांना आपल्या घरी राहावे लागत आहे. मात्र, शेतकऱ्याच्या दोन्ही मुलीने लॉकडाऊनचा फायदा घेत चक्क ट्रॅक्‍टर चालविण्याचे कौशल्य प्राप्त केले. आता तर त्या आपल्या शेतात कामालाही लागल्या आहेत. त्यांना ट्रक्‍टर चालविताना बघून गावातील मंडळी तोंडात बोट घालू लागली आहेत. 

आई-वडिलांना मदत करीत आहोत 
लॉकडाऊनमुळे घरी राहून आम्हाला कंटाळा आला होता. बाबा सहज म्हणाले बेटा ट्रॅक्‍टर चालवायला शिकणार का? मग मी तात्काळ तयार झाली. मी ट्रॅक्‍टर चालविणे शिकल्यानंतर माझ्या लहान बहिणीला देखील शिकविले. आम्ही दोघी बहिणी मिळून आता शेतातील काम करून आई-वडिलांना मदत करीत आहोत. 
- प्रेरणा विनोद दुर्गे, खराळपेठ.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : घर बैठे बैठे क्‍या करे म्हणत दोन बहिणींनी केले हे... गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : लॉकडाऊनमुळे सार काही थांबलं आहे. लोकांना घरी बसन्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. या काळात काहींनी पुस्तकांचा आधार घेतला तर काही आयुष्यात कधी न केलेली काम करू लागली आहेत. काही जण सोशल मीडियावर आपला वेळ घालवत आहे. मात्र, वेळेचा सदउपयोग कसा करावा ते शिकाव तर या दोन बहिणींकडून...  चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुका... तालुक्‍यातील खराळपेठ येथील रहिवासी विनोद दुर्गे... व्यवसायाने शेतकरी... त्यांना प्रेरणा व अर्पणा नावाच्या दोन मुली... त्यांच्या घराला लागूनच अडीच एकर शेती... शेतीच्या कामासाठी त्यांनी ट्रॅक्‍टर खरेदी केला... मात्र, लॉकडाऊनमुळे सारे काम थांबले. अशात काय कराव म्हणून विनोद दुर्गे यांनी दोन्ही मुलींना ट्रॅक्‍टर शिकविण्याचा निर्णय घेतला. मुलींनी अतिशय उत्साहाने ट्रॅक्‍टर शिकण्यास तयार झाल्या.  अधिक माहितीसाठी - अंबर दिव्याच्या गाडीतून उतरलेल्या अधिकाऱ्यातील माणूस बघून ते झाले भावुक... सुरुवातीला मोठी मुलगी प्रेरणा ट्रॅक्‍टर चालवायला शिकली. यांनतर तिने आपल्या लहान बहिणीलाही ट्रक्‍टर शिकवले. दोन्ही बहिणी आता ट्रॅक्‍टर चालविण्यात तरबेज झाल्या आहेत. प्रेरणा अकरावीत तर अर्पणा दहावीत शिकते. अभ्यासातही त्या हुशार आहेत. पण, आपल्या अंगी कला असाव्यात व त्याचा आपल्या कुटुबींयाना फायदा व्हावा या हेतून आपण ट्रॅक्‍टर शिकण्याचा निर्णय घेतल्याचे प्रेरणानी सांगितले.  विनोद दुर्गे व पत्नी दोघेही शेतात मेहनत घेतात. त्यांच दुसर शेत गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. घराला लागून असलेल्या अडीच एकर शेती व गावापासून दूर असलेल्या दोन एकर शेतात कामाच नियोजन करताना आई-वडिलांना होणारा त्रास दोघी बहिणींनी अगदी जवळून बघितला आहे. आता ट्रॅक्‍टर शिकण्यामुळे आई-वडिलांना होणारा त्रास बरासचा कमी होईल असा आशावाद त्यांना आहे.  21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे अनेक जण आपल्या घरीच असले तरी काही लोक या लॉकडाऊनचा सकारात्मक फायदा घेत आहेत. विनोद दुर्गे या शेतकीयाच्या दोन्ही मुलीन हे आपल्या कौशल्यातून सिद्ध केल आहे. आता तर त्या कपाशीचे फणकट काढण्यासाठी ट्रॅक्‍टरचा उपयोग करू लागल्या आहेत.  अधिक वाचा - मला नकोय बलात्कारातून राहिलेला गर्भ, नागपूर उच्च न्यालायात याचिका गावातील मंडळी तोंडात बोट घालू लागली महाराष्ट्रासह देशात कोरोना विषाणूने दहशत निर्माण केली आहे. कोरोनाला हरविण्यासाठी प्रशासन, सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. याचाच एक भाग म्हणून देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशावेळी लोकांना आपल्या घरी राहावे लागत आहे. मात्र, शेतकऱ्याच्या दोन्ही मुलीने लॉकडाऊनचा फायदा घेत चक्क ट्रॅक्‍टर चालविण्याचे कौशल्य प्राप्त केले. आता तर त्या आपल्या शेतात कामालाही लागल्या आहेत. त्यांना ट्रक्‍टर चालविताना बघून गावातील मंडळी तोंडात बोट घालू लागली आहेत.  आई-वडिलांना मदत करीत आहोत  लॉकडाऊनमुळे घरी राहून आम्हाला कंटाळा आला होता. बाबा सहज म्हणाले बेटा ट्रॅक्‍टर चालवायला शिकणार का? मग मी तात्काळ तयार झाली. मी ट्रॅक्‍टर चालविणे शिकल्यानंतर माझ्या लहान बहिणीला देखील शिकविले. आम्ही दोघी बहिणी मिळून आता शेतातील काम करून आई-वडिलांना मदत करीत आहोत.  - प्रेरणा विनोद दुर्गे, खराळपेठ. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34c3IgG
Read More
Video : सकारात्मक कवितांचा आनंद घेण्याचा छंद 

सकारात्मक कविता मनाला उभारी देतात. त्यातून प्रसन्नतेचे बहर फुलवणाऱ्या, कवी बा. भ. बोरकर यांच्या कविता असतील तर त्या वाचणारा, ऐकणारा तल्लीन होऊन जातो. या कविता अमृता कोलटकरसारखी संवेदनशील गायिका - अभिनेत्री जर सादर करत असेल तर माहौल क्षणात बदलून जातो. अमृताने सकारात्मक कवितांमधील आनंद घेण्याचा छंद जोपासला आहे. 

- बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमृता कोलटकर ही तरुणी जेव्हा मधुर स्वरांत कविता गाऊ लागते, तेव्हा विश्‍वास बसत नाही की, गणितासारख्या तर्कशुद्ध विषयात रमणारी हीच का? स्वप्नमय विश्‍व जिच्या सुरेल स्वरलहरींमधून प्रकटतं आहे, तीच ही अमृता अर्थशास्त्र व व्यवस्थापनशास्त्रातील पदवी मिळवून अर्थशास्त्रविषयक एका नामांकित संस्थेत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून वावरली, हे पचवणं जरा कठीण जातं. 

अमृता म्हणाली, ""आधी मुंबई आणि नंतर दिल्लीत कामगिरी पार पाडत असताना माझं गाणं मागं पडलं होतं. शास्त्रीय गाण्याची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. दोन मुलांच्या जन्मानंतर नोकरी सोडली. पुण्यात स्थिरावून मुलांना वाढवताना गाणंही जोपासता आलं. कवी अरुण कोलटकर हे माझे काका. अनेक कवींच्या वेगवेगळ्या भावछटा मांडणाऱ्या कविता वाचणं, गुणगुणणं हे खूप आवडू लागलं. मग मी रंगमंचीय कार्यक्रमांमधून काही कवितांचं वाचन तर काहींचं गायन सादर करू लागले. माझा हा छंद श्रोत्यांनाही आनंदित करतो आहे, हे लक्षात आल्यावर मी याबाबत जास्तीत जास्त सजग होत गेले.'' 

चोवीस वर्षांपासून अमृता काव्यगायनात रमते आहे. तिच्या काकांच्या वास्तववादी कवितांचं मंचावर वाचन करताना तिला ऐकणं ही पर्वणी असते. कित्येक कवींच्या छंदबद्ध कवितांचं गायन ती तन्मयतेने करते. इतर गायकांनी गाऊन आधीच लोकप्रिय केलेलं भावगीत अथवा नाट्यगीत या प्रकारांतील काव्य अमृता त्यातील मूळ गाभा तसाच ठेवून, मात्र जमेल तेथे स्वतःचा स्पर्श दर्शवत सादर करते. काही भावकविता खास तिच्या आवाजात ध्वनिमुद्रित आहेत तर काही कवितांना खुद्द तिनं चाल लावून कित्येक कार्यक्रमांतून सादर करून दाद मिळवली आहे. मंगेश पाडगावकर, आरती प्रभू, ग्रेस, इंदिरा संत, शांता शेळके, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, बहिणाबाई चौधरी आदींच्या रचनांसह संत ज्ञानेश्‍वर व संत कबीर यांचं काव्यही अमृता सुरेल स्वरांत सादर करत असते. 

अमृताने सांगितलं की, शास्त्रीय गाण्याचे माझ्यावरील संस्कार मला सुगम व नाट्यगीत गाताना उपयुक्त ठरतात. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : सकारात्मक कवितांचा आनंद घेण्याचा छंद  सकारात्मक कविता मनाला उभारी देतात. त्यातून प्रसन्नतेचे बहर फुलवणाऱ्या, कवी बा. भ. बोरकर यांच्या कविता असतील तर त्या वाचणारा, ऐकणारा तल्लीन होऊन जातो. या कविता अमृता कोलटकरसारखी संवेदनशील गायिका - अभिनेत्री जर सादर करत असेल तर माहौल क्षणात बदलून जातो. अमृताने सकारात्मक कवितांमधील आनंद घेण्याचा छंद जोपासला आहे.  - बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अमृता कोलटकर ही तरुणी जेव्हा मधुर स्वरांत कविता गाऊ लागते, तेव्हा विश्‍वास बसत नाही की, गणितासारख्या तर्कशुद्ध विषयात रमणारी हीच का? स्वप्नमय विश्‍व जिच्या सुरेल स्वरलहरींमधून प्रकटतं आहे, तीच ही अमृता अर्थशास्त्र व व्यवस्थापनशास्त्रातील पदवी मिळवून अर्थशास्त्रविषयक एका नामांकित संस्थेत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून वावरली, हे पचवणं जरा कठीण जातं.  अमृता म्हणाली, ""आधी मुंबई आणि नंतर दिल्लीत कामगिरी पार पाडत असताना माझं गाणं मागं पडलं होतं. शास्त्रीय गाण्याची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. दोन मुलांच्या जन्मानंतर नोकरी सोडली. पुण्यात स्थिरावून मुलांना वाढवताना गाणंही जोपासता आलं. कवी अरुण कोलटकर हे माझे काका. अनेक कवींच्या वेगवेगळ्या भावछटा मांडणाऱ्या कविता वाचणं, गुणगुणणं हे खूप आवडू लागलं. मग मी रंगमंचीय कार्यक्रमांमधून काही कवितांचं वाचन तर काहींचं गायन सादर करू लागले. माझा हा छंद श्रोत्यांनाही आनंदित करतो आहे, हे लक्षात आल्यावर मी याबाबत जास्तीत जास्त सजग होत गेले.''  चोवीस वर्षांपासून अमृता काव्यगायनात रमते आहे. तिच्या काकांच्या वास्तववादी कवितांचं मंचावर वाचन करताना तिला ऐकणं ही पर्वणी असते. कित्येक कवींच्या छंदबद्ध कवितांचं गायन ती तन्मयतेने करते. इतर गायकांनी गाऊन आधीच लोकप्रिय केलेलं भावगीत अथवा नाट्यगीत या प्रकारांतील काव्य अमृता त्यातील मूळ गाभा तसाच ठेवून, मात्र जमेल तेथे स्वतःचा स्पर्श दर्शवत सादर करते. काही भावकविता खास तिच्या आवाजात ध्वनिमुद्रित आहेत तर काही कवितांना खुद्द तिनं चाल लावून कित्येक कार्यक्रमांतून सादर करून दाद मिळवली आहे. मंगेश पाडगावकर, आरती प्रभू, ग्रेस, इंदिरा संत, शांता शेळके, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, बहिणाबाई चौधरी आदींच्या रचनांसह संत ज्ञानेश्‍वर व संत कबीर यांचं काव्यही अमृता सुरेल स्वरांत सादर करत असते.  अमृताने सांगितलं की, शास्त्रीय गाण्याचे माझ्यावरील संस्कार मला सुगम व नाट्यगीत गाताना उपयुक्त ठरतात.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2RfsJT0
Read More
Coronavirus : तेल, डाळी, धान्याची वाढीव दराने विक्री; व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा 

पुणे - लॉकडाउनचा गैरफायदा उठवत शहरातील अन्नधान्याच्या काही घाऊक व्यापाऱ्यांनी ग्राहकांची लूट करण्यास सुरवात केली आहे. तेल, डाळी, धान्याची वाढीव दराने विक्री सुरू केली. त्याचा फटका रिटेल व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य ग्राहकांना बसू लागल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या आहेत. 

- बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 24 मार्चपासून देशभरात लॉकडाउन जाहीर केले आहे. त्यातून जीवनावश्‍यक वस्तू वगळल्या आहेत. असे असताना अनेकांना अन्नधान्य मिळण्यास अडचणी येत आहे. चढ्या दराने वस्तूंची विक्री होत आहे. याचा फटका शहरात किरकोळ विक्रेत्या दुकानदारांना देखील बसू लागला आहे. घाऊक बाजारात चढ्या दराने माल मिळत असल्यामुळे आम्हाला देखील जादा दराने वस्तूंची विक्री करावी लागत आहे. त्याचा विनाकारण त्रास आम्हाला सहन करावा लागत असून या संदर्भात जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शन करावे, अशी मागणीही रिटेल व्यावसायिक संघटनेने केली आहे. वास्तविक अन्नधान्यांचा पुरवठा आणि दर नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक समिती स्थापन केली आहे. तरी देखील चढ्या दराने वस्तूंची विक्री होत आहे. 

80 ते 90 रुपये किलो दर असलेली तूरडाळ 130 रुपये दराने, तर तेलाच्या किमती देखील लिटर मागे वीस ते तीस रुपयांनी महाग झाल्या आहेत. 
- शशिकला काटे, गुरुवार पेठ 

सध्याची परिस्थिती विचारात घेता, व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट होत असेल, तर हे योग्य नाही. त्यांची दखल घेऊन तातडीने तपासणी करण्याचे आदेश देण्यात येतील. या मध्ये कोणी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 
-नवल किशोर राम, जिल्हाधिकारी 

-घाऊक व्यापाऱ्यांकडून लॉकडाउनचा गैरफायदा 
-किरकोळ विक्रेत्या दुकानदारांना बसते झळ 
-नागरिकांना अन्नधान्य मिळण्यात अडचणी 
-अन्नधान्यांचे दर नियंत्रित करण्यासाठी समिती 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : तेल, डाळी, धान्याची वाढीव दराने विक्री; व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा  पुणे - लॉकडाउनचा गैरफायदा उठवत शहरातील अन्नधान्याच्या काही घाऊक व्यापाऱ्यांनी ग्राहकांची लूट करण्यास सुरवात केली आहे. तेल, डाळी, धान्याची वाढीव दराने विक्री सुरू केली. त्याचा फटका रिटेल व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य ग्राहकांना बसू लागल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या आहेत.  - बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 24 मार्चपासून देशभरात लॉकडाउन जाहीर केले आहे. त्यातून जीवनावश्‍यक वस्तू वगळल्या आहेत. असे असताना अनेकांना अन्नधान्य मिळण्यास अडचणी येत आहे. चढ्या दराने वस्तूंची विक्री होत आहे. याचा फटका शहरात किरकोळ विक्रेत्या दुकानदारांना देखील बसू लागला आहे. घाऊक बाजारात चढ्या दराने माल मिळत असल्यामुळे आम्हाला देखील जादा दराने वस्तूंची विक्री करावी लागत आहे. त्याचा विनाकारण त्रास आम्हाला सहन करावा लागत असून या संदर्भात जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शन करावे, अशी मागणीही रिटेल व्यावसायिक संघटनेने केली आहे. वास्तविक अन्नधान्यांचा पुरवठा आणि दर नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक समिती स्थापन केली आहे. तरी देखील चढ्या दराने वस्तूंची विक्री होत आहे.  80 ते 90 रुपये किलो दर असलेली तूरडाळ 130 रुपये दराने, तर तेलाच्या किमती देखील लिटर मागे वीस ते तीस रुपयांनी महाग झाल्या आहेत.  - शशिकला काटे, गुरुवार पेठ  सध्याची परिस्थिती विचारात घेता, व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट होत असेल, तर हे योग्य नाही. त्यांची दखल घेऊन तातडीने तपासणी करण्याचे आदेश देण्यात येतील. या मध्ये कोणी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.  -नवल किशोर राम, जिल्हाधिकारी  -घाऊक व्यापाऱ्यांकडून लॉकडाउनचा गैरफायदा  -किरकोळ विक्रेत्या दुकानदारांना बसते झळ  -नागरिकांना अन्नधान्य मिळण्यात अडचणी  -अन्नधान्यांचे दर नियंत्रित करण्यासाठी समिती  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/39KtERG
Read More
तुमचा 'इमर्जन्सी फंड' तयार आहे ?

आर्थिक नियोजन करून घेण्यासाठी तुम्ही जेव्हा 'फायनान्शियल प्लॅनर'कडे जाता तेव्हा तो तुम्हाला अनेक प्रश्न विचारतो. तुमची आर्थिक उद्दिष्टे काय?, त्यासाठी काय तजवीज केली आहे?, आयुर्विमा, आरोग्यविमा आहे का? आणि तुमचा 'इमर्जन्सी फंड' तयार आहे का? तो नसल्यास किंवा अपुरा असल्यास तातडीने पुरेसा फंड तयार करण्याचा सल्ला देण्यात येतो कारण पुरेशा 'इमर्जन्सी फंडाच्या अभावी तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे 'इमर्जन्सी फंड' म्हणजे नक्की काय, त्याची आवश्यकता काय, तो किती असावा, तो कसा निर्माण करावा, कोठे गुंतवावा आणि गुंतवताना कोणकोणते घटक विचारात घ्यावेत हे बघणे हितकारक ठरेल. 

- बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'इमर्जन्सी फंड' म्हणजे काय? - आपल्या आयुष्यात येऊ शकणाऱ्या आर्थिक अडचणींना अथवा संकटांना सामोरे जाता यावे म्हणून बाजूला ठेवलेल्या पैशाला 'इमर्जन्सी' अथवा 'कॉन्टिजन्सी' फंड असे म्हणतात. 

आवश्यकता का?
हा फंड निर्माण करण्यामागचे उद्दिष्ट असे असते की आपली आर्थिक उद्दिष्टे सुरळीतपणे साध्य व्हावीत. एखाद्या व्यक्तीने आपल्या आर्थिक नियोजनाचा आराखडा बनवून घेतला, सर्व काही सुरळीतपणे चालले असतानाच अचानक नोकरी गेली, प्रदीर्घ आजारपणाला सामोरे जावे लागले, कुटुंबियांच्या आजारपणात मोठा खर्च झाला किंवा कोरोनासारखे जागतिक संकट उद्भवले तर त्या व्यक्तीला/ कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उदा. गृहकर्जाचा, वाहन कर्जाचा,  शैक्षणिक कर्जाचे हफ्ते थकल्यास बॅंका तगादा मागे लावतात आणि तुमचा 'क्रेडिट स्कोअर' खराब होऊ शकतो. त्यामुळे भविष्यकाळात नवीन कर्ज मिळणे दुरापास्त होते. विम्याचे हफ्ते न भरल्यास पॉलिसी बंद होऊ शकते. घरभाडे, मुलांच्या शाळा, कॉलेजचे शुल्क, वीजबील तर भरावेच लागते. अशा बिकट प्रसंगी आप्तेष्टांकडे मदत मागण्यापेक्षा स्वत:चा 'इमर्जन्सी फंड' वेळीच तयार करणे केव्हाही श्रेष्ठ असते. 

किती असावा?
- तज्ज्ञांच्या मते, तुमच्या अनिवार्य मासिक खर्चाच्या कमीत कमी सहा पट आणि जास्तीत जास्त 24 पट एवढा हा फंड असावा. उदा. एखाद्या कुटुंबाचा अनिवार्य मासिक खर्च 50 हजार रुपये असल्यास त्यांनी रु. तीन लाख ते 12 लाख रुपये 'इमर्जन्सी फंड' तयार करावा. 

कसा तयार करावा?
हा फंड तयार करण्यासाठी सातत्य आणि आर्थिक शिस्तीची गरज असते. महिन्याच्या शेवटी उरलेले पैसे या फंडात टाकण्याऐवजी पगार होताच या फंडात प्रथम पैसे टाकावेत आणि शिल्लक पैसे खर्च करावेत. म्युच्युअल फंडांच्या योजनेत 'एसआयपी' केल्याने नियमित बचत होते. शिवाय अचानक झालेला धनलाभ या फंडात जमा करावा. उदा. बोनस, इन्सेन्टिव्ह, वाचविलेल्या रजेचे पैसे किंवा अनावश्यक सेवा बंद करून, काटकसर करून तुम्ही या फंडाला 'टॉप अप' करू शकता.

कोठे गुंतवावा?
हा पैसा आपल्याला संकटकाळी तातडीने उपलब्ध व्हावा यासाठी ज्या गुंतवणुकीत 'लॉक-ईन' किंवा 'एक्झिट लोड' नाही, अशा योजनेत गुंतवावा. उदा. शॉर्ट डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट (ज्यावर कर्ज मिळते किंवा मुदतीआधी मोडता येते.) लिक्विड फंड अथवा सोने. 

'इमर्जन्सी फंडा'त गुंतवणूक करताना सुरक्षितता आणि तरलता याला प्राधान्य द्यावे, परतावा थोडा कमी मिळाला तरी चालेल. 

'कोरोना'सारखी गंभीर 'इमर्जन्सी' जगापुढे उभी ठाकली असतानाच 'इमर्जन्सी' फंडाचा श्रीगणेशा करुयात.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तुमचा 'इमर्जन्सी फंड' तयार आहे ? आर्थिक नियोजन करून घेण्यासाठी तुम्ही जेव्हा 'फायनान्शियल प्लॅनर'कडे जाता तेव्हा तो तुम्हाला अनेक प्रश्न विचारतो. तुमची आर्थिक उद्दिष्टे काय?, त्यासाठी काय तजवीज केली आहे?, आयुर्विमा, आरोग्यविमा आहे का? आणि तुमचा 'इमर्जन्सी फंड' तयार आहे का? तो नसल्यास किंवा अपुरा असल्यास तातडीने पुरेसा फंड तयार करण्याचा सल्ला देण्यात येतो कारण पुरेशा 'इमर्जन्सी फंडाच्या अभावी तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे 'इमर्जन्सी फंड' म्हणजे नक्की काय, त्याची आवश्यकता काय, तो किती असावा, तो कसा निर्माण करावा, कोठे गुंतवावा आणि गुंतवताना कोणकोणते घटक विचारात घ्यावेत हे बघणे हितकारक ठरेल.  - बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 'इमर्जन्सी फंड' म्हणजे काय? - आपल्या आयुष्यात येऊ शकणाऱ्या आर्थिक अडचणींना अथवा संकटांना सामोरे जाता यावे म्हणून बाजूला ठेवलेल्या पैशाला 'इमर्जन्सी' अथवा 'कॉन्टिजन्सी' फंड असे म्हणतात.  आवश्यकता का? हा फंड निर्माण करण्यामागचे उद्दिष्ट असे असते की आपली आर्थिक उद्दिष्टे सुरळीतपणे साध्य व्हावीत. एखाद्या व्यक्तीने आपल्या आर्थिक नियोजनाचा आराखडा बनवून घेतला, सर्व काही सुरळीतपणे चालले असतानाच अचानक नोकरी गेली, प्रदीर्घ आजारपणाला सामोरे जावे लागले, कुटुंबियांच्या आजारपणात मोठा खर्च झाला किंवा कोरोनासारखे जागतिक संकट उद्भवले तर त्या व्यक्तीला/ कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उदा. गृहकर्जाचा, वाहन कर्जाचा,  शैक्षणिक कर्जाचे हफ्ते थकल्यास बॅंका तगादा मागे लावतात आणि तुमचा 'क्रेडिट स्कोअर' खराब होऊ शकतो. त्यामुळे भविष्यकाळात नवीन कर्ज मिळणे दुरापास्त होते. विम्याचे हफ्ते न भरल्यास पॉलिसी बंद होऊ शकते. घरभाडे, मुलांच्या शाळा, कॉलेजचे शुल्क, वीजबील तर भरावेच लागते. अशा बिकट प्रसंगी आप्तेष्टांकडे मदत मागण्यापेक्षा स्वत:चा 'इमर्जन्सी फंड' वेळीच तयार करणे केव्हाही श्रेष्ठ असते.  किती असावा? - तज्ज्ञांच्या मते, तुमच्या अनिवार्य मासिक खर्चाच्या कमीत कमी सहा पट आणि जास्तीत जास्त 24 पट एवढा हा फंड असावा. उदा. एखाद्या कुटुंबाचा अनिवार्य मासिक खर्च 50 हजार रुपये असल्यास त्यांनी रु. तीन लाख ते 12 लाख रुपये 'इमर्जन्सी फंड' तयार करावा.  कसा तयार करावा? हा फंड तयार करण्यासाठी सातत्य आणि आर्थिक शिस्तीची गरज असते. महिन्याच्या शेवटी उरलेले पैसे या फंडात टाकण्याऐवजी पगार होताच या फंडात प्रथम पैसे टाकावेत आणि शिल्लक पैसे खर्च करावेत. म्युच्युअल फंडांच्या योजनेत 'एसआयपी' केल्याने नियमित बचत होते. शिवाय अचानक झालेला धनलाभ या फंडात जमा करावा. उदा. बोनस, इन्सेन्टिव्ह, वाचविलेल्या रजेचे पैसे किंवा अनावश्यक सेवा बंद करून, काटकसर करून तुम्ही या फंडाला 'टॉप अप' करू शकता. कोठे गुंतवावा? हा पैसा आपल्याला संकटकाळी तातडीने उपलब्ध व्हावा यासाठी ज्या गुंतवणुकीत 'लॉक-ईन' किंवा 'एक्झिट लोड' नाही, अशा योजनेत गुंतवावा. उदा. शॉर्ट डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट (ज्यावर कर्ज मिळते किंवा मुदतीआधी मोडता येते.) लिक्विड फंड अथवा सोने.  'इमर्जन्सी फंडा'त गुंतवणूक करताना सुरक्षितता आणि तरलता याला प्राधान्य द्यावे, परतावा थोडा कमी मिळाला तरी चालेल.  'कोरोना'सारखी गंभीर 'इमर्जन्सी' जगापुढे उभी ठाकली असतानाच 'इमर्जन्सी' फंडाचा श्रीगणेशा करुयात. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3e3w3KT
Read More
कोरोना व्हायरस : 'सरकार आमच्या जीवाची किंमत फक्त 30 रुपये करतंय'
Coronavirus : पुण्यात झोपडपट्टीतील तिघांचा मृत्यू; कोरोना संसर्गाचे कारण अनिश्‍चित

पुणे - कोरोनाच्या संसर्गामुळे अवघ्या चोवीस तासांत पुण्यातील वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमधील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच, नवीन 11 जणांना कोरोनाचे निदान झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. 

- बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गुलटेकडी येथील डायस प्लॉंट परिसरातील 69 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्या 30 मार्चला एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाल्या होत्या. दुसऱया रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर त्यांना दम लागायला सुरुवात झाली. त्यामुळे 1 एप्रिलला त्यांचा स्वॅब तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 एप्रिलला आलेल्या प्रयोगशाळा अहवालात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. खासगी रुग्णालयातून त्यांना विलगीकरणासाठी महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, नायडू रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णावर उपचाराची सुविधा नसल्याने त्यांना औंध येथील जिल्हा रुग्णालयात 2 एप्रिलला रात्री हलविण्यात आले. दाखल केल्यापासूनच त्या अत्यवस्थ होत्या. वय, शस्त्रक्रिया, सेप्सिस हे उपचारातील मोठे अडथळे होते. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाबरोबरच असलेल्या या त्रासामुळे त्यांचा मृत्यू झाला. 

भवानी पेठेतील कासेवाडी भागात रहाणाऱया 52 वर्षांच्या पुरुषाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाची लक्षणे दिसल्याने हा रुग्ण ससून रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी आला होता. त्यांना उच्चरक्तदाब आणि मधुमेह हे विकार होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. 

येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात रहाणाऱ्या 60 वर्षांच्या महिलेला कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यांना डॉ. नायडू रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचा निर्वाळा प्रयोगशाळेने दिला. त्यामुळे त्यांना विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात आले. घरी आल्यानंतरही त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे शनिवारी (ता. 4) ससून रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनात त्यांचा स्वॅब घेण्यात आला. त्यातून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. 

अकरा रुग्ण पॉझिटीव्ह 
शहरात गेल्या चोवीस तासांत अकरा जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान आहे. त्यापैकी तीन जणांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत 69 रुग्णांना संसर्ग झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यापैकी 61 रुग्ण हे पुणे महापालिका क्षेत्रातील असून, उर्वरित आठ शहराच्या बाहेरील आहेत. या 69 पैकी 15 रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात आले आहे. 

खासगी रुग्णालयांवरील भार वाढला 
आतापर्यंत महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार होत होते. मात्र, शंभर खाटांचे हे रुग्णालय आता भरत आले आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करण्याबरोबरच खासगी रुग्णालयांचीही मदत घेण्यात येत आहे. सद्यःस्थितीत नऊ खासगी रुग्णालयांमधून 13 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : पुण्यात झोपडपट्टीतील तिघांचा मृत्यू; कोरोना संसर्गाचे कारण अनिश्‍चित पुणे - कोरोनाच्या संसर्गामुळे अवघ्या चोवीस तासांत पुण्यातील वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमधील तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच, नवीन 11 जणांना कोरोनाचे निदान झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.  - बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप गुलटेकडी येथील डायस प्लॉंट परिसरातील 69 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्या 30 मार्चला एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाल्या होत्या. दुसऱया रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर त्यांना दम लागायला सुरुवात झाली. त्यामुळे 1 एप्रिलला त्यांचा स्वॅब तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 एप्रिलला आलेल्या प्रयोगशाळा अहवालात त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. खासगी रुग्णालयातून त्यांना विलगीकरणासाठी महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, नायडू रुग्णालयात अत्यवस्थ रुग्णावर उपचाराची सुविधा नसल्याने त्यांना औंध येथील जिल्हा रुग्णालयात 2 एप्रिलला रात्री हलविण्यात आले. दाखल केल्यापासूनच त्या अत्यवस्थ होत्या. वय, शस्त्रक्रिया, सेप्सिस हे उपचारातील मोठे अडथळे होते. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाबरोबरच असलेल्या या त्रासामुळे त्यांचा मृत्यू झाला.  भवानी पेठेतील कासेवाडी भागात रहाणाऱया 52 वर्षांच्या पुरुषाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाची लक्षणे दिसल्याने हा रुग्ण ससून रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी आला होता. त्यांना उच्चरक्तदाब आणि मधुमेह हे विकार होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.  येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात रहाणाऱ्या 60 वर्षांच्या महिलेला कोरोनाची लक्षणे दिसत होती. त्यांना डॉ. नायडू रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचा निर्वाळा प्रयोगशाळेने दिला. त्यामुळे त्यांना विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात आले. घरी आल्यानंतरही त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे शनिवारी (ता. 4) ससून रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनात त्यांचा स्वॅब घेण्यात आला. त्यातून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.  अकरा रुग्ण पॉझिटीव्ह  शहरात गेल्या चोवीस तासांत अकरा जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान आहे. त्यापैकी तीन जणांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत 69 रुग्णांना संसर्ग झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यापैकी 61 रुग्ण हे पुणे महापालिका क्षेत्रातील असून, उर्वरित आठ शहराच्या बाहेरील आहेत. या 69 पैकी 15 रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना विलगीकरण कक्षातून घरी सोडण्यात आले आहे.  खासगी रुग्णालयांवरील भार वाढला  आतापर्यंत महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार होत होते. मात्र, शंभर खाटांचे हे रुग्णालय आता भरत आले आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करण्याबरोबरच खासगी रुग्णालयांचीही मदत घेण्यात येत आहे. सद्यःस्थितीत नऊ खासगी रुग्णालयांमधून 13 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2JKX87i
Read More