Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 12, 2020

सुधीर मुनगंटीवारः शिवसेनेला आम्ही फसवलं, ही आमची चूकच #5मोठ्याबातम्या
कोरोनाची लागण : रुग्णांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी

कोरोनाची लागण : रुग्णांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी

March 12, 2020 0 Comments
देशात सध्या कोरोना व्हायरसचा फैलाव होत आहे.  मात्र, कोणीही घाबरुन जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले असून आरोग्य विभागाच्यावतीने मार्गदर्शक तत्व...
Read More
इटली में रुक नहीं रहा कोरोना का कहर, 1000 से पार हुआ मरने वालों का आंकड़ा https://ift.tt/2NfH8z5
कोरोना व्हायरस: कोव्हिड-19 मधून पूर्णपणे बऱ्या झालेल्या लोकांची गोष्ट
कोरोना व्हायरस: कोव्हिड-19 मधून पूर्णपणे बरे झालेले लोक | सोपी गोष्ट
भोपाल: शिवराज के घर सिंधिया ने खाया रात का खाना, डिनर टेबल पर सियासत की चर्चा https://ift.tt/33gQJK1
एनपीआरबाबत अमित शहांनी दिली महत्त्वाची माहिती; संसदेत केली घोषणा

नवी दिल्ली - एनपीआरची कार्यवाही करताना कोणाच्याही नावासमोर ‘डी’ म्हणजेच संशयास्पद असा शेरा लिहिला जाणार नाही, असे गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत सांगितले. दिल्ली दंगलीवरील चर्चेच्या उत्तरात शहा यांनी, सणासुदीच्या दिवसांत एखाद्याच्या  वक्तव्याने दंगलीचे घाव पुन्हा ताजे होऊ नयेत, यासाठीच ही चर्चा लांबविली, असे सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दंगल पेटविण्यासाठी दोषी आढळणाऱ्यांचा धर्म, जात व राजकीय पक्ष न पाहता त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. 

यादरम्यान शहा यांच्याशी विरोधी सदस्यांचे तीव्र खटके उडाले व शहा यांना वारंवार, ‘‘मला बोलू तरी द्या, बोलूच देणार नाही असे कसे चालेल?’’ असे विचारावे लागले. सीएए व एनपीआरबाबत ज्या शंका असतील, त्यांच्या निरसनासाठी आनंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे सदस्य व विरोधी पक्षनेते यांच्याबरोबर बैठक घेऊन शंकानिरसन करू, असेही शहा म्हणाले.

मोठी बातमी : कोरोनामुळं बदलले व्हिसाचे 'हे' नियम!

दंगलग्रस्तांना नुकसानभरपाईसाठी दिल्ली सरकार चांगले काम करत आहे. केंद्रही मदत करत आहे. याचा तपशील तुम्हाला पाठवेन, असे शहा यांनी सांगितले. एका विदेशी देशाचे अध्यक्ष भारतभेटीवर येत आहेत. आपण यजमान आहोत; तेव्हा त्यांच्या आगमनाच्या तोंडावर राजधानीत दंगल करावी, असा विचार तरी कोणताही पक्ष करेल का? थोडा विचार करा, अशा शब्दांत त्यांनी असे आरोप करणाऱ्यांची खिल्ली उडवली. राजकीय नेत्यांवर आरोप करा; पण दिल्ली पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करू नका. केवळ पोलिसांमुळेच दंगल दिल्लीतील 13 टक्के भागापुरती मर्यादित राहिली, ती पसरली नाही, असे शहा म्हणाले. 

देशातील जातीय दंगलींमध्ये मारले गेलेल्यांपैकी 76 टक्के मृत्यू कॉंग्रेसच्या शासनकाळात झाल्याचे शहा यांनी सांगताच पुन्हा गोंधळ झाला. ते म्हणाले की, दिल्लीच्या दंगलीपूर्वी दोन्ही बाजूंनी चिथावणीखोर वक्तव्ये झाली. दंगलीला भाजप किंवा भाजपच्या विचारसरणीशी जोडणे गैर आहे.

विदेशातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

न्यायालयीन चौकशी करा
ईशान्य दिल्लीतील जातीय दंगलीची सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी राज्यसभेत आज झालेल्या वादळी चर्चेत काॅँग्रेससह विरोधकांनी केली. ही दंगल भाजपने घडविल्यामुळेच गृहमंत्री २५ दिवस उलटले तरी दंगल पीडितांना भेटण्यास गेले नाहीत, असा आरोप आपचे संजय सिंह यांनी केला; तर ही दंगल म्हणजे भाजपने दिल्लीकरांवर केलेला सर्जिकल स्ट्राइक व व्हायरस हल्ला असल्याचा ठपका कॉंग्रेसचे कपिल सिब्बल यांनी ठेवला. दिल्लीत माओवादी व जिहादींनी आझादीचा नारा दिल्याचा आरोप भाजपचे सुधांशू त्रिवेदी यांनी केला.

नीता अंबानी जगातील 'टॉप टेन' प्रभावशाली महिलांच्या यादीत!

दिल्लीतील कायदा सुव्यवस्था परिस्थतीवर झालेल्या चर्चेत अनेक वक्त्यांचा वेळ दिल्ली यापुढे शांत कशी राहील यापेक्षाही परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच खर्ची पडला. आरोप-प्रत्यारोप थांबवा, असे कळकळीचे आवाहन करणारे अब्दुल वहाब, आनंद शर्मा व त्रिवेदी यांच्यासारखे निवडक नेते असल्याचे दिसून आले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तर मुस्लिम नेत्यांची भाषणे वाचून दाखविण्यासच सुरवात केल्यावर वातावरण पुन्हा गरम झाले. 

सिब्बल यांनी चर्चेला सुरवात करताना, भाजप मंत्री व नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्ये करून दंगलीचा व्हायरस पसरविल्याचा ठपका ठेवला. ते म्हणाले की, पोलिसांना दंगल आटोक्यात न आणण्याचा इशारा कोणीतरी दिला होता काय. दिल्ली दंगलीत जळत होती तेव्हा पंतप्रधान मोदी व शहा ट्रम्प यांच्या स्वागताच्या इव्हेंटमध्ये मग्न होते. दंगलीच्या काळात केंद्रातर्फे एकही निवेदन तर आले नाही, पण पंतप्रधान मोदींना वक्तव्य देण्यासाठी ७० तास लागले.

कोण काय म्हणाले - 

आनंद शर्मा (काँग्रेस) - देशात लष्कर असताना राम सेना, हिंदू सेना अशा अवैध सेनांवर या सरकारने त्वरित बंदी घालावी. दिल्लीत गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाचीही चौकशी व्हावी. 

विजय गोयल (भाजप) - दुर्दैवाने चर्चेत अशी भाषणे झाली की परिस्थिती निवळण्याऐवजी आणखी चिघळावी.

भूपेंद्र यादव (भाजप) - दंगलीसाठी जी वेळ निवडली व मुसलमानांच्या मनात भीती निर्माण करण्याचा कट रचणाऱ्यांची तयारी पूर्ण होती. सरकार सत्य प्रकाशात आणून अफवांचा बाजार पसरविणाऱ्यांना व दंगल करणाऱ्यांना सोडणार नाही.

तिरूची सिवा (द्रमुक) - दंगलीवर साधी चर्चा व्हावी यासाठी  लोकशाहीच्या मंदिरात विरोधकांना सात दिवस लढाई करावी लागणे हे दुर्दैवी.

डेरेक ओब्रायन (तृणमूल काँग्रेस) - देशाचे होम मिनिस्टर ह्युम्रनिटी मिनिस्टरही असावेत.

प्रसन्न आचार्य (बीजेडी) - महात्मा गांधींच्या भारतात पुन्हा असे दंगे होणार नाहीत याची जबाबदारी या सरकारची आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

एनपीआरबाबत अमित शहांनी दिली महत्त्वाची माहिती; संसदेत केली घोषणा नवी दिल्ली - एनपीआरची कार्यवाही करताना कोणाच्याही नावासमोर ‘डी’ म्हणजेच संशयास्पद असा शेरा लिहिला जाणार नाही, असे गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत सांगितले. दिल्ली दंगलीवरील चर्चेच्या उत्तरात शहा यांनी, सणासुदीच्या दिवसांत एखाद्याच्या  वक्तव्याने दंगलीचे घाव पुन्हा ताजे होऊ नयेत, यासाठीच ही चर्चा लांबविली, असे सांगितले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दंगल पेटविण्यासाठी दोषी आढळणाऱ्यांचा धर्म, जात व राजकीय पक्ष न पाहता त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.  यादरम्यान शहा यांच्याशी विरोधी सदस्यांचे तीव्र खटके उडाले व शहा यांना वारंवार, ‘‘मला बोलू तरी द्या, बोलूच देणार नाही असे कसे चालेल?’’ असे विचारावे लागले. सीएए व एनपीआरबाबत ज्या शंका असतील, त्यांच्या निरसनासाठी आनंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे सदस्य व विरोधी पक्षनेते यांच्याबरोबर बैठक घेऊन शंकानिरसन करू, असेही शहा म्हणाले. मोठी बातमी : कोरोनामुळं बदलले व्हिसाचे 'हे' नियम! दंगलग्रस्तांना नुकसानभरपाईसाठी दिल्ली सरकार चांगले काम करत आहे. केंद्रही मदत करत आहे. याचा तपशील तुम्हाला पाठवेन, असे शहा यांनी सांगितले. एका विदेशी देशाचे अध्यक्ष भारतभेटीवर येत आहेत. आपण यजमान आहोत; तेव्हा त्यांच्या आगमनाच्या तोंडावर राजधानीत दंगल करावी, असा विचार तरी कोणताही पक्ष करेल का? थोडा विचार करा, अशा शब्दांत त्यांनी असे आरोप करणाऱ्यांची खिल्ली उडवली. राजकीय नेत्यांवर आरोप करा; पण दिल्ली पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करू नका. केवळ पोलिसांमुळेच दंगल दिल्लीतील 13 टक्के भागापुरती मर्यादित राहिली, ती पसरली नाही, असे शहा म्हणाले.  देशातील जातीय दंगलींमध्ये मारले गेलेल्यांपैकी 76 टक्के मृत्यू कॉंग्रेसच्या शासनकाळात झाल्याचे शहा यांनी सांगताच पुन्हा गोंधळ झाला. ते म्हणाले की, दिल्लीच्या दंगलीपूर्वी दोन्ही बाजूंनी चिथावणीखोर वक्तव्ये झाली. दंगलीला भाजप किंवा भाजपच्या विचारसरणीशी जोडणे गैर आहे. विदेशातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा  न्यायालयीन चौकशी करा ईशान्य दिल्लीतील जातीय दंगलीची सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी राज्यसभेत आज झालेल्या वादळी चर्चेत काॅँग्रेससह विरोधकांनी केली. ही दंगल भाजपने घडविल्यामुळेच गृहमंत्री २५ दिवस उलटले तरी दंगल पीडितांना भेटण्यास गेले नाहीत, असा आरोप आपचे संजय सिंह यांनी केला; तर ही दंगल म्हणजे भाजपने दिल्लीकरांवर केलेला सर्जिकल स्ट्राइक व व्हायरस हल्ला असल्याचा ठपका कॉंग्रेसचे कपिल सिब्बल यांनी ठेवला. दिल्लीत माओवादी व जिहादींनी आझादीचा नारा दिल्याचा आरोप भाजपचे सुधांशू त्रिवेदी यांनी केला. नीता अंबानी जगातील 'टॉप टेन' प्रभावशाली महिलांच्या यादीत! दिल्लीतील कायदा सुव्यवस्था परिस्थतीवर झालेल्या चर्चेत अनेक वक्त्यांचा वेळ दिल्ली यापुढे शांत कशी राहील यापेक्षाही परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच खर्ची पडला. आरोप-प्रत्यारोप थांबवा, असे कळकळीचे आवाहन करणारे अब्दुल वहाब, आनंद शर्मा व त्रिवेदी यांच्यासारखे निवडक नेते असल्याचे दिसून आले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तर मुस्लिम नेत्यांची भाषणे वाचून दाखविण्यासच सुरवात केल्यावर वातावरण पुन्हा गरम झाले.  सिब्बल यांनी चर्चेला सुरवात करताना, भाजप मंत्री व नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्ये करून दंगलीचा व्हायरस पसरविल्याचा ठपका ठेवला. ते म्हणाले की, पोलिसांना दंगल आटोक्यात न आणण्याचा इशारा कोणीतरी दिला होता काय. दिल्ली दंगलीत जळत होती तेव्हा पंतप्रधान मोदी व शहा ट्रम्प यांच्या स्वागताच्या इव्हेंटमध्ये मग्न होते. दंगलीच्या काळात केंद्रातर्फे एकही निवेदन तर आले नाही, पण पंतप्रधान मोदींना वक्तव्य देण्यासाठी ७० तास लागले. कोण काय म्हणाले -  आनंद शर्मा (काँग्रेस) - देशात लष्कर असताना राम सेना, हिंदू सेना अशा अवैध सेनांवर या सरकारने त्वरित बंदी घालावी. दिल्लीत गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाचीही चौकशी व्हावी.  विजय गोयल (भाजप) - दुर्दैवाने चर्चेत अशी भाषणे झाली की परिस्थिती निवळण्याऐवजी आणखी चिघळावी. भूपेंद्र यादव (भाजप) - दंगलीसाठी जी वेळ निवडली व मुसलमानांच्या मनात भीती निर्माण करण्याचा कट रचणाऱ्यांची तयारी पूर्ण होती. सरकार सत्य प्रकाशात आणून अफवांचा बाजार पसरविणाऱ्यांना व दंगल करणाऱ्यांना सोडणार नाही. तिरूची सिवा (द्रमुक) - दंगलीवर साधी चर्चा व्हावी यासाठी  लोकशाहीच्या मंदिरात विरोधकांना सात दिवस लढाई करावी लागणे हे दुर्दैवी. डेरेक ओब्रायन (तृणमूल काँग्रेस) - देशाचे होम मिनिस्टर ह्युम्रनिटी मिनिस्टरही असावेत. प्रसन्न आचार्य (बीजेडी) - महात्मा गांधींच्या भारतात पुन्हा असे दंगे होणार नाहीत याची जबाबदारी या सरकारची आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 12, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TMeMxn
Read More
नेमके किती पाणी प्यावे?

प्रत्येकाने रोज किमान तीन लिटर पाणी प्यायला हवे, असे सांगितले जाते. मात्र, हे तीन लिटरचे माप प्रत्येकासाठी अचूक कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. व्यक्तिगणिक पाण्याची गरज वेगवेगळी असते. तेव्हा पाण्याची नेमकी गरज किती हे निश्‍चित करणे महत्त्वाचे आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाळा म्हटले, की सर्वप्रथम मनात कोणती गोष्ट येते, तर ती म्हणजे उष्मा. उष्म्यावर मात करण्यासाठी पाणी हवेच. प्रत्येकाने रोज किमान तीन लिटर पाणी प्यायला हवे, असे वर्षानुवर्षे सांगितले जाते. मात्र, जलपानाचे हे तीन लिटरचे माप प्रत्येकासाठी अचूक कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. प्रत्येकाला रोज नेमकी किती पाणी पिण्याची गरज असते, या प्रश्नाचे आणि त्या अनुषंगाने इतर प्रश्नांचीही उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करू. 

प्रत्येकाने रोज तीन लिटर पाणी पिण्याची संकल्पना सदासर्वकाळ योग्य म्हणता येत नाही. एकच माप सर्वांसाठी योग्य असू शकत नाही. व्यक्तीगणिक पाण्याची गरज बदलते. एखाद्याला नेमकी किती पाणी पिण्याची गरज आहे, हे एका सहजसोप्या सूत्राने काढता येते. ते खालीलप्रमाणे- 

तुमचे वजन (उदा. ते ७० किलो गृहीत धरू) 

तुमच्या वजनाला तुमच्या वयाने गुणा. (उदा. ते तीस समजू) 

आलेल्या उत्तराला २८.३ ने भागा. 

म्हणजेच ७० गुणिले ३०/२८.३ = ७४.२० औंस, जवळपास २.१९ लि.  (३३.८ औंस = एक लिटर) 

यावरून संबंधित व्यक्तीला दिवसभरात एकूण किती औंस पाण्याची गरज आहे, हे समजेल.
एखाद्या व्यक्तीची पाण्याची सरासरी गरज वरील सूत्रातून समजू शकते. अर्थात, यात हवामानातील बदल, व्यायाम, जीवनशैली आदी घटक गृहीत धरलेले नाहीत. भारतात उन्हाळ्यात तापमान ४५ अंशांपर्यंत पोचते. त्यामुळे, शरीराची अतिरिक्त गरज भरून काढण्यासाठी उन्हाळ्यात रोज दोन ग्लास अधिक पाणी प्यावे. त्याचप्रमाणे, तुम्ही मध्यम तीव्रतेचे व्यायाम करत असाल तर व्यायामाच्या प्रत्येक तासाला रोज एक ते दोन ग्लास पाणी अधिक पिण्याची गरज आहे. तीव्र व्यायाम करणाऱ्यांनी व्यायामाचा प्रकार, तीव्रता आदी घटक ध्यानात घेऊन रोजच्या पिण्याच्या पाण्यात दोन ते चार ग्लास वाढ करावी. घरामध्येच असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना रोज पिण्याच्या पाण्यामध्ये सरासरीपेक्षा कपात करावी लागू शकते. त्याचप्रमाणे, थंड प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींनीही थोडेसे कमी पाणी प्यावे. हे सर्व समजून घेताना हेही लक्षात घ्यावे, की पाण्याची गरज भागविण्याचा केवळ पाणी हाच एकमेव स्रोत नव्हे. आपल्या अन्नामध्येही पाणी असते. प्रत्येक पदार्थामध्ये पाण्याचे प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे आहारातूनही आपल्याला पाणी मिळते. 
प्रभाव टाकणारे विशेष घटक
आरोग्याशी निगडित एखादी विशिष्ट समस्या असेल, तर पाणी अधिक प्यायले जाऊ शकते. उदा. थायरॉईड किंवा मूत्रपिंडाचा, यकृताचा आजार, हृदयविकार आदी. त्याचप्रमाणे, पाणी रोखून धरणारी औषधे घेत असल्यास त्याचाही पाणी अधिक पिण्यावर परिणाम होऊ शकतो. उदा. वेदनाशामक औषधे, नैराश्‍याच्या आजारांवरील काही औषधे. मुतखड्यासारख्या काही आजारांमध्येही उपचाराचा भाग म्हणून अधिक पाणी प्यायले जाऊ शकते. 

लघवीचा रंग आणि पाणी
निर्जलीकरण (Dehydration) होत असल्याचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे लघवीचा रंग. सामान्यतः लघवीचा पारदर्शक रंग शरीरातील पाण्याचे पुरेसे प्रमाण (Hydration) दर्शवितो, तर पिवळा रंग पाणी कमी पडत असल्याचे निदर्शक आहे. निर्जलीकरणाचा विचार करता लघवीचा पिवळा रंग योग्य असू शकतो. मात्र, ती पारदर्शक असणे याचा अर्थ फक्त पाण्याच्या पुरेशा प्रमाणापुरता मर्यादित नाही. खरेतर, लघवीचा रंग पारदर्शक असेपर्यंत पाणी पिण्याची गरज नाही. लघवी पारदर्शक किंवा पांढऱ्या रंगाची होत असल्यास पाणी गरजेपेक्षा अधिक (Over Hydrated) पित असल्याचा त्याचा अर्थ होतो. लघवीचा फिकट पिवळा रंगही पाण्याचे योग्य प्रमाण दर्शवितो. मात्र, तरीही शरीरातील पाण्याचे प्रमाण ठरविण्याचे हे योग्य मोजमाप नव्हे. 

गर्भारपण आणि पाण्याचे पुरेसे प्रमाण 
शरीरात पाण्याचे पुरेसे प्रमाण (Hydration) ठेवण्याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. गर्भवती किंवा स्तन्यपान करणाऱ्या महिलांनी रोजच्या द्रव पदार्थांचे प्रमाण २४ ते ३२ औंसांनी वाढवायला हवे. अमेरिकन प्रेग्नन्सी असोसिएशनच्या अहवालानुसार ते  वजनावर अवलंबून आहे. याशिवाय इतर कॅफिनयुक्त पेये आणि सोड्याऐवजी पाण्यामधूनच बहुतांश गरज भागवणेही, महत्त्वाचे आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नेमके किती पाणी प्यावे? प्रत्येकाने रोज किमान तीन लिटर पाणी प्यायला हवे, असे सांगितले जाते. मात्र, हे तीन लिटरचे माप प्रत्येकासाठी अचूक कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. व्यक्तिगणिक पाण्याची गरज वेगवेगळी असते. तेव्हा पाण्याची नेमकी गरज किती हे निश्‍चित करणे महत्त्वाचे आहे. आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाळा म्हटले, की सर्वप्रथम मनात कोणती गोष्ट येते, तर ती म्हणजे उष्मा. उष्म्यावर मात करण्यासाठी पाणी हवेच. प्रत्येकाने रोज किमान तीन लिटर पाणी प्यायला हवे, असे वर्षानुवर्षे सांगितले जाते. मात्र, जलपानाचे हे तीन लिटरचे माप प्रत्येकासाठी अचूक कसे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. प्रत्येकाला रोज नेमकी किती पाणी पिण्याची गरज असते, या प्रश्नाचे आणि त्या अनुषंगाने इतर प्रश्नांचीही उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करू.  प्रत्येकाने रोज तीन लिटर पाणी पिण्याची संकल्पना सदासर्वकाळ योग्य म्हणता येत नाही. एकच माप सर्वांसाठी योग्य असू शकत नाही. व्यक्तीगणिक पाण्याची गरज बदलते. एखाद्याला नेमकी किती पाणी पिण्याची गरज आहे, हे एका सहजसोप्या सूत्राने काढता येते. ते खालीलप्रमाणे-  तुमचे वजन (उदा. ते ७० किलो गृहीत धरू)  तुमच्या वजनाला तुमच्या वयाने गुणा. (उदा. ते तीस समजू)  आलेल्या उत्तराला २८.३ ने भागा.  म्हणजेच ७० गुणिले ३०/२८.३ = ७४.२० औंस, जवळपास २.१९ लि.  (३३.८ औंस = एक लिटर)  यावरून संबंधित व्यक्तीला दिवसभरात एकूण किती औंस पाण्याची गरज आहे, हे समजेल. एखाद्या व्यक्तीची पाण्याची सरासरी गरज वरील सूत्रातून समजू शकते. अर्थात, यात हवामानातील बदल, व्यायाम, जीवनशैली आदी घटक गृहीत धरलेले नाहीत. भारतात उन्हाळ्यात तापमान ४५ अंशांपर्यंत पोचते. त्यामुळे, शरीराची अतिरिक्त गरज भरून काढण्यासाठी उन्हाळ्यात रोज दोन ग्लास अधिक पाणी प्यावे. त्याचप्रमाणे, तुम्ही मध्यम तीव्रतेचे व्यायाम करत असाल तर व्यायामाच्या प्रत्येक तासाला रोज एक ते दोन ग्लास पाणी अधिक पिण्याची गरज आहे. तीव्र व्यायाम करणाऱ्यांनी व्यायामाचा प्रकार, तीव्रता आदी घटक ध्यानात घेऊन रोजच्या पिण्याच्या पाण्यात दोन ते चार ग्लास वाढ करावी. घरामध्येच असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना रोज पिण्याच्या पाण्यामध्ये सरासरीपेक्षा कपात करावी लागू शकते. त्याचप्रमाणे, थंड प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींनीही थोडेसे कमी पाणी प्यावे. हे सर्व समजून घेताना हेही लक्षात घ्यावे, की पाण्याची गरज भागविण्याचा केवळ पाणी हाच एकमेव स्रोत नव्हे. आपल्या अन्नामध्येही पाणी असते. प्रत्येक पदार्थामध्ये पाण्याचे प्रमाण वेगवेगळे असते. त्यामुळे आहारातूनही आपल्याला पाणी मिळते.  प्रभाव टाकणारे विशेष घटक आरोग्याशी निगडित एखादी विशिष्ट समस्या असेल, तर पाणी अधिक प्यायले जाऊ शकते. उदा. थायरॉईड किंवा मूत्रपिंडाचा, यकृताचा आजार, हृदयविकार आदी. त्याचप्रमाणे, पाणी रोखून धरणारी औषधे घेत असल्यास त्याचाही पाणी अधिक पिण्यावर परिणाम होऊ शकतो. उदा. वेदनाशामक औषधे, नैराश्‍याच्या आजारांवरील काही औषधे. मुतखड्यासारख्या काही आजारांमध्येही उपचाराचा भाग म्हणून अधिक पाणी प्यायले जाऊ शकते.  लघवीचा रंग आणि पाणी निर्जलीकरण (Dehydration) होत असल्याचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे लघवीचा रंग. सामान्यतः लघवीचा पारदर्शक रंग शरीरातील पाण्याचे पुरेसे प्रमाण (Hydration) दर्शवितो, तर पिवळा रंग पाणी कमी पडत असल्याचे निदर्शक आहे. निर्जलीकरणाचा विचार करता लघवीचा पिवळा रंग योग्य असू शकतो. मात्र, ती पारदर्शक असणे याचा अर्थ फक्त पाण्याच्या पुरेशा प्रमाणापुरता मर्यादित नाही. खरेतर, लघवीचा रंग पारदर्शक असेपर्यंत पाणी पिण्याची गरज नाही. लघवी पारदर्शक किंवा पांढऱ्या रंगाची होत असल्यास पाणी गरजेपेक्षा अधिक (Over Hydrated) पित असल्याचा त्याचा अर्थ होतो. लघवीचा फिकट पिवळा रंगही पाण्याचे योग्य प्रमाण दर्शवितो. मात्र, तरीही शरीरातील पाण्याचे प्रमाण ठरविण्याचे हे योग्य मोजमाप नव्हे.  गर्भारपण आणि पाण्याचे पुरेसे प्रमाण  शरीरात पाण्याचे पुरेसे प्रमाण (Hydration) ठेवण्याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. गर्भवती किंवा स्तन्यपान करणाऱ्या महिलांनी रोजच्या द्रव पदार्थांचे प्रमाण २४ ते ३२ औंसांनी वाढवायला हवे. अमेरिकन प्रेग्नन्सी असोसिएशनच्या अहवालानुसार ते  वजनावर अवलंबून आहे. याशिवाय इतर कॅफिनयुक्त पेये आणि सोड्याऐवजी पाण्यामधूनच बहुतांश गरज भागवणेही, महत्त्वाचे आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 12, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ILXHgE
Read More
आंबा बागायतदारांनो, हापूसची घ्या काळजी!

रत्नागिरी - वातावरणातील बदलांमुळे कोकणातील हापूस उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून मार्चच्या पहिल्या आठवड्यात अवघ्या दोन ते अडीच हजार पेट्याच वाशी मार्केटला रवाना होत आहेत. कमी उत्पादनामुळे दर चांगला मिळत आहे. बागायतदारांनी सुरवातीला तयार झालेलाच आंबा बाजारात पाठविण्यावर भर दिला तर दर कायमस्वरुपी टिकुन राहणार आहे. कोवळा आंबा बाजारात गेला तर दरावर मोठा परिणाम होण्याची दाट शक्‍यता आहे.

पावसापाठोपाठ थंडी लांबल्यामुळे आंब्यावर मोहोर येण्याची प्रक्रिया एक महिन्यांनी लांबली. त्याचे परिणाम हापूसच्या उत्पादनावर होत आहे. वातावरणातील बदलांबरोबरच कीडरोगांचाही प्रादुर्भाव काही अंशी ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे.

फेब्रुवारी महिन्यात देवगडमधून अधिकाधिक आंबा वाशी मार्केटला पाठविण्यात येतो. त्यात रत्नागिरीचा टक्‍का अत्यंत कमी असतो; परंतु मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये रत्नागिरीचे प्रमाण वाढत जाते. यंदा परिस्थिती गंभीर असून देवगडसह रत्नागिरीतून दररोज सरासरी अडीच हजार पेट्याच वाशीला जात आहे. उत्पादन कमी असल्यामुळे सुरवातीला 4 ते 9 हजार रुपयांपर्यंत पाच डझनच्या पेटीला दर मिळत होता. 

यंदा आंबा हंगाम दीड महिन्यांनी लांबलेला आहे. त्यामुळे बाजारात आंब्याला दरही चांगला मिळतोय. परंतु तयार झालेले फळ बाजारात गेले तर त्याचा दुरगामी फायदा बागायतदारांना मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. 
- राजेंद्र कदम, आंबा बागायतदार. 

पिकण्यायोग्य झालेलाच आंबाच... 
तमिळनाडूसह परराज्यातूनही आंबा वाशीला येऊ लागला असून त्याचा दरावर परिणाम होत आहे. त्यामुळे हापूसचा दर्जा टिकवून ठेवण्याचे आव्हान कोकणातील बागायतदारांपुढे आहे. पिकण्यायोग्य झालेलाच आंबा बाजारात पाठविण्याची काळजी बागायतदारांनी घेतली तर वधारलेला दर टिकू शकतो. अन्यथा, त्यात मोठी घट होऊ शकते. 

शेवटच्या टप्प्यातही दर चांगला 
सध्या वाशी बाजारात 3 ते 8 हजार रुपयांपर्यंत दर पेटीला मिळत आहे. यंदा उत्पादन कमी असल्यामुळे शेवटच्या टप्प्यातही दर चांगला राहू शकेल, असा अंदाज वाशीतील काही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्याला पूरक अशा गोष्टी बागायतदारांनी स्वतःहून करणे आवश्‍यक आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आंबा बागायतदारांनो, हापूसची घ्या काळजी! रत्नागिरी - वातावरणातील बदलांमुळे कोकणातील हापूस उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून मार्चच्या पहिल्या आठवड्यात अवघ्या दोन ते अडीच हजार पेट्याच वाशी मार्केटला रवाना होत आहेत. कमी उत्पादनामुळे दर चांगला मिळत आहे. बागायतदारांनी सुरवातीला तयार झालेलाच आंबा बाजारात पाठविण्यावर भर दिला तर दर कायमस्वरुपी टिकुन राहणार आहे. कोवळा आंबा बाजारात गेला तर दरावर मोठा परिणाम होण्याची दाट शक्‍यता आहे. पावसापाठोपाठ थंडी लांबल्यामुळे आंब्यावर मोहोर येण्याची प्रक्रिया एक महिन्यांनी लांबली. त्याचे परिणाम हापूसच्या उत्पादनावर होत आहे. वातावरणातील बदलांबरोबरच कीडरोगांचाही प्रादुर्भाव काही अंशी ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यात देवगडमधून अधिकाधिक आंबा वाशी मार्केटला पाठविण्यात येतो. त्यात रत्नागिरीचा टक्‍का अत्यंत कमी असतो; परंतु मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये रत्नागिरीचे प्रमाण वाढत जाते. यंदा परिस्थिती गंभीर असून देवगडसह रत्नागिरीतून दररोज सरासरी अडीच हजार पेट्याच वाशीला जात आहे. उत्पादन कमी असल्यामुळे सुरवातीला 4 ते 9 हजार रुपयांपर्यंत पाच डझनच्या पेटीला दर मिळत होता.  यंदा आंबा हंगाम दीड महिन्यांनी लांबलेला आहे. त्यामुळे बाजारात आंब्याला दरही चांगला मिळतोय. परंतु तयार झालेले फळ बाजारात गेले तर त्याचा दुरगामी फायदा बागायतदारांना मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.  - राजेंद्र कदम, आंबा बागायतदार.  पिकण्यायोग्य झालेलाच आंबाच...  तमिळनाडूसह परराज्यातूनही आंबा वाशीला येऊ लागला असून त्याचा दरावर परिणाम होत आहे. त्यामुळे हापूसचा दर्जा टिकवून ठेवण्याचे आव्हान कोकणातील बागायतदारांपुढे आहे. पिकण्यायोग्य झालेलाच आंबा बाजारात पाठविण्याची काळजी बागायतदारांनी घेतली तर वधारलेला दर टिकू शकतो. अन्यथा, त्यात मोठी घट होऊ शकते.  शेवटच्या टप्प्यातही दर चांगला  सध्या वाशी बाजारात 3 ते 8 हजार रुपयांपर्यंत दर पेटीला मिळत आहे. यंदा उत्पादन कमी असल्यामुळे शेवटच्या टप्प्यातही दर चांगला राहू शकेल, असा अंदाज वाशीतील काही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्याला पूरक अशा गोष्टी बागायतदारांनी स्वतःहून करणे आवश्‍यक आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 12, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2wOVs9Q
Read More
इराणमध्ये सहा हजार भारतीय अडकले

नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने वेगाने पावले उचलायला सुरुवात केली आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये आणखी तेरा जणांची भर पडल्याने एकूण बाधितांची संख्या ७४ वर पोचली आहे. कोरोनाग्रस्त इराणमध्ये सहा हजार भारतीय अडकून पडले असून, त्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र मंत्रालयानेही लोकांनी आवश्‍यक असेल तरच प्रवास करावा, अशी सूचना केली आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नव्याने विषाणूचा संसर्ग झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील नऊ, दिल्ली, लडाख आणि उत्तर प्रदेशातील एक आणि एका परकी नागरिकाचाही समावेश असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले. या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांनी घाबरून जाऊ नये, पण काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

दरम्यान, कोरोनाबाधित इराणमध्ये सहा हजार भारतीय अडकून पडले असून, त्यांना मायदेशी आणण्यासाठी तीन विमाने पाठविली जाणार असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत बोलताना सांगितले. या अडकून पडलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्र आणि जम्मू-काश्‍मीरमधील एक हजार यात्रेकरूंचा समावेश आहे. या विषाणूंच्या प्रसाराचा वेग लक्षात घेता भारतीयांनी आहे तेथेच थांबावे अशी सूचना परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. आयपीएल रद्द करण्याची सूचनाही मंत्रालयाने केली असून अंतिम निर्णय मात्र आयोजकांनी घ्यावा, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. 

Coronavirus : देशात ५२, तर राज्यात 'या' ठिकाणी आहेत 'कोरोना टेस्ट लॅब'!

लसीसाठी दीड ते दोन वर्षे लागणार
आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या चाचणीसाठी देशभर पुरेशा प्रयोगशाळा असल्याचे म्हटले आहे. कोरोना विषाणूंना वेगळे पाडण्यात आम्हाला यश आले असून या विषाणूंविरोधातील लस येण्यासाठी किमान दीड ते दोन वर्षांचा अवधी लागेल, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली आहे. भारतात सुदैवाने या विषाणूचा एका समुदायाकडून दुसऱ्याकडे प्रसार होताना दिसत नाही. भारतातही केवळ बाहेरून आलेल्यांमुळेच हा विषाणू पसरला असून एका व्यक्तीकडून तिच्या अन्य कुटुंबीयांना या विषाणूची लागण होण्याचा धोका अधिक आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी सांगितले.

Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय; आता...

राजधानी दिल्लीमध्ये राज्य सरकारने सरकारी आणि खासगी कार्यालये निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश दिले असून, ३१ मार्चपर्यंत सिनेमागृहेदेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकार तीन विमाने पाठविणार
देशातील बाधितांची संख्या ७४ वर
अनावश्‍यक प्रवास टाळावा लागणार

कोरोनाच्या विषाणूचा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असून, याला रोखण्यात आधीच आपल्याला खूप उशीर झाला आहे. याच्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी सरकारने उपाययोजना आखाव्यात.
- राहुल गांधी, नेते, काॅँग्रेस

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

इराणमध्ये सहा हजार भारतीय अडकले नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने वेगाने पावले उचलायला सुरुवात केली आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये आणखी तेरा जणांची भर पडल्याने एकूण बाधितांची संख्या ७४ वर पोचली आहे. कोरोनाग्रस्त इराणमध्ये सहा हजार भारतीय अडकून पडले असून, त्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र मंत्रालयानेही लोकांनी आवश्‍यक असेल तरच प्रवास करावा, अशी सूचना केली आहे. आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  नव्याने विषाणूचा संसर्ग झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील नऊ, दिल्ली, लडाख आणि उत्तर प्रदेशातील एक आणि एका परकी नागरिकाचाही समावेश असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले. या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांनी घाबरून जाऊ नये, पण काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित इराणमध्ये सहा हजार भारतीय अडकून पडले असून, त्यांना मायदेशी आणण्यासाठी तीन विमाने पाठविली जाणार असल्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत बोलताना सांगितले. या अडकून पडलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्र आणि जम्मू-काश्‍मीरमधील एक हजार यात्रेकरूंचा समावेश आहे. या विषाणूंच्या प्रसाराचा वेग लक्षात घेता भारतीयांनी आहे तेथेच थांबावे अशी सूचना परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. आयपीएल रद्द करण्याची सूचनाही मंत्रालयाने केली असून अंतिम निर्णय मात्र आयोजकांनी घ्यावा, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.  Coronavirus : देशात ५२, तर राज्यात 'या' ठिकाणी आहेत 'कोरोना टेस्ट लॅब'! लसीसाठी दीड ते दोन वर्षे लागणार आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या चाचणीसाठी देशभर पुरेशा प्रयोगशाळा असल्याचे म्हटले आहे. कोरोना विषाणूंना वेगळे पाडण्यात आम्हाला यश आले असून या विषाणूंविरोधातील लस येण्यासाठी किमान दीड ते दोन वर्षांचा अवधी लागेल, अशी माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली आहे. भारतात सुदैवाने या विषाणूचा एका समुदायाकडून दुसऱ्याकडे प्रसार होताना दिसत नाही. भारतातही केवळ बाहेरून आलेल्यांमुळेच हा विषाणू पसरला असून एका व्यक्तीकडून तिच्या अन्य कुटुंबीयांना या विषाणूची लागण होण्याचा धोका अधिक आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी सांगितले. Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय; आता... राजधानी दिल्लीमध्ये राज्य सरकारने सरकारी आणि खासगी कार्यालये निर्जंतुकीकरण करण्याचे निर्देश दिले असून, ३१ मार्चपर्यंत सिनेमागृहेदेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार तीन विमाने पाठविणार देशातील बाधितांची संख्या ७४ वर अनावश्‍यक प्रवास टाळावा लागणार कोरोनाच्या विषाणूचा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असून, याला रोखण्यात आधीच आपल्याला खूप उशीर झाला आहे. याच्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी सरकारने उपाययोजना आखाव्यात. - राहुल गांधी, नेते, काॅँग्रेस News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 12, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cWwshh
Read More