Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, February 28, 2020

‘भारतरत्न’चे राजकारण

मध्यरात्र उलटल्यावर शहरातील चौकात एका चौथऱ्यावर भेटलेल्या पाच पुतळ्यांची कविता त्या महामानवांची वेदना तीव्रतेने आपल्यापर्यंत पोचविते. संवेदनशील, देशप्रेमी नागरिकाच्या अंगावर काटा आणणारी ही कविता आहे. सध्या महापुरुषांच्या नावांचा वापर ज्या पद्धतीने राजकीय फायद्यांसाठी केला जात आहे, ती बाब धक्कादायक आहे. जातीपातीचे राजकारण असते मुळात विभाजक. त्यात धर्माचे, पंथाचे पाठभेद शिरले की ते ठरते विदारक अन्‌ एकाच विचाराच्या दोन पक्षांनी त्याचे राजकारण सुरू केले की ते ठरते विद्वेषक. गेल्या वेळी वेगळे लढून दोन पक्ष नंतर एकत्र आले. या वेळी उलटे झाले. लढले एकत्र अन्‌ नंतर झाले वेगळे. सत्तालालसा परस्परसंबंध ठरवतेय सध्या. पण एकेकाळी सत्ता अप्राप्य असल्याने हिंदुत्ववादी राजकारण हा दोघांनाही जोडणारा धागा होता. आज वेगळे झाल्यावरही या मतपेढीवर भाजप आणि शिवसेना हे दोघेही हक्‍क सांगत आहेत. त्यासाठी वैचारिक प्रतीके आपापल्या दिशेने ओढली जात आहेत. किमान समान कार्यक्रमानंतरही शिवसेनेचे ‘चलो अयोध्या’ आहेच अन्‌ भाजप त्यांना अडचणीत आणायला कधीही न मांडलेल्या ‘सावरकर गौरव ठरावा’चा आग्रह धरते आहे. या हिंदुत्वाच्या साठमारीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा जो वापर केला जात आहे, तो निंद्यच आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापुरुषांचे जीवन तसेही सरळ, एकरेषीय नसतेच. सावरकरांसारखे व्यक्तिमत्त्व तर वादळी होते. त्यांच्याविषयीच्या काही प्रवादांवर चर्चा होऊही शकते; पण त्यापेक्षाही महत्त्वाचे ठरते ते त्यांना ‘भारतरत्न’ मिळावे काय, याबद्दल सुरू असलेले राजकारण. समाजजीवनात, राष्ट्राच्या वाटचालीत योगदान देणारा कुणीही सच्चा माणूस देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा यासाठी मोर्चेबांधणी करत नसतो. त्यासाठी पुढे येतात ते अनुयायी. स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास हा नेहरू-गांधींना केंद्रस्थानी ठेवून लिहिला गेला ही उजव्या विचारसरणीची ठसठस. नेहरू-गांधी परिवाराच्या वरचष्म्याला विरोध करण्यासाठी सावरकर, सुभाषचंद्र बोस यांची चरित्रे मग प्रतीक पर्याय म्हणून प्रखरपणे समोर आणली गेली. वाजपेयी सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्यानंतर संसदेत सावरकरांचे तैलचित्र लावले गेले ते विचारसरणीला लोकमान्यता मिळाल्याने. खरे तर मतभेदांना तिलांजली देत देशाने भविष्याकडे वाटचाल करायची असते; पण ज्या संस्कृतीत मंदिरप्रवेशाचे मुद्दे आजही वादविषय ठरतात, तेथे महापुरुषही ‘तुमचे ते’ अन्‌ ‘आमचे हे’ अशा विभाजनात वाटले जातात. 

काँग्रेसचे सध्याचे नेतृत्व बेरजेच्या राजकारणाचे भान नसलेले. ‘मी राहुल- सावरकर नाही’ असे गांधी घराण्याचे वारस अकारण म्हणतात अन्‌ वादाच्या आगीत विधानांच्या मोळ्या पडतात. खरे तर सावरकरांचे योगदान आणि मराठी माणसातले त्यांचे स्थान लक्षात घेत महाराष्ट्राच्या विधिमंडळातही त्यांचे तैलचित्र लावण्यात आले. दादरमध्ये सावरकर स्मारकासाठी ज्येष्ठ नेते जयंतराव टिळक यांनी स्थानिकांना मदत करत पाठविलेला प्रस्ताव वसंतदादा पाटील, शरद पवार अशा तत्कालिन राज्यप्रमुखांनी प्रत्यक्षात आणला. सर्वसमावेशकतेची, सामोपचाराची ही काँग्रेस संस्कृती आज पक्षनेतृत्वाच्या भीतीने दूर ठेवली जाते. ‘सावरकरांचे योगदान मोठे आहे,’ असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू स्पष्ट केली. काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांनी मात्र कुणी चुगली केली, तर राहुलजींची मर्जी फिरायची या भीतीने कणाहीन वागणे पत्करले.

आश्‍वासनाचे विस्मरण?
 हिंदुत्ववादी पक्षांचे वर्तनही तपासण्यासारखे. सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याचा विषय भाजपने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात नमूद केला. देशाचा कारभार आपल्या मर्जीनुसार चालवायची या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची वृत्ती. अमित शहा तर सावरकरभक्‍त, पहिला ब्लॉग सावरकरांना समर्पित करणारे. ‘भारतरत्न’साठी पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या कार्यालयाला शिफारस करणे एवढाच काय तो नियम अन्‌ निकष. तरीही पक्षाला या आश्‍वासनाचा विसर पडतो आहे, की राजकारण करीत हा विषय तापवत ठेवायचा आहे? सावरकरांबरोबर फडवणीस सरकाने महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावांचीही शिफारस ‘भारतरत्न’साठी पाठविलेली आहे. त्याचे पुढे काय झाले?

मतांकडे डोळे ठेवून दक्षिणेतील एम. जी. रामचंद्रन यांना या सन्मानाने गौरविले गेले, त्याच दिवशी या सर्वोच्च सन्मानाचे राजकारण सुरू झाले. ते दु:खद आहे. स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यांचा या सन्मानासाठी विचार करावा काय, याचा विचार जरूर व्हावा, पण स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा जोतिराव फुले किंवा क्रांतिकारक भगतसिंग या महापुरुषांची नावे वापरत ‘भारतरत्न’चे राजकारण होऊ नये. दिवंगत राष्ट्रपुरुषांना मरणयातना कितीदा द्यायच्या?

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘भारतरत्न’चे राजकारण मध्यरात्र उलटल्यावर शहरातील चौकात एका चौथऱ्यावर भेटलेल्या पाच पुतळ्यांची कविता त्या महामानवांची वेदना तीव्रतेने आपल्यापर्यंत पोचविते. संवेदनशील, देशप्रेमी नागरिकाच्या अंगावर काटा आणणारी ही कविता आहे. सध्या महापुरुषांच्या नावांचा वापर ज्या पद्धतीने राजकीय फायद्यांसाठी केला जात आहे, ती बाब धक्कादायक आहे. जातीपातीचे राजकारण असते मुळात विभाजक. त्यात धर्माचे, पंथाचे पाठभेद शिरले की ते ठरते विदारक अन्‌ एकाच विचाराच्या दोन पक्षांनी त्याचे राजकारण सुरू केले की ते ठरते विद्वेषक. गेल्या वेळी वेगळे लढून दोन पक्ष नंतर एकत्र आले. या वेळी उलटे झाले. लढले एकत्र अन्‌ नंतर झाले वेगळे. सत्तालालसा परस्परसंबंध ठरवतेय सध्या. पण एकेकाळी सत्ता अप्राप्य असल्याने हिंदुत्ववादी राजकारण हा दोघांनाही जोडणारा धागा होता. आज वेगळे झाल्यावरही या मतपेढीवर भाजप आणि शिवसेना हे दोघेही हक्‍क सांगत आहेत. त्यासाठी वैचारिक प्रतीके आपापल्या दिशेने ओढली जात आहेत. किमान समान कार्यक्रमानंतरही शिवसेनेचे ‘चलो अयोध्या’ आहेच अन्‌ भाजप त्यांना अडचणीत आणायला कधीही न मांडलेल्या ‘सावरकर गौरव ठरावा’चा आग्रह धरते आहे. या हिंदुत्वाच्या साठमारीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा जो वापर केला जात आहे, तो निंद्यच आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महापुरुषांचे जीवन तसेही सरळ, एकरेषीय नसतेच. सावरकरांसारखे व्यक्तिमत्त्व तर वादळी होते. त्यांच्याविषयीच्या काही प्रवादांवर चर्चा होऊही शकते; पण त्यापेक्षाही महत्त्वाचे ठरते ते त्यांना ‘भारतरत्न’ मिळावे काय, याबद्दल सुरू असलेले राजकारण. समाजजीवनात, राष्ट्राच्या वाटचालीत योगदान देणारा कुणीही सच्चा माणूस देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा यासाठी मोर्चेबांधणी करत नसतो. त्यासाठी पुढे येतात ते अनुयायी. स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास हा नेहरू-गांधींना केंद्रस्थानी ठेवून लिहिला गेला ही उजव्या विचारसरणीची ठसठस. नेहरू-गांधी परिवाराच्या वरचष्म्याला विरोध करण्यासाठी सावरकर, सुभाषचंद्र बोस यांची चरित्रे मग प्रतीक पर्याय म्हणून प्रखरपणे समोर आणली गेली. वाजपेयी सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्यानंतर संसदेत सावरकरांचे तैलचित्र लावले गेले ते विचारसरणीला लोकमान्यता मिळाल्याने. खरे तर मतभेदांना तिलांजली देत देशाने भविष्याकडे वाटचाल करायची असते; पण ज्या संस्कृतीत मंदिरप्रवेशाचे मुद्दे आजही वादविषय ठरतात, तेथे महापुरुषही ‘तुमचे ते’ अन्‌ ‘आमचे हे’ अशा विभाजनात वाटले जातात.  काँग्रेसचे सध्याचे नेतृत्व बेरजेच्या राजकारणाचे भान नसलेले. ‘मी राहुल- सावरकर नाही’ असे गांधी घराण्याचे वारस अकारण म्हणतात अन्‌ वादाच्या आगीत विधानांच्या मोळ्या पडतात. खरे तर सावरकरांचे योगदान आणि मराठी माणसातले त्यांचे स्थान लक्षात घेत महाराष्ट्राच्या विधिमंडळातही त्यांचे तैलचित्र लावण्यात आले. दादरमध्ये सावरकर स्मारकासाठी ज्येष्ठ नेते जयंतराव टिळक यांनी स्थानिकांना मदत करत पाठविलेला प्रस्ताव वसंतदादा पाटील, शरद पवार अशा तत्कालिन राज्यप्रमुखांनी प्रत्यक्षात आणला. सर्वसमावेशकतेची, सामोपचाराची ही काँग्रेस संस्कृती आज पक्षनेतृत्वाच्या भीतीने दूर ठेवली जाते. ‘सावरकरांचे योगदान मोठे आहे,’ असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू स्पष्ट केली. काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांनी मात्र कुणी चुगली केली, तर राहुलजींची मर्जी फिरायची या भीतीने कणाहीन वागणे पत्करले. आश्‍वासनाचे विस्मरण?  हिंदुत्ववादी पक्षांचे वर्तनही तपासण्यासारखे. सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याचा विषय भाजपने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात नमूद केला. देशाचा कारभार आपल्या मर्जीनुसार चालवायची या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची वृत्ती. अमित शहा तर सावरकरभक्‍त, पहिला ब्लॉग सावरकरांना समर्पित करणारे. ‘भारतरत्न’साठी पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या कार्यालयाला शिफारस करणे एवढाच काय तो नियम अन्‌ निकष. तरीही पक्षाला या आश्‍वासनाचा विसर पडतो आहे, की राजकारण करीत हा विषय तापवत ठेवायचा आहे? सावरकरांबरोबर फडवणीस सरकाने महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावांचीही शिफारस ‘भारतरत्न’साठी पाठविलेली आहे. त्याचे पुढे काय झाले? मतांकडे डोळे ठेवून दक्षिणेतील एम. जी. रामचंद्रन यांना या सन्मानाने गौरविले गेले, त्याच दिवशी या सर्वोच्च सन्मानाचे राजकारण सुरू झाले. ते दु:खद आहे. स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यांचा या सन्मानासाठी विचार करावा काय, याचा विचार जरूर व्हावा, पण स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा जोतिराव फुले किंवा क्रांतिकारक भगतसिंग या महापुरुषांची नावे वापरत ‘भारतरत्न’चे राजकारण होऊ नये. दिवंगत राष्ट्रपुरुषांना मरणयातना कितीदा द्यायच्या? News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TpcAur
Read More
मुस्लिम आरक्षणावरून  आघाडीत मतभिन्नता 

मुंबई  - मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यावरून राज्य सरकारमध्येच मतभेद असल्याचे आज स्पष्ट झाले. येत्या शैक्षणिक वर्षापासून आरक्षणाची घोषणा राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत केली; तर तसा कोणताही निर्णय झाला नसल्याचे शिवसेनेचे नेते नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, नवीन २०२०-२१ चे शैक्षणिक प्रवेश सुरू होण्याआधीच मुस्लिम समाजाला शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यासाठी कायदा करण्यात येईल.

आघाडी सरकारने २०१४ मध्ये मुस्लिम समाजासाठी नोकरी आणि शैक्षणिकदृष्ट्या आरक्षणासाठी अध्यादेश काढला होता. मात्र, त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर न झाल्याने अध्यादेश रद्द झाला होता. मात्र, उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर मुस्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण दिले गेले पाहिजे, असे उच्च न्यायालयाने सांगितले होते. परंतु, धर्माधिष्ठित आरक्षण देण्यासाठी भाजपने नकार दिला होता.

काँग्रेसच्या आ. हुस्नबानो खलिफे यांनी येत्या शैक्षणिक वर्षाचे प्रवेश सुरू होण्यापूर्वीच हा कायदा लागू केला जावा, अशी मागणी केली.  त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मलिक यांनी येत्या शैक्षणिक वर्षात हा कायदा केला जाईल, अशी हमी दिली.

दरम्यान, भाजपचे आमदार भाई गिरकर यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. त्यामुळे अल्पसंख्याकांना देण्यात येणारे आरक्षण न्यायालयात टिकेल का? आंध्र प्रदेश सरकारने मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नसल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, १९५० ला घटनादुरुस्ती करून नवबौद्ध आणि शीख धर्मातील अनुसूचित जातीच्या लोकांना आरक्षण दिले गेले आहे. त्यामुळे अशाप्रकारे आरक्षण देता येते, हे सिद्ध झालेले आहे. आम्ही संविधानाच्या आधारावरच आरक्षण देऊ, याचा पुनरुच्चार केला. तसेच, सच्चर समितीचा अहवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनीदेखील आरक्षण देता येईल, असे मत नोंदविले असल्याने मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण देता येण्यास अडचण येत नसल्याचा विश्वास व्यक्त केला. 

शिवसेनेने त्यांच्या जाहीरनाम्यात अल्पसंख्याक समाज, दलित, आदिवासींच्या सामाजिक हक्कांचे संरक्षण करणार असल्याचे नमूद केलेले होते. त्यामुळे मुस्लिम आरक्षणाला त्यांचा पाठिंबा आहेच. सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. 
-नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री

राज्यघटनेनुसार धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही. इतकेच नाही, तर धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण दिल्याने मराठा आणि ओबीसी आरक्षणही अडचणीत येईल. मंत्री ज्या वेळी उत्तर देतात तेव्हा सरकारच बोलत असते. शिवसेनेने आपली सगळी तत्त्वे बाजूला ठेवून कशाकशात सेटिंग केली आहे, हे एकदा जाहीर करावे.
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मुस्लिम आरक्षणावरून  आघाडीत मतभिन्नता  मुंबई  - मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यावरून राज्य सरकारमध्येच मतभेद असल्याचे आज स्पष्ट झाले. येत्या शैक्षणिक वर्षापासून आरक्षणाची घोषणा राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत केली; तर तसा कोणताही निर्णय झाला नसल्याचे शिवसेनेचे नेते नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, नवीन २०२०-२१ चे शैक्षणिक प्रवेश सुरू होण्याआधीच मुस्लिम समाजाला शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यासाठी कायदा करण्यात येईल. आघाडी सरकारने २०१४ मध्ये मुस्लिम समाजासाठी नोकरी आणि शैक्षणिकदृष्ट्या आरक्षणासाठी अध्यादेश काढला होता. मात्र, त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर न झाल्याने अध्यादेश रद्द झाला होता. मात्र, उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर मुस्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण दिले गेले पाहिजे, असे उच्च न्यायालयाने सांगितले होते. परंतु, धर्माधिष्ठित आरक्षण देण्यासाठी भाजपने नकार दिला होता. काँग्रेसच्या आ. हुस्नबानो खलिफे यांनी येत्या शैक्षणिक वर्षाचे प्रवेश सुरू होण्यापूर्वीच हा कायदा लागू केला जावा, अशी मागणी केली.  त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मलिक यांनी येत्या शैक्षणिक वर्षात हा कायदा केला जाईल, अशी हमी दिली. दरम्यान, भाजपचे आमदार भाई गिरकर यांनी धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. त्यामुळे अल्पसंख्याकांना देण्यात येणारे आरक्षण न्यायालयात टिकेल का? आंध्र प्रदेश सरकारने मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नसल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, १९५० ला घटनादुरुस्ती करून नवबौद्ध आणि शीख धर्मातील अनुसूचित जातीच्या लोकांना आरक्षण दिले गेले आहे. त्यामुळे अशाप्रकारे आरक्षण देता येते, हे सिद्ध झालेले आहे. आम्ही संविधानाच्या आधारावरच आरक्षण देऊ, याचा पुनरुच्चार केला. तसेच, सच्चर समितीचा अहवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनीदेखील आरक्षण देता येईल, असे मत नोंदविले असल्याने मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण देता येण्यास अडचण येत नसल्याचा विश्वास व्यक्त केला.  शिवसेनेने त्यांच्या जाहीरनाम्यात अल्पसंख्याक समाज, दलित, आदिवासींच्या सामाजिक हक्कांचे संरक्षण करणार असल्याचे नमूद केलेले होते. त्यामुळे मुस्लिम आरक्षणाला त्यांचा पाठिंबा आहेच. सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे.  -नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री राज्यघटनेनुसार धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही. इतकेच नाही, तर धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण दिल्याने मराठा आणि ओबीसी आरक्षणही अडचणीत येईल. मंत्री ज्या वेळी उत्तर देतात तेव्हा सरकारच बोलत असते. शिवसेनेने आपली सगळी तत्त्वे बाजूला ठेवून कशाकशात सेटिंग केली आहे, हे एकदा जाहीर करावे. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 28, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/387BxQn
Read More
सोनभद्र: पत्थर की खदान धंसी, 2 घायल मजदूर निकाले गए, कई अभी भी फंसे https://ift.tt/2Pw2k2b

Thursday, February 27, 2020

पैशे सांभाळा... कारण या बॅंकेला १५ जणांनी लावलाय चुना

औरंगाबाद : एचडीएफसी बँकेच्या कोकणवाडीच्या शाखेची आतापर्यंत १५ व्यक्तींनी फसवणूक केल्याचे आणि साखळी पद्धतीने हा गुन्हा करण्यात आल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष फ्रान्सिस आयवन क्रियाडो (पुणे) यांनी दुकान परवाना, आयकर विवरण पत्र, बँक खाते उतारे आदी बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यावसायिक कर्ज घेऊन बॅंकेची फसवणूक केल्याची तक्रार वेदांतनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. 

हेही वाचा- देवदर्शनासाठी जाताना त्यांच्या मनीध्यानीही नव्हते. पण घरी येऊन पाहतात तर....

या प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन संशयित आरोपी प्रभाकर गावंडे याला पोलिसांनी अटक केली तर, न्यायालयाने गावंडेला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपी गावंडेला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

सुनावणीवेळी, १५ आरोपींनी बनावट कागदपत्रे व शिक्क्यांचा वापर करुन बँकेची फसवणूक केल्याचा केली सून गावंडेने १४ लाख रुपये बँकेतून उचलले आहेत व सर्व आरोपींनी साखळी पद्धतीने गुन्हा केल्याचे दिसून येत आहे असा युक्तीवाद करण्यात आला. सुनावणीदरम्यान आरोपी गावंडेच्या पोलिस कोठडीमध्ये रविवारपर्यंत (ता.२३) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी दिले. 

क्लिक करा- बीड जिल्हा पुन्हा गुंडगिरीकडे, पण खपवून घेणार नाही- पंकजा मुंडे

आहेत संशयित 

मंगेश पंढरीनाथ सिरसाठ (रा. खडकेश्वर), महेश पंढरीनाथ सिरसाठ (रा. शिवनेरी हौसिंग सोसायटी), सचिन बंडुलाल राठोड (रा. गारखेडा), सय्यद जाविद (निकलक, ता. बदनापूर, जि. जालना), मुस्तकीम निसार खान (पीरबाजार रोड), मीना सुभाष औताडे (रा. बजाजनगर), सविता गुलाब हिवर्डे (रा. शरणापूर, पडेगाव), संतोषकुमार बबनराव पाटील (देवळाई परिसर), वाजिद अली खान (रा. सिल्कमिल कॉलनी), मालती राजेंद्र हार्डे (रा. हिवरखेडा रोड, कन्नड, जि. औरंगाबाद), प्रभाकर मधुकर गावंडे (४९, रा. चिकलठाणा), दिनेश बेचारा वाविया (रा. सातारा परिसर), शेख निहाल अहेमद हाजी (रा. किराडपुरा), हसन अमर हैदरा (रा. रोशनगेट) व फकरोद्दीन मोहम्मद (रा. बिस्मिल्ला कॉलनी) यांनी बँकेच्या कोकणवाडी शाखेची एक कोटी ४७ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादी म्हटले आहे.

मास्टर माईंड मोकाटच 

मागच्या वर्षीही ७ व्यक्तींनी बँकेची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे या प्रकरणात आरोपींची मोठी साखळी असू शकते. आरोपी गावंडेने बनावट शिक्के-कागदपत्रे कुठून मिळवले, कुणी दिले, गुन्ह्याचा मास्टर माईंड कोण आदी बाबींचा तपास करणे बाकी असून, बनावट शिक्के-कागदपत्रे जप्त करणे बाकी असल्याचेही न्यायालयात सांगण्यात आले.

हे वाचलंत का- उपवासाच्या भगरीतून एकाच गावातील सतरा जणांना विषबाधा

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पैशे सांभाळा... कारण या बॅंकेला १५ जणांनी लावलाय चुना औरंगाबाद : एचडीएफसी बँकेच्या कोकणवाडीच्या शाखेची आतापर्यंत १५ व्यक्तींनी फसवणूक केल्याचे आणि साखळी पद्धतीने हा गुन्हा करण्यात आल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष फ्रान्सिस आयवन क्रियाडो (पुणे) यांनी दुकान परवाना, आयकर विवरण पत्र, बँक खाते उतारे आदी बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यावसायिक कर्ज घेऊन बॅंकेची फसवणूक केल्याची तक्रार वेदांतनगर पोलिस ठाण्यात दिली आहे.  हेही वाचा- देवदर्शनासाठी जाताना त्यांच्या मनीध्यानीही नव्हते. पण घरी येऊन पाहतात तर.... या प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन संशयित आरोपी प्रभाकर गावंडे याला पोलिसांनी अटक केली तर, न्यायालयाने गावंडेला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे आरोपी गावंडेला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीवेळी, १५ आरोपींनी बनावट कागदपत्रे व शिक्क्यांचा वापर करुन बँकेची फसवणूक केल्याचा केली सून गावंडेने १४ लाख रुपये बँकेतून उचलले आहेत व सर्व आरोपींनी साखळी पद्धतीने गुन्हा केल्याचे दिसून येत आहे असा युक्तीवाद करण्यात आला. सुनावणीदरम्यान आरोपी गावंडेच्या पोलिस कोठडीमध्ये रविवारपर्यंत (ता.२३) वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. काळे यांनी दिले.  क्लिक करा- बीड जिल्हा पुन्हा गुंडगिरीकडे, पण खपवून घेणार नाही- पंकजा मुंडे आहेत संशयित  मंगेश पंढरीनाथ सिरसाठ (रा. खडकेश्वर), महेश पंढरीनाथ सिरसाठ (रा. शिवनेरी हौसिंग सोसायटी), सचिन बंडुलाल राठोड (रा. गारखेडा), सय्यद जाविद (निकलक, ता. बदनापूर, जि. जालना), मुस्तकीम निसार खान (पीरबाजार रोड), मीना सुभाष औताडे (रा. बजाजनगर), सविता गुलाब हिवर्डे (रा. शरणापूर, पडेगाव), संतोषकुमार बबनराव पाटील (देवळाई परिसर), वाजिद अली खान (रा. सिल्कमिल कॉलनी), मालती राजेंद्र हार्डे (रा. हिवरखेडा रोड, कन्नड, जि. औरंगाबाद), प्रभाकर मधुकर गावंडे (४९, रा. चिकलठाणा), दिनेश बेचारा वाविया (रा. सातारा परिसर), शेख निहाल अहेमद हाजी (रा. किराडपुरा), हसन अमर हैदरा (रा. रोशनगेट) व फकरोद्दीन मोहम्मद (रा. बिस्मिल्ला कॉलनी) यांनी बँकेच्या कोकणवाडी शाखेची एक कोटी ४७ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादी म्हटले आहे. मास्टर माईंड मोकाटच  मागच्या वर्षीही ७ व्यक्तींनी बँकेची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे या प्रकरणात आरोपींची मोठी साखळी असू शकते. आरोपी गावंडेने बनावट शिक्के-कागदपत्रे कुठून मिळवले, कुणी दिले, गुन्ह्याचा मास्टर माईंड कोण आदी बाबींचा तपास करणे बाकी असून, बनावट शिक्के-कागदपत्रे जप्त करणे बाकी असल्याचेही न्यायालयात सांगण्यात आले. हे वाचलंत का- उपवासाच्या भगरीतून एकाच गावातील सतरा जणांना विषबाधा   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 27, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32B26w1
Read More
सायदाला मिळाली तीस वर्षांनंतर मायेची ऊब

येरवडा - सायदा एक वर्षाची असताना तिची आई हरवली होती. शोध घेऊनही सापडली नसल्याने कुटुंबीयांनी त्या परतण्याची आशा सोडली. पण येरवड्यातील मनोरुग्णालयाच्या प्रयत्नामुळे तीस वर्षांनंतर सायदाला आईच्या मायेची ऊब मिळाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आसाम येथील हमिदा बेगम तीस वर्षांपूर्वी हरविल्या होत्या. रुग्णालयातील औषधोपचार, येथील समाजसेवक व आसाम पोलिसांच्या प्रयत्नातून हमिदा यांना त्यांची मुलगी सायदा सुलतान मिळाली. आईला घेण्यासाठी सायदा आपला मामेभाऊ अलिमुद्दीन यांच्यासह आल्या होत्या. मायलेकीच्या भेटीमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनासुद्धा अश्रू अनावर झाले.

मुलगी सायदा एक वर्षाची असताना हमिदा बेगम उदाली (जि. लंका, रा. आसाम) येथून हरविल्या होत्या. त्या मुंबईतील एका रेल्वे स्थानकावर सापडल्या. पोलिसांनी त्यांना १९८९ मध्ये ठाण्यातील मनोरुग्णालयात दाखल केले. जून २०१९ मध्ये त्यांना येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजित फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जयसिंह इंगळे, समाजसेवक मारुती दुनगे तेथील रुग्णांशी चर्चा करून नाव, पत्ता शोधत होते. वैद्यकीय उपचार व समुपदेशनामुळे हमिदा यांची मानसिकता सुधारत होती. समुपदेशनामध्ये त्या आसाममधील असल्याची जुजबी माहिती दिली. त्यावरून दुनगे यांनी तेथील पोलिसांशी संपर्क साधून नातेवाइकांना याची माहिती दिली. त्यानंतर दुनगे यांनी हमिदा यांचे भाऊ अल्लीमउद्दीन यांच्याशी व्हिडिओ कॉन्फन्सवर संवाद साधला. अल्लीमउद्दीन यांनी तीस वर्षांपूर्वी हरविलेल्या बहिणीला ओळखले. त्यांनी तत्काळ भाची सायदा यांच्यासह पुणे गाठले. 

हमिदा यांना पाहताच मुलीचा मायेचा बांध फुटला. सर्वत्र चौकशी केल्यानंतरही हमिदा यांचा शोध लागत नव्हता. रुग्णालयातून बाहेर पडताना नातेवाइकांनी अधीक्षक डॉ. फडणीस व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले. केवळ मनोरुग्णालयामुळे आपली आई तब्बल तीस वर्षांनी सुस्थितीत मिळाल्याचा आनंद त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर होता. या क्षणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनासुद्धा अश्रू आवरता आले नाहीत.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सायदाला मिळाली तीस वर्षांनंतर मायेची ऊब येरवडा - सायदा एक वर्षाची असताना तिची आई हरवली होती. शोध घेऊनही सापडली नसल्याने कुटुंबीयांनी त्या परतण्याची आशा सोडली. पण येरवड्यातील मनोरुग्णालयाच्या प्रयत्नामुळे तीस वर्षांनंतर सायदाला आईच्या मायेची ऊब मिळाली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आसाम येथील हमिदा बेगम तीस वर्षांपूर्वी हरविल्या होत्या. रुग्णालयातील औषधोपचार, येथील समाजसेवक व आसाम पोलिसांच्या प्रयत्नातून हमिदा यांना त्यांची मुलगी सायदा सुलतान मिळाली. आईला घेण्यासाठी सायदा आपला मामेभाऊ अलिमुद्दीन यांच्यासह आल्या होत्या. मायलेकीच्या भेटीमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनासुद्धा अश्रू अनावर झाले. मुलगी सायदा एक वर्षाची असताना हमिदा बेगम उदाली (जि. लंका, रा. आसाम) येथून हरविल्या होत्या. त्या मुंबईतील एका रेल्वे स्थानकावर सापडल्या. पोलिसांनी त्यांना १९८९ मध्ये ठाण्यातील मनोरुग्णालयात दाखल केले. जून २०१९ मध्ये त्यांना येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजित फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जयसिंह इंगळे, समाजसेवक मारुती दुनगे तेथील रुग्णांशी चर्चा करून नाव, पत्ता शोधत होते. वैद्यकीय उपचार व समुपदेशनामुळे हमिदा यांची मानसिकता सुधारत होती. समुपदेशनामध्ये त्या आसाममधील असल्याची जुजबी माहिती दिली. त्यावरून दुनगे यांनी तेथील पोलिसांशी संपर्क साधून नातेवाइकांना याची माहिती दिली. त्यानंतर दुनगे यांनी हमिदा यांचे भाऊ अल्लीमउद्दीन यांच्याशी व्हिडिओ कॉन्फन्सवर संवाद साधला. अल्लीमउद्दीन यांनी तीस वर्षांपूर्वी हरविलेल्या बहिणीला ओळखले. त्यांनी तत्काळ भाची सायदा यांच्यासह पुणे गाठले.  हमिदा यांना पाहताच मुलीचा मायेचा बांध फुटला. सर्वत्र चौकशी केल्यानंतरही हमिदा यांचा शोध लागत नव्हता. रुग्णालयातून बाहेर पडताना नातेवाइकांनी अधीक्षक डॉ. फडणीस व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले. केवळ मनोरुग्णालयामुळे आपली आई तब्बल तीस वर्षांनी सुस्थितीत मिळाल्याचा आनंद त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर होता. या क्षणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनासुद्धा अश्रू आवरता आले नाहीत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 27, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TfFNru
Read More
आईच माझा कंफर्ट झोन 

मेमॉयर्स : 
माझ्या आयुष्यात ज्या व्यक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, ती म्हणजे माझी आई - डॉ. स्वाती दैठणकर. मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते; कारण मला माझ्या आईमध्येच माझा गुरू मिळाला. जन्मल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिची साथ आणि मार्गदर्शन मला मोलाचे ठरले. मी तिचा रियाज बघतच लहानाची मोठी झाले आणि नृत्याची गोडी कधी आणि कशी निर्माण झाली हे कळलेच नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आईने कधीच माझ्यावर कोणतीच बंधने लादली नाहीत. तिचे प्रोत्साहन आणि खंबीर साथ कायम होतीच. त्यामुळे तिने कोणताही उपदेश न करता स्वतःच्या वागणुकीतून तिचा आदर्श माझ्यापुढे घालून दिला. घर आणि मुलांचे संगोपन उत्तमरीत्या सांभाळून स्वतःचे उदाहरण माझ्यासमोर ठेवले. माझे वडील संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर, तर आई नृत्यांगना. अशा वलयांकित आई-वडिलांची मुले असणे जितके भाग्याचे तितकेच जबाबदारीचे आहे, याची मला कल्पना आहे. त्यांच्या प्रभावातून वेगळे होऊन स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणे अवघड असते, पण आईने दिलेले विचार आणि निर्णय स्वातंत्र्यामुळेच मी वेगवेगळी क्षेत्रे अजमावून पाहत आहे. 

आईच नृत्यगुरू असल्याने तिचा २४ तास सहवास मला मिळाला. फक्त नृत्य शिक्षणापुरता सहवास सीमित न राहता तिची दिनचर्या, देश-विदेशातील कार्यक्रम, प्रवास यांची जवळून ओळख झाली. नृत्यकलाकार कसा असावा, त्याचबरोबर एक माणूस कसा असावा याची ओळख झाली. तिचा माझ्यावर अफाट विश्‍वास आहे, त्यानेही मला बळ मिळते व नवनवीन गोष्टी करण्यास मी प्रवृत्त होते. आपण आईशी मनमोकळेपणाने काही गोष्टी शेअर करतो, तर कधी भांडतोसुद्धा. माझ्या बाबतीत काही वेगळे नाही. आई हा माझा कंफर्ट झोन आहे. कधीकधी काही न बोलताही तिला माझ्या मनातल्या गोष्टी कळतात. माझ्या मालिका सुरू असताना स्वतःचे दौरे सांभाळून माझ्या झोपेची, खाण्यापिण्याची काळजी करताना ती आई असायची, तर अभिनयाचे बारकावे समजावून सांगताना गुरू असायची. असा ‘स्वीच ऑन- स्वीच ऑफ’ पण तिला मस्त जमतो. अनेकदा भारताबाहेरही तिच्याबरोबर नृत्य करायची संधी मिळाली. त्यातील जपानच्या टूरमध्ये आम्ही एन्जॉय केलेला ‘we time’ विशेष लक्षात राहिला. माझ्या हातून तिला प्रेरणा पुरस्कार देताना विशेष आनंद झाला. माझ्या बाबतीत आईचे पारडे कायमच जड राहील आणि आज मी जे काही आहे ते केवळ आईच्या शिकवणीमुळे. असे कधी विचार करून तिच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या जात नाहीत; पण आज मी हे औचित्य साधून तिला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना करते.  

(शब्दांकन - अरुण सुर्वे)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आईच माझा कंफर्ट झोन  मेमॉयर्स :  माझ्या आयुष्यात ज्या व्यक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, ती म्हणजे माझी आई - डॉ. स्वाती दैठणकर. मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते; कारण मला माझ्या आईमध्येच माझा गुरू मिळाला. जन्मल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिची साथ आणि मार्गदर्शन मला मोलाचे ठरले. मी तिचा रियाज बघतच लहानाची मोठी झाले आणि नृत्याची गोडी कधी आणि कशी निर्माण झाली हे कळलेच नाही. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आईने कधीच माझ्यावर कोणतीच बंधने लादली नाहीत. तिचे प्रोत्साहन आणि खंबीर साथ कायम होतीच. त्यामुळे तिने कोणताही उपदेश न करता स्वतःच्या वागणुकीतून तिचा आदर्श माझ्यापुढे घालून दिला. घर आणि मुलांचे संगोपन उत्तमरीत्या सांभाळून स्वतःचे उदाहरण माझ्यासमोर ठेवले. माझे वडील संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर, तर आई नृत्यांगना. अशा वलयांकित आई-वडिलांची मुले असणे जितके भाग्याचे तितकेच जबाबदारीचे आहे, याची मला कल्पना आहे. त्यांच्या प्रभावातून वेगळे होऊन स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणे अवघड असते, पण आईने दिलेले विचार आणि निर्णय स्वातंत्र्यामुळेच मी वेगवेगळी क्षेत्रे अजमावून पाहत आहे.  आईच नृत्यगुरू असल्याने तिचा २४ तास सहवास मला मिळाला. फक्त नृत्य शिक्षणापुरता सहवास सीमित न राहता तिची दिनचर्या, देश-विदेशातील कार्यक्रम, प्रवास यांची जवळून ओळख झाली. नृत्यकलाकार कसा असावा, त्याचबरोबर एक माणूस कसा असावा याची ओळख झाली. तिचा माझ्यावर अफाट विश्‍वास आहे, त्यानेही मला बळ मिळते व नवनवीन गोष्टी करण्यास मी प्रवृत्त होते. आपण आईशी मनमोकळेपणाने काही गोष्टी शेअर करतो, तर कधी भांडतोसुद्धा. माझ्या बाबतीत काही वेगळे नाही. आई हा माझा कंफर्ट झोन आहे. कधीकधी काही न बोलताही तिला माझ्या मनातल्या गोष्टी कळतात. माझ्या मालिका सुरू असताना स्वतःचे दौरे सांभाळून माझ्या झोपेची, खाण्यापिण्याची काळजी करताना ती आई असायची, तर अभिनयाचे बारकावे समजावून सांगताना गुरू असायची. असा ‘स्वीच ऑन- स्वीच ऑफ’ पण तिला मस्त जमतो. अनेकदा भारताबाहेरही तिच्याबरोबर नृत्य करायची संधी मिळाली. त्यातील जपानच्या टूरमध्ये आम्ही एन्जॉय केलेला ‘we time’ विशेष लक्षात राहिला. माझ्या हातून तिला प्रेरणा पुरस्कार देताना विशेष आनंद झाला. माझ्या बाबतीत आईचे पारडे कायमच जड राहील आणि आज मी जे काही आहे ते केवळ आईच्या शिकवणीमुळे. असे कधी विचार करून तिच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या जात नाहीत; पण आज मी हे औचित्य साधून तिला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना करते.   (शब्दांकन - अरुण सुर्वे) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 27, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/397avKl
Read More
भीषण ! ३२ वार करत पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीचा खेळ केला खल्लास...

नवी मुंबई - उरणच्या चिरनेर हद्दीतील टाकिगाव बस स्थानक रानसई मार्गावर मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खुनाचा तपास उरण पोलिसांनी अवघ्या अठरा तासात पूर्ण केला आहे. या खून प्रकरणी दोन महिलांना अटक केली असून एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रानसई मार्गावर सोमवारी (ता.24) एका उकिरड्यावर  महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेचा धारधार शस्त्राने खून केल्याचे निदर्शनात आल्याने उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनखली उरण पोलिसांनी तपास सुरु केला. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेच्या शरीरावर एक दोन नव्हे तब्बल ३२ वार करण्यात आले होते.

मोठी बातमी - तुम्ही योग्य पार्टनरसोबत आहात की 'ही' आहे धोक्याची घंटा, असं ओळखा; आधी वाचा नंतर धन्यवाद द्या!

या महिलेच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल झाले होते. यानंतर व्हायरल फोटोवरून तिच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात जाऊन मृतदेहाची ओळख पटवली होती. त्यानंतर अवघ्या 18 तासात हा तपास पूर्ण करून पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, मृत महिला जया तुकाराम घाणेकर हिचे पती मयत झाल्यानंतर मुक्तार हुसेन अली संग्राम यांच्या सोबत प्रेम विवाहातून लग्न झाले होते; मात्र त्याची पहिल्या पत्नीला ते अमान्य होतं. त्यामुळे आरोपी महिला आणि मयत महिला या दोघींचे नेहमीच वाद होत असे. अखेर आरोपीने तिची मुलगी व मित्रासोबत संगनमताने जया हिचा खून केला. तसेच मानसरोवर येथील घरातून चिरनेर रसत्यावर मृतदेह फेकून दिला; मात्र उरण पोलिसांनी दोन महिला आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपीचा मित्राचा शोध सुरु आहे.

मोठी बातमी -  फक्त 'हे' कानातले घाला मग मुलींनो तुमची छेड काढण्यास कुणीही धजावणार नाही...
 
या गुन्हाचा तपासामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदीश कुलकर्णी आणि पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी काठे, कावळे, वृषाली पवार, पोलिस उप निरीक्षक अनिल चव्हाण, गोपनीय विभागातील सचिन केकरे, संतोष मोहिते, संजय कुथे, सुनील मोहिते, पुषोत्तम मराडे, उमेश कराले, घनश्‍याम पाटील, पोलिस हवलदार नीता डाउर यांनी अधिक मेहनत घेतली. 

ex wife took revenge from current wife attacked with sharp tool 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

भीषण ! ३२ वार करत पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीचा खेळ केला खल्लास... नवी मुंबई - उरणच्या चिरनेर हद्दीतील टाकिगाव बस स्थानक रानसई मार्गावर मृत अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खुनाचा तपास उरण पोलिसांनी अवघ्या अठरा तासात पूर्ण केला आहे. या खून प्रकरणी दोन महिलांना अटक केली असून एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रानसई मार्गावर सोमवारी (ता.24) एका उकिरड्यावर  महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेचा धारधार शस्त्राने खून केल्याचे निदर्शनात आल्याने उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनखली उरण पोलिसांनी तपास सुरु केला. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेच्या शरीरावर एक दोन नव्हे तब्बल ३२ वार करण्यात आले होते. मोठी बातमी - तुम्ही योग्य पार्टनरसोबत आहात की 'ही' आहे धोक्याची घंटा, असं ओळखा; आधी वाचा नंतर धन्यवाद द्या! या महिलेच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल झाले होते. यानंतर व्हायरल फोटोवरून तिच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात जाऊन मृतदेहाची ओळख पटवली होती. त्यानंतर अवघ्या 18 तासात हा तपास पूर्ण करून पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे.   पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, मृत महिला जया तुकाराम घाणेकर हिचे पती मयत झाल्यानंतर मुक्तार हुसेन अली संग्राम यांच्या सोबत प्रेम विवाहातून लग्न झाले होते; मात्र त्याची पहिल्या पत्नीला ते अमान्य होतं. त्यामुळे आरोपी महिला आणि मयत महिला या दोघींचे नेहमीच वाद होत असे. अखेर आरोपीने तिची मुलगी व मित्रासोबत संगनमताने जया हिचा खून केला. तसेच मानसरोवर येथील घरातून चिरनेर रसत्यावर मृतदेह फेकून दिला; मात्र उरण पोलिसांनी दोन महिला आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपीचा मित्राचा शोध सुरु आहे. मोठी बातमी -  फक्त 'हे' कानातले घाला मग मुलींनो तुमची छेड काढण्यास कुणीही धजावणार नाही...   या गुन्हाचा तपासामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदीश कुलकर्णी आणि पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी काठे, कावळे, वृषाली पवार, पोलिस उप निरीक्षक अनिल चव्हाण, गोपनीय विभागातील सचिन केकरे, संतोष मोहिते, संजय कुथे, सुनील मोहिते, पुषोत्तम मराडे, उमेश कराले, घनश्‍याम पाटील, पोलिस हवलदार नीता डाउर यांनी अधिक मेहनत घेतली.  ex wife took revenge from current wife attacked with sharp tool  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 27, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3cdEwtO
Read More
#BUDGET2020 : सोलापूर महापालिका अंदाजपत्रकावर `या` दिवशी चर्चा  

सोलापूर :  महापालिका अंदाजपत्रक आढावा बैठक 6 ते 11 मार्च या कालावधीत होणार आहे. पहिल्या दिवशी कर आकारणी व कर संकलन विभाग, हद्दवाढ, गलिच्छ वस्ती सुधारणा आणि स्थानिक संस्था कर विभागाचा आढावा होणार आहे. 

हेही वाचा - साम टीव्ही नंबर वन...

बैठकांचे वेळापत्रक ः भूमी व मालमत्ता अधिकारी, उद्यान अधीक्षक, मंडई (सात मार्च), नगर अभियंता, सहायक संचालक नगर रचना, सार्वजनिक आरोग्य अभियंता, पाणीपुरवठा व ड्रेनेज (आठ मार्च), आरोग्याधिकारी, घनकचरा विभाग, नागरी समुदाय विकास प्रकल्प, क्रीडाधिकारी, महिला व बालकल्याण विभाग (नऊ मार्च), विभागीय कार्यालय क्रमांक एक ते आठ (10 मार्च) आणि नगरसचिव, मुख्य लेखापरीक्षक, परिवहन उपक्रम व शिक्षण मंडळ (11 मार्च). या सर्व बैठकांना मुख्य लेखापालांनी उपस्थित राहावे, अशी सूचना करण्यात आली आहे. 

 कोणत्याही करात वाढ नाही 
पाणीपट्टीसह कोणत्याही करामध्ये वाढीची शिफारस नसलेले 2020-21 साठीचे 704 कोटी 21 लाख 97 हजार 410 रुपयांचे प्रशासकीय अंदाजपत्रक शनिवारी नगरसचिव कार्यालयास सादर करण्यात आले. स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने अधिनियमातील कलम 35 (अ) नुसार हे अंदाजपत्रक नगरसचिवांमार्फत सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आले आहे. सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकामध्ये महसूली विभागातून 516 कोटी 32 लाख 21 हजार 401 रुपये, तर भांडवली विभागातून 187 कोटी 89 लाख 76 हजार रुपये असे एकूण 704 कोटी 21 कोटी 97 लाख 401 रुपये अपेक्षित धरण्यात आले आहे. महसूली विभागातून 438 कोटी 73 लाख रुपये, पाणीपुरवठा विभागाकडून 77 लाख 55 हजार रुपये उत्पन्न अपेक्षित धरले आहे. महसूली विभागाच्या खर्चामध्ये 412 कोटी 53 लाख रुपये आणि पाणीपुरवठा विभागावरील खर्च 77 कोटी 55 लाख रुपये अपेक्षित धरण्यात आला आहे. भांडवली विभागातून 47 कोटी 45 लाख रुपयांची भांडवली कामे करण्यात येणार आहेत. तर अनुदानातून 140 कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत. 

असे मिळेल उत्पन्न ः महापालिका कर (97 कोटी 28 लाख), निश्‍चित महसुली उत्पन्न (9 कोटी 10 लाख), महापालिका मालमत्तेपासून उत्पन्न (12 कोटी 70 लाख), शुल्क आणि वापरकर्ता शुल्क (99 कोटी 79 लाख), विक्री आणि भाडे (1 कोटी 2 लाख), महसुली अनुदान (218 कोटी 62 लाख), गुंतवणुकीतून उत्पन्न (10 लाख), दिलेल्या कर्जावरील व्याज (पाच लाख), इतर उत्पन्न (7 लाख), पाणीपुरवठा उत्पन्न (77 कोटी 55 लाख) असे एकूण (516 कोटी 29 लाख, 64 हजार रुपये) 

असा होईल खर्च ः पगार व भत्ते (207 कोटी 19 लाख), निवृत्तीवेतन व कुटुंब वेतन (75 कोटी 86 लाख), प्रशासकीय खर्च (12 कोटी 49 लाख), देखभाल व दुरुस्ती (50 कोटी 10 लाख), घेतलेल्या व घ्यावयाच्या कर्जावरील व्याज (5 कोटी 80 लाख), कार्यक्रम व योजनांवरील खर्च (29 कोटी 24 लाख), महसुली अनुदाने, देणग्या, योगदाने (9 कोटी 45 लाख), घसारा निधी (15 लाख), महसूली निधीतून वर्ग (44 कोटी 20 लाख), स्थिर मालमत्ता (3 कोटी 98 लाख), कर्जे (25 लाख), पाणीपुरवठा (77 कोटी 55 लाख) असे एकूण (516 कोटी 29 लाख, 64 हजार रुपये). 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

#BUDGET2020 : सोलापूर महापालिका अंदाजपत्रकावर `या` दिवशी चर्चा   सोलापूर :  महापालिका अंदाजपत्रक आढावा बैठक 6 ते 11 मार्च या कालावधीत होणार आहे. पहिल्या दिवशी कर आकारणी व कर संकलन विभाग, हद्दवाढ, गलिच्छ वस्ती सुधारणा आणि स्थानिक संस्था कर विभागाचा आढावा होणार आहे.  हेही वाचा - साम टीव्ही नंबर वन... बैठकांचे वेळापत्रक ः भूमी व मालमत्ता अधिकारी, उद्यान अधीक्षक, मंडई (सात मार्च), नगर अभियंता, सहायक संचालक नगर रचना, सार्वजनिक आरोग्य अभियंता, पाणीपुरवठा व ड्रेनेज (आठ मार्च), आरोग्याधिकारी, घनकचरा विभाग, नागरी समुदाय विकास प्रकल्प, क्रीडाधिकारी, महिला व बालकल्याण विभाग (नऊ मार्च), विभागीय कार्यालय क्रमांक एक ते आठ (10 मार्च) आणि नगरसचिव, मुख्य लेखापरीक्षक, परिवहन उपक्रम व शिक्षण मंडळ (11 मार्च). या सर्व बैठकांना मुख्य लेखापालांनी उपस्थित राहावे, अशी सूचना करण्यात आली आहे.   कोणत्याही करात वाढ नाही  पाणीपट्टीसह कोणत्याही करामध्ये वाढीची शिफारस नसलेले 2020-21 साठीचे 704 कोटी 21 लाख 97 हजार 410 रुपयांचे प्रशासकीय अंदाजपत्रक शनिवारी नगरसचिव कार्यालयास सादर करण्यात आले. स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने अधिनियमातील कलम 35 (अ) नुसार हे अंदाजपत्रक नगरसचिवांमार्फत सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आले आहे. सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकामध्ये महसूली विभागातून 516 कोटी 32 लाख 21 हजार 401 रुपये, तर भांडवली विभागातून 187 कोटी 89 लाख 76 हजार रुपये असे एकूण 704 कोटी 21 कोटी 97 लाख 401 रुपये अपेक्षित धरण्यात आले आहे. महसूली विभागातून 438 कोटी 73 लाख रुपये, पाणीपुरवठा विभागाकडून 77 लाख 55 हजार रुपये उत्पन्न अपेक्षित धरले आहे. महसूली विभागाच्या खर्चामध्ये 412 कोटी 53 लाख रुपये आणि पाणीपुरवठा विभागावरील खर्च 77 कोटी 55 लाख रुपये अपेक्षित धरण्यात आला आहे. भांडवली विभागातून 47 कोटी 45 लाख रुपयांची भांडवली कामे करण्यात येणार आहेत. तर अनुदानातून 140 कोटी रुपयांची कामे केली जाणार आहेत.  असे मिळेल उत्पन्न ः महापालिका कर (97 कोटी 28 लाख), निश्‍चित महसुली उत्पन्न (9 कोटी 10 लाख), महापालिका मालमत्तेपासून उत्पन्न (12 कोटी 70 लाख), शुल्क आणि वापरकर्ता शुल्क (99 कोटी 79 लाख), विक्री आणि भाडे (1 कोटी 2 लाख), महसुली अनुदान (218 कोटी 62 लाख), गुंतवणुकीतून उत्पन्न (10 लाख), दिलेल्या कर्जावरील व्याज (पाच लाख), इतर उत्पन्न (7 लाख), पाणीपुरवठा उत्पन्न (77 कोटी 55 लाख) असे एकूण (516 कोटी 29 लाख, 64 हजार रुपये)  असा होईल खर्च ः पगार व भत्ते (207 कोटी 19 लाख), निवृत्तीवेतन व कुटुंब वेतन (75 कोटी 86 लाख), प्रशासकीय खर्च (12 कोटी 49 लाख), देखभाल व दुरुस्ती (50 कोटी 10 लाख), घेतलेल्या व घ्यावयाच्या कर्जावरील व्याज (5 कोटी 80 लाख), कार्यक्रम व योजनांवरील खर्च (29 कोटी 24 लाख), महसुली अनुदाने, देणग्या, योगदाने (9 कोटी 45 लाख), घसारा निधी (15 लाख), महसूली निधीतून वर्ग (44 कोटी 20 लाख), स्थिर मालमत्ता (3 कोटी 98 लाख), कर्जे (25 लाख), पाणीपुरवठा (77 कोटी 55 लाख) असे एकूण (516 कोटी 29 लाख, 64 हजार रुपये).  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

February 27, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/389rVoa
Read More
मुंबईत दंगल रोखणाऱ्या मोहल्ला कमिटीचं काम कसं चालतं?
'तान्हाजी' के बाद 2020 की अगली ब्लॉकबस्टर- बागी 3 या सूर्यवंशी- BOX OFFICE रिपोर्ट

'तान्हाजी' के बाद 2020 की अगली ब्लॉकबस्टर- बागी 3 या सूर्यवंशी- BOX OFFICE रिपोर्ट

February 27, 2020 0 Comments
साल 2020 के दो महीने खत्म होने को हैं और बॉक्स ऑफिस पर अब तक सिर्फ एक बॉलीवुड फिल्म ब्लॉकबस्टर रही है। अजय देवगन की तान्हाजी के अलावा सभी फि...
Read More
Box Office: ओवरसीज में आयुष्मान खुराना के शुभ मंगल की करोड़ों की कमाई, कलेक्शन रिपोर्ट !

Box Office: ओवरसीज में आयुष्मान खुराना के शुभ मंगल की करोड़ों की कमाई, कलेक्शन रिपोर्ट !

February 27, 2020 0 Comments
शुभ मंगल ज्यादा सावधान के साथ आयुष्मान खुराना एक बार फिर से कमाई बटोर रहे हैं। हालांकि अपनी बीती फिल्मों से आयुष्मान इस बार कमाई के मामले मे...
Read More
BOX OFFICE: बॉलीवुड की 11वीं सबसे बड़ी फिल्म बनी अजय देवगन की 'तान्हाजी'- जानें रिपोर्ट

BOX OFFICE: बॉलीवुड की 11वीं सबसे बड़ी फिल्म बनी अजय देवगन की 'तान्हाजी'- जानें रिपोर्ट

February 27, 2020 0 Comments
अजय देवगन की फिल्म तान्हाजी को रिलीज हुए सात हफ्ते हो चुके हैं और फिल्म अभी कमाई कर रही है। अब तक तान्हाजी 276.90 करोड़ का आंकड़ा पार कर चुक...
Read More
BOX OFFICE: विकी कौशल की 'भूत' का ठंडा रहा वीकेंड कलेक्शन- जानें रविवार की कमाई

BOX OFFICE: विकी कौशल की 'भूत' का ठंडा रहा वीकेंड कलेक्शन- जानें रविवार की कमाई

February 27, 2020 0 Comments
विकी कौशल की पहली हॉरर फिल्म भूत ने जहां शुक्रवार को एवरेज शुरुआत की थी, वहीं वीकेंड पर भी बॉक्स ऑफिस कलेक्शन में कुछ खास बढ़ोतरी नहीं दिखी।...
Read More